1 ULB यहूदाचा राजा आहाज याच्या बाराव्या वर्षी एलाचा मुलगा होशे शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने नऊ वर्षे राज्य केले. BSB BSB: In the twelfth year of the reign of Ahaz over Judah, Hoshea son of Elah became king of Israel, and he reigned in Samaria nine years.
2 ULB परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच तो करत असे, पण त्याच्या पूर्वीच्या इस्राएलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती. BSB BSB: And he did evil in the sight of the LORD, but not like the kings of Israel who preceded him.
3 ULB अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करून आला. तेव्हा होशे त्याचा दास बनला आणि त्याने त्यास खंडणी भरून दिली. BSB BSB: Shalmaneser king of Assyria attacked him, and Hoshea became his vassal and paid him tribute.
4 ULB पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी होशेने खंडणीही दिली नव्हती. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्यास अटक करून कैदेत टाकले. BSB BSB: But the king of Assyria discovered that Hoshea had conspired to send envoys to King So of Egypt, and that he had not paid tribute to the king of Assyria as in previous years. Therefore the king of Assyria arrested Hoshea and put him in prison.
5 ULB मग अश्शूरचा राजा सर्व देशावर चाल करून आला व शोमरोनावर चढून येऊन त्याने शोमरोनला तीन वर्षे वेढा घातला. BSB BSB: Then the king of Assyria invaded the whole land, marched up to Samaria, and besieged it for three years.
7 ULB परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती, म्हणून असे घडले. कारण इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वर त्यांचा देव ज्याने त्यांना मिसरचा राजा फारो याच्या जाचातून सोडवले होते, त्याच्याविरुध्द पाप केले आणि दुसऱ्या देवांचे भजन पूजन केले. BSB BSB: All this happened because the people of Israel had sinned against the LORD their God, who had brought them out of the land of Egypt from under the hand of Pharaoh king of Egypt. They had worshiped other gods
8 ULB आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्राएली लोकांपुढून हुसकावून लावली होती, त्यांच्या नियमांप्रमाणे आणि इस्राएलाच्या राजांनी जे नियम केले होतो त्याप्रमाणे ते चालत. BSB BSB: and walked in the customs of the nations that the LORD had driven out before the Israelites, as well as in the practices introduced by the kings of Israel.
9 ULB इस्राएल लोकांनी ज्या गोष्टी चांगल्या नाहीत त्या त्यांनी परमेश्वर देवाविरुध्द चोरुन केल्या. पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या नगरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थाने बांधली. BSB BSB: The Israelites secretly did things against the LORD their God that were not right. From watchtower to fortified city, they built high places in all their cities.
10 ULB प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतिस्तंभ आणि अशेरा देवीचे खांब उभारले. BSB BSB: They set up for themselves sacred pillars and Asherah poles on every high hill and under every green tree.
11 ULB आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्या समोरून घालवून दिली होती, त्यांच्यासारखेच त्यांनी उंचस्थानावर धूप जाळला आणि परमेश्वरास संताप येईल आशाप्रकारची वाईट कामे केली. त्या नीच कृत्यांनी परमेश्वराचा राग भडकला. BSB BSB: They burned incense on all the high places like the nations that the LORD had driven out before them. They did wicked things, provoking the LORD to anger.
12 ULB त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “त्यांची सेवा कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते. BSB BSB: They served idols, although the LORD had told them, “You shall not do this thing.”
13 ULB इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे सांगितले होते की, “या वाईट मार्गातून फिरा आणि जे नियम तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिले होते व जे मी माझे सेवक आणि भविष्यवादी यांच्याकडून तुम्हास पाठवून दिले, त्या सर्वांप्रमाणे माझ्या आज्ञा व माझे नियम पाळा.” BSB BSB: Yet through all His prophets and seers, the LORD warned Israel and Judah, saying, “Turn from your wicked ways and keep My commandments and statutes, according to the entire Law that I commanded your fathers and delivered to you through My servants the prophets.”
14 ULB पण त्यांनी काही एकले नाही. उलट आपल्या पूर्वजांसारखाच, ज्यांचा परमेश्वर आपला देव याच्यावर विश्वास नव्हता हट्टीपणा केला. BSB BSB: But they would not listen, and they stiffened their necks like their fathers, who did not believe the LORD their God.
15 ULB परमेश्वराचा करार आणि त्याचा नियम जो त्याने त्यांच्या पूर्वजांशी केला होता व त्याच्या साक्षी ज्या त्याने त्यांना साक्ष देऊन दिलेल्या होत्या, त्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते निरर्थक होऊन व्यर्थतेच्या मागे लागले. त्यांनी आपल्या भोवतालची राष्ट्रे ज्याच्याविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांस आज्ञा केली होती की, त्यांच्यासारखे करू नका त्यांच्यामागे ते चालले होते. BSB BSB: They rejected His statutes and the covenant He had made with their fathers, as well as the decrees He had given them. They pursued worthless idols and became worthless themselves, going after the surrounding nations that the LORD had commanded them not to imitate.
