1 ULB असे झाले की, दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावर व सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलागचा पाडाव करून ते अग्नीने जाळले होते. BSB BSB: On the third day David and his men arrived in Ziklag, and the Amalekites had raided the Negev, attacked Ziklag, and burned it down.
2 ULB त्यातल्या स्त्रिया व त्यामध्ये जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते; त्यांनी कोणालाही जिवे मारले नव्हते, पण त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले. BSB BSB: They had taken captive the women and all who were there, both young and old. They had not killed anyone, but had carried them off as they went on their way.
3 ULB तर दावीद व त्याची माणसे नगराजवळ आली तेव्हा पाहा ते अग्नीने जाळलेले आहे आणि त्यांच्या स्त्रिया आणि त्यांचे पुत्र व त्यांच्या मुली धरून नेलेल्या आहेत असे त्यांनी पाहिले. BSB BSB: When David and his men came to the city, they found it burned down and their wives and sons and daughters taken captive.
4 ULB तेव्हा दावीद व त्याच्याजवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही. BSB BSB: So David and the troops with him lifted up their voices and wept until they had no strength left to weep.
5 ULB दावीदाच्या दोघी स्त्रिया अहीनवाम इज्रेलीण व पूर्वी नाबाल कर्मेली याची पत्नी होती ती अबीगईल या धरून नेलेल्या होत्या. BSB BSB: David’s two wives, Ahinoam of Jezreel and Abigail the widow of Nabal of Carmel, had been taken captive.
6 ULB तेव्हा दावीद मोठ्या संकटात पडला कारण त्यास धोंडमार करावा असे लोक बोलू लागले; कारण सर्व मनुष्यांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दु:खित झाले होते; परंतु दावीदाने आपला देव परमेश्वर याच्याकडून आपणाला सशक्त केले. BSB BSB: And David was greatly distressed because the people spoke of stoning him, because the soul of every man grieved for his sons and daughters. But David found strength in the LORD his God.
7 ULB मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दावीदाकडे आणले. BSB BSB: Then David said to Abiathar the priest, the son of Ahimelech, “Bring me the ephod.” So Abiathar brought it to him,
8 ULB दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “जर मी या सैन्याच्या पाठीस लागलो तर मी त्यांना गाठेन काय?” त्याने त्यास उत्तर दिले की, “पाठीस लाग कारण खचित तू त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून घेशील.” BSB BSB: and David inquired of the LORD: “Should I pursue these raiders? Will I overtake them?” “Pursue them,” the LORD replied, “for you will surely overtake them and rescue the captives.”
9 ULB मग दावीद त्याच्याकडील सहाशे पुरुष घेऊन बसोर नदीजवळ पोहचला. जे मागे ठेवले होते ते तेथे राहिले. BSB BSB: So David and his six hundred men went to the Brook of Besor, where some stayed behind
10 ULB तेव्हा दावीद व चारशे माणसे शत्रूच्या पाठीस लागली. कारण दोनशे माणसे तेथे थांबली; ती इतकी थकली होती की त्यांच्याने बसोर नदीच्या पलीकडे जाववेना. BSB BSB: because two hundred men were too exhausted to cross the brook. But David and four hundred men continued in pursuit.
11 ULB रानांत एक मिसरी त्यांना आढळला. तेव्हा त्यांनी त्यास दावीदाकडे आणले. मग त्यांनी त्यास भाकर दिली आणि ती त्याने खाल्ली व त्यांनी त्यास पाणी पाजले. BSB BSB: Now his men found an Egyptian in the field and brought him to David. They gave the man water to drink and food to eat—
12 ULB मग त्यांनी अंजिराच्या ढेपेचा तुकडा व द्राक्षाचे दोन घड त्यास दिले मग त्याने खाल्ल्यावर त्याच्या जिवात जीव आला कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती पाणीही तो प्याला नव्हता. BSB BSB: a piece of a fig cake and two clusters of raisins. So he ate and was revived, for he had not had any food or water for three days and three nights.
13 ULB तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “तू कोणाचा? कोठला आहेस?” त्याने म्हटले, “मी मिसरी तरुण एका अमालेकी मनुष्याचा चाकर आहे: तीन दिवसामागे मी दुखण्यात पडलो म्हणून माझ्या धन्याने मला सोडले. BSB BSB: Then David asked him, “To whom do you belong, and where are you from?” “I am an Egyptian,” he replied, “the slave of an Amalekite. My master abandoned me three days ago when I fell ill.
14 ULB आम्ही करेथी यांच्या दक्षिण प्रदेशावर व यहूदाच्या प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण प्रदेशावर घाला घातला आणि सिकलाग आम्ही अग्नीने जाळले.” BSB BSB: We raided the Negev of the Cherethites, the territory of Judah, and the Negev of Caleb, and we burned down Ziklag.”
15 ULB मग दावीद त्यास म्हणाला, “तू मला या टोळीकडे खाली नेशील काय?” त्याने म्हटले, “तुम्ही मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी देवाची शपथ माझ्याशी वाहा म्हणजे मी तुम्हास या टोळीकडे खाली नेईन.” BSB BSB: “Will you lead me to these raiders?” David asked. And the man replied, “Swear to me by God that you will not kill me or deliver me into the hand of my master, and I will lead you to them.”
