2 UDB तुम्ही इतर लोकांचे दोष काढले तर, देव तुम्हांला दोषी ठरवील. ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढले तसे, तुमचेही दोष काढण्यात येतील. BSB BSB: For with the same judgment you pronounce, you will be judged, and with the measure you use, it will be measured to you.
3 UDB तुमच्या पैकी कोणीही इतर कोणाच्याही छोट्याशा चूकीबद्दल चिंताकुल होऊ नये! हे त्या व्यक्तीच्या डोळ्यात गेलेल्या कचऱ्याचा कण पाहण्यासारखे आहे. परंतु तुम्ही तर आपल्या स्वतःच्या मोठ्या अपराधाबद्दल चिंताकुल व्हावे. हे जणू काय एखाद्या लाकडाचा ओंडका तुझ्या डोळ्यात असल्या प्रमाणे आहे हे तुझ्या लक्षात येत नाही. BSB BSB: Why do you look at the speck in your brother’s eye but fail to notice the beam in your own eye?
4 UDB इतर लोकांच्या किरकोळ चूकांबद्दल तुम्ही असे बोलू नये, ‘मला तुझ्या डोळ्यातील कचऱ्याचा कण बाहेर काढू दे!’ तुझ्या स्वतःच्या डोळ्यात लाकडाचा ओंडका असून सुद्धा, तू असे बोलू शकत नाही!’ BSB BSB: How can you say to your brother, ‘Let me take the speck out of your eye,’ while there is still a beam in your own eye?
5 UDB अहो ढोंग्यानो, सर्व प्रकारे मोठी पापे करणे थांबवा. मगच तुम्ही इतरांना त्यांची लहान पापे करणे थांबवण्यास सक्षम व्हाल.” BSB BSB: You hypocrite! First take the beam out of your own eye, and then you will see clearly to remove the speck from your brother’s eye.
6 UDB ज्या गोष्टी देवाच्या आहेत त्या तुम्ही अशा कुत्र्यांना देता जे नंतर तुम्हावरच हल्ला करतील. आणि तुम्ही मौल्यवान मोती डुकरांपुढे फेकू नये, कारण ते त्याच्या वरून चालतील. ह्याच प्रकारे जर तुला हे माहीत आहे की, देवाविषयीच्या अद्भुत गोष्टी सांगितल्यावर देखील ते तुझ्याशी वाईट वागतील अशा लोकांना त्या तू सांगू नये. BSB BSB: Do not give dogs what is holy; do not throw your pearls before swine. If you do, they may trample them under their feet, and then turn and tear you to pieces.
7 UDB “ज्याची तुम्हांला गरज आहे ते देवाकडे मागत राहा, आणि त्याने ते तुम्हांला द्यावे ह्याची अपेक्षा करतच राहा. BSB BSB: Ask, and it will be given to you; seek, and you will find; knock, and the door will be opened to you.
8 UDB प्रत्येकजण जो देवाकडे काहीतरी मागतो, आणि जो त्याने त्याला द्यावे अशी अपेक्षा करतो, तो प्राप्त करील. BSB BSB: For everyone who asks receives; he who seeks finds; and to him who knocks, the door will be opened.
9 UDB तुमच्या मुलाने जर तुम्हांला भाकर मागीतली, तुमच्या पैकी कोणीही त्याला धोंडा देणार नाही, हो की नाही? BSB BSB: Which of you, if his son asks for bread, will give him a stone?
10 UDB तुमच्या मुलाने जर तुम्हांला मासा मागीतला, तर तुमच्या पैकी कोणीही त्याला साप देणार नाही, हो की नाही? BSB BSB: Or if he asks for a fish, will give him a snake?
11 UDB तुम्ही जरी वाईट आहात तरी, आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी कशा द्याव्या हे तुम्हांला समजते. मग देव, तुमचा पिता जो स्वर्गात आहे, जे त्याला मागतात त्यांना कितीतरी चांगल्या गोष्टी निश्चितच देईल. BSB BSB: So if you who are evil know how to give good gifts to your children, how much more will your Father in heaven give good things to those who ask Him!
12 UDB तर इतरांनी तुमच्याशी कशा प्रकारे वर्तन करावे असे तुम्हांला वाटते, तशाच प्रकारे तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करावे, कारण देवाच्या नियमांचे आणि फार काळापूर्वी संदेष्ट्यांनी लिहिले त्या सर्वांचे सार हेच आहे. BSB BSB: In everything, then, do to others as you would have them do to you. For this is the essence of the Law and the Prophets.
13 UDB देवा सोबत सर्वकाळामध्ये राहण्यास स्वर्गात जाणे हे फार कठीन आहे; हा तोच कठीन मार्ग आहे जो तुम्ही निवडला पाहिजे. तेथे अजून एक मार्ग आहे, ज्याने पुष्कळ लोक जातात, व तो मार्ग रुंद आहे; ते रुंद फाटक येईपर्यंत चालतील, परंतु ते जेव्हा त्यामधून प्रवेश करतील, तेव्हा ते मरण पावतील. म्हणून मी तुम्हांला सांगतो की तुम्ही कठीन मार्ग निवडावा आणि स्वर्गात देवासोबत सर्वकाळ जगण्यासाठी अरुंद फाटकाने आत प्रवेश करावा.” BSB BSB: Enter through the narrow gate. For wide is the gate and broad is the way that leads to destruction, and many enter through it.
