1 ULB त्या दिवसात असे झाले की पलिष्ट्यांनी आपली सैन्ये इस्राएलाशी लढायला एकत्र केली. तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “तुला आणि तुझ्या मनुष्यांना लढाईस माझ्याबरोबर यायचे हे तू खचित समज.” BSB BSB: Now in those days the Philistines gathered their forces for warfare against Israel. So Achish said to David, “You must understand that you and your men are to go out to battle with me.”
2 ULB दावीदाने आखीशाला म्हटले, “तुझा दास काय करील हे तू खचित जाणशील.” तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “याकरिता तुला मी आपल्या मस्तकाचा रक्षक असा कायमचा ठेवीन.” BSB BSB: David replied, “Then you will come to know what your servant can do.” “Very well,” said Achish. “I will make you my bodyguard for life.”
3 ULB शमुवेल तर मेला होता व सर्व इस्राएलांनी त्याच्यासाठी शोक करून त्यास रामा येथे त्याच्या नगरात पुरले होते. भूते ज्यांच्या परीचयाची होती अशा जाणत्या लोकांस व जादूगिरांना शौलाने आपल्या प्रदेशातून हाकलून लावले होते. BSB BSB: Now by this time Samuel had died, and all Israel had mourned for him and buried him in Ramah, his own city. And Saul had removed the mediums and spiritists from the land.
4 ULB पलिष्ट्यांनी एकत्र जमून शूनेमात येऊन तळ दिला आणि शौलाने सर्व इस्राएलांस एकत्र जमवून गिलबोवा येथे तळ दिला. BSB BSB: The Philistines gathered together and camped at Shunem, while Saul gathered all Israel and camped at Gilboa.
5 ULB शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले तेव्हा तो भ्याला व त्याचे मन फार घाबरे झाले. BSB BSB: When Saul saw the Philistine army, he was afraid and trembled violently.
6 ULB शौलाने परमेश्वरास विचारले तेव्हा परमेश्वराने त्यास स्वप्नाकडून किंवा ऊरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिले नाही. BSB BSB: He inquired of the LORD, but the LORD did not answer him by dreams or Urim or prophets.
7 ULB मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, “म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन.” तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास म्हटले, “पाहा भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एन-दोर येथे आहे.” BSB BSB: Then Saul said to his servants, “Find me a woman who is a medium, so I can go and consult her.” “There is a medium at Endor,” his servants replied.
8 ULB मग शौलाने वेष पालटून निराळी वस्त्रे अंगात घातली आणि तो आपणाबरोबर दोन माणसे घेऊन त्या स्त्रीकडे रात्री गेला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्या भूतविद्येने मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी वर आण.” BSB BSB: So Saul disguised himself by putting on different clothes, and he set out with two of his men. They came to the woman at night, and Saul said, “Consult a spirit for me. Bring up for me the one I name.”
9 ULB तेव्हा ती स्त्री त्यास म्हणाली, “पाहा शौलाने काय केले आहे, त्याने भूते ज्यांच्या परिचयाची आहेत अशा जाणत्यांना व जादूगिरांना देशातून कसे काढून टाकले आहे, हे तू जाणतोस तर मी मरावे असे करण्यासाठी तू कशाला माझ्या जिवाला पाश घालतोस?” BSB BSB: But the woman replied, “Surely you know what Saul has done, how he has killed the mediums and spiritists in the land. Why have you set a trap to get me killed?”
10 ULB तेव्हा शौलाने तिच्याशी शपथ वाहून म्हटले, “परमेश्वर जिवंत आहे, या गोष्टीवरून तुला काही शिक्षा होणार नाही.” BSB BSB: Then Saul swore to her by the LORD: “As surely as the LORD lives, no punishment shall come upon you for this.”
11 ULB मग त्या स्त्रीने म्हटले, “तुझ्यासाठी मी कोणाला वर आणू?” तेव्हा तो म्हणाला, “माझ्यासाठी शमुवेलाला वर आण.” BSB BSB: “Whom shall I bring up for you?” the woman asked. “Bring up Samuel,” he replied.
12 ULB त्या स्त्रीने शमुवेलाला पाहिले तेव्हा ती मोठ्याने ओरडली. मग ती स्त्री शौलाला म्हणाली, “तू मला का फसवले, कारण तू शौल आहेस.” BSB BSB: But when the woman saw Samuel, she cried out in a loud voice and said to Saul, “Why have you deceived me? You are Saul!”
13 ULB राजा तिला म्हणाला, “भिऊ नको. तू काय पाहतेस?” तेव्हा ती स्त्री शौलाला म्हणाली, “मी दैवत भूमीतून वर येताना पाहते.” BSB BSB: “Do not be afraid,” the king replied. “What do you see?” “I see a god coming up out of the earth,” the woman answered.
14 ULB मग तो तिला म्हणाला, “तो कोणत्या रूपाचा आहे?” तिने म्हटले, “म्हातारा मनुष्य झगा घातलेला असा आहे.” तेव्हा तो शमुवेल आहे असे शौल समजला आणि तो आपले तोंड भूमीकडे लववून नमला. BSB BSB: “What does he look like?” asked Saul. “An old man is coming up,” she replied. “And he is wearing a robe.” So Saul knew that it was Samuel, and he bowed facedown in reverence.
