1 ULB मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले. BSB BSB: So David left Gath and took refuge in the cave of Adullam. When his brothers and the rest of his father’s household heard about it, they went down to him there.
2 ULB कोणी अडचणीत पडलेले कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले आणि तो त्यांचा सरदार झाला; सुमारे चारशे माणसे त्याच्याजवळ होती. BSB BSB: And all who were distressed or indebted or discontented rallied around him, and he became their leader. About four hundred men were with him.
3 ULB दावीद तेथून मवाबातील मिस्पा येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला, “मी तुला विनंती करतो परमेश्वर माझ्यासाठी काय करील हे मला कळेल तोपर्यंत माझ्या आई-वडीलांना तुझ्याजवळ येऊन राहू दे.” BSB BSB: From there David went to Mizpeh of Moab, where he said to the king of Moab, “Please let my father and mother stay with you until I learn what God will do for me.”
4 ULB मग त्याने त्यांना मवाबाच्या राजाकडे आणले आणि दावीद गडात वस्तीस होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले. BSB BSB: So he left them in the care of the king of Moab, and they stayed with him the whole time David was in the stronghold.
5 ULB मग गाद भविष्यवादी दावीदाला म्हणाला, “गडात राहू नको तर तू निघून यहूदा देशात जा.” तेव्हा दावीद निघून हरेथ रानात आला. BSB BSB: Then the prophet Gad said to David, “Do not stay in the stronghold. Depart and go into the land of Judah.” So David left and went to the forest of Hereth.
6 ULB दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांचा शोध लागला असे शौलाने ऐकले. शौल तर रामातल्या गिब्यात एशेल झाडाखाली बसला होता; त्याचा भाला त्याच्या हातात होता व त्याचे सर्व चाकर उभे होते. BSB BSB: Soon Saul learned that David and his men had been discovered. At that time Saul was sitting under the tamarisk tree on the hill at Gibeah, with his spear in hand and all his servants standing around him.
7 ULB तेव्हा शौल आपल्याजवळ जे आपले चाकर उभे होते त्यांना म्हणाला, “अहो बन्यामिनी लोकांनो ऐका हा इशायाचा मुलगा तुम्हा प्रत्येकाला शेते व द्राक्षमळे देणार आहे काय? तो तुम्हा सर्वांना हजाराचे व शंभराचे सरदार करणार आहे काय? BSB BSB: Then Saul said to his servants, “Listen, men of Benjamin! Is the son of Jesse giving all of you fields and vineyards and making you commanders of thousands or hundreds?
8 ULB म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर फितुरी करीत आहा आणि माझा मुलगा इशायाच्या मुलाशी करार करतो तेव्हा मला कोणी कळवीत नाही आणि तुम्हातला कोणी माझ्यासाठी दुखि:त होत नाही आणि माझ्या मुलाने माझ्या चाकराला आजच्यासारखे माझ्यासाठी टपून बसायला चेतवले आहे हे कोणी मला कळवीत नाही.” BSB BSB: Is that why all of you have conspired against me? Not one of you told me that my own son had made a covenant with the son of Jesse. Not one of you has shown concern for me or revealed to me that my son has stirred up my own servant to lie in wait against me, as is the case today.”
9 ULB मग दवेग अदोमी जो शौलाच्या चाकरांसोबत उभा होता, त्याने उत्तर देऊन म्हटले, “मी इशायाच्या मुलाला नोब येथे अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याच्याकडे येताना पाहिले; BSB BSB: But Doeg the Edomite, who had stationed himself with Saul’s servants, answered: “I saw the son of Jesse come to Ahimelech son of Ahitub at Nob.
10 ULB त्याने त्याच्यासाठी परमेश्वरास विचारले व त्यास अन्न दिले आणि गल्याथ पलिष्टी याची तलवार त्यास दिली.” BSB BSB: Ahimelech inquired of the LORD for him and gave him provisions. He also gave him the sword of Goliath the Philistine.”
11 ULB तेव्हा राजाने अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याजक याला व त्याच्या वडिलाच्या सर्व घराण्यातले जे याजक नोब येथे होते त्यांना बोलवायला माणसे पाठवली आणि ते सर्व राजाकडे आले. BSB BSB: Then the king sent messengers to summon Ahimelech the priest, the son of Ahitub, and his father’s whole family, who were priests at Nob. And all of them came to the king.
12 ULB तेव्हा शौलाने म्हटले, “अहीटूबाच्या मुला आता ऐक.” तो म्हणाला, “माझ्या प्रभू मी येथे आहे.” BSB BSB: “Listen now, son of Ahitub,” said Saul. “Here I am, my lord,” he replied.
