1 UDB येशू अजूनही नासरेथ गावातच असता योहान, ज्याला लोक बाप्तिस्मा करणारा म्हणतात, तो यहूदा प्रांतातील ओसाड प्रदेशात गेला. तेथे येणाऱ्या सर्व लोकांना तो उपदेश करत होता. BSB BSB: In those days John the Baptist came, preaching in the wilderness of Judea
2 UDB तो म्हणत असे, “तुम्ही पाप करणे थांबवले पाहिजे, कारण देव लवकरच दाखवून देईल की तो राजा आहे, तुम्ही जर पाप करणे थांबवले नाही तर तो तुमचा नकार करेल.” BSB BSB: and saying, “Repent, for the kingdom of heaven is near.”
3 UDB योहानाने उपदेश करण्यास सुरवात केली, तेव्हा फार काळापूर्वी यशया संदेष्टा जे काही बोलला ते खरे ठरले. तो म्हणाला, “अरण्यामध्ये कोणाचा तरी आवाज लोकांना ऐकू येत आहे, तो येणाऱ्या प्रत्येकाला ओरडून म्हणत आहे, प्रभू येईल तेव्हा त्याचा स्वीकार करण्यासाठी तयार असा! त्याच्यासाठी सर्वकाही तयार करा!” BSB BSB: This is he who was spoken of through the prophet Isaiah: “A voice of one calling in the wilderness, ‘Prepare the way for the Lord, make straight paths for Him.’”
4 UDB योहान हा उंटाच्या केसापासून बनवलेले खरबरीत वस्त्र घालत असे. जसा एलिया संदेष्टा फार काळापूर्वी घालत होता तसा, चामड्याचा कमरबंद आपल्या कंबरे भोवती घालत असे. अरण्यात आढळणारा मध आणि नाकतोडे हेच मात्र त्याचे अन्न होते. BSB BSB: John wore a garment of camel’s hair, with a leather belt around his waist. His food was locusts and wild honey.
5 UDB यरुशलेम शहरामध्ये राहणारे लोक, यहूदा जिल्ह्यातील इतर ठिकाणातील अनेक लोक, आणि यार्देन नदी जवळ राहणारे इतर पुष्कळ लोक हे सर्व योहानाचा उपदेश ऐकण्यासाठी येत होते. BSB BSB: People went out to him from Jerusalem and all Judea and the whole region around the Jordan.
6 UDB त्यांनी त्याचे ऐकल्यानंतर ते, उघडपणे त्यांच्या पापांची कबुली देत असत, आणि मग तो त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा देत असे. BSB BSB: Confessing their sins, they were baptized by him in the Jordan River.
7 UDB परंतु योहानाने पाहिले की अनेक परूशी आणि सदूकी बाप्तिस्मा घेण्यासाठी त्याच्याकडे येत आहेत. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक विषारी सापाची पिल्ले आहात! जो कोणी पाप करतो, त्या प्रत्येकाला देव एके दिवशी शिक्षा करील ह्या विषयी तुम्हांला कोणी सावध केले? BSB BSB: But when John saw many of the Pharisees and Sadducees coming to his place of baptism, he said to them, “You brood of vipers, who warned you to flee from the coming wrath?
8 UDB जर खरोखर तुम्ही पाप करणे थांबवले, तर ते दर्शविण्यासाठी योग्य त्या गोष्टी करा. BSB BSB: Produce fruit, then, in keeping with repentance.
9 UDB देवाने अब्राहामाच्या वंशजांना दिलेले वचन मला ठाऊक आहे. परंतु आपल्या स्वतःशी असे म्हणू नका, ‘आम्ही आमचा पूर्वज अब्राहामाचे वंशज आहोत, म्हणून आमच्या पापासाठी देव आम्हांला शासन करणार नाही.' मी तुम्हास सांगतो की देव ह्या धोंड्याचे रुपांतर अब्राहामाच्या वंशजांमध्ये करू शकतो! BSB BSB: And do not presume to say to yourselves, ‘We have Abraham as our father.’ For I tell you that out of these stones God can raise up children for Abraham.
10 UDB जे झाड चांगले फळ देत नाही त्याला कापण्यासाठी जसे एखादा मनुष्य त्याच्या मुळांवर घाव करतो तसे, देव तुम्हांला शिक्षा देण्यासाठी तयार आहे. तो अशा प्रत्येक झाडाला कापून टाकेल आणि त्यांना तो आग्निमध्ये टाकेल.” BSB BSB: The axe lies ready at the root of the trees, and every tree that does not produce good fruit will be cut down and thrown into the fire.
11 UDB “माझ्याविषयी म्हणाल तर, मी काही फार महत्त्वाचा नाही, कारण मी तर केवळ पाण्याने बाप्तिस्मा करतो. लोकांनी त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप केल्यानंतर मी ते करतो. परंतु लवकरच अतिशय सामर्थ्यशाली गोष्टी करणारा असा कोणीतरी एक येत आहे. तो माझ्यापेक्षा एवढा महान आहे की, मी त्याच्या पायतणांना उचलून चालण्यास देखील पात्र नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. BSB BSB: I baptize you with water for repentance, but after me will come One more powerful than I, whose sandals I am not worthy to carry. He will baptize you with the Holy Spirit and with fire.
12 UDB चांगल्या धान्यातून भूसा वेगळा करण्यासाठी, त्याचे उफणण्याचे सुप त्याने आपल्या हाती घेतले आहे. त्याने ज्या धान्याची मळणी केली आहे त्यामधून सर्व निरुपयोगी भूसा बाहेर काढून टाकण्यास तो तयार आहे. जसे शेतकरी आपल्या कोठारात गहू साठवतो तसेच तो नीतिमान लोकांना सुद्धा घरामध्ये ठेवील; परंतु जसे एखाद्याने न विझणाऱ्या आग्निमध्ये भुसा जाळावा तसे, तो दुष्ट लोकांना आग्निमध्ये जाळून टाकील. BSB BSB: His winnowing fork is in His hand to clear His threshing floor and to gather His wheat into the barn; but He will burn up the chaff with unquenchable fire.”
13 UDB त्या दिवसात, जेथे योहान होता तेथे, येशू गालील जिल्ह्यातून यार्देन नदीकडे गेला. योहानाने त्याचा बाप्तिस्मा करावा म्हणून त्याने तसे केले. BSB BSB: At that time Jesus came from Galilee to the Jordan to be baptized by John.
14 UDB येशूने योहानाला त्याचा बाप्तिस्मा करण्यास सांगितले, तेव्हा योहानाने त्याला नकार दिला; तो म्हणाला, “तुच माझा बाप्तिस्मा करावा ह्याची मला गरज आहे! तू तर पापी नाहीस तरी देखील, तू माझ्याकडे का आला आहेस?” BSB BSB: But John tried to prevent Him, saying, “I need to be baptized by You, and do You come to me?”
15 UDB परंतु येशू त्याला म्हणाला, “आताच माझा बाप्तिस्मा कर, कारण हे केल्याने आपण दोघेही देवाच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही करू.” मग योहान त्याला बाप्तिस्मा देण्यासाठी तयार झाला. BSB BSB: “Let it be so now,” Jesus replied. “It is fitting for us to fulfill all righteousness in this way.” Then John permitted Him.
17 UDB मग देव स्वर्गातून बोलला आणि म्हणाला, “हा माझा पुत्र आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो, आणि मी त्याच्या विषयी फार संतुष्ट आहे.” BSB BSB: And a voice from heaven said, “This is My beloved Son, in whom I am well pleased!”