1 UDB त्यावेळेस एका शब्बाथ दिवशी, येशू आणि त्याचे शिष्य ज्या शेतामध्ये काही धान्य होते त्या शेताजवळून जात होते. शिष्यांना भूक लागलेली असल्यामुळे, त्यांनी त्या शेतातील धान्याची काही कणसे तोडली आणि ते ती कणसे खाऊ लागले, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याची परवानगी होती. BSB BSB: At that time Jesus went through the grainfields on the Sabbath. His disciples were hungry and began to pick the heads of grain and eat them.
2 UDB ते असे करत असतांना काही परूश्यांनी त्यांना पाहिले, म्हणून ते येशूला म्हणाले, “पाहा! तुझे शिष्य विसावा घेण्याच्या दिवशी देखील काम करत आहेत. नियमशास्त्र आम्हाला असे करण्याची परवानगी देत नाही!” BSB BSB: When the Pharisees saw this, they said to Him, “Look, Your disciples are doing what is unlawful on the Sabbath.”
4 UDB देवाची उपासना करतात त्या पवित्र तंबूमध्ये दावीदाने प्रवेश केला आणि त्याने तेथे काही अन्न मागितले. देवासमोर काही भाकरी मांडण्यात आल्या होत्या त्या भाकरी मुख्य याजकाने त्याच्या हातात दिल्या. परंतु मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, ती भाकर केवळ याजकच खाऊ शकत होते, परंतु दावीद आणि त्याच्या मनुष्यांनी त्या भाकरी खाल्ल्या. आणि देवाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काहीच चूक केली नव्हती! BSB BSB: He entered the house of God, and he and his companions ate the consecrated bread, which was not lawful for them to eat, but only for the priests.
5 UDB तसेच, मोशेने लिहिले आहे ते तुम्ही नक्कीच वाचले असेल, तो म्हणतो जरी याजक आमच्या शब्बाथ दिवशी मंदिरात काम करत असले, तर ते यहूदी कायद्यांचे विश्रांती दिवस पाळत नाहीत, तरी देखील ते दोषी नाहीत. BSB BSB: Or haven’t you read in the Law that on the Sabbath the priests in the temple break the Sabbath and yet are innocent?
6 UDB याचा अर्थ काय होतो ते मला तुम्हाला सांगायचा आहे म्हणून मी तुम्हाकडे आलो आहे, आणि मी मंदिरापेक्षाही महत्त्वाचा आहे, म्हणून आपल्या पूर्वजांनी शब्बाथ दिवसाविषयी काय म्हटले यापेक्षा मी तुम्हाला जे काही शिकवत आहे त्याचे तुम्ही पालन करावे हे महत्त्वाचे आहे. BSB BSB: But I tell you that One greater than the temple is here.
7 UDB शास्त्रलेखामध्ये लिहिलेल्या देवाच्या या वचनाविषयी तुम्ही विचार केला पाहिजे: ‘तुम्ही लोकांसोबत दयेने वागावे ही माझी इच्छा आहे, आणि केवळ बलिदानच करत राहू नये’ ह्या वचनाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला कळाले असते, तर तुम्ही माझ्या शिष्यांना दोष लावला नसता, त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. BSB BSB: If only you had known the meaning of ‘I desire mercy, not sacrifice,’ you would not have condemned the innocent.
8 UDB मी मनुष्याचा पुत्र आहे, आणि शब्बाथ दिवशी लोकांनी काय केले पाहिजे हे सांगण्याचा मला अधिकार आहे.” BSB BSB: For the Son of Man is Lord of the Sabbath.”