16 ULB त्याने त्यांना खाली नेले, तेव्हा पाहा ते लोक अवघ्या भूमीवर पसरून खात व पीत व नाचत होते कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या देशातून व यहूद्याच्या देशातून पुष्कळ लूट घेतली होती. BSB BSB: So he led David down, and there were the Amalekites spread out over all the land, eating, drinking, and celebrating the great amount of plunder they had taken from the land of the Philistines and the land of Judah.
17 ULB दावीद पहाटेपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत त्यांना मारीत गेला; त्यांच्यातील चारशे तरुण माणसे उंटावर बसून पळाली. त्यांच्याशिवाय त्यांच्यातला कोणीएक सुटला नाही. BSB BSB: And David struck them down from twilight until the evening of the next day. Not a man escaped, except four hundred young men who fled, riding off on camels.
18 ULB जे सर्व अमालेक्यांनी नेले होते ते दावीदाने सोडवले व आपल्या दोघी स्त्रिया सोडवल्या. BSB BSB: So David recovered everything the Amalekites had taken, including his two wives.
19 ULB लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली व लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होते त्यातले काहीच त्यांनी गमावले नाही; दावीदाने सर्व माघारी आणले. BSB BSB: Nothing was missing, young or old, son or daughter, or any of the plunder the Amalekites had taken. David brought everything back.
20 ULB अवघी मेंढरे व गुरे दावीदाने घेतली; ती त्यांनी इतर सामानापुढे हाकून म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.” BSB BSB: And he took all the flocks and herds, which his men drove ahead of the other livestock, calling out, “This is David’s plunder!”
21 ULB मग जी दोनशे माणसे थकल्यामुळे दावीदाच्या मागे गेली नाहीत, ज्यांना त्याने बसोर नदीपाशी ठेवले होते, त्यांच्याकडे दावीद आला तेव्हा ती दावीदाला भेटायला व त्यांच्याबरोबरच्या लोकांस भेटायला सामोरी आली आणि दावीदाने त्या मनुष्यांजवळ येऊन त्यांना त्यांचे कुशल विचारले. BSB BSB: When David came to the two hundred men who had been too exhausted to follow him and who were left behind at the Brook of Besor, they came out to meet him and the troops with him. As David approached the men, he greeted them,
22 ULB तेव्हा जी माणसे दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती. ती सर्व असे म्हणू लागली की, “ही माणसे आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातले काही आम्ही त्यांना देणार नाही; फक्त प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊ. मग त्यांनी ती घेऊन निघून जावे.” BSB BSB: but all the wicked and worthless men among those who had gone with David said, “Because they did not go with us, we will not share with them the plunder we recovered, except for each man’s wife and children. They may take them and go.”
23 ULB तेव्हा दावीद म्हणाला, “माझ्या भावांनो जे परमेश्वराने आम्हांला दिले आहे त्याचे असे करू नका. कारण त्याने आम्हास संभाळले व जी टोळी आम्हावर आली ती आमच्या हाती दिली. BSB BSB: But David said, “My brothers, you must not do this with what the LORD has given us. He has protected us and delivered into our hands the raiders who came against us.
24 ULB या गोष्टीविषयी तुमचे कोण ऐकेल? जो लढाईत गेला त्याचा जसा वाटा तसा जो सामानाजवळ राहतो त्याचा वाटा होईल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.” BSB BSB: Who will listen to your proposal? The share of the one who went to battle will match the share of the one who stayed with the supplies. They will share alike.”
25 ULB त्या दिवसापासून पुढे तोच नियम झाला; त्याने तसा नियम व रीत इस्राएलात आजपर्यंत करून ठेवली. BSB BSB: And so it has been from that day forward. David established this statute and ordinance for Israel to this very day.
26 ULB दावीद सिकलागास आला तेव्हा त्याने यहूदाच्या वडिलांकडे आपल्या मित्रांकडे लुटीतले काही पाठवून सांगितले की, “पाहा परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हास ही भेट आहे.” BSB BSB: When David arrived in Ziklag, he sent some of the plunder to his friends, the elders of Judah, saying, “Here is a gift for you from the plunder of the LORD’s enemies.”
27 ULB जे बेथेलात होते त्यांना जे दक्षिण प्रदेशातील रामोथात होते त्यांना, व जे यत्तीरात होते त्यांना; BSB BSB: He sent gifts to those in Bethel, Ramoth Negev, and Jattir;
28 ULB जे अरोएरात होते त्यांना, व जे सिफमोथात होते त्यांना, व जे एष्टमोत होते त्यांना, BSB BSB: to those in Aroer, Siphmoth, and Eshtemoa;
29 ULB जे राखासांत होते त्यांना, व जे येरहमेली यांच्या नगरांत होते त्यांना, व जे केनी यांच्या नगरांत होते त्यांना, BSB BSB: to those in Racal and in the cities of the Jerahmeelites and Kenites;
30 ULB जे हर्मात होते त्यांना, व जे कोराशानात होते त्यांना, व जे अथाखात होते त्यांना, BSB BSB: to those in Hormah, Bor-ashan, and Athach;
31 ULB आणि जे हेब्रोनात होते त्यांना, जेथे दावीद व त्याची माणसे फिरत असत त्या सर्व ठिकाणाकडे त्याने लुटीतले काही पाठवले. BSB BSB: and to those in Hebron and in all the places where David and his men had roamed.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.