1 ULB त्यांनी देवाचा कोश दावीदाने उभारलेल्या तंबूमध्ये आत आणून ठेवला. मग त्यांनी देवापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिली. BSB BSB: So they brought the ark of God and placed it inside the tent that David had pitched for it. And they presented burnt offerings and peace offerings before God.
2 ULB मग होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिण्याचे समाप्त केल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांस आशीर्वाद दिला. BSB BSB: When David had finished sacrificing the burnt offerings and peace offerings, he blessed the people in the name of the LORD.
3 ULB मग त्याने इस्राएलातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकएक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि खिसमिसांची एकएक ढेप वाटून दिली. BSB BSB: Then he distributed to every man and woman of Israel a loaf of bread, a date cake, and a raisin cake.
4 ULB मग दावीदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुति करणे हे त्यांचे काम नेमून दिले. BSB BSB: David appointed some of the Levites to minister before the ark of the LORD, to celebrate, to give thanks, and to praise the LORD, the God of Israel.
5 ULB आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांज वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी उज्जियेल, शमीरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत. BSB BSB: Asaph was the chief, Zechariah was second, then Jeiel, Shemiramoth, Jehiel, Mattithiah, Eliab, Benaiah, Obed-edom, and Jeiel. They were to play the harps and lyres, while Asaph sounded the cymbals
6 ULB बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी देवाच्या कराराच्या कोशापुढे कर्णे वाजवत असत. BSB BSB: and the priests Benaiah and Jahaziel blew the trumpets regularly before the ark of the covenant of God.
7 ULB तेव्हा त्यादिवशी पहिल्याने दावीदाने आसाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले. BSB BSB: On that day David first committed to Asaph and his associates this song of thanksgiving to the LORD:
8 ULB परमेश्वराचे स्तवन करा. त्याच्या नावाने हाक मारा. राष्ट्रांस त्याची कृत्ये कळवा. BSB BSB: “Give thanks to the LORD; call upon His name; make known His deeds among the nations.
9 ULB त्याचे गायन करा, त्याचे स्तुतीगान करा. त्याच्या सर्व आश्र्चर्यकारक कृत्यांविषयी बोला. BSB BSB: Sing to Him, sing praises to Him; tell of all His wonders.
10 ULB त्याच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे अंतःकरण आनंदीत होवो. BSB BSB: Glory in His holy name; let the hearts of those who seek the LORD rejoice.
11 ULB परमेश्वरास व त्याच्या सामर्थ्याला शोधा. निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा. BSB BSB: Seek out the LORD and His strength; seek His face always.
12 ULB त्याने केलेल्या आश्र्चर्यकारक कृत्यांची आठवण करा. त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा. BSB BSB: Remember the wonders He has done, His marvels, and the judgments He has pronounced,
13 ULB त्याचा सेवक इस्राएल याचे वंशजहो, त्याने निवडलेल्या, याकोबाच्या लोकांनो, BSB BSB: O offspring of His servant Israel, O sons of Jacob, His chosen ones.
14 ULB तो परमेश्वर, आमचा देव आहे. त्याचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत. BSB BSB: He is the LORD our God; His judgments carry throughout the earth.
15 ULB त्याच्या कराराचे सर्वकाळ स्मरण करा. त्याने हजारो पिढ्यांस आज्ञापिलेले त्याचे वचन आठवा. BSB BSB: Remember His covenant forever, the word He ordained for a thousand generations—
16 ULB त्याने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली. BSB BSB: the covenant He made with Abraham, and the oath He swore to Isaac.
17 ULB याकोबासाठी त्याने तोच नियम केला. आणि इस्राएलाशी सर्वकाळचा करार केला. BSB BSB: He confirmed it to Jacob as a decree, to Israel as an everlasting covenant:
18 ULB तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुमच्या वतनाचा वाटा असा देईन.” BSB BSB: ‘I will give you the land of Canaan as the portion of your inheritance.’
19 ULB मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता. BSB BSB: When they were few in number, few indeed, and strangers in the land,
20 ULB तुम्ही एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत होता. एका राज्यातून दुसऱ्यात जात होता. BSB BSB: they wandered from nation to nation, from one kingdom to another.
21 ULB पण त्याने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही. त्याने त्यांच्यासाठी राजांना शिक्षा दिली. BSB BSB: He let no man oppress them; He rebuked kings on their behalf:
22 ULB तो राजांना म्हणाला, “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका. माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.” BSB BSB: ‘Do not touch My anointed ones! Do no harm to My prophets!’
23 ULB पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. त्याचे तारण दिवसेंदिवस सर्वांना सांगा. BSB BSB: Sing to the LORD, all the earth. Proclaim His salvation day after day.