9 UDB त्यादिवशी येशू तेथून निघाल्यानंतर, तो एका सभास्थानात गेला. BSB BSB: Moving on from there, Jesus entered their synagogue,
10 UDB तेथे त्याला सुकलेल्या हाताचा एक मनुष्य दृष्टीस पडला. शब्बाथ दिवसाविषयी येशूसोबत वाद-विवाद करावा अशी परूश्यांची इच्छा होती, म्हणून त्यांच्यापैकी एकाने येशूला विचारले, “विसावा घेण्याच्या दिवशी लोकांना बरे करण्याची देव आम्हाला परवानगी देतो का?” येशू काहीतरी चुकीचे बोलून एखादे पाप करेल अशी त्यांची आशा होती. BSB BSB: and a man with a withered hand was there. In order to accuse Jesus, they asked Him, “Is it lawful to heal on the Sabbath?”
11 UDB त्याने त्यांना उत्तर दिले, “समजा तुम्हापैकी एकाकडे केवळ एकच मेंढरू आहे, आणि शब्बाथ दिवशी ते एका खोल खड्ड्यामध्ये पडले. तर काय तुम्ही त्याला तेथेच सोडून द्याल काय? नक्कीच नाही! तुम्ही त्याला धराल आणि लगेचच त्याला बाहेर काढाल, आणि आमचे शब्बाथ दिवशी असे करणे चुकीचे ठरणार नाही. BSB BSB: He replied, “If one of you has a sheep and it falls into a pit on the Sabbath, will he not take hold of it and lift it out?
12 UDB परंतु एका मेंढरापेक्षा एखादा व्यक्ती कितीतरी मोलवान आहे. तर एखाद्या मनुष्याला कोणत्याही दिवशी बरे करणे हे आम्हासाठी चांगले आहे, आणि आम्ही त्याला शब्बाथ दिवशी देखील बरे करू शकतो!” BSB BSB: How much more valuable is a man than a sheep! Therefore it is lawful to do good on the Sabbath.”
13 UDB त्यानंतर तो त्या मनुष्याला म्हणाला, “तू आपला हात लांब कर! त्या मनुष्याने त्याचा सुकलेला हात लांब केला, आणि तो दुसऱ्या निरोगी हाता सारखाच पूर्णपणे निरोगी झाला! BSB BSB: Then Jesus said to the man, “Stretch out your hand.” So he stretched it out, and it was restored to full use, just like the other.
14 UDB मग परूशी त्या सभास्थानातून निघून गेले. येशूला कसे ठार मारावे याची योजना ते आखू लागले. BSB BSB: But the Pharisees went out and plotted how they might kill Jesus.
15 UDB परूशी त्याला ठार करण्याची योजना आखत आहेत हे येशूला ठाऊक असल्यामुळे, त्याने शिष्यांना घेतले आणि तो तेथून निघून गेला. लोकांची खूप गर्दी होती, जेथे असंख्य आजारी लोकही होते, आणि ते त्याच्या मागे गेले, आणि त्याने त्या सर्वांना बरे केले. BSB BSB: Aware of this, Jesus withdrew from that place. Large crowds followed Him, and He healed them all,
16 UDB परंतु त्याने त्यांना निक्षून सांगितले की त्यांनी त्याच्या विषयी इतर लोकांना सांगू नये. BSB BSB: warning them not to make Him known.
18 UDB “हाच तो माझा सेवक होय ज्याला मी निवडले आहे, मी ह्याच्यावर प्रीती करतो आणि तो मला संतोष देतो. मी त्याच्यामध्ये माझा आत्मा ठेवीन, आणि तो परराष्ट्रीयांना न्याय व तारण देईल. BSB BSB: “Here is My Servant, whom I have chosen, My beloved, in whom My soul delights. I will put My Spirit on Him, and He will proclaim justice to the nations.
19 UDB तो लोकांसोबत भांडण करणार नाही, आणि तो आरडा-ओरडाही करणार नाही. आणि तो रस्त्यांवर मोठ्याने बोलणार नाही. BSB BSB: He will not quarrel or cry out; no one will hear His voice in the streets.