15 ULB मग शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मला वर आणून का त्रास दिला आहे?” तेव्हा शौलाने उत्तर केले, “मी फार संकटात पडलो आहे. कारण पलिष्टी माझ्याशी लढाई करीत आहेत. आणि परमेश्वर मला सोडून गेला आहे, आणि तो भविष्यवाद्यांकडून किंवा स्वप्नांकडून मला उत्तर देत नाही; मी काय करावे हे तुम्ही मला कळवावे म्हणून मी तुम्हास बोलावले आहे.” BSB BSB: Then Samuel said to Saul, “Why have you disturbed me by bringing me up?” “I am deeply distressed,” replied Saul. “The Philistines are fighting against me, and God has turned away from me. He no longer answers me, either by prophets or by dreams. So I have called on you to tell me what to do.”
16 ULB तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वर तुला सोडून गेला आहे व तुझा विरोधी झाला आहे; तर तू कशाला मला विचारतोस?” BSB BSB: “Why do you consult me,” asked Samuel, “since the LORD has turned away from you and become your enemy?
17 ULB जसे परमेश्वराने माझ्याकडून तुला सांगितले तसे त्याने तुझे केले आहे. परमेश्वराने तुझ्या हातातून राज्य काढून घेतले आहे, आणि तुझा शेजारी दावीद याला ते दिले आहे. BSB BSB: He has done exactly what He spoke through me: The LORD has torn the kingdom out of your hand and given it to your neighbor David.
18 ULB कारण तू देवाची वाणी मानली नाही, आणि त्याचा तीव्र क्रोध अमालेकावर घातला नाही, म्हणून आज परमेश्वराने तुझे असे केले आहे. BSB BSB: Because you did not obey the LORD or carry out His burning anger against Amalek, the LORD has done this to you today.
19 ULB परमेश्वर इस्राएलास तुझ्याबरोबर पलिष्ट्यांच्या हाती देईल. उद्या तू तुझ्या मुलांसमवेत माझ्याजवळ असशील. परमेश्वर इस्राएलाचे सैन्य पलिष्ट्यांच्या हाती देईल. BSB BSB: Moreover, the LORD will deliver Israel with you into the hand of the Philistines, and tomorrow you and your sons will be with me. And the LORD will deliver the army of Israel into the hand of the Philistines.”
20 ULB तेव्हा शमुवेलाच्या शब्दांमुळे शौल लागलाच भूमीवर उपडा पडला आणि फार भयभीय झाला, व त्याच्यात काही शक्ति राहिली नाही. कारण सर्व दिवस आणि सारी रात्र त्याने काही भाकर खाल्ली नव्हती. BSB BSB: Immediately Saul fell flat on the ground, terrified by the words of Samuel. And his strength was gone, because he had not eaten anything all that day and night.
21 ULB मग त्या स्त्रीने शौलाकडे येऊन तो फार घाबरला आहे असे पाहून त्यास म्हटले, “पाहा तुमच्या दासीने तुमची वाणी ऐकली आहे. आणि मी आपला जीव आपल्या मुठीत धरून तुम्ही माझ्याशी जे शब्द बोलला ते ऐकले आहेत. BSB BSB: When the woman came to Saul and saw how distraught he was, she said to him, “Look, your maidservant has obeyed your voice. I took my life in my hands and did as you told me.
22 ULB तर आता मी तुम्हास विनंती करते, तुम्ही हि आपल्या दासीचा शब्द ऐका आणि मला तुमच्या पुढे भाकरीचा तुकडा ठेवू द्या; तो तुम्ही खा यासाठी की, तुम्ही वाटेने जाल तेव्हा तुम्हास शक्ती असावी.” BSB BSB: Now please listen to your servant and let me set a morsel of bread before you so you may eat and have the strength to go on your way.”
23 ULB परंतु त्याने नाकारून म्हटले, “मी खाणार नाही.” मग त्याच्या चाकरांनी व त्या स्त्रीनेही त्यास आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचा शब्द ऐकला व तो भूमीवरून उठून पलंगावर बसला. BSB BSB: Saul refused, saying, “I will not eat.” But his servants joined the woman in urging him, and he heeded their voice. He got up from the ground and sat on the bed.
24 ULB त्या स्त्रीच्या घरात पुष्ट वासरू होते, ते तिने मोठ्या घाईने कापले; तिने पीठ घेतले व ते मळून त्याच्या बेखमीर भाकरी भाजल्या. BSB BSB: The woman had a fattened calf at her house, and she quickly slaughtered it. She also took flour, kneaded it, and baked unleavened bread.
25 ULB मग तिने ते शौलापुढे व त्याच्या चाकरापुढे ठेवले आणि ते जेवले; मग ते उठले आणि त्याच रात्री निघून गेले. BSB BSB: She served it to Saul and his servants, and they ate. And that night they got up and left.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.