16 ULB आणि त्यांनी परमेश्वर आपला देव याच्या सर्व आज्ञा सोडून, त्यांनी वासरांच्या दोन मूर्ति केल्या, अशेराचे खांब उभारले, आणि आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बआलदेवतेची त्यांनी पूजा केली. BSB BSB: They abandoned all the commandments of the LORD their God and made for themselves two cast idols of calves and an Asherah pole. They bowed down to all the host of heaven and served Baal.
17 ULB त्यांनी आपल्या मुला व मुलींना ही अग्नीत होम करून अर्पिली. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि ज्योतिषी यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वत:लाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला. BSB BSB: They sacrificed their sons and daughters in the fire and practiced divination and soothsaying. They devoted themselves to doing evil in the sight of the LORD, provoking Him to anger.
18 ULB म्हणून परमेश्वर इस्राएलवर फार संतापला आणि त्याने त्यांना आपल्यासमोरून घालवले, फक्त यहूदा वंश सोडून कोणी उरले नाही. BSB BSB: So the LORD was very angry with Israel, and He removed them from His presence. Only the tribe of Judah remained,
19 ULB यहूदाने देखील परमेश्वर आपला देव याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. याउलट इस्राएलांनी जे नियम केले त्याचे त्यांनी अनुसरण केले. BSB BSB: and even Judah did not keep the commandments of the LORD their God, but lived according to the customs Israel had introduced.
20 ULB त्यामुळे परमेश्वराने सर्व इस्राएल वंशजांचा त्याग केला व त्यांना आपणासमोरून हाकलून दृष्टीआड करेपर्यंत, त्याने त्यांना पीडा देऊन लुटारुंच्या हाती दिले. BSB BSB: So the LORD rejected all the descendants of Israel. He afflicted them and delivered them into the hands of plunderers, until He had banished them from His presence.
21 ULB त्याने दाविदाच्या घराण्यापासून इस्राएल फाडून काढला, तेव्हा त्यांनी नबाटचा मुलगा यराबाम याला राजा केले. यराबामाने इस्राएलाला परमेश्वराच्या मागे चालण्यापासून परावृत्त केले आणि त्यांना मोठे पाप करायला लावले. BSB BSB: When the LORD had torn Israel away from the house of David, they made Jeroboam son of Nebat king, and Jeroboam led Israel away from following the LORD and caused them to commit a great sin.
22 ULB यराबामाने जी पापे केली त्याचे अनुकरण इस्राएल लोकांनी केले. त्यांनी ते सोडले नाही. BSB BSB: The Israelites persisted in all the sins that Jeroboam had committed and did not turn away from them.
23 ULB अखेर परमेश्वराने आपले सर्व सेवक जे भविष्यवादी होते त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या समोरून घालवले. त्यांना त्यांच्या प्रदेशातून काढून अश्शूरमध्ये नेण्यात आले. आजपर्यंत ते तेथे आहेत. BSB BSB: Finally, the LORD removed Israel from His presence, as He had declared through all His servants the prophets. So Israel was exiled from their homeland into Assyria, where they are to this day.
24 ULB अश्शूरच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनात इस्राएली लोकांच्या ठिकाणी वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले. BSB BSB: Then the king of Assyria brought people from Babylon, Cuthah, Avva, Hamath, and Sepharvaim and settled them in the towns of Samaria to replace the Israelites. They took possession of Samaria and lived in its towns.
25 ULB आणि असे झाले की ते तेथे वस्ती करून राहू लागले, तेव्हा ते परमेश्वराचा मान राखत नव्हते. म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह सोडले. त्यांनी त्यांच्यातील कित्येकांचा बळी घेतला. BSB BSB: Now when the settlers first lived there, they did not worship the LORD, so He sent lions among them, which killed some of them.
26 ULB मग ते अश्शूरच्या राजाला म्हणाले, “जी राष्ट्रे तू नेऊन शोमरोनमधल्या नगरात वसवले, त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. आणि पाहा, सिंह त्या लोकांस मारून टाकत आहे, कारण त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम माहित नाही.” BSB BSB: So they spoke to the king of Assyria, saying, “The peoples that you have removed and placed in the cities of Samaria do not know the requirements of the God of the land. Because of this, He has sent lions among them, which are indeed killing them off.”
27 ULB तेव्हा अश्शूरच्या राजाने आज्ञा दिली, “जे याजक तुम्ही तेथून आणले आहेत, त्यातील कोणाएकाला तिथे घेऊन जा. आणि त्यास तिथे राहू द्यावे व त्यांनी त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम शिकवावा. BSB BSB: Then the king of Assyria commanded: “Send back one of the priests you carried off from Samaria, and have him go back to live there and teach the requirements of the God of the land.”