20 UDB अशक्त लोकांसोबत तो अतिशय सौम्यतेने वागणार; जर एखादा व्यक्ती अगदी मरावयास टेकला असेल, तर तो त्याला ठार करणार नाही. आणि तो लोकांचा न्याय अतिशय न्यायीपणाने करेल आणि ते दोषी नाहीत अशी घोषणा करेल. BSB BSB: A bruised reed He will not break, and a smoldering wick He will not extinguish, till He leads justice to victory.
21 UDB म्हणून परराष्ट्रीय लोक त्याच्यावर अगदी पूर्ण मनाने भरवसा ठेवतील.” BSB BSB: In His name the nations will put their hope.”
22 UDB एके दिवशी काही माणसांनी आंधळा आणि जो बोलू शकत नव्हता अशा एका व्यक्तीला येशूकडे आणले कारण त्याला एक दुरात्मा लागलेला होता. येशूने त्याच्यातील दुरात्मा काढून टाकला आणि त्या व्यक्तीला बरे केले. नंतर तो मनुष्य बोलू लागला आणि त्याला पाहता येऊ लागले. BSB BSB: Then a demon-possessed man who was blind and mute was brought to Jesus, and He healed the man so that he could speak and see.
23 UDB ज्या लोकांनी ते पाहिले ते अतिशय आश्चर्य करू लागले. ते एकमेकांना विचारू लागले की, “हा व्यक्ती ख्रिस्त असू शकतो काय, दावीद राजाचा वंशज ज्याची आम्ही वाट पाहत आहोत तो ख्रिस्त हाच व्यक्ती आहे काय?” BSB BSB: The crowds were astounded and asked, “Could this be the Son of David?”
24 UDB परूश्यांनी त्या चमत्काराविषयी ऐकले होते म्हणून, ते म्हणाले, “लोकांमधून दुरात्मे घालवण्याची शक्ती ह्या व्यक्तीला सैतानाचा अधिपती, बालजबूलाकडून प्राप्त होते हा सैतान म्हणजेच दुरात्म्यांचा अधिकारी होय, देवापासून हे नाही.” BSB BSB: But when the Pharisees heard this, they said, “Only by Beelzebul, the prince of demons, does this man drive out demons.”
25 UDB परंतु परूशी काय विचार करत आहेत हे येशूने ओळखले. म्हणून त्याने त्यांना उत्तर दिले, “एका देशातील दोन गट एकमेकांसोबत भांडू लागले, तर त्या देशांमध्ये फूट पडून त्या देशाचा नाश होईल. एकाच शहरात किंवा एकाच घरात राहणारे लोक एकमेकांसोबत भांडू लागले, तर नक्कीच ते एक कुटूंब किंवा एक शहर मिळून राहू शकत नाहीत. BSB BSB: Knowing their thoughts, Jesus said to them, “Every kingdom divided against itself will be laid waste, and every city or household divided against itself will not stand.
26 UDB अगदी याच प्रकारे, सैतान त्याच्या स्वतःच्या दुष्ट आत्म्यांना घालवू लागला, तर तो स्वतःच्याच विरुद्ध लढत असेल. आणि अशा रीतीने तो त्याच्या सेवकांवर अधिकार करू शकणार नाही! BSB BSB: If Satan drives out Satan, he is divided against himself. How then can his kingdom stand?
27 UDB इतकेच काय तर, सैतान माझ्याद्वारे दुरात्मे घालवत असेल, तर तुमचे शिष्य देखील सैतानाच्या सामर्थ्याने दुरात्मे घालवतात हे सत्य आहे का? नाही! परंतु हे सत्य नाही आणि म्हणून तुम्ही जो विचार करत आहात तो तर्काला धरून नाही. BSB BSB: And if I drive out demons by Beelzebul, by whom do your sons drive them out? So then, they will be your judges.
