1 ULB बेन-हदाद अरामाचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बत्तीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले. BSB BSB: Now Ben-hadad king of Aram assembled his entire army. Accompanied by thirty-two kings with their horses and chariots, he marched up, besieged Samaria, and waged war against it.
2 ULB इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे नगरात बेनहदादने दूतांकरवी निरोप पाठवला BSB BSB: Then he sent messengers into the city to Ahab king of Israel,
3 ULB संदेश असा होता, “बेन-हदादचे म्हणणे आहे, तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या स्त्रिया आणि पुत्रेही माझ्या हवाली करावी.” BSB BSB: saying, “This is what Ben-hadad says: ‘Your silver and gold are mine, and your best wives and children are mine!’”
4 ULB यावर इस्राएलाच्या राजाचे उत्तर असे होते, “महाराज मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे.” BSB BSB: And the king of Israel replied, “Just as you say, my lord the king: I am yours, along with all that I have.”
5 ULB अहाबाकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेन-हदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस. BSB BSB: The messengers came back and said, “This is what Ben-hadad says: ‘I have sent to you to demand your silver, your gold, your wives, and your children.
6 ULB उद्याच मी माझ्या मनुष्यांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे. ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील. त्यांच्या डोळ्यांना जे आवडेल ते स्वत:च्या हाताने घेतील. ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील.” BSB BSB: But about this time tomorrow I will send my servants to search your palace and the houses of your servants. They will seize and carry away all that is precious to you.’”
7 ULB तेव्हा इस्राएलचा राजा अहाबाने आपल्या देशातील सर्व वडिलधाऱ्या मनुष्यांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, हा मणुष्य माझे कसे अनिष्ट करू पाहत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोनेचांदी तसेच माझी स्त्रिया पुत्रे मागितली. त्यास मी कबूल झालो. आणि आता त्यास सर्वच हवे आहे.” BSB BSB: Then the king of Israel summoned all the elders of the land and said, “Please take note and see that this man is looking for trouble, for when he demanded my wives, my children, my silver, and my gold, I did not deny him.”
8 ULB यावर ती वडिलधारी मंडळी आणि इतर लोक अहाबाला म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान झुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.” BSB BSB: And the elders and the people all said, “Do not listen to him or consent to his terms.”
9 ULB मग राजा अहाबाने बेन-हदादकडे निरोप्याला सांगितले की “माझा स्वामी अहाब राजास सांग” तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेचे मी पालन करु शकत नाही. बेन-हदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला. BSB BSB: So Ahab answered the messengers of Ben-hadad, “Tell my lord the king, ‘All that you demanded of your servant the first time I will do, but this thing I cannot do.’” So the messengers departed and relayed the message to Ben-hadad.
10 ULB तेव्हा बेन-हदादकडून अहाबाला दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या मनुष्यांना काही राहणार नाही. असे झाले नाहीतर देव माझे तसे करो व त्यापेक्षा अधिक करो.” BSB BSB: Then Ben-hadad sent another message to Ahab: “May the gods deal with me, and ever so severely, if enough dust remains of Samaria for each of my men to have a handful.”
11 ULB इस्राएलच्या राजाचे त्यास उत्तर गेले. त्यामध्ये म्हटले होते. “बेन-हदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्घ काळापर्यंत जगतो त्याने इतकी फुशारकी मारू नये.” BSB BSB: And the king of Israel replied, “Tell him: ‘The one putting on his armor should not boast like one taking it off.’”
12 ULB राजा बेन-हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या मनुष्यांना नगरापुढे चढाईचा व्यूह रचायला सांगितले. “त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.” BSB BSB: Ben-hadad received this message while he and the kings were drinking in their tents, and he said to his servants, “Take your positions.” So they stationed themselves against the city.
13 ULB तेव्हा इकडे एक संदेष्टा इस्राएलाचा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हस्ते या सैन्याचा पराभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.” BSB BSB: Meanwhile a prophet approached Ahab king of Israel and declared, “This is what the LORD says: ‘Do you see this entire great army? Behold, I will deliver it into your hand this very day, and you will know that I am the LORD.’”
