1 UDB एके दिवशी येशू एका निश्चित ठिकाणी प्रार्थना करीत होता. त्याने प्रार्थना संपविली तेव्हा त्याचा एक शिष्य त्याला म्हणाला, “प्रभूजी, योहानाने त्याच्या शिष्यांना शिकवले तसेच, आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही काय बोलावे ते आम्हांस शिकवा!” BSB BSB: One day in a place where Jesus had just finished praying, one of His disciples requested, “Lord, teach us to pray, just as John taught his disciples.”
2 UDB तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा अशा पध्दतीच्या गोष्टी बोला: ‘हे पित्या, सर्व लोक तुझ्या नामाचा पवित्र म्हणून आदर करावे. सगळीकडील सर्व लोकांवर लवकरच तू राज्य करावे. BSB BSB: So Jesus told them, “When you pray, say: ‘Father, hallowed be Your name. Your kingdom come.
3 UDB आम्हांला दररोज आवश्यक असलेले अन्न कृपया देत जा. BSB BSB: Give us each day our daily bread.
4 UDB आम्ही आमच्या विरुध्द लोक ज्या वाईट गोष्टी करतात त्याबद्दल आम्ही त्यांना क्षमा करतो, त्याचरीतिने आम्ही केलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल आम्हांला कृपया माफ करत जा. आम्ही मोहात पडतो तेव्हा आम्ही पाप करू नये म्हणून मदत कर.’” BSB BSB: And forgive us our sins, for we also forgive everyone who sins against us. And lead us not into temptation.’”
5 UDB मग तो त्यांना म्हणाला, “समजा तुमच्यापैकी एकजण मध्यरात्री आपल्या एका मित्राच्या घरी गेला. समजा तुम्ही बाहेर उभे राहिला आणि त्याला बाहेर येण्यासाठी बोलावले, ‘माझ्या मित्रा, कृपया मला तीन भाकरी उसन्या दे! BSB BSB: Then Jesus said to them, “Suppose one of you goes to his friend at midnight and says, ‘Friend, lend me three loaves of bread,
6 UDB माझा दुसरा एक मित्र जो प्रवास करून आताच माझ्या घरी आला आहे, परंतु त्याला देण्यासाठी माझ्याकडे अन्न तयार नाही!’ BSB BSB: because a friend of mine has come to me on a journey, and I have nothing to set before him.’
7 UDB समजा तुम्हांला तो घराच्या आतून उत्तर देत असेल की, ‘मला त्रास देऊ नकोस! दार बंद केले आहेत आणि माझे सर्व कुटूंब अंथरुणावर आहेत. त्यामुळे मी उठून तुला काही देऊ शकत नाही!’ BSB BSB: And suppose the one inside answers, ‘Do not bother me. My door is already shut, and my children and I are in bed. I cannot get up to give you anything.’
8 UDB मी तुम्हास सांगतो, जरी त्याला उठायचे नसेल आणि तुम्ही त्याचे मित्र असूनही त्याला तुम्हांला काही अन्न द्यायचे नसेल. परंतु तुम्ही तिथेच राहून त्याला सतत मागीतल्यामुळे, तो लगेच उठेल आणि जे काही तुमची गरज असेल तो देईल. BSB BSB: I tell you, even though he will not get up to provide for him because of his friendship, yet because of the man’s persistence, he will get up and give him as much as he needs.
9 UDB म्हणून मी तुम्हांला हे सांगतो: आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्यासाठी देवाला विनंती करत राहा, आणि तो ती तुम्हांला देईल. त्याची इच्छा शोधत राहा आणि तो ती तुम्हांला दाखवील. दरवाजा ठोठावण्याप्रमाणे देवाकडे प्रार्थना लगेच करीत राहा, आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली ते प्राप्त करण्यासाठीचे मार्ग तो तुमच्यासाठी उघडेल. BSB BSB: So I tell you: Ask, and it will be given to you; seek, and you will find; knock, and the door will be opened to you.
