3 UDB त्यानंतर, जेव्हा येशू जैतून डोंगराच्या उतारावर एकटाच बसला होता, शिष्य त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याला विचारले, “मंदिराच्या इमारती सोबत त्या घटना केव्हा घडतील? आणि ह्या जगाचा अंत होणार आहे, आणि तू पुन्हा परत येणार आहेस हे दिसावे म्हणून कोणत्या गोष्टी घडणार आहेत?” BSB BSB: While Jesus was sitting on the Mount of Olives, the disciples came to Him privately. “Tell us,” they said, “when will these things happen, and what will be the sign of Your coming and of the end of the age?”
4 UDB येशूने उत्तर दिले, “काय घडणार आहे याविषयी तुम्हाला कोणीही फसवू नये, याची खात्री बाळगा एवढेच मी तुम्हाला सांगेन! BSB BSB: Jesus answered, “See to it that no one deceives you.
5 UDB अनेक लोक येतील आणि तो मीच आहे असे तुम्हाला सांगतील. होय, ते खरोखर असे म्हणतील, ‘मी ख्रिस्त आहे,’ आणि ते अनेक लोकांना फसवतील. BSB BSB: For many will come in My name, claiming, ‘I am the Christ,’ and will deceive many.
7 UDB वेगवेगळ्या लोकांचे गट एकमेकांवर हल्ला करतील, आणि राजे एकमेकांवर चाल करून जाण्यासाठी आपापल्या सैन्याचे नेतृत्व करतील. पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी दुष्काळ आणि भूमिकंप होतील. BSB BSB: Nation will rise against nation, and kingdom against kingdom. There will be famines and earthquakes in various places.
8 UDB या सर्व गोष्टी अगोदर घडतील, परंतु एखादी स्त्री एका बाळाला जन्म देत असते तेव्हा तिच्या वेदनांची सुरूवात होते तशाच प्रकारे हे असेल. BSB BSB: All these are the beginning of birth pains.
9 UDB यापेक्षा अधिक वाईट गोष्टी घडणार आहेत. जे लोक तुमचा विरोध करतात ते तुम्हाला ठार करावे व छळावे म्हणून धरून नेतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून वेगवेगळ्या गटातील लोक तुमचा तिरस्कार करतील. BSB BSB: Then they will deliver you over to be persecuted and killed, and you will be hated by all nations because of My name.
10 UDB माझ्यावर विश्वास ठेवणारे अनेक लोक देखील, त्यांचा छळ झाल्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवणे बंद करतील. ते त्यांच्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांचा विश्वास घात करतील आणि एकमेकांचा तिरस्कार करतील. BSB BSB: At that time many will fall away and will betray and hate one another,
11 UDB अनेक लोक ‘मी संदेष्टा आहे’ असे म्हणत येतील आणि मात्र ते खोटे बोलतील व त्यामुळे अनेक लोक फसवले जातील. BSB BSB: and many false prophets will arise and deceive many.
12 UDB देवाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे, अनेक विश्वासणारे देखील एकमेकांवर प्रीती करणार नाहीत. BSB BSB: Because of the multiplication of wickedness, the love of most will grow cold.
13 UDB परंतु जे विश्वासणारे त्यांच्या जीवनाच्या शेवटपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवत राहतील, त्या सर्वांना देव तारेल. BSB BSB: But the one who perseveres to the end will be saved.
14 UDB शिवाय, जगाच्या प्रत्येक भागामध्ये विश्वासणारे जातील आणि देव जगाच्या प्रत्येक भागातील लोकांवर राज्य करण्याची सुरूवात कशी करणार आहे, याविषयीच्या आनंदाच्या बातमीचा प्रचार करतील आणि ते सर्व लोक गटांपर्यंत ही बातमी नेतील. त्यानंतर जगाचा अंत येईल.” BSB BSB: And this gospel of the kingdom will be preached in all the world as a testimony to all nations, and then the end will come.
16 UDB मंदिरामध्ये ही घटना घडतांना तुम्ही पाहाल, तेव्हा यहूदी या प्रांतात राहणाऱ्या सर्वांनी डोंगरांकडे पळून जावे! BSB BSB: then let those who are in Judea flee to the mountains.
17 UDB पळून जाण्या अगोदर आपल्या घरातून काही वस्तू घेण्यासाठी मैदानामधील लोकांनी पुन्हा आपल्या घरांकडे परत जाऊ नये. BSB BSB: Let no one on the housetop come down to retrieve anything from his house.
18 UDB जे लोक शेतामध्ये काम करत असतील त्यांनी घरामधून आपली अंगरखे घेण्यासाठी परत फिरू नये. BSB BSB: And let no one in the field return for his cloak.
19 UDB त्या काळामध्ये ज्या स्त्रिया गर्भवती असतील त्यांना किती कष्ट होतील, आणि ज्या लहान लेकरांना पाजणाऱ्या असतील त्यांना दुःख सहन करावे लागेल, कारण त्यांच्यासाठी तेथून पळून जाणे खरोखर अवघड होईल! BSB BSB: How miserable those days will be for pregnant and nursing mothers!