28 UDB परंतु तो देवाचा आत्मा आहे जो दुरात्मे घालवण्याची शक्ती मला देतो, हे यावरून सिद्ध होते की देवाने तुमच्यावर स्वतःला राजा म्हणून दाखवणे आरंभ केले आहे. BSB BSB: But if I drive out demons by the Spirit of God, then the kingdom of God has come upon you.
29 UDB मी दुरात्मे घालवण्यास का सक्षम आहे हे मी तुम्हाला दाखवतो. एक व्यक्ती सैतानासारख्या एका बलदंड मनुष्याच्या घरात जाऊन जो पर्यंत त्याला बांधत नाही तो पर्यंत त्याची मालमत्ता कोणालाही लुटता येत नाही. परंतु तेथे जाऊन त्याला बांधले, तर नंतर तो त्याची मालमत्ता घेऊ शकेल. BSB BSB: Or again, how can anyone enter a strong man’s house and steal his possessions, unless he first ties up the strong man? Then he can plunder his house.
30 UDB म्हणून कोणीही व्यक्ती तटस्थ राहू शकत नाही. मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दुरात्मे काढतो ह्या गोष्टीला जे स्वीकार करत नाहीत ते माझा विरोध करणारे आहेत, आणि लोकांनी माझे शिष्य व्हावे याकरिता जे लोकांना गोळा करत नाहीत ते लोकांनी माझे शिष्य होऊ नये म्हणून त्यांना माझ्यापासून दूर करतात. BSB BSB: He who is not with Me is against Me, and he who does not gather with Me scatters.
31 UDB मला दुरात्मे काढण्यासाठी सक्षम करणारा पवित्र आत्मा नाही असे तुम्ही म्हणत आहात. म्हणून मी तुम्हाला असे म्हणतो: कोणी एखाद्याला कोणत्याही प्रकारे दुखवले व अपमान केला आणि मग त्याबद्दल त्यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी देवाला त्याची क्षमा मागितली, तर देव त्यांना त्याची क्षमा करणार. परंतु पवित्र आत्म्याने केलेल्या कार्याचा जे कोणी अपमान करतील त्यांना देव क्षमा करणार नाही. BSB BSB: Therefore I tell you, every sin and blasphemy will be forgiven men, but the blasphemy against the Spirit will not be forgiven.
32 UDB माझा, म्हणजेच मनुष्याच्या पुत्राचा जे लोक अपमान करतात त्यांना क्षमा करण्यासाठी देव तयार आहे, परंतु पवित्र आत्मा काय करतो त्याचा जर कोणी अपमान केला तर देव अशा लोकांना क्षमा करणार नाही. देव त्यांना आताही क्षमा करणार नाही, आणि येणाऱ्या राज्यातही क्षमा करणार नाही.” BSB BSB: Whoever speaks a word against the Son of Man will be forgiven, but whoever speaks against the Holy Spirit will not be forgiven, either in this age or in the one to come.
33 UDB “तुम्ही एखाद्या झाडावरील फळ पाहता तेव्हा तुम्ही निर्णय घेता की ते फळ चांगले आहे किंवा वाईट आहे. ते फळ चांगले असेल, तर तुम्हाला हे कळते की ते झाडही नक्कीच चांगले आहे. मी चांगली कार्ये करत आहे, तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की मी चांगला आहे किंवा नाही. BSB BSB: Make a tree good and its fruit will be good, or make a tree bad and its fruit will be bad, for a tree is known by its fruit.
34 UDB तुम्ही विषारी सापांच्या पिल्लांसारखे आहात! तुम्ही वाईट असल्यामुळे, कोणतीही चांगली गोष्ट बोलू शकत नाही. एखादा व्यक्ती काय बोलतो ह्यावरून त्या व्यक्तीच्या आतमध्ये काय आहे ते दिसते BSB BSB: You brood of vipers, how can you who are evil say anything good? For out of the overflow of the heart the mouth speaks.
