1 UDB या सर्व गोष्टी सांगण्याचे येशूने समाप्त केल्यानंतर, तो आपल्या शिष्यांना म्हणाला, BSB BSB: When Jesus had finished saying all these things, He told His disciples,
2 UDB “आतापासून दोन दिवसानंतर आपण वल्हांडणाचा सण साजरा करणार आहोत हे तुम्हाला माहीत आहे. त्या वेळेस मला, मनुष्याच्या पुत्राला, जे मला वधस्तंभावर खिळणार आहेत त्यांच्या हातात धरून देतील.” BSB BSB: “You know that the Passover is two days away, and the Son of Man will be handed over to be crucified.”
4 UDB येशूला एखाद्या कोड्यामध्ये अडकवून कशी अटक करावी याची ते योजना करत होते जेणेकरून त्यांना त्याला ठार करता आले असते. BSB BSB: and they conspired to arrest Jesus covertly and kill Him.
5 UDB परंतु ते म्हणाले, “वल्हांडणाच्या सणाच्या दिवसांमध्ये आपण ते करू नये, जर आपण तसे केले, तर लोक कदाचित दंगल करतील.” BSB BSB: “But not during the feast,” they said, “or there may be a riot among the people.”
6 UDB येशू आणि त्याचे शिष्य बेथानी नावाच्या एका खेड्यात असता, येशूने ज्याला कुष्ठरोगातून बरे केले होते, त्या शिमोनाच्या घरी जेवत होते. BSB BSB: While Jesus was in Bethany in the home of Simon the Leper,
7 UDB ते जेवण करत असता, तेथे घरात एक स्त्री आली. दगडांनी बनवलेल्या एका बाटलीमध्ये अतिशय मोलवान अत्तर घेऊन ती तेथे आली होती. येशू जेवण करत असतांना ती त्याच्याकडे गेली आणि त्याच्या डोक्यावर तिने ते पूर्ण अत्तर ओतून टाकले. BSB BSB: a woman came to Him with an alabaster jar of expensive perfume, which she poured on His head as He reclined at the table.
8 UDB जेव्हा शिष्यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना खूप राग आला. त्यापैकी एक जण म्हणाला, “हे अत्तर असे वाया घालवणे अतिशय वाईट आहे! BSB BSB: When the disciples saw this, they were indignant and asked, “Why this waste?
9 UDB आम्ही ते विकले असते आणि त्यामुळे भरपूर पैसे मिळवले असते! मग आम्ही तो पैसा गरीब लोकांना दिला असता.” BSB BSB: This perfume could have been sold at a high price, and the money given to the poor.”
10 UDB ते काय बोलत आहेत हे येशूला माहीती होते, म्हणून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही या स्त्रीला अजिबात त्रास देऊ नये! तिने माझ्यासाठी एक अतिशय सुंदर कार्य केले आहे. BSB BSB: Aware of this, Jesus asked, “Why are you bothering this woman? She has done a beautiful deed to Me.
11 UDB गरीब लोक तुम्हामध्ये तर नेहमीच असणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला त्यांना मदत करावीशी वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता. परंतु मी नेहमीकरीता तुम्हासोबत राहणार नाही! BSB BSB: The poor you will always have with you, but you will not always have Me.
12 UDB तिने हे अत्तर माझ्या शरीरावर ओतले, तेव्हा मी लवकरच मरणार आहे हे तिला माहिती झाल्यासारखे वाटले. आणि मला पुरले जाण्याच्या आधी तिने माझ्या शरीराला अभिषेक केल्याप्रमाणे ते झाले. BSB BSB: By pouring this perfume on Me, she has prepared My body for burial.
13 UDB मी तुम्हाला हे सांगतो: माझ्याविषयी संपूर्ण जगामध्ये लोक जेथे कोठे सुवार्ता सांगतील, तेथे ह्या स्त्रीने माझ्यासाठी जे काही केले त्याविषयी ही ते सांगतील, आणि अशा रीतीने लोक नेहमी तिची आठवण करतील.” BSB BSB: Truly I tell you, wherever this gospel is preached in all the world, what she has done will also be told in memory of her.”