15 UDB तुमच्याकडे येऊन देव काय म्हणाला हे तुमच्याशी खोटेपणाने बोलणाऱ्या लोकांविषयी सावध असा. ते काही उपद्रव करणार नाहीत असे वाटतात, परंतु ते सत्य नाही. स्वतःला मेंढरांच्या वेशात लपवलेल्या लांडग्यांप्रमाणे ते आहेत. ते निरुपद्रवी मेंढरे आहेत असा लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा असे त्यांना वाटते, परंतु खरोखर एखाद्या लांडग्यांप्रमाणे ते तुमच्यावर हल्ला करतात. BSB BSB: Beware of false prophets. They come to you in sheep’s clothing, but inwardly they are ravenous wolves.
17 UDB येथे आणखी एक उदाहरण आहे: सर्व चांगली फळे देणारी झाडे चांगलीच फळे देतात, परंतु सर्व निरुपयोगी झाडे अयोग्य फळ देतात. BSB BSB: Likewise, every good tree bears good fruit, but a bad tree bears bad fruit.
18 UDB कोणतेही चांगले झाड निरुपयोगी फळ देत नाही, आणि कोणतेही वाईट झाड चांगले फळ देत नाही. BSB BSB: A good tree cannot bear bad fruit, and a bad tree cannot bear good fruit.
19 UDB जे झाड चांगले फळ देत नाही अशा प्रत्येक झाडाचे कामकरी तुकडे करतील आणि त्या सर्वांना जाळून टाकतील. BSB BSB: Every tree that does not bear good fruit is cut down and thrown into the fire.
20 UDB झाडे कोणती फळे देतात हे पाहून, तुम्हांला समजते की ती झाडे कोणती आहेत. त्याच प्रकारे, तुमच्याकडे येणारे लोक काय करतात हे तुम्ही पाहाल तेव्हा, ते खरोखर देवासाठीच बोलतात किंवा नाही हे तुम्हांला समजेल. BSB BSB: So then, by their fruit you will recognize them.
22 UDB ज्या दिवशी देव प्रत्येकाचा न्याय करील, तेव्हा पुष्कळ लोक मला म्हणतील, ‘प्रभू, आम्ही तुझे प्रतिनिधी म्हणून देवाचा संदेश सांगितला! तुझे प्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांमधून भूते बाहेर काढली! आणि तुझे प्रतिनिधी म्हणून, आम्ही पुष्कळ वेळा अद्भुत कामे केली!’ BSB BSB: Many will say to Me on that day, ‘Lord, Lord, did we not prophesy in Your name, and in Your name drive out demons and perform many miracles?’
23 UDB मग मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, ‘तुम्ही माझे आहात हे मी कधीच स्वीकार केले नव्हते. अहो वाईट करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा!’” BSB BSB: Then I will tell them plainly, ‘I never knew you; depart from Me, you workers of lawlessness!’
24 UDB तर मग, मी जे काही सांगतो ते जो कोणी ऐकतो आणि मी आज्ञापिल्याप्रमाणे करतो, तो ज्याने आपले घर खडकावर बांधले अशा एका हुशार मनुष्यासारखा आहे. BSB BSB: Therefore everyone who hears these words of Mine and acts on them is like a wise man who built his house on the rock.
25 UDB मग पाऊस जरी आला आणि नदीला पूर आला, आणि वाराही सुटला व त्या घरावर आदळला, तरी ते खाली पडणार नाही कारण ते एका मजबूत खडकावर बनवलेले आहे. BSB BSB: The rain fell, the torrents raged, and the winds blew and beat against that house; yet it did not fall, because its foundation was on the rock.
26 UDB दुसरीकडे, जो कोणी मी सांगतो ते ऐकतो आणि त्या प्रमाणे आज्ञापालन करत नाही तो, ज्याने आपले घर वाळूवर बांधले अशा एका मूर्ख मनुष्यासारखा आहे. BSB BSB: But everyone who hears these words of Mine and does not act on them is like a foolish man who built his house on sand.
27 UDB मग पाऊस पडला आणि नदीला पूरही आला, आणि वारा सुटला व त्या घरावर आदळला, तेव्हा ते घर पूर्णपणे कोलमडून पडले व नष्ट झाले, कारण ते वाळूवर बांधलेले होते. म्हणून मी तुम्हांला जे काही सांगितले त्याचे तुम्ही आज्ञापालन करायलाच हवे. BSB BSB: The rain fell, the torrents raged, and the winds blew and beat against that house, and it fell—and great was its collapse!”
28 UDB येशूने ह्या सर्व गोष्टी शिकवण्याचे संपविल्यावर, ज्या लोकसमुदायाने त्याचे ऐकले त्यांना त्याच्या शिकवणीचे खुप आश्चर्य वाटले. BSB BSB: When Jesus had finished saying these things, the crowds were astonished at His teaching,
29 UDB जो स्वतःला माहित असलेल्या गोष्टींवर अवलंबून असतो अशा एका शिक्षकाप्रमाणे त्याने शिकवले. यहूदी नियमशास्त्र शिकवणारे जसे इतरांनी शिकवलेल्या गोष्टीच पुन्हा-पुन्हा शिकवतात, तसे त्याने शिकवले नाही. BSB BSB: because He taught as one who had authority, and not as their scribes.