10 UDB लक्षात ठेवा की, जो कोणी मागतो त्यास मिळेल जो कोणी शोधतो त्याला सापडेल, आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. BSB BSB: For everyone who asks receives; he who seeks finds; and to him who knocks, the door will be opened.
11 UDB तुमच्यापैकी कोणा एकाच्या मुलाने खाण्याकरिता एक मासा तुम्हांला मागीतला असता, तेव्हा तू त्याला एक विषारी साप देशील का? कदापी देणार नाहीस; BSB BSB: What father among you, if his son asks for a fish, will give him a snake instead?
12 UDB आणि त्याने एक अंडे मागीतले, तेव्हा तू त्याला विंचू देशील का? कदापी देणार नाहीस. BSB BSB: Or if he asks for an egg, will give him a scorpion?
13 UDB तुम्ही लोक पापी असुनही, आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे तुम्हांला कळते. त्यामुळे हे अजून निश्चित आहे तुम्ही त्याला पवित्र आत्मा देण्यास सांगितले तर तुमचा स्वर्गातील पिता पवित्र आत्मा तुम्हांला देईल.” BSB BSB: So if you who are evil know how to give good gifts to your children, how much more will your Father in heaven give the Holy Spirit to those who ask Him!”
14 UDB एके दिवशी तिथे एक मनुष्य होता जो बोलू शकत नव्हता, कारण एका भूताने त्याला वश केले होते., येशूने त्या भूताला जबरदस्तीने बाहेर काढल्यानंतर, तो मनुष्य बोलू लागला. तिथे असलेले बहुतेक लोक आश्चर्यचकित झाले. BSB BSB: One day Jesus was driving out a demon that was mute. And when the demon was gone, the man who had been mute spoke. The crowds were amazed,
15 UDB परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले, “भूतांचा शासक, जो बालजबूल, भुते बाहेर काढण्यासाठी ह्या मनुष्याला सक्षम करतो!” BSB BSB: but some of them said, “It is by Beelzebul, the prince of the demons, that He drives out demons.”
16 UDB तिथे असलेल्या इतर लोकांनी तो देवापासून आहे हे सिद्ध करण्यासाठी एक चमत्कार करण्यासाठी त्याला विचारले. BSB BSB: And others tested Him by demanding a sign from heaven.
17 UDB पंरतु ते काय विचार करत आहेत हे त्याला माहिती होते. मग तो त्यांना म्हणाला, “एका राष्ट्रातील लोक एकमेकांविरुद्ध लढले, तेव्हा त्यांचा देश नष्ट होईल. एका कुटूंबातील लोक एकमेकांचा विरोध करतात, त्यांचे कुटूंब वेगवेगळे पडतील. BSB BSB: Knowing their thoughts, Jesus said to them, “Every kingdom divided against itself will be laid waste, and a house divided against a house will fall.
18 UDB त्याचप्रमाणे, सैतान आणि त्याचे दुरात्मे एकमेकांशी भांडण करत असले, तेव्हा त्यांचे राज्य नक्कीच टिकणार नाही! मी हे सांगतो कारण तुम्ही म्हणत आहात की मी भुतांचा शासक बालजबूल याच्या शक्तीने भुते बाहेर काढतो! BSB BSB: If Satan is divided against himself, how can his kingdom stand? After all, you say that I drive out demons by Beelzebul.
19 UDB आता, बालजबूल मला भुते बाहेर काढण्यासाठी सक्षम करतो हे जर खरे असेल, तर तुमचे शिष्य जे भूते बाहेर काढतात ते देखील सैतानाच्या सामर्थ्याने काढतात हे खरे आहे का? नक्कीच नाही! म्हणून तुम्ही चुकीचे आहात असे ते सिध्द करतात. BSB BSB: And if I drive out demons by Beelzebul, by whom do your sons drive them out? So then, they will be your judges.