14 UDB त्या बारा शिष्यांपैकी एक असून देखील, यहूदा इस्कर्योत, त्या मुख्य याजकांकडे गेला. BSB BSB: Then one of the Twelve, the one called Judas Iscariot, went to the chief priests
15 UDB त्याने त्यांना विचारले, “मी येशूला अटक करण्यास मदत केली. तर त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला किती पैसे देण्यास तयार व्हाल?” त्याला चांदीच्या तीस मोहरा देण्याचे त्यांनी कबूल केले. मग त्यांनी त्या मोहरांना मोजले आणि त्याला त्या देऊन टाकल्या. BSB BSB: and asked, “What are you willing to give me if I hand Him over to you?” And they set out for him thirty pieces of silver.
16 UDB त्यावेळेपासून येशूला अटक करण्याची संधी यहूदा शोधू लागला. BSB BSB: So from then on Judas looked for an opportunity to betray Jesus.
17 UDB एक आठवडाभर चालणाऱ्या खमिर न टाकता तयार केलेल्या भाकरीच्या सणाच्या पहिल्याच दिवशी, शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “आम्ही तुझ्यासोबत भोजन करावे म्हणून वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी त्याचे जेवण कुठे करावे अशी तुझी इच्छा आहे?” BSB BSB: On the first day of the Feast of Unleavened Bread, the disciples came to Jesus and asked, “Where do You want us to prepare for You to eat the Passover?”
18 UDB येशूने त्याच्या दोन शिष्यांना काय करावे याविषयीच्या सूचना त्यांना दिल्या. तो त्यांना म्हणाला, “शहरामधील मी एका मनुष्यासोबत या अगोदरच योजना आखली आहे. तुम्ही त्याच्याकडे जा. त्याला जाऊन असे सांगा: गुरुजी असे म्हणतात, ‘मी तुला ज्या वेळेविषयी सांगितले होते ती वेळ आता जवळ आली आहे. मी तुझ्या घरी माझ्या शिष्यांसोबत वल्हांडणाचे जेवण करून तो सण साजरा करणार आहे, आणि ते भोजन तयार करण्यासाठी मी ह्या दोघांना तुझ्याकडे पाठवले आहे.’” BSB BSB: He answered, “Go into the city to a certain man and tell him that the Teacher says, ‘My time is near. I will keep the Passover with My disciples at your house.’”
19 UDB म्हणून येशूने सांगितल्याप्रमाणे त्या दोन शिष्यांनी तसेच केले. त्या मनुष्याच्या घरी जाऊन त्या दोघांनी वल्हांडणाचे भोजन तयार केले. BSB BSB: So the disciples did as Jesus had directed them and prepared the Passover.
20 UDB मग ती संध्याकाळ आल्यानंतर, येशू त्याच्या बारा शिष्यांसोबत जेवण करत होता. BSB BSB: When evening came, Jesus was reclining with the twelve disciples.
21 UDB तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका: माझ्या शत्रूंनी मला धरावे यासाठी तुमच्या पैकी एक जण त्यांना मदत करणार आहे.” BSB BSB: And while they were eating, He said to them, “Truly I tell you, one of you will betray Me.”
22 UDB शिष्य अतिशय उदास झाले. ते त्याला म्हणू लागले, ते एकानंतर एक त्याच्याशी बोलले, “प्रभू, मी तो नक्कीच नाही!” BSB BSB: They were deeply grieved and began to ask Him one after another, “Surely not I, Lord?”
23 UDB त्याने त्याला उत्तर दिले, “माझ्यासोबत जो भाजीच्या ताटामध्ये जो भाकर बुचकळत आहे. तोच मला माझ्या शत्रूंनी अटक करावी म्हणून मदत करावी आणि तो तुम्हापैकीच एक आहे. BSB BSB: Jesus answered, “The one who has dipped his hand into the bowl with Me will betray Me.
