1 UDB येशू चमत्कार करत आहेत याविषयीची वार्ता हेरोद अंतीपस ह्या शासकाकडे पोहचली. BSB BSB: At that time Herod the tetrarch heard the reports about Jesus
2 UDB त्याने आपल्या सेवकांना म्हटले, “हा नक्कीच बाप्तिस्मा करणारा योहान असला पाहिजे. जो मेलेल्यांमधून पुन्हा जिवंत झाला असावा, आणि म्हणूनच त्याच्याकडे चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे.” BSB BSB: and said to his servants, “This is John the Baptist; he has risen from the dead! That is why miraculous powers are at work in him.”
3 UDB हेरोद असा विचार करत होता ह्याच्या मागे हे कारण होते. हेरोदाने हेरोदिया सोबत विवाह केला होता, ती त्याचा भाऊ फिलीप्प ह्याची बायको होती, आणि फिलिप्प जिवंत असतांनाच त्याने असे केले होते. म्हणून योहान त्याला असे म्हणत होता, “तू जे काही केले आहे ते देवाच्या नियमाच्या विरोधात आहे!” तेव्हा, हेरोदियाला खूश करण्यासाठी, हेरोदाने आपल्या सैनिकांना सांगितले की योहानाला कैदेत टाका. त्यांनी त्याला साखळदंडांनी बांधले आणि तुरूंगामध्ये ठेवले. BSB BSB: Now Herod had arrested John and bound him and put him in prison on account of Herodias, his brother Philip’s wife,
5 UDB आपल्या माणसांना सांगून योहानाला ठार करावे अशी हेरोदाची इच्छा होती, परंतु तो सर्वसाधारण लोकांना घाबरत होता, कारण योहान हा देवासाठी बोलणारा एक महान संदेष्टा आहे असा त्यांचा विश्वास होता. BSB BSB: Although Herod wanted to kill John, he was afraid of the people, because they regarded John as a prophet.
6 UDB एके दिवशी, हेरोदाने त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक मोठी मेजवानी केली होती, आणि त्याच्या पाहुण्यासमोर हेरोदीयाच्या मुलीने नाच करून त्यांना खूश केले. तिचे नृत्य पाहून हेरोदालाही अतिशय आनंद झाला, BSB BSB: On Herod’s birthday, however, the daughter of Herodias danced before them and pleased Herod
7 UDB म्हणून त्याने तिला असे वचन दिले की ती जे काही मागेल ते तो तिला देईल, आणि त्यांने हे वचन दिले आहे यासाठी त्याने देवाला साक्षीदार म्हणून राहण्याची विनंती केली. BSB BSB: so much that he promised with an oath to give to her whatever she asked.
8 UDB मग हेरोदियेची मुलगी निघाली आणि तिच्या आईला तिने म्हटले की मी काय मागावे. तिच्या आईने तिला सांगितले की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिर आणून द्यावे असे तू माग. मग ती मुलगी पुन्हा परत गेली आणि हेरोदाला असे म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तू कलम करावे आणि एका तबकात घालून तो खरोखर मेला आहे हे दाखवण्यासाठी माझ्यासमोर घेऊन यावे!” BSB BSB: Prompted by her mother, she said, “Give me here on a platter the head of John the Baptist.”
9 UDB हिरोदीयाच्या मुलीने जे काही मागितले ते मी तिला देईन असे अभिवचन दिल्याचे आता हेरोदाला खूप पस्तावा झाला. परंतु ते वचन देतांना त्याने देवाला साक्षीदार म्हणून ठेवल्यामुळे, आणि त्याच्या मेजवानीसाठी जमलेल्या सर्व पाहुण्यासमोर त्याने ते बोलले होते, म्हणून त्याने जे काही म्हटले आहे ते त्याला करावेच लागेल अशी त्याला जाणिव झाली. म्हणून त्यांनी आपल्या सेवकांना आज्ञा दिली की तिच्या इच्छेप्रमाणे करा. BSB BSB: The king was grieved, but because of his oaths and his guests, he ordered that her wish be granted
10 UDB त्याने सैनिकांना तुरूंगात जाण्याची आज्ञा केली आणि योहानाचे शीर कापावे म्हणून सांगितले. BSB BSB: and sent to have John beheaded in the prison.
11 UDB त्यांनी तसे केले, आणि एका तबकामध्ये योहानाचे डोके ठेवून ते त्या मुलीकडे घेऊन आले. मग त्या मुलीने ते शिर घेतले आणि आपल्या आईकडे आणले. BSB BSB: John’s head was brought in on a platter and presented to the girl, who carried it to her mother.