21 UDB येशू म्हणाला, “एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षितेसाठी ज्याच्याकडे अनेक शस्त्रे आहेत, तेव्हा कोणीही त्यांच्या घरातील कोणतीही गोष्ट चोरू शकत नाही. BSB BSB: When a strong man, fully armed, guards his house, his possessions are secure.
22 UDB पंरतु कोणीतरी त्याच्यावर एक मजबूत हल्ला करतो आणि त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रांवर तो मनुष्याचा भरवसा होता ते काढून घेण्यास तो सक्षम आहे. मग त्याला त्या माणसाच्या घरातून त्यास जे काही हवे ते घेता येईल. BSB BSB: But when someone stronger attacks and overpowers him, he takes away the armor in which the man trusted, and then he divides up his plunder.
23 UDB जो कोणी मला आधार देत नाही तो माझा विरोध करीत आहे, आणि जो कोणी इतरांना माझ्यापाशी आणणार नाही तो त्यांना माझ्यापासून निघून जायला कारण ठरेल.” BSB BSB: He who is not with Me is against Me, and he who does not gather with Me scatters.
24 UDB मग येशू असे म्हणाला: “कधीकधी एखादा अशुद्ध आत्मा कोणा एकाला सोडून जातो, तेव्हा तो आराम शोधण्यासाठी निर्जन क्षेत्रांत भटकतो. त्याला ते सापडत नसल्यास, तो स्वतः म्हणतो, ज्या व्यक्तीमध्ये मी जगायचो त्याच्याकडे परत जाईन! BSB BSB: When an unclean spirit comes out of a man, it passes through arid places seeking rest and does not find it. Then it says, ‘I will return to the house I left.’
25 UDB म्हणून तो परत जातो आणि स्वच्छ धुतलेले व पुसलेल्या घरासारखे ती व्यक्ती त्यास आढळते, पण तरीही ती रिक्त असते. BSB BSB: On its return, it finds the house swept clean and put in order.
26 UDB नंतर हा अशुद्ध आत्मा जातो आणि त्यापेक्षाही अधिक वाईट जे सात भुते आहेत त्यास तो घेऊन येतो. ते सर्व त्या व्यक्तीत प्रवेश करतात आणि तिथे राहण्यास सुरू करतात. त्यामुळे त्या व्यक्तीची स्थिती पूर्वी वाईट होती, ती आणखी खराब होऊन जाते.” BSB BSB: Then it goes and brings seven other spirits more wicked than itself, and they go in and dwell there. And the final plight of that man is worse than the first.”
27 UDB येशूने असे म्हटले तेव्हा, ते ऐकत असलेल्या एका स्त्रीने त्याला मोठ्याने ओरडून म्हटले, “तुला जन्म देणारी आणि जिच्या स्तनाने तुझी काळजी घेतली तिला प्रभूने किती महानरित्या आर्शिवादीत केले आहे!” BSB BSB: As Jesus was saying these things, a woman in the crowd raised her voice and said, “Blessed is the womb that bore You, and blessed are the breasts that nursed You!”
28 UDB मग त्याने उत्तर दिले, “जे त्याचा उपदेश ऐकतात आणि त्याला पाळतात त्यांना देव ह्यांपेक्षाही अधिक आर्शिवादीत करेल!” BSB BSB: But He replied, “Blessed rather are those who hear the word of God and obey it.”
29 UDB येशूसभोवतीच्या गर्दीमध्ये सामिल होण्यासाठी अधिक लोक येत होते, तेव्हा तो म्हणाला, “या युगाचे लोक दृष्ट आहेत. मी देवापासून आलेलो आहे म्हणून मी एखादा चमत्कार करून दाखवून त्याचा पुरावा द्यावा असे तुमच्यापैकी अनेकांना हवे असते. परंतु योनासोबत काय घडले होते केवळ हाच पुरावा तुम्हांला एक चमत्कार म्हणून प्राप्त होईल. BSB BSB: As the crowds were increasing, Jesus said, “This is a wicked generation. It demands a sign, but none will be given it except the sign of Jonah.