24 UDB माझ्याविषयी शास्त्रलेख जे सांगतात तसे घडावे म्हणून, मनुष्याचा पुत्र, म्हणजे मी नक्कीच ठार केला जाईन. परंतु जो पुरुष माझ्या शत्रूंना मला अटक करण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यासाठी भयंकर शिक्षा वाट पाहात आहे! त्या पुरुषाने कधी जन्म घेतला नसता तर ते त्याच्यासाठी कितीतरी बरे झाले असते!” BSB BSB: The Son of Man will go just as it is written about Him, but woe to that man by whom He is betrayed. It would be better for him if he had not been born.”
25 UDB त्याला जो धोका देणार होता, तो यहूदा त्याला म्हणाला, “प्रभूजी, मी तर तो नक्कीच नाही!” येशूने त्याला उत्तर दिले, “होय, तूच तो आहेस.” BSB BSB: Then Judas, who would betray Him, said, “Surely not I, Rabbi?” Jesus answered, “You have said it yourself.”
26 UDB ते जेवण करत असतांना, येशूने भाकरीचा एक लहान तुकडा घेतला आणि त्याच्याबद्दल देवाचे आभार मानले. त्याने ती भाकर मोडली, आणि ते तुकडे शिष्यांना दिले, आणि तो म्हणाला, “ही भाकर घ्या आणि ती खा. हे माझे शरीर आहे.” BSB BSB: While they were eating, Jesus took bread, spoke a blessing and broke it, and gave it to the disciples, saying, “Take and eat; this is My body.”
27 UDB त्यानंतर त्याने द्राक्षरसाचा एक प्याला घेतला आणि त्याच्यासाठी देवाचे आभार मानले. मग त्याने तो त्यांना दिला आणि तो म्हणाला, “तुम्ही सर्व या प्यालातून प्या. BSB BSB: Then He took the cup, gave thanks, and gave it to them, saying, “Drink from it, all of you.
28 UDB ह्या प्याल्यातील द्राक्षरस माझे रक्त आहे ते माझ्या शरीरातून लवकरच वाहीले जाईल. अनेक लोकांच्या पापांची क्षमा करण्यासाठी देव जो नवा करार करणार आहे त्याचे चिन्ह म्हणजे हे रक्त आहे. BSB BSB: This is My blood of the covenant, which is poured out for many for the forgiveness of sins.
29 UDB तुम्ही ह्याची काळजीपूर्वक नोंद घ्या: हा द्राक्षरस एका नव्या अर्थाने पिण्याची वेळ येईपर्यंत मी यानंतर कधीही अशाप्रकारे द्राक्षरस पिणार नाही. माझा पिता सर्वांवर राज्य करत आहे हे प्रगट करेल त्याच वेळेस हे घडेल.” BSB BSB: I tell you, I will not drink of this fruit of the vine from now on until that day when I drink it anew with you in My Father’s kingdom.”
30 UDB त्यानंतर त्यांनी एक गीत गायले, आणि मग ते जैतूनाच्या डोंगराकडे चालत गेले. BSB BSB: And when they had sung a hymn, they went out to the Mount of Olives.
31 UDB तेथे जात असतांना, येशूने त्यांना सांगितले, “माझ्यासोबत जे घडणार आहे त्यामुळे तुम्हापैकी प्रत्येक जण आज रात्री मला सोडून देईल! हे नक्कीच घडणार आहे कारण देवाने बोललेले हे शब्द शास्त्र लेखामध्ये लिहिलेले आहेत: ‘मनुष्याने मेंढपाळाला ठार करावे असे मी होऊ देईन, आणि ते सर्व मेंढरांची दाणादाण करतील.’ BSB BSB: Then Jesus said to them, “This very night you will all fall away on account of Me. For it is written: ‘I will strike the Shepherd, and the sheep of the flock will be scattered.’
32 UDB परंतु मी मरण पावल्यावर आणि पुन्हा जिवंत झाल्यानंतर, मी तुमच्या अगोदर गालीलात जाईन आणि तेथे तुम्हाला भेटणार.” BSB BSB: But after I have risen, I will go ahead of you into Galilee.”
