1 ULB याच सुमारास यराबामाचा पुत्र अबीया आजारी पडला. BSB BSB: At that time Abijah son of Jeroboam became ill,
2 ULB तेव्हा यराबाम आपल्या पत्नीला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत. BSB BSB: and Jeroboam said to his wife, “Now get up, disguise yourself so they will not recognize you as my wife, and go to Shiloh. For Ahijah the prophet is there; it was he who spoke about my kingship over this people.
3 ULB यराबामाने त्याच्या पत्नीला संदेष्ट्याकडे दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला घेऊन पाठवले. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.” BSB BSB: Take with you ten loaves of bread, some cakes, and a jar of honey, and go to him. He will tell you what will become of the boy.”
4 ULB मग यराबामाने सांगितल्यावरून त्याची पत्नी शिलोला अहीया, या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्यास अंधत्वही आले होते. BSB BSB: Jeroboam’s wife did as instructed; she arose and went to Shiloh and arrived at Ahijah’s house. Now Ahijah could not see, for his eyes were dim because of his age.
5 ULB पण परमेश्वराने त्यास सूचना केली, “यराबामाची पत्नी आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येत आहे. तिचा पुत्र फार आजारी आहे. मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्यास सांगितले. यराबामाची पत्नी अहीयाच्या घरी आली. लोकांस कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता.” BSB BSB: But the LORD had said to Ahijah, “Behold, the wife of Jeroboam is coming to ask you about her son, for he is ill. You are to say such and such to her, because when she arrives, she will be disguised.”
6 ULB अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामाची पत्नी ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे. BSB BSB: So when Ahijah heard the sound of her feet entering the door, he said, “Come in, wife of Jeroboam! Why are you disguised? For I have been sent to you with bad news.
7 ULB परत जाशील तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामाला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलाच्या सर्व प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली. BSB BSB: Go, tell Jeroboam that this is what the LORD, the God of Israel, says: ‘I raised you up from among the people and appointed you ruler over My people Israel.
8 ULB यापुर्वी इस्राएलावर दाविदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे. मन:पूर्वक मलाच अनुसरत असे. तो योग्य असलेल्या गोष्टी तो करीत असे. BSB BSB: I tore the kingdom away from the house of David and gave it to you. But you have not been like My servant David, who kept My commandments and followed Me with all his heart, doing only what was right in My eyes.
9 ULB पण तुझ्या हस्ते अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ति केल्यास याचा मला खूप राग आला आहे. BSB BSB: You have done more evil than all who came before you. You have proceeded to make for yourself other gods and molten images to provoke Me, and you have flung Me behind your back.
10 ULB तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. मग तो इस्राएलात बंदीत असो की मोकळा जसे आगीत शेण काहीही शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन. BSB BSB: Because of all this, behold, I am bringing disaster on the house of Jeroboam: I will cut off from Jeroboam every male, both slave and free, in Israel; I will burn up the house of Jeroboam as one burns up dung until it is gone!
11 ULB यराबामाच्या घरातल्या ज्याला नगरात मरण येईल त्यास कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे. BSB BSB: Anyone belonging to Jeroboam who dies in the city will be eaten by dogs, and anyone who dies in the field will be eaten by the birds of the air.’ For the LORD has spoken.
12 ULB अहीया संदेष्टा यराबामाच्या पत्नीशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, आता तू घरी परत जा. तू नगरात शिरल्याबरोबर तुझा पुत्र मरणार आहे. BSB BSB: As for you, get up and go home. When your feet enter the city, the child will die.
13 ULB सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याला रीतसर मुठमाती मिळेल असा, यराबामाच्या घराण्यातला हाच राहील. कारण फक्त त्याच्याठायीच इस्राएलचा देव परमेश्वर याला काहीसा चांगूलपणा दिसून आला आहे. BSB BSB: All Israel will mourn for him and bury him. For this is the only one belonging to Jeroboam who will receive a proper burial, because only in him has the LORD, the God of Israel, found any good in the house of Jeroboam.
14 ULB परमेश्वर इस्राएलावर नवीन राजा नेमील. तो यराबामाच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लवकरच घडेल. BSB BSB: Moreover, the LORD will raise up for Himself a king over Israel who will cut off the house of Jeroboam. This is the day—yes, even today!