12 UDB त्यानंतर योहानाचे शिष्य तुरूंगात गेले, त्यांनी योहानाचे शरीर घेतले आणि ते पुरले. आणि मग ते तेथून गेले आणि येशूला जाऊन त्यांनी ह्या सर्व घडलेल्या घटना सांगितल्या. BSB BSB: Then John’s disciples came and took his body and buried it. And they went and informed Jesus.
13 UDB येशूने ही बातमी ऐकल्यानंतर, त्याने आपल्या शिष्यांना आपल्या सोबत घेतले आणि गालील समुद्रात एका नावेने प्रवास करत जिथे कोणीही राहत नव्हते अशा ठिकाणी तो गेला. मग ते कोठे गेले आहे हे लोक समुदायाने ऐकले, तेव्हा त्यांनीही आपली गावे सोडली आणि ते त्यांच्या मागोमाग किनाऱ्यांनी पाई पाई चालत यांच्याकडे गेले. BSB BSB: When Jesus heard about John, He withdrew by boat privately to a solitary place. But the crowds found out about it and followed Him on foot from the towns.
14 UDB येशू किनाऱ्यावर आला, तेव्हा त्याने लोकांचा मोठा जमाव त्याची वाट पाहत आहे असे त्याने पाहिले. त्याला त्यांचा फार कळवळा आला, आणि त्यांच्यामध्ये जे लोक आजारी होते त्या सर्वांना त्यांने पूर्णपणे बरे केले. BSB BSB: When He stepped ashore and saw a large crowd, He had compassion on them and healed their sick.
15 UDB त्या दिवशी जवळपास संध्याकाळ झाली होती, तेव्हा शिष्य येशूजवळ आले आणि म्हणाले, “हे एक ठिकाण ओसाड आहे आणि येथे कोणतीही वस्ती नाही, आणि आता बराच उशीर झाला आहे. म्हणून तू आता ह्या लोकांना जवळपासच्या गावांमध्ये जावे आणि स्वतःसाठी अन्न विकत घ्यावे असे सांगून त्यांना पाठवून दे.” BSB BSB: When evening came, the disciples came to Him and said, “This is a desolate place, and the hour is already late. Dismiss the crowds so they can go to the villages and buy themselves some food.”
16 UDB परंतु येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “अन्न विकत घेण्यासाठी त्यांना येथून जाण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, तुम्ही स्वतःच त्यांना खाण्यासाठी काहीतरी द्या!” BSB BSB: “They do not need to go away,” Jesus replied. “You give them something to eat.”
17 UDB शिष्यांनी त्याला म्हटले, “परंतु आमच्याकडे तर केवळ पाच भाकरी आणि दोन बनवलेले मासे आहेत!” BSB BSB: “We have here only five loaves of bread and two fish,” they answered.
18 UDB तो म्हणाला, “ते माझ्याकडे घेऊन या!” BSB BSB: “Bring them here to Me,” Jesus said.
19 UDB जो लोकसमुदाय एकत्र आला होता त्या लोक समुदायाला येशूने तेथील गवतावर बसण्यास सांगितले. मग त्याने ते दोन मासे आणि त्या पाच भाकरी आपल्या हातात घेतल्या. त्याने आपली दृष्टी स्वर्गाकडे केली, आणि त्या अन्नाबद्दल देवाचे आभार मानले, आणि मग त्याने त्या भाकरी तुकड्यांमध्ये मोडल्या. मग त्याने ते तुकडे आपल्या शिष्यांच्या हातात दिले, आणि त्यांनी ते लोकसमुदायांमध्ये वाटले. BSB BSB: And He directed the crowds to sit down on the grass. Taking the five loaves and the two fish and looking up to heaven, He spoke a blessing. Then He broke the loaves and gave them to the disciples, and the disciples gave them to the people.
20 UDB तेथे जमलेल्या सर्वांनी तृप्त होईपर्यंत जेवण केले. आणि त्यानंतर त्यांच्यातल्या काही लोकांनी उरलेले तुकडे गोळा केले तर त्यांच्या बारा टोपल्या भरल्या. BSB BSB: They all ate and were satisfied, and the disciples picked up twelve basketfuls of broken pieces that were left over.
21 UDB त्यावेळी सुमारे पाच हजार पुरूषांनी जेवण केले, आणि त्यामध्ये स्त्रियांची आणि मुलांची गणना केली नव्हती! BSB BSB: About five thousand men were fed, besides women and children.