33 UDB पेत्राने उत्तर दिले, “तुझ्यासोबत जे काही घडणार आहे ते पाहून कदाचित सर्व शिष्य तुला सोडून देतील, परंतु मी तुला नक्कीच कधीही सोडणार नाही!” BSB BSB: Peter said to Him, “Even if all fall away on account of You, I never will.”
34 UDB येशूने त्याला उत्तर दिले आणि म्हटले, “आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला ओळखत नाहीस, असे तीन वेळेस तू म्हणशील हे सत्य आहे!” BSB BSB: “Truly I tell you,” Jesus declared, “this very night, before the rooster crows, you will deny Me three times.”
35 UDB पेत्र त्याला म्हणाला, “मी तुझा बचाव करत असतांना त्यांनी मला ठार जरी केले, तरी मी तुला ओळखत नाही असे कधीही म्हणणार नाही!” इतर सर्व शिष्यांनीही असेच म्हटले. BSB BSB: Peter replied, “Even if I have to die with You, I will never deny You.” And all the other disciples said the same thing.
36 UDB त्यानंतर गेथशेमाने नावाच्या एका ठिकाणावर येशू आपल्या शिष्यांसोबत पोहोंचला. तेथे तो म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करतो तोपर्यंत तुम्ही येथेच थांबा.” BSB BSB: Then Jesus went with His disciples to a place called Gethsemane, and He told them, “Sit here while I go over there and pray.”
37 UDB त्याने आपल्या सोबत, पेत्र, याकोब, आणि योहानाला घेतले आणि तो अतिशय चिंताक्रात झाला व कळवळला. BSB BSB: He took with Him Peter and the two sons of Zebedee and began to be sorrowful and deeply distressed.
38 UDB त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “मी अतिशय दुःखी आहे, इतका की मी जणुकाय मरावयास टेकलो आहे असे मला वाटते! तुम्ही येथे थांबा आणि माझ्यासोबत जागे राहा.” BSB BSB: Then He said to them, “My soul is consumed with sorrow to the point of death. Stay here and keep watch with Me.”
39 UDB मग आणखी थोडे पुढे जाऊन, तो जमिनीवर उपडा पडला. त्याने प्रार्थना केली, “हे पित्या, ज्याप्रकारे मला दुःख सहन करावे लागणार आहे, तुला शक्य असल्यास मला ते दुःख सहन करावे लागू देऊ नकोस. परंतु माझ्या इच्छेप्रमाणे करू नकोस. त्याऐवजी, जशी तुझी इच्छा आहे तसे कर!” BSB BSB: Going a little farther, He fell facedown and prayed, “My Father, if it is possible, let this cup pass from Me. Yet not as I will, but as You will.”
40 UDB मग तो त्या तीन शिष्यांकडे परत आला आणि ते त्याला झोपलेले आहेत असे दिसले. त्याने पेत्राला जागे केले आणि त्याला तो म्हणाला, “तुम्ही पुरूष झोपी गेलात हे पाहून मी निराश झालो आहे, तुम्हाला माझ्यासोबत थोडावेळ देखील जागे राहता आले नाही! BSB BSB: Then Jesus returned to the disciples and found them sleeping. “Were you not able to keep watch with Me for one hour?” He asked Peter.
41 UDB कोणी तुम्हाला पापात पाडण्यासाठी तुम्हाला मोहात पाडावे अशा वेळेस तुम्ही त्याचा विरोध करावा म्हणून तुम्ही जागे राहून प्रार्थना करणे आवश्यक आहे.” BSB BSB: “Watch and pray so that you will not enter into temptation. For the spirit is willing, but the body is weak.”
42 UDB मग तो दुसऱ्यांदा तेथे गेला. त्याने प्रार्थना केली, “माझ्या पित्या, जर मी दुःख सहन करणे अवश्य आहे, तर जे काही घडावे अशी तुझी इच्छा आहे ते घडू दे!” BSB BSB: A second time He went away and prayed, “My Father, if this cup cannot pass unless I drink it, may Your will be done.”
