1 ULB शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून परमेश्वराने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले; BSB BSB: And David sang this song to the LORD on the day the LORD had delivered him from the hand of all his enemies and from the hand of Saul.
2 ULB परमेश्वर हा माझा दुर्ग, माझा गड, माझ्या सुरक्षिततेचा आधार. BSB BSB: He said: “The LORD is my rock, my fortress, and my deliverer.
3 ULB “तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, देवाच्या आश्रयाला जातो. देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते. परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा, माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले. क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो. BSB BSB: My God is my rock, in whom I take refuge, my shield, and the horn of my salvation. My stronghold, my refuge, and my Savior, You save me from violence.
4 ULB त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला, आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला. BSB BSB: I will call upon the LORD, who is worthy to be praised; so shall I be saved from my enemies.
5 ULB शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता. मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो. BSB BSB: For the waves of death engulfed me; the torrents of chaos overwhelmed me.
6 ULB अधोलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता. BSB BSB: The cords of Sheol entangled me; the snares of death confronted me.
7 ULB तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला. BSB BSB: In my distress I called upon the LORD; I cried out to my God. And from His temple He heard my voice, and my cry for help reached His ears.
8 ULB तेव्हा धरती डळमळली हादरली स्वर्गाचा पाया थरथरला कारण देवाचा कोप झाला होता. BSB BSB: Then the earth shook and quaked; the foundations of the heavens trembled; they were shaken because He burned with anger.
9 ULB त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. मुखातून अग्नीज्वाला बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या. BSB BSB: Smoke rose from His nostrils, and consuming fire came from His mouth; glowing coals blazed forth.
10 ULB आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. काळ्याभोर ढगावर उभा राहिला. BSB BSB: He parted the heavens and came down with dark clouds beneath His feet.
11 ULB करूबावर आरुढ होऊन तो उडत होता. तो वाऱ्यावर स्वार झाला होता. BSB BSB: He mounted a cherub and flew; He soared on the wings of the wind.
12 ULB परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरून ठेवले होते. BSB BSB: He made darkness a canopy around Him, a gathering of water and thick clouds.
13 ULB त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की, निखारे धगधगू लागले. BSB BSB: From the brightness of His presence coals of fire blazed forth.
14 ULB परमेश्वर आकाशातून गरजला. त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला. BSB BSB: The LORD thundered from heaven; the voice of the Most High resounded.
15 ULB त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले. BSB BSB: He shot His arrows and scattered the foes; He hurled lightning and routed them.
16 ULB परमेश्वरा, तुझ्या धमकीच्या आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या श्वासाने समुद्राचे पाणीही मागे हटले. समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला. BSB BSB: The channels of the sea appeared, and the foundations of the world were exposed at the rebuke of the LORD, at the blast of the breath of His nostrils.
17 ULB मला परमेश्वराने आधार दिला, वरून तो खाली आला. मला धरून त्याने संकटाच्या खोल पाण्यातून बाहेर काढले. BSB BSB: He reached down from on high and took hold of me; He drew me out of deep waters.
18 ULB शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता. पण परमेश्वराने मला वाचवले. BSB BSB: He rescued me from my powerful enemy, from foes too mighty for me.
19 ULB मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण परमेश्वराने मला आधार दिला. BSB BSB: They confronted me in my day of calamity, but the LORD was my support.
20 ULB परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे, म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले. BSB BSB: He brought me out into the open; He rescued me because He delighted in me.
21 ULB मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल, कारण मी योग्य तेच केले. मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल. BSB BSB: The LORD has rewarded me according to my righteousness; He has repaid me according to the cleanness of my hands.
22 ULB कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही अपराध मी केला नाही. BSB BSB: For I have kept the ways of the LORD and have not wickedly departed from my God.
23 ULB परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो. BSB BSB: For all His ordinances are before me; I have not disregarded His statutes.
24 ULB मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले. BSB BSB: And I have been blameless before Him and kept myself from iniquity.