35 UDB चांगले लोक चांगल्या गोष्टी बोलतात. त्यांनी चांगल्या गोष्टींना सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवले आहे आणि त्यांना हवे तेव्हा ते त्या गोष्टींना बाहेर काढू शकतात म्हणूनच ते अशाप्रकारे वागू शकतात. परंतु वाईट लोक वाईट गोष्टी बोलतात. कारण जणूकाय त्यांनी सर्व वाईट गोष्टींचा साठा करून ठेवला आहे आणि त्यांनी त्या गोष्टी अशा ठिकाणी साठवून ठेवल्या आहेत तेथून त्या कोणत्याही वेळेस ते बाहेर काढू शकतात. BSB BSB: The good man brings good things out of his good store of treasure, and the evil man brings evil things out of his evil store of treasure.
36 UDB देव ज्या दिवशी न्याय करणार त्या दिवसाविषयी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की, लोकांनी इतरांना दुःख होईल अशा बोललेल्या प्रत्येक शब्दाची तो त्यांना आठवण करून देईल, आणि त्यांनी जे काही म्हटले त्या विषयी तो त्यांचा न्याय-निवाडा करील. BSB BSB: But I tell you that men will give an account on the day of judgment for every careless word they have spoken.
37 UDB तुम्ही जे कोणते शब्द बोलले आहात त्या शब्दांवरून देव एक तर तुम्हाला नीतिमान ठरवेल, किंवा तुम्ही जे काही बोलला आहात त्यानूसार तो तुम्हाला दोषी ठरवेल.” BSB BSB: For by your words you will be acquitted, and by your words you will be condemned.”
40 UDB एका मोठ्या माशाच्या पोटामध्ये तीन दिवस व तीन रात्र योना होता आणि त्यानंतर देवाने त्याला त्याच्यातून बाहेर काढले. अशाच प्रकारे, मी, मनुष्याचा पुत्र, देखील पृथ्वीमध्ये खोलवर तीन दिवस आणि तीन रात्र राहणार आहे, आणि त्यानंतर देव मला पुन्हा जिवंत करणार आहे. BSB BSB: For as Jonah was three days and three nights in the belly of the great fish, so the Son of Man will be three days and three nights in the heart of the earth.
41 UDB देव ज्या वेळेस सर्व लोकांचा न्याय करणार, त्यावेळेस निनवे शहरातील लोक त्याच्यासमोर तुम्हा लोकांच्या बाजूला उभे राहतील. परंतु योनाने त्यांना चेतावणी दिली त्यावेळी त्यांनी पाप करणे थांबवले होते. आता मी तुम्हाकडे आलो आहे, आणि योना होता त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाचा मी आहे, परंतु तरीही तुम्ही पाप करणे थांबवलेले नाही. म्हणून देव तुमचा न्याय करणार आहे. BSB BSB: The men of Nineveh will stand at the judgment with this generation and condemn it; for they repented at the preaching of Jonah, and now One greater than Jonah is here.
42 UDB शलमोन राजा ज्या ज्ञानाच्या गोष्टी शिकवत होता, त्या ऐकण्यासाठी एका दुरवरच्या प्रदेशातून इस्त्राएलाच्या दक्षिणेकडे राहणारी, शिबाची राणी, फार पूर्वीच्या काळी आली होती. शलमोन होता, त्याहीपेक्षा मी कितीतरी महत्त्वाचा आहे, आणि आता मी तुम्हाकडे आलो आहे, परंतु तरीही तुम्ही पाप करणे थांबवलेले नाही. म्हणून देव सर्वांचा न्याय करेल तेव्हा शिबाची राणी त्याच्यासमोर तुम्हा लोकांच्या बाजूला उभा राहील, आणि ती तुम्हाला दोषी ठरवील.” BSB BSB: The Queen of the South will rise at the judgment with this generation and condemn it; for she came from the ends of the earth to hear the wisdom of Solomon, and now One greater than Solomon is here.