43 UDB जेव्हा तो त्या तीन शिष्यांकडे परत आला, त्याने पाहिले की ते पुन्हा झोपलेले होते. त्यांच्याने झोप आवरणे अशक्य झाले होते. BSB BSB: And again Jesus returned and found them sleeping, for their eyes were heavy.
44 UDB म्हणून त्यांने त्यांना सोडून दिले आणि तो पुन्हा परत गेला. त्याने तिसऱ्यांदा प्रार्थना केली, त्याने आधी म्हटले तशाच प्रकारे पुन्हा प्रार्थनेमध्ये म्हटले. BSB BSB: So He left them and went away once more and prayed a third time, saying the same thing.
45 UDB मग तो इतर सर्व शिष्यांकडे परत आला. त्याने त्यांना जागे केले आणि तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आता ही झोपलेले आहात आणि आराम करत आहा हे पाहून मी निराश होत आहे! पाहा! पापी लोकांनी मनुष्याच्या पुत्राला अटक करावी यासाठी कोणीतरी त्यांना मदत करत आहे! BSB BSB: Then He returned to the disciples and said, “Are you still sleeping and resting? Look, the hour is near, and the Son of Man is betrayed into the hands of sinners.
46 UDB तर उठा! आपण जाऊन त्यांना भेटूया! मला अटक करण्यासाठी त्यांना मदत करणारा जवळ येऊन पोहचला आहे!” BSB BSB: Rise, let us go! See, My betrayer is approaching!”
48 UDB यहूदाने अगोदरच त्यांना एक इशारा निश्चित करून ठेवला होता. त्याने त्यांना असे सांगितले होते की, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन तोच मनुष्य तुम्हास हवा आहे. त्याला अटक करा!” BSB BSB: Now the betrayer had arranged a signal with them: “The One I kiss is the man; arrest Him.”
49 UDB तो लगेचच येशूकडे गेला आणि त्याला म्हणाला, “गुरूजी, अभिवादन!” आणि मग त्याने येशूचे चुंबन घेतले. BSB BSB: Going directly to Jesus, he said, “Greetings, Rabbi!” and kissed Him.
50 UDB येशूने उत्तर दिले, “मित्रा, तू जे काही करण्याचे ठरवले आहे, ते लवकर कर.” मग यहूदासोबत जे लोक आले होते ते पुढे आले आणि त्यांनी येशूला पकडले. BSB BSB: “Friend,” Jesus replied, “do what you came for.” Then the men stepped forward, seized Jesus, and arrested Him.
53 UDB तुम्हाला काय वाटते मी जर माझ्या पित्याला विनंती केली तर तो माझ्यासाठी देवदूतांच्या सैन्याच्या बारा तुकड्यांना लगेचच पाठवून देणार नाही काय? BSB BSB: Are you not aware that I can call on My Father, and He will at once put at My disposal more than twelve legions of angels?
54 UDB परंतु जर मी तसे केले, तर संदेष्ट्यांनी शास्त्र लेखांमध्ये लिहिल्याप्रमाणे मसीहा सोबत जे काही घडणार आहे ते परिपूर्ण होणार नाही.” BSB BSB: But how then would the Scriptures be fulfilled that say it must happen this way?”
55 UDB जे लोक येशूला धरण्यासाठी आले होते, त्यांना येशू त्यावेळेस म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि भाले घेऊन मला धरण्यासाठी आला आहात हे किती आश्चर्यकारक आहे, एखाद्या दरोडेखोराला धरायला यावेत तसे तुम्ही आला आहात! तुमच्या मंदिराच्या अंगणामध्ये दररोज मी बसलेलो असायचो आणि लोकांना शिकवत असे. तुम्ही मला तेव्हा का अटक केली नाही? BSB BSB: At that time Jesus said to the crowd, “Have you come out with swords and clubs to arrest Me as you would an outlaw? Every day I sat teaching in the temple courts, and you did not arrest Me.