30 UDB ज्याप्रमाणे देवाने अनेक वर्षांपूर्वी योनासाठी केलेला चमत्कार म्हणून निनवे शहरातील लोकांना साक्ष दिली, तसेच देव मनुष्याच्या पुत्रासाठी असाच एक चमत्कार करेल तो आताच्या युगातील राहणांऱ्या तुमच्या लोकांसाठी एक साक्ष होईल. BSB BSB: For as Jonah was a sign to the Ninevites, so the Son of Man will be a sign to this generation.
31 UDB फार पूर्वीं शेबाची राणी शलमोनाच्या शहाणपणाच्या गोष्टी ऐकण्याकरता फार दूरचे अंतर पार करून आली होती. आणि आता शलमोनापेक्षाही येथे कोणीतरी महान आहे, परंतु मी काय बोललो हे तुम्ही खरोखर ऐकले नाही. म्हणून, न्यायाच्या दिवशी देव सर्व लोकांचा न्याय करेल तेव्हा, त्यावेळी ती राणी तिथे उभे राहील आणि आता राहणांऱ्या लोकांस दोषी ठरवेल. BSB BSB: The Queen of the South will rise at the judgment with the men of this generation and condemn them; for she came from the ends of the earth to hear the wisdom of Solomon, and now One greater than Solomon is here.
32 UDB योनाने त्यांना शिकविल्यानंतर तेव्हा निनवे या प्राचीन शहरामध्ये जे पुरूष राहत होते तेव्हा ते त्यांच्या पापी मार्गापासून वळाले. आणि आता, योनापेक्षाही अधिक थोर जो मी, आलो आहे आणि तुम्हांला उपदेश दिला, तरीदेखील तुम्ही तुमच्या पापी मार्गापासून वळाला नाही. त्यामुळे, देव सर्व लोकांचा न्याय करेल त्यावेळी, फार पूर्वीं राहणारे निनवेतील पुरूष तिथे उभे राहतील आणि आताच्या राहणाऱ्या लोकांना दोषी ठरवतील.” BSB BSB: The men of Nineveh will stand at the judgment with this generation and condemn it; for they repented at the preaching of Jonah, and now One greater than Jonah is here.
33 UDB “दिवा लावणारे लोक त्याला लावून मग त्याच्या प्रकाशाला झाकून अथवा टोपलीच्या खाली ठेवत नाहीत, त्याउलट, ते खोलीमध्ये किंवा घरामध्ये प्रवेश करणाऱ्यांना प्रकाश दिसावा म्हणून तो एका दिवठणीवर ठेवतात. BSB BSB: No one lights a lamp and puts it in a cellar or under a basket. Instead, he sets it on a stand, so those who enter can see the light.
34 UDB डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे निरोगी असतील तेव्हा मग तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशाने भरलेले आहे. जर, दुसरीकडे, तो रोगी असेल, मग तुमचे संपूर्ण शरीर अंधकाराने भरलेले असेल. BSB BSB: Your eye is the lamp of your body. When your eyes are good, your whole body also is full of light. But when they are bad, your body is full of darkness.
35 UDB म्हणून, तुमच्यातील प्रकाश हा अंधार नसावा ह्याची काळजी घ्या. BSB BSB: Be careful, then, that the light within you is not darkness.
36 UDB जर तुमचे सर्व शरीर पूर्ण प्रकाशाने भरलले आहे आणि त्याच्यातील कुठलाही भाग अंधकारमय नाही, तुमचे संपूर्ण शरीर एका दिव्याचा प्रकाश जो सर्वगोष्टी स्पष्ट पाहता यावी यासाठी सक्षम करतो त्यासारखे तुमचे शरीरे प्रकाशमय होतील.” BSB BSB: So if your whole body is full of light, with no part of it in darkness, you will be radiant, as though a lamp were shining on you.”
