2 UDB मी जावे असे देवाने मला प्रगट केले, म्हणून मी गेलो. ज्याप्रमाणे मी पूर्वी यहूदीतर लोकांमध्ये सुवार्ता सांगितली तशी मी खाजगीपणे पुढाऱ्यांच्या सभेत सुध्दा सुवार्ता सांगितली. यासाठी की, भूतकाळातील किंवा चालू स्थितीला माझे काम व्यर्थ जाऊ नये. BSB BSB: I went in response to a revelation and set before them the gospel that I preach among the Gentiles. But I spoke privately to those recognized as leaders, for fear that I was running or had already run in vain.
3 UDB त्याचा परिणाम असा झाला की, तीत, जो माझ्याबरोबर होता, तो ग्रीक असतानाही त्याला सुंता करवून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. BSB BSB: Yet not even Titus, who was with me, was compelled to be circumcised, even though he was a Greek.
4 UDB कारण ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले ते हेरण्यासाठी व आम्हांला गुलाम करता यावे म्हणून ज्या खोट्या विश्वासणाऱ्यांना आत आणण्यात आले त्यामुळे हे झाले. BSB BSB: This issue arose because some false brothers had come in under false pretenses to spy on our freedom in Christ Jesus, in order to enslave us.
5 UDB सुवार्तेमधील सत्य तुमच्या जवळच राहावे म्हणून आम्ही क्षणभर देखील त्यांना वश झालो नाही. BSB BSB: We did not give in to them for a moment, so that the truth of the gospel would remain with you.
6 UDB जे लोक महत्त्वाचे आहेत असे लोक समजत होते त्यांच्याकडून मला काहीही मिळाले नाही. जे कोणी ते होते त्यांच्यामुळे मला काही फरक पडला नाही; सर्व माणसे देवासमोर सारखीच आहेत. काहीही असो, त्या प्रतिष्ठीत माणसांनी माझ्यामध्ये किंवा माझ्या संदेशांमध्ये कोणतीही भर टाकली नाही. BSB BSB: But as for the highly esteemed—whatever they were makes no difference to me; God does not show favoritism—those leaders added nothing to me.
7 UDB उलट, जेव्हा ते म्हणतात की, विदेशी लोकांना सुवार्ता सांगण्याचे कार्य माझ्यावर सोपविण्यात आले आहे, ज्याप्रमाणे पेत्राला यहूदी लोकांना सुवार्ता सांगण्याचे कार्य सोपविलेले आहे. BSB BSB: On the contrary, they saw that I had been entrusted to preach the gospel to the uncircumcised, just as Peter had been to the circumcised.
8 UDB कारण ज्याने पेत्राला यहूदी लोकांकरिता प्रेषित बनविले त्यानेच मला विदेशी लोकांकरिता प्रेषित बनविले. BSB BSB: For the One who was at work in Peter’s apostleship to the circumcised was also at work in my apostleship to the Gentiles.
10 UDB त्यांनी फक्त हेच सांगितले की, त्यांच्या गरिबांना मदत करण्याची आम्ही आठवण ठेवावी, आणि मी ते सर्व करण्यास राजी होतो एवढेच नव्हे तर ते करण्यास अधीर झालो होतो. BSB BSB: They only asked us to remember the poor, the very thing I was eager to do.
11 UDB पण, जेव्हा पेत्र अंत्युखियात आला तेव्हा मी त्याला उघडपणे विरोध केला, कारण त्याने स्पष्टपणे चूक केली होती. BSB BSB: When Cephas came to Antioch, however, I opposed him to his face, because he stood condemned.
12 UDB कारण याकोबाने पाठविलेली काही माणसे येण्यापूर्वी पेत्र विदेशी लोकांबरोबर जेवत असे. पण जेव्हा ते (याकोबाने पाठविलेले यहूदी) आले तेव्हा त्याने अंग काढून घेतले आणि तो विदेशी लोकांपासून वेगळा झाला, कारण या यहूदी लोकांचा विश्वास होता की, विदेशी माणसांची सुंता झालीच पाहिजे, म्हणून त्यांची त्याला भीती वाटत होती. BSB BSB: For before certain men came from James, he used to eat with the Gentiles. But when they arrived, he began to draw back and separate himself, for fear of those in the circumcision group.
13 UDB व बाकीचे यहूदी लोकसुद्धा त्याच्या ढोंगामध्ये सामील झाले, येथपर्यंत की, बर्णबासुद्धा त्यांच्या ढोंगाला वश झाला. BSB BSB: The other Jews joined him in his hypocrisy, so that by their hypocrisy even Barnabas was led astray.
14 UDB जेव्हा मी पाहिले की, सुवार्तेच्या सत्याच्या सरळ मार्गात ते योग्य प्रकारे वागत नाहीत, तेव्हा मी सर्वांसमोर पेत्राला म्हणालो, “जर तू तो यहूदी आहेस व यहूदीतरांप्रमाणे वागत आहेस व यहूदी माणसांप्रमाणे वागत नाहीस तर तू विदेशी लोकांना यहूदी लोकांच्या चालीरीतींचे अनुकरण करण्यास त्यांना कसे भाग पाडू शकतोस?” BSB BSB: When I saw that they were not walking in line with the truth of the gospel, I said to Cephas in front of them all, “If you, who are a Jew, live like a Gentile and not like a Jew, how can you compel the Gentiles to live like Jews?”
15 UDB आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि “पापी यहूदीतर लोकांपैकी” नाही. BSB BSB: We who are Jews by birth and not Gentile “sinners”
16 UDB तरीही आम्हांला माहीत होते की, मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने ठरतो, म्हणून आम्ही आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर ठेवला आहे. यासाठी की, ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण कोणीही देहधारी मनुष्य नियमाशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरणार नाही. BSB BSB: know that a man is not justified by works of the law, but by faith in Jesus Christ. So we, too, have believed in Christ Jesus, that we may be justified by faith in Christ and not by works of the law, because by works of the law no one will be justified.
17 UDB पण जर, आम्ही ख्रिस्तामध्ये नीतिमान होण्याचे पाहतो, तर आम्ही यहूदीसुद्धा विदेश्यांप्रमाणे पापी असे आढळतो. याचा अर्थ असा आहे की, ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? BSB BSB: But if, while we seek to be justified in Christ, we ourselves are found to be sinners, does that make Christ a minister of sin? Certainly not!
18 UDB अर्थातच नाही! कारण जर मी सोडून दिलेल्या या पद्धतीप्रमाणे पुन्हा शिकविण्यास सुरूवात केली, तर मी नियमशास्त्र मोडणारा होतो. BSB BSB: If I rebuild what I have already torn down, I prove myself to be a lawbreaker.
19 UDB कारण नियमशास्त्रामुळे मी नियमशास्त्राला “मेलो” यासाठी की मी देवासाठी जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेलो. BSB BSB: For through the law I died to the law so that I might live to God.
20 UDB यासाठी की यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, आता देहामध्ये जे जीवन मी जगतो ते मी ज्याने माझ्यावर प्रीती केली आणि माझ्या ऐवजी स्वत:ला दिले त्या देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो. BSB BSB: I have been crucified with Christ, and I no longer live, but Christ lives in me. The life I live in the body, I live by faith in the Son of God, who loved me and gave Himself up for me.
21 UDB मी देवाची कृपा नाकारीत नाही. कारण जर नीतिमत्व नियम शास्त्रामुळे मिळत असेल तर ख्रिस्त विनाकारण मरण पावला. BSB BSB: I do not set aside the grace of God. For if righteousness comes through the law, then Christ died for nothing.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.