56 UDB परंतु माझ्याविषयी शास्त्र लेखामध्ये संदेष्ट्यांनी लिहिलेल्या सर्व गोष्टी परिपूर्ण होण्यासाठी हे केवळ घडत आहे.” मग येशूच्या सर्व शिष्यांनी येशूला सोडून दिले आणि ते तेथून पळून गेले. BSB BSB: But this has all happened so that the writings of the prophets would be fulfilled.” Then all the disciples deserted Him and fled.
58 UDB पेत्र दुरवरून येशूच्या मागे मागे चालत होता. मुख्य याजकाच्या घराच्या अंगणामध्ये पेत्र आला. त्याने अंगणामध्ये प्रवेश केला आणि रक्षकांच्या सोबत तो बसला आणि काय घडत आहे ते पाहू लागला. BSB BSB: But Peter followed Him at a distance, right up to the courtyard of the high priest. And he went in and sat down with the guards to see the outcome.
59 UDB येशूला मृत्युदंड देता यावा म्हणून मुख्य याजक आणि यहूद्यांच्या धर्म सभेतील इतर लोक अशा लोकांचा शोध घेत होते जे त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देतील. BSB BSB: Now the chief priests and the whole Sanhedrin were seeking false testimony against Jesus in order to put Him to death.
60 UDB परंतु अनेक लोकांनी त्याची खोटी साक्ष देऊन देखील त्यांना असा कोणी सापडला नाही जो उपयोगी साक्ष देऊ शकेल. शेवटी दोन पुरूष समोर आले आणि म्हणाले, BSB BSB: But they did not find any, though many false witnesses came forward. Finally two came forward
61 UDB “ह्या मनुष्याने म्हटले आहे की, ‘मी देवाच्या मंदिराचा नाश करण्यास आणि तीन दिवसात ते पुन्हा उभारण्यास समर्थ आहे.’” BSB BSB: and declared, “This man said, ‘I am able to destroy the temple of God and rebuild it in three days.’”
62 UDB मग मुख्य याजक उभा राहिला आणि येशूला म्हणाला, “तू ह्यांना प्रत्युत्तर देणार नाहीस काय? ते तुझ्यावर ज्या गोष्टींचा आरोप लावत आहेत त्याविषयी तुला काय म्हणायचे आहे?” BSB BSB: So the high priest stood up and asked Him, “Have You no answer? What are these men testifying against You?”
63 UDB परंतु येशू शांत राहिला. मग मुख्य याजक त्याला म्हणाला, “मी तुला आज्ञा करतो की तू मला सत्य सांगावे; सर्वसमर्थ देव तुझे ऐकत आहे हे तुला ठाऊक आहे: तू देवाचा पुत्र, ख्रिस्त आहेस काय?” BSB BSB: But Jesus remained silent. Then the high priest said to Him, “I charge You under oath by the living God: Tell us if You are the Christ, the Son of God.”
64 UDB येशूने उत्तर दिले, “होय, तू म्हणतो ते तसेच आहे. परंतु मी तुम्हा सर्वांना हे देखील सांगतो: तुम्ही मला, मनुष्याच्या पुत्राला, एके दिवशी सर्वसमर्थ देवाच्या बाजूला बसून अधिकार करत असतांना पाहणार आहात. तसेच स्वर्गातून ढगांवर बसून येत असतांना मी तुम्हाला दिसणार आहे!” BSB BSB: “You have said it yourself,” Jesus answered. “But I say to all of you, from now on you will see the Son of Man sitting at the right hand of Power and coming on the clouds of heaven.”
65 UDB ह्यामुळे मुख्य याजक एवढा व्यथीत झाला की त्याने आपला अंगरखा फाडला. मग तो म्हणाला, “ह्या मनुष्याने देवाचा अपमान केला आहे! तो देवाच्या समान आहे असा स्वतःविषयी दावा करतो! आता ह्या मनुष्याच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी आम्हाला आणखी कोणाची गरज नाही! त्याने काय म्हटले ते तुम्ही ऐकले आहे! BSB BSB: At this, the high priest tore his clothes and declared, “He has blasphemed! Why do we need any more witnesses? Look, now you have heard the blasphemy.