20 UDB प्रार्थना करा की तुमचे पळून जाणे हिवाळ्यामध्ये होऊ नये कारण तेव्हा प्रवास करणे तुम्हाला कठीण होईल, तसेच ही घटना शब्बाथ दिवशी विसाव्याच्या दिवशी घडू नये म्हणून प्रार्थना करा; BSB BSB: Pray that your flight will not occur in the winter or on the Sabbath.
21 UDB कारण ह्या घटना घडतील तेव्हा लोकांना फार त्रासाला सामोरे जावे लागेल. देवाने हे जग निर्माण केले तेव्हापासून आतापर्यंत इतक्या मोठ्या संकटाचा सामना कोणालाही करावा लागला नाही, आणि पुढेही एवढे मोठे संकट कोणावर येणार नाही असे हे संकट असणार आहे. BSB BSB: For at that time there will be great tribulation, unseen from the beginning of the world until now, and never to be seen again.
22 UDB लोकांना ज्या संकटाचा सामना करावा लागेल याची वेळ जर देवाने कमी केली नसती, तर प्रत्येक जण मरण पावला असता, परंतु त्याने त्याची वेळ कमी करण्याचे ठरवले आहे कारण ज्या लोकांना त्याने निवडले आहे त्यांच्याविषयी त्याला काळजी वाटते.” BSB BSB: If those days had not been cut short, nobody would be saved. But for the sake of the elect, those days will be cut short.
23 UDB “त्यावेळेस लोक असे म्हणतील मी तो आहे, मी ख्रिस्त आहे, किंवा ते देवापासून आलेले खरे संदेष्टे आहेत असे म्हणत प्रकट होतील. ते वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह व चमत्कार करतील आणि अद्भुत गोष्टी करतील, जेणेकरून लोकांना फसवावे. देवाने निवडलेल्या तुम्हा लोकांनाही फसवावे म्हणून ते प्रयत्न करतील. म्हणून त्यावेळेस, जर कोणी तुम्हाला असे म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे!’ किंवा कुणी म्हणेल, ख्रिस्त तेथे आहे, तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका!’ BSB BSB: At that time, if anyone says to you, ‘Look, here is the Christ!’ or ‘There He is!’ do not believe it.
25 UDB ह्या गोष्टी घडण्याच्या अगोदरच मी यांच्याविषयी तुम्हाला इशारा देऊन ठेवला आहे हे तुम्ही विसरू नये. BSB BSB: See, I have told you in advance.
26 UDB जर कोणी तुम्हाला असे म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त त्या रानात आहे!’ तर तुम्ही तेथे जाऊ नका. तसेच, जर कोणी तुम्हाला असे म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त त्या गुप्त खोली मध्ये आहे!’ तर तुम्ही त्या व्यक्तीवर देखील विश्वास ठेवू नये. BSB BSB: So if they tell you, ‘There He is, in the wilderness,’ do not go out, or, ‘Here He is, in the inner rooms,’ do not believe it.
27 UDB कारण जेव्हा वीज चकाकते तेव्हा ती पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्व लोकांच्या दृष्टीस पडते, अगदी तशाच प्रकारे, जेव्हा मी, मनुष्याचा पुत्र, परत येईन तेव्हा प्रत्येकजण मला पाहील. BSB BSB: For just as the lightning comes from the east and flashes as far as the west, so will be the coming of the Son of Man.
28 UDB मी पुन्हा परतेन, तेव्हा ते सर्वांना स्पष्टपणे दिसणारे असेल; जेव्हा आपल्याला गिधाडे आकाशामध्ये फिरताना दिसतात, तेव्हा तेथे एखादा मेलेले जनावर असेल हे आपल्याला कळते तशाप्रमाणे हे होईल.” BSB BSB: Wherever there is a carcass, there the vultures will gather.
29 UDB “लोकांनी त्या दिवसांमध्ये संकटाचा सामना केल्यानंतर, संपूर्ण सृष्टी अंधकारमय होईल. सूर्य अंधकारमय होईल. चंद्र प्रकाश देणार नाही. तारे आकाशातून खाली पडतील. आणि देव आकाशाला हलवेल आणि सर्व गोष्टी त्यांच्या ठिकाणाहून हालतील. BSB BSB: Immediately after the tribulation of those days: ‘The sun will be darkened, and the moon will not give its light; the stars will fall from the sky, and the powers of the heavens will be shaken.’
30 UDB त्यानंतर, मी, मनुष्याचा पुत्र, पुन्हा पृथ्वीवर परत येत आहे हे दर्शवणारे चिन्ह सर्वजणांना आकाशामध्ये दृष्टीस पडेल. तेव्हा सर्व लोकांच्या गटातील जे लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ते विलाप करतील कारण देव त्यांना शिक्षा करणार आहे याविषयी ते घाबरलेले असतील. मी पृथ्वीवर परत येईन तेव्हा सामर्थ्याने व मोठ्या गौरवाने ढगांवर बसून परत येताना, मला म्हणजे, मनुष्याच्या पुत्राला ते पाहतील. BSB BSB: At that time the sign of the Son of Man will appear in heaven, and all the tribes of the earth will mourn. They will see the Son of Man coming on the clouds of heaven with power and great glory.