43 UDB “कधीकधी जेव्हा एक दुष्ट आत्मा एका व्यक्तीला सोडतो, त्यावेळेस तो निर्जन स्थळामध्ये भटकत राहतो, एखाद्याच्या आत शिरावे आणि विसावा घ्यावा म्हणून तो शोधत फिरतो. परंतु जर त्याला कोणी आढळले नाही, BSB BSB: When an unclean spirit comes out of a man, it passes through arid places seeking rest and does not find it.
44 UDB तर तो स्वतःशीच असे म्हणतो, ‘मी ज्या व्यक्तीमध्ये राहत असे त्या व्यक्तीकडे पुन्हा परत जाईन.’ तर तो पुन्हा परत जातो आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर देवाच्या आत्म्याचे नियंत्रण नाही असे त्याच्या दृष्टीस पडते. एखादे घर स्वच्छ झाडलेले आहे आणि सर्वकाही जेथे हवे तेथे नीट ठेवलेले आहे, परंतु ते रिकामे आहे अशा घरासारखे त्या व्यक्तीचे जीवन आहे. BSB BSB: Then it says, ‘I will return to the house I left.’ On its return, it finds the house vacant, swept clean, and put in order.
45 UDB मग हा अशुद्ध आत्मा जातो आणि त्याच्याहून अधिक दुष्ट असे सात अशुद्ध आत्मे मिळवतो, आणि ते सर्व त्या व्यक्तीत प्रवेश करतात आणि त्याच्या सोबत राहण्यास सुरूवात करतात. मग त्या व्यक्तीची स्थिती आधी होती, त्याच्यापेक्षाही त्यानंतरची स्थिती त्याहूनही अधिक वाईट होते. तुम्हापैकी ज्या दुष्ट लोकांनी माझे शिक्षण ऐकले आहे तुम्ही देखील हाच अनुभव घ्याल.” BSB BSB: Then it goes and brings with it seven other spirits more wicked than itself, and they go in and dwell there. And the final plight of that man is worse than the first. So will it be with this wicked generation.”
46 UDB येशू त्या लोक समुदायाशी बोलत असतांना, त्याचे लहान भाऊ आणि त्याची आई त्या ठिकाणी आले. तो ज्या घरात उभा राहून बोलत होता त्या घराच्या बाहेर ते उभे होते आणि त्यांना त्याच्याशी बोलण्याची इच्छा होती. BSB BSB: While Jesus was still speaking to the crowds, His mother and brothers stood outside, wanting to speak to Him.
47 UDB कोणीतरी त्याला म्हणाले, “तुझी आई आणि तुझे लहान भाऊ घराबाहेर उभे आहेत, आणि त्यांना तुझ्या सोबत बोलायचे आहे.” BSB BSB: Someone told Him, “Look, Your mother and brothers are standing outside, wanting to speak to You.”
48 UDB मग ज्या व्यक्तीने येशूला हा निरोप दिला त्याला येशू म्हणाला, “माझी खरी आई आणि माझे खरे भाऊ कोण आहेत हे मी तुला सांगतो.” BSB BSB: But Jesus replied, “Who is My mother, and who are My brothers?”
49 UDB मग त्याने त्याच्या शिष्यांकडे बोट दाखवले आणि म्हणाला, “मी जेवढी माझ्या आईवर आणि माझ्या भावांवर प्रीती करतो तेवढीच मी ह्यांच्यावरही प्रीती करतो. BSB BSB: Pointing to His disciples, He said, “Here are My mother and My brothers.
50 UDB माझा देव जो पिता स्वर्गात राहतो त्याच्या इच्छेप्रमाणे जे करतात, ते माझ्या भावांइतके, माझ्या बहिणींइतके, आणि माझ्या आई इतके मला प्रिय आहेत.” BSB BSB: For whoever does the will of My Father in heaven is My brother and sister and mother.”