37 UDB येशूने या गोष्टी बोलल्यानंतर, एका परुश्याने त्याला त्याच्याबरोबर भोजन करण्यासाठी आमंत्रित केले. मग येशू त्या परुश्याच्या घरी गेला आणि आपल्या जागी मेजावर बसला. BSB BSB: As Jesus was speaking, a Pharisee invited Him to dine with him; so He went in and reclined at the table.
38 UDB येशूने विधीप्रमाणे खाण्याआधी त्याचे हात धुतले नाहीत हे त्याने पाहिले तेव्हा त्या परूश्याला अतिशय आश्चर्य वाटले. BSB BSB: But the Pharisee was surprised to see that Jesus did not first wash before the meal.
39 UDB प्रभू येशू त्याला म्हणाला, तुम्ही परूशी खाण्यापूर्वी प्याल्याला आणि ताटल्यांना बाहेरून धुता, परंतु स्वत: आत तुम्ही खूप लोभी आणि दुष्ट आहात. BSB BSB: Then the Lord said, “Now you Pharisees clean the outside of the cup and dish, but inside you are full of greed and wickedness.
40 UDB तुम्ही मूर्ख लोकांनो! देवाने केवळ बाहेरची बाजू बनविली नाही, परंतु त्याने आतील बाजूही बनविली आहे! हे खात्रीने तुम्हांला माहित आहे. BSB BSB: You fools! Did not the One who made the outside make the inside as well?
41 UDB ताटल्याची चिंता करण्याऐवजी विवेक शुद्ध असावा, दयाळू व्हा, आणि गरज असलेल्यांना जे काही ताटल्यांमध्ये आहे ते देऊन टाका, आणि नंतर तुमची आतील आणि बाहेरील दोन्ही बाजू शुद्ध होतील. BSB BSB: But give as alms the things that are within you, and behold, everything will be clean for you.
42 UDB परंतु परुश्यांनो! तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल. तुमच्या उद्यानात वाढलेल्या औषधी वनस्पतींसह, तुमच्याकडे जे काही आहे त्याचा दशंमाश तुम्ही काळजीपूर्वक देवाला देता. परंतु तुम्ही देवावर प्रेम करत नाही किंवा इतरांसोबत न्यायीपणे वागत नाही. देवाला देण्याव्यतिरिक्त तुम्ही देवावर प्रेम करा आणि इतरांसोबत न्यायीपणे वागणे आवश्यक आहे ह्याची तुम्ही खात्री ठेवा. BSB BSB: Woe to you Pharisees! For you pay tithes of mint, rue, and every herb, but you disregard justice and the love of God. You should have practiced the latter without neglecting the former.
43 UDB परुश्यांनो तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल, कारण सभास्थानांमध्ये तुम्हास सर्वात महत्त्वाच्या जागांवर बसण्यास आवडते, आणि बाजारातील लोकांचा विशेष सन्मानांसोबत आदर घेण्यास तुम्हांला आवडते. BSB BSB: Woe to you Pharisees! For you love the chief seats in the synagogues and the greetings in the marketplaces.
44 UDB तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल, कारण तुम्ही खूण नसलेल्या कबरांसारखे व्हाल जी लोकांस दिसणार नाही आणि ते लक्षात न घेता तिच्यावरून चालून जातील आणि तुम्ही अशुद्ध व्हाल.” BSB BSB: Woe to you! For you are like unmarked graves, which men walk over without even noticing.”
45 UDB ज्या लोकांच्या नियमांच्या कोणी एका शिक्षकांनी असे उत्तर दिले, “गुरूजी, हे म्हणण्याद्वारे तुम्ही आम्हांवर सुद्धा टीका करत आहात!” BSB BSB: One of the experts in the law told Him, “Teacher, when You say these things, You insult us as well.”