66 UDB तुम्हाला ह्याविषयी काय वाटते?” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आमच्या नियमांप्रमाणे, हा दोषी ठरला आहे आणि ह्याला मृत्युदंड देण्यात यावा!” BSB BSB: What do you think?” “He deserves to die,” they answered.
67 UDB मग त्यांच्यापैकी काही लोक त्याच्या तोंडावर थुंकले. आणि इतर लोकांनी त्याला बुक्कयांनी मारहाण केली. इतर अनेकांनी त्याला चापटा मारल्या; BSB BSB: Then they spit in His face and struck Him. Others slapped Him
68 UDB आणि ते म्हणाले, “तू ख्रिस्त असल्याचा दावा करतोस, म्हणून तुला कोणी मारले ते आम्हास सांग!” BSB BSB: and said, “Prophesy to us, Christ! Who hit You?”
69 UDB पेत्र बाहेर अंगणामध्ये बसला होता. तेथील एक दासी त्याच्या जवळ आली आणि तिने त्याला पाहिले. ती म्हणाली, “गालील जिल्ह्यातील तो मनुष्य येशू, त्याच्यासोबत तू देखील होतास!” BSB BSB: Meanwhile, Peter was sitting out in the courtyard, and a servant girl came up to him. “You also were with Jesus the Galilean,” she said.
70 UDB परंतु सगळेजण हे संभाषण ऐकत असतांना, त्याने तिचे म्हणणे नाकारले. तो म्हणाला, “तू कशाविषयी बोलत आहेस हे मला ठाऊक नाही!” BSB BSB: But he denied it before them all: “I do not know what you are talking about.”
71 UDB मग तो घराच्या अंगणातून निघून बाहेरील दाराजवळ गेला. दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले आणि तिथे उभ्या असलेल्या लोकांना ती म्हणाली, “नासरेथाहून आलेला तो मनुष्य येशू याच्यासोबत हाही मनुष्य होता.” BSB BSB: When Peter had gone out to the gateway, another servant girl saw him and said to the people there, “This man was with Jesus of Nazareth.”
72 UDB परंतु पेत्राने पुन्हा एकदा नकार दिला. तो म्हणाला, “मी जर खोटा बोलत असेल तर परमेश्वर मला शिक्षा देवो! मी तर तुम्हाला सांगतो, मी तर त्या मनुष्याला ओळखत देखील नाही!” मग पेत्र अंगणात बाहेर आला त्याने जे केले त्याबद्दल दुःख झाले आणि तो रडला. BSB BSB: And again he denied it with an oath: “I do not know the man!”
73 UDB आणखी थोड्या वेळानंतर, जे लोक तेथे उभे होते ते पेत्राच्या जवळ आले, आणि ते त्याला म्हणाले, “आम्हाला नक्कीच खात्री आहे की तू देखील त्या मनुष्यासोबत होतास. तुझ्या बोलण्याच्या शैलीवरून आम्ही ओळखू शकतो की तू देखील गालीलाचा आहेस.” BSB BSB: After a little while, those standing nearby came up to Peter. “Surely you are one of them,” they said, “for your accent gives you away.”
74 UDB मग पेत्र मोठमोठ्याने असे बोलू लागला की जर तो खोटा बोलत असेल तर देव त्याला शाप देईल. तो खरे सांगत आहे ह्याचा साक्षीदार म्हणून त्याने देवाला स्वर्गातून साक्ष देण्याची विनंती केली आणि तो म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही!” आणि लगेचच कोंबडा आरवला. BSB BSB: At that he began to curse and swear to them, “I do not know the man!” And immediately a rooster crowed.
75 UDB मग येशूने त्याच्याशी बोललेले होते ते पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला ओळखत नाहीस असे तू म्हणशील.” मग पेत्र अंगणातून बाहेर आला, आणि त्याने जे केले त्याबद्दल त्याला दुःख झाले म्हणून तो फार रडला. BSB BSB: Then Peter remembered the word that Jesus had spoken: “Before the rooster crows, you will deny Me three times.” And he went outside and wept bitterly.