1 ULB डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती दोनशे भाकरी, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते. BSB BSB: When David had gone a little beyond the summit, Ziba the servant of Mephibosheth was there to meet him. He had a pair of saddled donkeys loaded with two hundred loaves of bread, a hundred clusters of raisins, a hundred summer fruits, and a skin of wine.
2 ULB राजा दावीदाने “हे सर्व कशासाठी? म्हणून सीबाला विचारले सीबा म्हणाला,” “राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत, भाकरी आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षारस आहे.” BSB BSB: “Why do you have these?” asked the king. Ziba replied, “The donkeys are for the king’s household to ride, the bread and summer fruit are for the young men to eat, and the wine is to refresh those who become exhausted in the wilderness.”
3 ULB राजाने त्यास मफिबोशेथाचा ठावठिकाणा विचारला सीबाने सांगितले, मफिबोशेथ यरुशलेमेमध्येच आहे. कारण आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील असे त्यास वाटते. BSB BSB: “Where is your master’s grandson?” asked the king. And Ziba answered, “Indeed, he is staying in Jerusalem, for he has said, ‘Today, the house of Israel will restore to me the kingdom of my grandfather.’”
4 ULB तेव्हा राजा सीबाला म्हणाला ठीक आहे, जे जे मफीबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे. सीबा म्हणाला, मी आपल्याला नमन करतो. मी तुम्हास आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो. BSB BSB: So the king said to Ziba, “All that belongs to Mephibosheth is now yours!” “I humbly bow before you,” said Ziba. “May I find favor in your eyes, my lord the king!”
5 ULB पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी होता. तो दावीदाला शिव्याशाप देत चालला होता. BSB BSB: As King David approached Bahurim, a man from the family of the house of Saul was just coming out. His name was Shimei son of Gera, and as he approached, he kept yelling out curses.
6 ULB त्याने दावीदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरवात केली. पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दावीदाला वेढा घातला. BSB BSB: He threw stones at David and at all the servants of the king, though the troops and all the mighty men were on David’s right and left.
7 ULB शिमी दाविदला शाप देतच होता, चालता हो इथून, तू दुष्ट आहेस तू खूनी आहेस! BSB BSB: And as he yelled curses, Shimei said, “Get out, get out, you worthless man of bloodshed!
8 ULB देव तुला शासन करीत आहे. कारण शौलाच्या घरातील लोकांस तू मारलेस. त्याचे राज्य बळकावलेस. पण ते राज्य परमेश्वराने तुझा मुलगा अबशालोम याच्या हवाली केले आहे. तुझे आता हाल होत आहेत कारण तू खुनी आहेस. BSB BSB: The LORD has paid you back for all the blood of the house of Saul, in whose place you have reigned, and the LORD has delivered the kingdom into the hand of your son Absalom. See, you have come to ruin because you are a man of bloodshed!”
9 ULB सरुवेचा मुलगा अबीशय राजाला म्हणाला, “या मरण पावलेल्या कुत्र्यासारख्या मनुष्याने तुम्हास शिव्याशाप द्यावेत म्हणजे काय? स्वामी, मला त्याचा शिरच्छेद करू द्या. BSB BSB: Then Abishai son of Zeruiah said to the king, “Why should this dead dog curse my lord the king? Let me go over and cut off his head!”
10 ULB पण राजा त्यास म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो मी काय करू? दाविदाला शिव्याशाप दे असे परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल. मग त्यास असे कोण म्हणू शकेल की, तू राजाला का शाप देत आहेस?” BSB BSB: But the king replied, “What have I to do with you, O sons of Zeruiah? If he curses me because the LORD told him, ‘Curse David,’ who can ask, ‘Why did you do this?’”
11 ULB अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे तर त्यामध्ये नवल काय. त्यास हवे ते म्हणू द्या, कारण परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल. BSB BSB: Then David said to Abishai and to all his servants, “Behold, my own son, my own flesh and blood, seeks my life. How much more, then, this Benjamite! Leave him alone and let him curse me, for the LORD has told him so.