24 ULB त्याच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा सर्व राष्ट्राला त्याच्या आश्चर्यकारक कृत्ये जाहिर सांगा. BSB BSB: Declare His glory among the nations, His wonders among all peoples.
25 ULB परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे. BSB BSB: For great is the LORD, and greatly to be praised; He is to be feared above all gods.
26 ULB कारण सर्व राष्ट्रांतले सगळी दैवते म्हणजे नुसत्या मूर्ती आहेत. पण परमेश्वराने आकाश निर्माण केले. BSB BSB: For all the gods of the nations are idols, but it is the LORD who made the heavens.
27 ULB महिमा आणि प्रताप त्याच्यापुढे आहेत. सामर्थ्य आणि आनंद त्याच्या स्थानी आहेत. BSB BSB: Splendor and majesty are before Him; strength and joy fill His dwelling.
28 ULB अहो लोकांच्या कुळांनो परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा. BSB BSB: Ascribe to the LORD, O families of the nations, ascribe to the LORD glory and strength.
29 ULB परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. पावित्र्यानेयुक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. BSB BSB: Ascribe to the LORD the glory due His name; bring an offering and come before Him. Worship the LORD in the splendor of His holiness;
30 ULB त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही. BSB BSB: tremble before Him, all the earth. The world is firmly established; it cannot be moved.
31 ULB पृथ्वी उल्हासित होवो आणि आकाश आनंदीत होवो; राष्ट्रामधल्या लोकांस सांगा की, “परमेश्वर राज्य करतो.” BSB BSB: Let the heavens be glad, and the earth rejoice. Let them say among the nations, ‘The LORD reigns!’
32 ULB समुद्र आणि त्यातले सर्वकाही आनंदाने गर्जना करो शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत. BSB BSB: Let the sea resound, and all that fills it; let the fields exult, and all that is in them.
33 ULB अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. BSB BSB: Then the trees of the forest will sing for joy before the LORD, for He is coming to judge the earth.
34 ULB परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. BSB BSB: Give thanks to the LORD, for He is good; His loving devotion endures forever.
35 ULB आणि म्हणा, “हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार. आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव. आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे.” BSB BSB: Then cry out: ‘Save us, O God of our salvation; gather and deliver us from the nations, that we may give thanks to Your holy name, that we may glory in Your praise.’
36 ULB इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो. सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले. BSB BSB: Blessed be the LORD, the God of Israel, from everlasting to everlasting.” Then all the people said, “Amen!” and “Praise the LORD!”
37 ULB मग आसाफ आणि त्याचे भाऊ यांनी कोशापुढे दररोजच्या कामाप्रमाणे नित्य सेवा करावी म्हणून दावीदाने त्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर ठेवले. BSB BSB: So David left Asaph and his associates there before the ark of the covenant of the LORD, to minister there regularly according to the daily requirements,
38 ULB त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम यांच्याबरोबर अडुसष्ट नातेवाईकांना त्यामध्ये समाविष्ट केले. यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम, ह्याना होसासोबत, द्वारपाल केले होते. BSB BSB: along with Obed-edom and his sixty-eight relatives. Obed-edom son of Jeduthun, and also Hosah, were to be gatekeepers.
39 ULB सादोक याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांनी गिबोन येथील उच्चस्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर सेवा करण्यास नेमले. BSB BSB: And David left Zadok the priest and his fellow priests before the tabernacle of the LORD at the high place in Gibeon
40 ULB ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर परमेश्वरास होमार्पणे करत असत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे, त्याने इस्राएलांस आज्ञा केल्याप्रमाणे ते सर्व करावे म्हणून त्यांना नेमले होते. BSB BSB: to regularly present burnt offerings to the LORD on the altar of burnt offerings, morning and evening, according to all that was written in the Law of the LORD, which He had commanded Israel to keep.
41 ULB आणि त्यांच्याबरोबर हेमान, यदूथून व बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांहि, परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. BSB BSB: With them were Heman, Jeduthun, and the rest of those chosen and designated by name to give thanks to the LORD, for “His loving devotion endures forever.”
42 ULB हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे व देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदूथूनाचे पुत्र द्वाररक्षक होते. BSB BSB: Heman and Jeduthun had with them trumpets and cymbals for the music and instruments for the songs of God. And the sons of Jeduthun were stationed at the gate.
43 ULB नंतर सर्व लोक आपल्या घरी परत गेले आणि दावीदही आपल्या घरास आशीर्वाद देण्यासाठी परत गेला. BSB BSB: Then all the people departed for their homes, and David returned home to bless his household.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.