46 UDB येशू म्हणाला, “यहूदी कायद्यांचे शिक्षकांनो तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल! कारण लोकांना खूप जड ओझे देऊन खाली पाडता, परंतु त्या लोकांचा भार सहन करण्यासाठी लहान गोष्टींची देखील मदत करत नाहीत! BSB BSB: “Woe to you as well, experts in the law!” He replied. “For you weigh men down with heavy burdens, but you yourselves will not lift a finger to lighten their load.
47 UDB तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल, कारण तुमच्या या पूर्वजांनी ज्या संदेष्टयांना मारले त्यांच्या कबरा तुम्ही चिन्ह ठेवण्याकरता त्यावर इमारती बांधतात. BSB BSB: Woe to you! For you build tombs for the prophets, but it was your fathers who killed them.
48 UDB म्हणून तुम्ही या इमारती बांधता तेव्हा, तुम्ही आपल्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना जिवे मारल्याबद्दल त्यांना मान्यता दिली असल्याचे तुम्ही जाहिर करीत आहात. BSB BSB: So you are witnesses consenting to the deeds of your fathers: They killed the prophets, and you build their tombs.
49 UDB म्हणून देव, जो फार हुशार आहे, तो म्हणतो,‘मी माझ्या लोकांना मार्गदर्शन करण्याकरिता संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन. परंतु ते खूप दु:ख सहन करतील आणि त्यापैकी काही ठार मारले जातील.’ BSB BSB: Because of this, the wisdom of God said, ‘I will send them prophets and apostles; some of them they will kill and others they will persecute.’
50 UDB परिणामी, सध्याच्या काळात राहणाऱ्या बऱ्याच जणांना सर्व जगाच्या निर्मितीपासून देवाच्या संदेष्ट्यांच्या खूनाचा दोषी मानण्यात येईल, BSB BSB: As a result, this generation will be charged with the blood of all the prophets that has been shed since the foundation of the world,
51 UDB होय, या काळातील देशवासीयांना त्या संदेष्ट्यांचा झालेल्या खूनाबद्दल दोषी मानण्यात येईल! सुरूवातीला हाबेलाचा त्याच्या भावाने खून केल्यापासून मंदिर व पवित्र स्थान यांच्या दरम्यान मारल्या गेलेल्या संदेष्टा जखऱ्यापर्यंत. BSB BSB: from the blood of Abel to the blood of Zechariah, who was killed between the altar and the sanctuary. Yes, I tell you, all of it will be charged to this generation.
52 UDB यहूदी कायदा शिकवणाऱ्या पुरूषांनो तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल, कारण तुम्ही लोकांना देवाचे सत्य कळवले नाही! हे असे आहे की तुम्ही घराची किल्ली घेतली आहे. तुम्ही स्व:त घरात जात नाही, आणि इतर लोकांनाही तुम्ही आत येऊ देत नाही.” BSB BSB: Woe to you experts in the law! For you have taken away the key to knowledge. You yourselves have not entered, and you have hindered those who were entering.”
53 UDB येशूने या गोष्टी बोलणे संपविल्यानंतर, तो तिथून निघून जात असतांना. मग यहूदी लोकांचे नियम शिकवणारे पुरूष आणि परूशी त्याच्याविरुध्द अतिशय द्वेषपूर्ण अशा पद्धतीने वागण्यास सुरूवात केली. त्यांनी पुष्कळ गोष्टींबद्दल त्याला हेतूपूर्वक प्रश्न विचारले. BSB BSB: As Jesus went on from there, the scribes and Pharisees began to oppose Him bitterly and to ply Him with questions about many things,
54 UDB तो काहीतरी चुकीचे बोलण्याची त्याची वाट पाहत राहिले जेणेकरून ते त्याच्यावर आरोप ठेवू शकतील. BSB BSB: waiting to catch Him in something He might say.