15 ULB मग परमेश्वर इस्राएलाला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलाच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांस उपटून परमेश्वर त्यांना युफ्रटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा मूर्ती त्यांनी उभारली याचा त्यास संताप आला. BSB BSB: For the LORD will strike Israel as a reed is shaken in the water. He will uproot Israel from this good land that He gave their fathers, and He will scatter them beyond the Euphrates, because they have made their Asherah poles, provoking the LORD to anger.
16 ULB आधी यराबामाच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांस पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.” BSB BSB: So He will give Israel over on account of the sins Jeroboam has committed and has caused Israel to commit.”
17 ULB यराबामाची पत्नी तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा पुत्र मेला. BSB BSB: Then Jeroboam’s wife got up and departed for Tirzah, and as soon as she stepped over the threshold of the house, the boy died.
18 ULB सर्व इस्राएल लोकांस त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वरच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती. BSB BSB: And they buried him, and all Israel mourned for him, according to the word that the LORD had spoken through His servant Ahijah the prophet.
19 ULB राजा यराबामाने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या; लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे. BSB BSB: As for the rest of the acts of Jeroboam, how he waged war and how he reigned, they are indeed written in the Book of the Chronicles of the Kings of Israel.
20 ULB यराबाम बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र नादाब त्यानंतर सत्तेवर आला. BSB BSB: And the length of Jeroboam’s reign was twenty-two years, and he rested with his fathers, and his son Nadab reigned in his place.
21 ULB शलमोनाचा पुत्र रहबाम यहूदाचा राजा झाला, तेव्हा तो एक्केचाळीस वर्षाचा होता. यरुशलेमेमध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वत:च्या सन्मानासाठी सर्व वंशातून या नगराची निवड केली होती. इस्राएलातील इतर नगरामधून त्याने हेच निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा, ती अम्मोनी होती. BSB BSB: Meanwhile, Rehoboam son of Solomon reigned in Judah. He was forty-one years old when he became king, and he reigned seventeen years in Jerusalem, the city the LORD had chosen from all the tribes of Israel in which to put His Name. His mother’s name was Naamah the Ammonite.
22 ULB यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले याप्रकारे परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराचा कोप होईल, अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती. BSB BSB: And Judah did evil in the sight of the LORD, and by the sins they committed they provoked Him to jealous anger more than all their fathers had done.
23 ULB या लोकांनी उंचवटयांवर देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. परकीय दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी हे केले व अशेरा मूर्ती स्थापिल्या. BSB BSB: They also built for themselves high places, sacred pillars, and Asherah poles on every high hill and under every green tree.
24 ULB परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही पुरुष वेश्या त्या देशात होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात यापुर्वी जे लोक राहत असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलाच्या लोकांस दिला होता. BSB BSB: There were even male shrine prostitutes in the land. They imitated all the abominations of the nations the LORD had driven out before the Israelites.
26 ULB त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामाचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून ज्या शलमोनाने सोन्याच्या ढाली आणल्या होत्या, त्याही त्याने पळवल्या. दाविदाने त्या यरुशलेमेमध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली शिशकने नेल्या. BSB BSB: He seized the treasures of the house of the LORD and of the royal palace. He took everything, including all the gold shields that Solomon had made.
27 ULB मग रहबाम राजाने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या. BSB BSB: Then King Rehoboam made bronze shields in their place and committed them to the care of the captains of the guard on duty at the entrance to the royal palace.
28 ULB राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत. BSB BSB: And whenever the king entered the house of the LORD, the guards would bear the shields, and later they would return them to the guardroom.
29 ULB यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा रहबामाच्या सर्व गोष्टींची नोंद आहे. BSB BSB: As for the rest of the acts of Rehoboam, along with all that he did, are they not written in the Book of the Chronicles of the Kings of Judah?
30 ULB रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते. BSB BSB: There was war between Rehoboam and Jeroboam throughout their days.
31 ULB रहबाम मेला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्यास पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामाचा पुत्र अबीयाम नंतर राज्यावर आला. BSB BSB: And Rehoboam rested with his fathers and was buried with them in the City of David; his mother’s name was Naamah the Ammonite. And his son Abijam reigned in his place.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.