15 ULB तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलाच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते. BSB BSB: So Ahab assembled the young officers of the district governors, and there were 232 men. And after them, he assembled the rest of the Israelite troops, 7,000 in all.
16 ULB राजा बेन-हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबाने हल्ला चढवला. BSB BSB: They marched out at noon while Ben-hadad and the 32 kings allied with him were in their tents getting drunk.
17 ULB तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा “शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेन-हदादच्या मनुष्यांनी त्यास सांगितले.” BSB BSB: And the young officers of the district governors marched out first. Now Ben-hadad had sent out scouts, who reported to him, “Men are marching out of Samaria.”
18 ULB तेव्हा बेन-हदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.” BSB BSB: “If they have marched out in peace,” he said, “take them alive. Even if they have marched out for war, take them alive.”
19 ULB राजा अहाबाच्या तरुणांची तुकडी नगरातून बाहेर पडली आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते. BSB BSB: Meanwhile, these young officers of the district governors marched out of the city, with the army behind them,
20 ULB प्रत्येक इस्राएलीने समोरुन येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अरामामधली माणसे पळ काढू लागली. इस्राएलाच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेन-हदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला. BSB BSB: and each one struck down his opponent. So the Arameans fled, with the Israelites in pursuit. But Ben-hadad king of Aram escaped on horseback with the cavalry.
21 ULB इस्राएल राजाने सेनेचे नेतृत्व करून अरामाच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामाची मोठी कत्तल उडवली. BSB BSB: Then the king of Israel marched out and attacked the horses and chariots, inflicting a great slaughter on the Arameans.
22 ULB यानंतर तो संदेष्टा इस्राएल राजा अहाबाकडे गेला आणि म्हणाला, “अरामाचा राजा बेन-हदाद पुढच्या वसंत ऋतुत पुन्हा तुझ्यावर चालून येईल. तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्याची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आख.” BSB BSB: Afterward, the prophet approached the king of Israel and said, “Go and strengthen your position, and take note what you must do, for in the spring the king of Aram will come up against you.”
23 ULB अरामाच्या राजाचे अधिकारी त्यास म्हणाले, “इस्राएलाचा देव हा पहाडावरील देव आहे. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू. BSB BSB: Meanwhile, the servants of the king of Aram said to him, “Their gods are gods of the hills. That is why they prevailed over us. Instead, we should fight them on the plains; surely then we will prevail.
24 ULB आता तुम्ही असे करायला हवे त्या राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा. BSB BSB: So do this: Dismiss all the kings from their positions and replace them with other officers.
25 ULB जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएली लोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली. BSB BSB: And you must raise an army like the one you have lost—horse for horse and chariot for chariot—so we can fight the Israelites on the plain, where we will surely prevail.” And the king approved their plan and acted accordingly.
26 ULB वसंत ऋतुत बेन-हदादने अराममधील लोकांस एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला. BSB BSB: In the spring, Ben-hadad mobilized the Arameans and went up to Aphek to fight against Israel.
27 ULB इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता. BSB BSB: The Israelites also mobilized, gathered supplies, and marched out to meet them. The Israelites camped before them like two small flocks of goats, while the Arameans covered the countryside.
28 ULB एक देवाचा मनुष्य (संदेष्टा) इस्राएलाच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.” BSB BSB: Then the man of God approached the king of Israel and said, “This is what the LORD says: ‘Because the Arameans have said that the LORD is a god of the hills and not of the valleys, I will deliver all this great army into your hand. Then you will know that I am the LORD.’”
29 ULB दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकांनी अरामाचे एक लक्ष सैनिक एका दिवसात ठार केले. BSB BSB: For seven days the armies camped opposite each other, and on the seventh day the battle ensued, and the Israelites struck down the Arameans—a hundred thousand foot soldiers in one day.
30 ULB जे बचावले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेन-हदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका आतल्या खोलीत लपला होता. BSB BSB: The rest of them fled into the city of Aphek, where the wall fell on twenty-seven thousand of the remaining men. Ben-hadad also fled to the city and hid in an inner room.