22 UDB ही घटना घडल्यानंतर लगेचच, येशूने आपल्या शिष्यांना नावेमध्ये बसण्यास आणि त्याच्या अगोदर गालील समुद्राच्या पलीकडच्या बाजूस जाण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात, तो लोकांना त्यांच्या घरी लावून देणार होता. म्हणजेच तो लोकांचा निरोप घेणार होता. BSB BSB: Immediately Jesus made the disciples get into the boat and go on ahead of Him to the other side, while He dismissed the crowds.
23 UDB त्याने त्या लोकांच्या गर्दीला निरोप दिल्यानंतर, तो डोंगरावर चढला तेथे तो स्वतःसाठी प्रार्थना करणार होता. तेव्हा संध्याकाळ झाली असता तो तेथे अद्यापही एकटाच होता. BSB BSB: After He had dismissed them, He went up on the mountain by Himself to pray. When evening came, He was there alone,
24 UDB इतक्या वेळपर्यंत शिष्य किनाऱ्यापासून वल्लवत बरेच अंतर पार करून गेले होते. शिष्य वल्लवण्याचा प्रयत्न करत असतांना; वारा त्यांच्या विरुद्ध दिशेला जोरदार वाहत होता. त्या वाऱ्यामुळे समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा उसळल्या आणि त्या नावेला मागेपुढे पाण्यामध्ये हेलकावे खावे लागले. BSB BSB: but the boat was already far from land, buffeted by the waves because the wind was against it.
25 UDB मग येशू डोंगरावरून उतरून खाली पाण्याजवळ आला, मोठ्या पहाटे तीन वाजेपासून ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान तो पाण्यावर चालत नावेकडे आला. BSB BSB: During the fourth watch of the night, Jesus went out to them, walking on the sea.
26 UDB शिष्यांनी त्याला पाण्यावर चालतांना पाहीले, तेव्हा तो एक भूत आहे असे त्यांना वाटले. ते अतिशय घाबरून गेले, आणि ते भीतीने फार मोठ्याने ओरडू लागले. BSB BSB: When the disciples saw Him walking on the sea, they were terrified. “It’s a ghost!” they said, and cried out in fear.
27 UDB लगेचच येशू त्यांना म्हणाला, “घाबरू नका! हा मी आहे. भीती बाळगू नका!” BSB BSB: But Jesus spoke up at once: “Take courage! It is I. Do not be afraid.”
30 UDB परंतु त्याचे लक्ष जोराने वाहणाऱ्या वाऱ्याकडे गेले, तेव्हा तो घाबरला. आणि तो पाण्यामध्ये बुडू लागला मग तो मोठ्याने ओरडला, “प्रभू, मला वाचवा!” BSB BSB: But when he saw the strength of the wind, he was afraid and, beginning to sink, cried out, “Lord, save me!”
31 UDB येशूने लगेच आपला हात पुढे केला आणि पेत्राला धरले. येशू त्याला म्हणाला, “तू माझ्या सामर्थ्यावर अगदी थोडासाच विश्वास ठेवतो! मी तुला बुडण्यापासून वाचवणार नाही असा तू विचार का केला?” BSB BSB: Immediately Jesus reached out His hand and took hold of Peter. “You of little faith,” He said, “why did you doubt?”
32 UDB मग येशू आणि पेत्र दोघेही नावेमध्ये चढले आणि वारा अचानक आपोआपच जोराने वाहण्याचा बंद झाला. BSB BSB: And when they had climbed back into the boat, the wind died down.
34 UDB त्या नावेतून समुद्रात ते आणखी पुढे गेले, तेव्हा गनेसरेत नावाच्या गावाच्या शेजारील किनाऱ्यावर ते पोहोंचले. BSB BSB: When they had crossed over, they landed at Gennesaret.
35 UDB येशूला त्या प्रदेशातील पुरूषांनी ओळखले, आणि येशू त्यांच्या प्रदेशात आला आहे हे त्या संपूर्ण भागात राहणाऱ्या इतरांना माहिती द्यावी म्हणून त्यांनी काही लोकांना पाठवले. मग त्या प्रदेशातील लोकांनी त्यांच्यामधील आजारी लोकांना त्याच्याकडे आणले. BSB BSB: And when the men of that place recognized Jesus, they sent word to all the surrounding region. People brought all the sick to Him
36 UDB त्यांनी त्याला स्पर्श करू द्यावा किंवा त्याने घातलेल्या अंगरख्याच्या काठाला तरी निदान स्पर्श करू द्यावा जेणेकरून ते बरे होतील म्हणून ते आजारी लोक येशूला विनंती करत राहिले. त्याला किंवा त्याच्या वस्त्राला स्पर्श करणारा प्रत्येक व्यक्ती बरा झाला. BSB BSB: and begged Him just to let them touch the fringe of His cloak. And all who touched Him were healed.