13 ULB शौल त्यास म्हणाला, “तू आणि इशायाचा मुलगा अशा तुम्ही दोघांनी माझ्यावर फितुरी केली तू त्यास भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी देवापाशी विचारले यासाठी की, त्याने आजच्यासारखे माझ्यावर उठून माझ्यासाठी टपून बसावे?” BSB BSB: And Saul asked him, “Why have you and the son of Jesse conspired against me? You gave him bread and a sword and inquired of God for him so that he could rise up against me to lie in wait, as he is doing today.”
14 ULB तेव्हा अहीमलेखाने राजाला उत्तर देऊन म्हटले, “तुझ्या सर्व चाकरांमध्ये दावीदासारखा कोण विश्वासू आहे? तो राजाचा जावई आहे व एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो व तुझ्या घरात प्रतिष्ठीत आहे. BSB BSB: Ahimelech answered the king, “Who among all your servants is as faithful as David, the king’s son-in-law, the captain of your bodyguard and honored in your house?
15 ULB आजच मी त्याच्यासाठी परमेश्वरास विचारू लागलो काय? असे करणे माझ्यापासून दूर असो; राजाने आपल्या दासास किंवा माझ्या वडिलाच्या घराण्यातील कोणाला अपराध लावू नये कारण या सर्वांतले अधिक उणे काहीच तुझ्या दासास ठाऊक नाही.” BSB BSB: Was that day the first time I inquired of God for him? Far be it from me! Let not the king accuse your servant or any of my father’s household, for your servant knew nothing of this whole affair—not in part or in whole.”
16 ULB राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला खचित मरण पावले पाहिजे; तुला व तुझ्या वडिलाच्या घराण्यातील सर्वांना मरण पावले पाहिजे” BSB BSB: But the king replied, “You will surely die, Ahimelech, you and all your father’s house!”
17 ULB मग राजा आपणाजवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला, “परमेश्वराच्या याजकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारा कारण त्यांनीही दावीदाचा पक्ष धरला आहे; आणि तो पळाला असे त्यांना कळले असता त्यांनी मला कळवले नाही.” परंतु राजाचे चाकर परमेश्वराच्या याजकांवर तुटून पडायला आपले हात पुढे करीनात. BSB BSB: Then the king ordered the guards at his side, “Turn and kill the priests of the LORD, because they too sided with David. For they knew he was fleeing, but they did not tell me.” But the king’s servants would not lift a hand to strike the priests of the LORD.
18 ULB मग राजाने दवेगाला म्हटले, “तू याजकांच्या अंगावर चालून जा. तेव्हा दवेग अदोमी याजकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला.” त्या दिवशी त्याने तागाचे एफोद नेसलेल्या पंच्याऐंशी मनुष्यांना जिवे मारले. BSB BSB: So the king ordered Doeg, “You turn and strike down the priests!” And Doeg the Edomite turned and struck down the priests himself. On that day he killed eighty-five men who wore the linen ephod.
19 ULB त्याने याजकांचे नोब नगर याचा तलवारीच्या धारेने नाश केला; पुरुष स्त्रिया बाळके व तान्ही बाळे, आणि गुरे, आणि गाढवे आणि मेंढरे ही त्याने तलवारीच्या धारेने जिवे मारली. BSB BSB: He also put to the sword Nob, the city of the priests, with its men and women, children and infants, oxen, donkeys, and sheep.
21 ULB शौलाने परमेश्वराच्या याजकांना जिवे मारले हे अब्याथाराने दावीदाला कळवले. BSB BSB: And Abiathar told David that Saul had killed the priests of the LORD.
22 ULB तेव्हा दावीदाने अब्याथाराला म्हटले, “दवेग अदोमी येथे होता, त्याच दिवशी मला समजले की, तो शौलाला खचित सांगेल. मी तुझ्या वडिलाच्या घराण्याच्या सर्व मनुष्यांस मरणास कारण झालो आहे. BSB BSB: Then David said to Abiathar, “I knew that Doeg the Edomite was there that day, and that he was sure to tell Saul. I myself am responsible for the lives of everyone in your father’s house.
23 ULB माझ्याजवळ राहा भिऊ नको; कारण जो मला जिवे मारायला पाहतो तोच तुला जिवे मारायला पाहतो आहे. पण माझ्याजवळ तुझे रक्षण होईल.” BSB BSB: Stay with me; do not be afraid, for he who seeks your life is seeking mine as well. You will be safe with me.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.