28 ULB तेव्हा, शोमरोनमधून जे याजक त्यांनी नेले होते, त्यापैकी एकजण बेथेल येथे राहिला. आणि त्याने लोकांस परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.” BSB BSB: Thus one of the priests they had carried away came and lived in Bethel, and he began to teach them how they should worship the LORD.
29 ULB परंतू प्रत्येक राष्ट्राने स्वत:चे देव केले, आणि त्यांना शोमरोन मधील लोकांनी बांधलेल्या उंचस्थानावरील पूजास्थळामध्ये ठेवले. प्रत्येक राष्ट्राने स्वत:च्या राहण्याच्या नगरात असेच केले. BSB BSB: Nevertheless, the people of each nation continued to make their own gods in the cities where they had settled, and they set them up in the shrines that the people of Samaria had made on the high places.
30 ULB बाबेल लोकांनी सुक्कोथ-बनोथ ही दैवते केली; कूथातील लोकांनी नेरगल केला; हमाथमधील लोकांनी अशीमा केली, BSB BSB: The men of Babylon made Succoth-benoth, the men of Cuth made Nergal, the men of Hamath made Ashima,
31 ULB अव्वी यांनी निभज आणि तर्ताक केले. सफरवाईम यांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक यांच्यासाठी आपल्या मुलांचा अग्नीत बली दिला. BSB BSB: the Avvites made Nibhaz and Tartak, and the Sepharvites burned their children in the fire to Adrammelech and Anammelech the gods of Sepharvaim.
32 ULB ते परमेश्वराविषयी आदर बाळगत तरी, उंचस्थानातील पूजास्थळांसाठी त्यांनी आपल्यातूनच याजक निवडले. तिथे हे याजक यज्ञ करीत. BSB BSB: So the new residents worshiped the LORD, but they also appointed for themselves priests of all sorts to serve in the shrines of the high places.
33 ULB ते परमेश्वराविषयी आदर बाळगत असत आणि आपापल्या दैवतांचीही पूजा करीत. आपल्या पूर्वीच्या राष्ट्रा प्रमाणे जेथून त्यांना आणले होते त्यांच्या रीतीप्रमाणे ते करीत गेले. BSB BSB: They worshiped the LORD, but they also served their own gods according to the customs of the nations from which they had been carried away.
34 ULB आजही ते लोक त्यांच्या पूर्वीच्या चालीरीतीला चिटकून आहेत. ते परमेश्वराचा आदर बाळगत नसत व ज्याचे नाव इस्राएल ठेवले, त्या याकोबाच्या वंशजास त्याने दिलेल्या आज्ञा, नियम, न्याय व नियमशास्त्र यांप्रमाणे ते आचरण करीत नाही. BSB BSB: To this day they are still practicing their former customs. None of them worship the LORD or observe the statutes, ordinances, laws, and commandments that the LORD gave the descendants of Jacob, whom He named Israel.
35 ULB परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार करून त्यांना आज्ञा केली होती की, “इतर दैवतांचे भय तुम्ही धरू नका, आणि त्यांच्या पाया ही पडू नका व त्यांची सेवाही करू नका व त्यांना यज्ञ करू नका. BSB BSB: For the LORD had made a covenant with the Israelites and commanded them, “Do not worship other gods or bow down to them; do not serve them or sacrifice to them.
36 ULB फक्त परमेश्वर देवालाच मानले पाहिजे त्यानेच तुम्हास मिसरमधून बाहेर काढले तुमच्या रक्षणासाठी परमेश्वराने आपले सामर्थ्य पणाला लावले. तेव्हा परमेश्वराची उपासना करा आणि त्याच्यासाठी यज्ञ करा. BSB BSB: Instead, worship the LORD, who brought you out of the land of Egypt with great power and an outstretched arm. You are to bow down to Him and offer sacrifices to Him.
37 ULB त्याने तुम्हास ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांचे भय धरता कामा नये. BSB BSB: And you must always be careful to observe the statutes, ordinances, laws, and commandments He wrote for you. Do not worship other gods.
38 ULB मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका. BSB BSB: Do not forget the covenant I have made with you. Do not worship other gods,
39 ULB फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हास सर्व संकटातून सोडवील.” BSB BSB: but worship the LORD your God, and He will deliver you from the hands of all your enemies.”
40 ULB पण इस्राएल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले. BSB BSB: But they would not listen, and they persisted in their former customs.
41 ULB आता ती इतर राष्ट्रे परमेश्वराचा आदर ठेवतात पण स्वत:च्या देवतांच्या मूर्तीचीही पूजा करतात. त्यांची मुलेबाळे, नातवंडे आपल्या पूर्वजांचेच अनुकरण करत राहिली. ती आजतागायत तशीच वागत आहेत. BSB BSB: So these nations worshiped the LORD but also served their idols, and to this day their children and grandchildren continue to do as their fathers did.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.