12 ULB माझ्याबाबतीत घडणारे हे अन्याय कदाचित् परमेश्वर पाहील, आणि शिमीच्या या शिव्याशापाच्या बदल्यात उद्या तो माझे भलेच करील. BSB BSB: Perhaps the LORD will see my affliction and repay me with good for the cursing I receive today.”
13 ULB दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक मग आपल्या वाटेने तसेच पुढे गेले. शिमी त्यांच्या मागोमाग जात राहिला. डोंगराच्या कडेने तो दुसऱ्या बाजूने जात होता. तो दाविदाबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत होता. दावीदावर तो दगड आणि मातीही फेकत होता. BSB BSB: So David and his men proceeded along the road as Shimei went along the ridge of the hill opposite him. As Shimei went, he yelled curses, threw stones, and flung dust at David.
14 ULB राजा दावीद आणि बरोबरचे सर्व लोक यार्देन नदीजवळ आले. दमल्यामुळे ते तेथे विश्रांतीला थांबले. त्यांनी विसावा घेतला व ते ताजेतवाने झाले. BSB BSB: Finally, the king and all the people with him arrived, exhausted. And there he refreshed himself.
15 ULB अबशालोम, अहिथोफेल आणि इस्राएलचे सर्व लोक यरुशलेम येथे आले. BSB BSB: Then Absalom and all the men of Israel came to Jerusalem, and Ahithophel was with him.
16 ULB दावीदाचा मित्र अर्की हूशय अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो. BSB BSB: And David’s friend Hushai the Archite went to Absalom and said to him, “Long live the king! Long live the king!”
17 ULB अबशालोम त्यास म्हणाला, हीच का तुझ्या मित्रावरील तुझी प्रीती? तू ही त्याच्याबरोबर यरुशलेम का सोडले नाहीस? BSB BSB: “Is this the loyalty you show your friend?” Absalom replied. “Why did you not go with your friend?”
18 ULB हूशय अबशालोमाला म्हणाला, परमेश्वर ज्याची निवड करेल त्यास माझा पाठिंबा आहे. परमेश्वराने आणि इस्राएल लोकांनी आपली निवड केली आहे. म्हणून मी तुमच्या बाजूचा आहे. BSB BSB: “Not at all,” Hushai answered. “For the one chosen by the LORD, by this people, and by all the men of Israel—his I will be, and with him I will remain.
19 ULB पूर्वी मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो, आता तशीच तुमची सेवा करणार. BSB BSB: Furthermore, whom should I serve if not his son? As I served in your father’s presence, so also I will serve in yours.”
20 ULB अबशालोमने अहिथोफेलला विचारले आम्ही काय करावे ते सांग. BSB BSB: Then Absalom said to Ahithophel, “Give me counsel. What should we do?”
21 ULB अहिथोफेल त्यास म्हणाला, मंदीराची राखण करायला तुझ्या वडीलांनी त्यांच्या उपपत्नी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव मग तुझ्या वडीलांना तुझा तिरस्कार वाटेल व ही गोष्ट सर्व इस्राएलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठिंबा मिळेल. BSB BSB: Ahithophel replied, “Sleep with your father’s concubines, whom he has left to take care of the palace. When all Israel hears that you have become a stench to your father, then the hands of all who are with you will be strengthened.”
22 ULB मग सर्वांनी राजवाड्याच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या उपपत्नीशी लैंगिक सबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली. BSB BSB: So they pitched a tent for Absalom on the roof, and he slept with his father’s concubines in the sight of all Israel.
23 ULB अहिथोफेलचा सल्ला दावीद आणि अबशालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकांस त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटत. BSB BSB: Now in those days the advice of Ahithophel was like the consultation of the word of God. Such was the regard that both David and Absalom had for Ahithophel’s advice.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.