25 ULB तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील. BSB BSB: So the LORD has repaid me according to my righteousness, according to my cleanness in His sight.
26 ULB एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करू. तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू. BSB BSB: To the faithful You show Yourself faithful, to the blameless You show Yourself blameless;
27 ULB हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि कुटीलांशी तू ही कुटिलतेने वागतोस. BSB BSB: to the pure You show Yourself pure, but to the crooked You show Yourself shrewd.
28 ULB परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस. BSB BSB: You save an afflicted people, but Your eyes are on the haughty to bring them down.
29 ULB परमेश्वरा, तू माझा दीप आहेस. माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस. BSB BSB: For You, O LORD, are my lamp; the LORD lights up my darkness.
30 ULB परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो. देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करू शकतो. BSB BSB: For in You I can charge an army; with my God I can scale a wall.
31 ULB देवाची सत्ता सर्वकष आहे. परमेश्वराचे वचन कसोटीला उतरलेले आहे. त्याच्यावर भरवसा टाकणाऱ्या, सर्वांची तो ढाल आहे. BSB BSB: As for God, His way is perfect; the word of the LORD is flawless. He is a shield to all who take refuge in Him.
32 ULB या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण? BSB BSB: For who is God besides the LORD? And who is the Rock except our God?
33 ULB देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांस तो आपल्या मार्गाने नेतो. BSB BSB: God is my strong fortress, and He makes my way clear.
34 ULB देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो. उच्च स्थानावर तो मला अढळ ठेवतो. BSB BSB: He makes my feet like those of a deer and stations me upon the heights.
35 ULB युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो. त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करू शकतात. BSB BSB: He trains my hands for battle; my arms can bend a bow of bronze.
36 ULB देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास. BSB BSB: You have given me Your shield of salvation, and Your gentleness exalts me.
37 ULB माझ्या पायांत बळ दे, म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन. BSB BSB: You broaden the path beneath me so that my ankles do not give way.
38 ULB शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही. BSB BSB: I pursued my enemies and destroyed them; I did not turn back until they were consumed.
39 ULB त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले. BSB BSB: I devoured and crushed them so they could not rise; they have fallen under my feet.
40 ULB देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास. BSB BSB: You have armed me with strength for battle; You have subdued my foes beneath me.
41 ULB त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणून मी त्यांच्यावर वार करू शकलो. BSB BSB: You have made my enemies retreat before me; I destroyed those who hated me.
42 ULB शत्रू मदतीसाठी याचना करू लागले. पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यांनी परमेश्वराचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली. BSB BSB: They looked, but there was no one to save them—to the LORD, but He did not answer.
43 ULB माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखा त्यांचा मी भुगा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले. BSB BSB: I ground them as the dust of the earth; I crushed and trampled them like mud in the streets.
44 ULB माझ्यावर जे चाल करून आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस. ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली. BSB BSB: You have delivered me from the strife of my people; You have preserved me as the head of nations; a people I had not known shall serve me.
45 ULB आता दूर देशचे लोक माझे ऐकतात. जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो. BSB BSB: Foreigners cower before me; when they hear me, they obey me.
46 ULB भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते, ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात. BSB BSB: Foreigners lose heart and come trembling from their strongholds.
47 ULB परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे. BSB BSB: The LORD lives, and blessed be my Rock! And may God, the Rock of my salvation, be exalted—
48 ULB या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांस माझ्या शासनामध्ये ठेवले. BSB BSB: the God who avenges me and brings down nations beneath me,
49 ULB देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस. BSB BSB: who frees me from my enemies. You exalt me above my foes; You rescue me from violent men.
50 ULB हे परमेश्वरा, म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन. BSB BSB: Therefore I will praise You, O LORD, among the nations; I will sing praises to Your name.
51 ULB परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.” BSB BSB: Great salvation He brings to His king. He shows loving devotion to His anointed, to David and his descendants forever.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.