31 UDB मी स्वर्गातून माझ्या स्वर्गदूतांना पृथ्वीवर सगळीकडे पाठवेन. ते मोठ-मोठ्याने तुतारी वाजवतील. मग मी लोकांना निवडले आहे त्यांना ते संपूर्ण पृथ्वीवरून एकत्र करतील.” BSB BSB: And He will send out His angels with a loud trumpet call, and they will gather His elect from the four winds, from one end of the heavens to the other.
33 UDB त्याचप्रमाणे, मी तुम्हाला आता समजावून सांगितलेल्या सर्व गोष्टी घडतांना तुम्ही पाहाल, त्यावेळेस तुम्हाला ही कळेल की माझे परत येणे जवळ आले आहे. BSB BSB: So also, when you see all these things, you will know that He is near, right at the door.
40 UDB मी परत येईन, तेव्हा मी सर्व लोकांना स्वर्गात वर घेऊन जाणार नाही. माझ्यावर ज्यांनी भरोसा ठेवला आहे केवळ त्यांनाच मी घेऊन जाईन. उदाहरणार्थ, दोन लोक एका शेतात असतील. त्यांच्यापैकी एकाला स्वर्गात वर घेतले जाईल आणि त्याच्या सोबतचा दुसरा व्यक्तीला येथे शिक्षा भोगण्यासाठी सोडून दिले जाईल. BSB BSB: Two men will be in the field: one will be taken and the other left.
41 UDB अशाच प्रकारे, एका जात्यावर दोन स्त्रिया दळत असतील. त्यापैकी एकीला स्वर्गात घेतले जाईल आणि दुसरीला सोडून दिले जाईल. BSB BSB: Two women will be grinding at the mill: one will be taken and the other left.
43 UDB एका घराच्या मालकाला जर माहिती असले की दरोडेखोर रात्री कोणत्या क्षणी येतील, तर तो जागा राहिला असता आणि दरोडेखोरांना त्याने घर फोडू दिले नसते. अशाचप्रकारे, मी देखील एखाद्या चोरासारखा अनपेक्षित रीतीने येईन. BSB BSB: But understand this: If the homeowner had known in which watch of the night the thief was coming, he would have kept watch and would not have let his house be broken into.
44 UDB मी परत येण्याची तुम्ही अपेक्षा करणार नाही त्यावेळेस मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर परत येईल म्हणून तुम्ही तयार असण्याची गरज आहे.” BSB BSB: For this reason, you also must be ready, because the Son of Man will come at an hour you do not expect.
45 UDB “प्रत्येक विश्वास योग्य आणि ज्ञानी सेवक कसा आहे ह्याविषयीचा विचार करा. घरमालकाने एका सेवकाकडे इतर सेवकांवर देखरेख करण्याची जबाबदारी दिली. त्यांना ठरलेल्या वेळेवर जेवण देण्याचे त्याने त्याला सांगितले. त्यानंतर तो एका दूरच्या प्रवासावर निघून गेला. BSB BSB: Who then is the faithful and wise servant, whom the master has put in charge of his household, to give the others their food at the proper time?
46 UDB जेव्हा घरमालक त्या प्रवासावरून परत येईल, तेव्हा जर दास तसे करताना त्याला आढळला तर घर मालक त्याच्यावर अतिशय प्रसन्न होईल. BSB BSB: Blessed is that servant whose master finds him doing so when he returns.
47 UDB याविषयी विचार करा; घर मालक त्या एका दासाला त्याच्या सर्व मालमत्तेवर देखरेख ठेवणारा म्हणून नियुक्त करेल. BSB BSB: Truly I tell you, he will put him in charge of all his possessions.
48 UDB परंतु एखादा दुष्ट दास स्वतःशीच असे म्हणेल, ‘आता माझा मालक बराच काळासाठी परत येणार नाही त्याला जाऊन बराच वेळ झाला आहे. आणि मी काय करत आहे हे त्याला कळणार ही नाही.’ BSB BSB: But suppose that servant is wicked and says in his heart, ‘My master will be away a long time.’
49 UDB मग तो त्याच्या सोबतच्या इतर सेवकांना मारहाण करू लागेल. आणि तो खाईल व पिईल आणि जे पितात त्यांच्यासोबत राहील. BSB BSB: And he begins to beat his fellow servants and to eat and drink with drunkards.
50 UDB तो सेवक अपेक्षा करणार नाही अशा वेळेस त्याचा घर मालक परत येईल. BSB BSB: The master of that servant will come on a day he does not expect and at an hour he does not anticipate.
51 UDB तो त्या सेवकाला अतिशय कठोर शिक्षा देईल आणि जेथे ढोंगी लोकांना ठेवले जाते तेथे तो त्याला ठेवेल. त्या ठिकाणी लोक रडतात आणि आपले दात खातात कारण तेथे त्यांना खूप जास्त वेदना होतात.” BSB BSB: Then he will cut him to pieces and assign him a place with the hypocrites, where there will be weeping and gnashing of teeth.