1 ULB जेव्हा शमुवेल म्हातारा झाला तेव्हा त्याने आपले पुत्र इस्राएलावर न्यायाधीश नेमले. BSB BSB: When Samuel grew old, he appointed his sons as judges over Israel.
2 ULB त्याच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव योएल व दुसऱ्याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायाधीश होते. BSB BSB: The name of his firstborn son was Joel, and the name of his second was Abijah. They were judges in Beersheba.
3 ULB परंतु त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालत नसत, तर ते अप्रामाणिक लाभांच्या पाठीमागे लागले होते. ते लाच घेऊन विपरीत न्याय करीत असत. BSB BSB: But his sons did not walk in his ways; they turned aside toward dishonest gain, accepting bribes and perverting justice.
4 ULB मग इस्राएलाचे सर्व वडील जमून रामा येथे शमुवेलाकडे आले. BSB BSB: So all the elders of Israel gathered together and came to Samuel at Ramah.
5 ULB आणि ते त्यास म्हणाले, “पाहा तुम्ही वयोवृद्ध झाले आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत. आता सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय करायला आम्हावर राजा नेमा.” BSB BSB: “Look,” they said, “you are old, and your sons do not walk in your ways. Now appoint a king to judge us like all the other nations.”
6 ULB परंतु, “आमचा न्याय करायला आम्हांला राजा द्या,” असे जे त्यांनी म्हटले, त्याबद्दल शमुवेलाला वाईट वाटले. म्हणून शमुवेलाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. BSB BSB: But when they said, “Give us a king to judge us,” their demand was displeasing in the sight of Samuel; so he prayed to the LORD.
7 ULB तेव्हा परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “लोक सांगतात त्या सर्वबाबतीत तू त्यांचा शब्द ऐक; कारण त्यांनी तुला नाकारले नाही, तर मला नाकारले आहे. BSB BSB: And the LORD said to Samuel, “Listen to the voice of the people in all that they say to you. For it is not you they have rejected, but they have rejected Me as their king.
8 ULB मी त्यांना मिसरातून वर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे, मला सोडून अन्य देवाची सेवा त्यांनी केली, आणि तसेच त्यांनी तुझ्याशी केले आहे.” BSB BSB: Just as they have done from the day I brought them up out of Egypt until this day, forsaking Me and serving other gods, so they are doing to you.
9 ULB तर आता त्यांचे ऐक; तथापि तू त्याच्याशी खडसावून बोल आणि जो राजा त्याच्यावर राज्य करील त्याची रीत त्यांना समजावून सांग. BSB BSB: Now listen to their voice; but you must solemnly warn them and show them the manner of the king who will reign over them.”
10 ULB मग शमुवेलाने, ज्या लोकांनी राजा मागितला होता त्यांना, परमेश्वराची सर्व वचने सांगितली. BSB BSB: So Samuel spoke all the words of the LORD to the people who were asking him for a king.
11 ULB तो त्यांना म्हणाला, “जो राजा तुम्हावर राज्य करील त्याची रीत अशी होईल; तो तुमचे पुत्र घेऊन आपल्या रथांसाठी व आपले घोडेस्वार होण्यासाठी ठेवील आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील. BSB BSB: He said, “This will be the manner of the king who will reign over you: He will take your sons and appoint them to serve his own chariots and horses, and to run in front of his chariots.
12 ULB तो त्यांना आपले हजारांचे सरदार नेमून ठेवील. जमीन नांगरायला, आपली पिके कापायला, आणि आपली लढाईची शस्त्रे व आपली रथांची शस्त्रे करायला ठेवील. BSB BSB: He will appoint some for himself as commanders of thousands and of fifties, and others to plow his ground, to reap his harvest, and to make his weapons of war and equipment for his chariots.
13 ULB तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या, स्वयंपाकिणी, आणि भटारखान्यात काम करणाऱ्या होण्यास घेईल. BSB BSB: And he will take your daughters to be perfumers, cooks, and bakers.
14 ULB तुमची जी उत्तम ती शेते, तुमचे द्राक्षमळे, आणि तुमचे जैतूनाचे मळे घेऊन, ते तो त्याच्या चाकरांना देईल. BSB BSB: He will take the best of your fields and vineyards and olive groves and give them to his servants.
15 ULB तो तुमची पीके व तुमचे द्राक्षमळे यांचा दशमांश घेऊन, तो आपल्या कारभाऱ्यांना देईल. BSB BSB: He will take a tenth of your grain and grape harvest and give it to his officials and servants.
16 ULB तुमचे दास आणि तुमच्या दासी व तुमचे उत्तम तरुण व तुमची गाढवे घेऊन, ते तो आपल्या कामाला लावील. BSB BSB: And he will take your menservants and maidservants and your best cattle and donkeys and put them to his own use.
17 ULB तुमच्या मेंढरांचा दशमांश तो घेईल व तुम्ही त्याचे दास व्हाल. BSB BSB: He will take a tenth of your flocks, and you yourselves will become his slaves.
18 ULB त्यानंतर तुम्ही आपणासाठी निवडलेल्या राजामुळे ओरडाल; परंतु परमेश्वर त्या दिवसात तुम्हास उत्तर देणार नाही.” BSB BSB: When that day comes, you will beg for relief from the king you have chosen, but the LORD will not answer you on that day.”
19 ULB पण लोक शमुवेलाचा शब्द ऐकायला नाकारून म्हणाले, “असे नाही! आम्हांवर राजा पाहिजेच BSB BSB: Nevertheless, the people refused to listen to Samuel. “No!” they said. “We must have a king over us.
20 ULB म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आणि आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हापुढे चालून आमच्या लढाया लढेल.” BSB BSB: Then we will be like all the other nations, with a king to judge us, to go out before us, and to fight our battles.”
21 ULB शमुवेलाने जेव्हा लोकांनी दिलेल्या उत्तराचे सर्व शब्द ऐकून परमेश्वरास ऐकवले; BSB BSB: Samuel listened to all the words of the people and repeated them in the hearing of the LORD.
22 ULB मग तेव्हा परमेश्वर शमुवेलाशी बोलला, “तू त्यांचा शब्द ऐकून त्याच्यांवर राज्य करायला राजा नेमून ठेव.” तेव्हा शमुवेल इस्राएलाच्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकजण आपापल्या नगरास परत जा.” BSB BSB: “Listen to their voice,” the LORD said to Samuel. “Appoint a king for them.” Then Samuel told the men of Israel, “Everyone must go back to his city.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.