31 ULB त्याचे सेवक त्यास म्हणाले, “इस्राएलाचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण कबंरेस गोणताट नेसून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून इस्राएलाच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल.” BSB BSB: Then the servants of Ben-hadad said to him, “Look now, we have heard that the kings of the house of Israel are merciful. Let us go out to the king of Israel with sackcloth around our waists and ropes around our heads. Perhaps he will spare your life.”
32 ULB त्या सर्वांनी मग गोणताट घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलाच्या राजाकडे आले. त्यास म्हणाले, “तुमचा दास बेन-हदाद तुमच्याकडे जीवदान मागत आहे.” अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा बंधूच आहे.” BSB BSB: So with sackcloth around their waists and ropes around their heads, they went to the king of Israel and said, “Your servant Ben-hadad says, ‘Please spare my life.’” And the king answered, “Is he still alive? He is my brother.”
33 ULB बेन-हदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबाने बेन-हदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेन-हदाद तुमचा भाऊ जीवंत आहे” अहाब म्हणाल, “जा आणि त्यास आणा” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबाने त्यास आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले. BSB BSB: Now the men were looking for a sign of hope, and they quickly grasped at this word and replied, “Yes, your brother Ben-hadad.” “Go and get him!” said the king. Then Ben-hadad came out, and Ahab had him come up into his chariot.
34 ULB बेन-हदाद अहाबाला म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडिलांनी शोमरोनात जशा बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील” अहाब त्यावर म्हणाला, “या करारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतीचा करार केला. मग राजा अहाबाने राजा बेन-हदादला मुक्त केले. BSB BSB: Ben-hadad said to him, “I will restore the cities my father took from your father; you may set up your own marketplaces in Damascus, as my father did in Samaria.” “By this treaty I release you,” Ahab replied. So he made a treaty with him and sent him away.
35 ULB त्यानंतर संदेष्टयांच्या शिष्यापैकी एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला म्हटले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले. BSB BSB: Meanwhile, by the word of the LORD, one of the sons of the prophets said to his companion, “Strike me, please!” But the man refused to strike him.
36 ULB तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्यास ठार मारले. BSB BSB: Then the prophet said to him, “Because you have not obeyed the voice of the LORD, as soon as you depart from me a lion will kill you.” And when he left, a lion found him and killed him.
37 ULB मग हा पहिला संदेष्टा एका मनुष्याकडे गेला. त्यास त्याने स्वत:ला “फटका मारायला” सांगितले. त्या मनुष्याने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले. BSB BSB: Then the prophet found another man and said, “Strike me, please!” So the man struck him and wounded him,
38 ULB त्या संदेष्ट्याने मग स्वत:च्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहत बसला. BSB BSB: and the prophet went and waited on the road for the king, disguising himself with a bandage over his eyes.
39 ULB राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्यास म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, ‘याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा शंभर रत्तल चांदीचा दंड भरावा लागेल.’ BSB BSB: As the king passed by, he cried out to the king: “Your servant had marched out into the middle of the battle, when suddenly a man came over with a captive and told me, ‘Guard this man! If he goes missing for any reason, your life will be exchanged for his life, or you will weigh out a talent of silver.’
40 ULB पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो मनुष्य पळून गेला यावर इस्राएलाचा राजा म्हणाला, त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे.” तेव्हा निकाल उघडच आहे. “तो मनुष्य म्हणाला ते तू केले पाहिजेस.” BSB BSB: But while your servant was busy here and there, the man disappeared.” And the king of Israel said to him, “So shall your judgment be; you have pronounced it on yourself.”
41 ULB आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. इस्राएली राजाने त्यास पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले. BSB BSB: Then the prophet quickly removed the bandage from his eyes, and the king of Israel recognized him as one of the prophets.
42 ULB मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्यास तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.” BSB BSB: And the prophet said to the king, “This is what the LORD says: ‘Because you have let slip from your hand the man I had devoted to destruction, your life will be exchanged for his life, and your people for his people.’”
43 ULB यानंतर इस्राएलचा राजा शोमरोनाला आपल्या घरी परतला. तो अतिशय संतापला होता आणि चितांग्रस्त झाला होता. BSB BSB: Sullen and angry, the king of Israel went home to Samaria.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.