1 ULB माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो. BSB BSB: You therefore, my child, be strong in the grace that is in Christ Jesus.
2 ULB माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांस सोपवून दे. BSB BSB: And the things that you have heard me say among many witnesses, entrust these to faithful men who will be qualified to teach others as well.
3 ULB ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. BSB BSB: Join me in suffering, like a good soldier of Christ Jesus.
4 ULB सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे. BSB BSB: A soldier refrains from entangling himself in civilian affairs, in order to please the one who enlisted him.
5 ULB जर कोणी मल्ल युद्ध करतो, तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्यास मुकुट मिळत नाही. BSB BSB: Likewise, a competitor does not receive the crown unless he competes according to the rules.
6 ULB कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. BSB BSB: The hardworking farmer should be the first to partake of the crops.
7 ULB जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल. BSB BSB: Consider what I am saying, for the Lord will give you insight into all things.
8 ULB माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर. BSB BSB: Remember Jesus Christ, raised from the dead, descended from David, as proclaimed by my gospel,
9 ULB कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःख सहन करत आहे, येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही. BSB BSB: for which I suffer to the extent of being chained like a criminal. But the word of God cannot be chained!
10 ULB ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्वकाही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकाळचे गौरव प्राप्त व्हावे. BSB BSB: For this reason I endure all things for the sake of the elect, so that they too may obtain the salvation that is in Christ Jesus, with eternal glory.
11 ULB हे वचन विश्वसनीय आहे की, जर आम्ही त्याच्यासह मरण पावलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू BSB BSB: This is a trustworthy saying: If we died with Him, we will also live with Him;
12 ULB जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्यास नाकारले, तर तोसुध्दा आम्हास नाकारील BSB BSB: if we endure, we will also reign with Him; if we deny Him, He will also deny us;
13 ULB जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही. BSB BSB: if we are faithless, He remains faithful, for He cannot deny Himself.
14 ULB लोकांस या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दयुद्ध करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते. BSB BSB: Remind the believers of these things, charging them before God to avoid quarreling over words, which succeeds only in leading the listeners to ruin.
15 ULB तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर. BSB BSB: Make every effort to present yourself approved to God, an unashamed workman who accurately handles the word of truth.
16 ULB पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांस देवापासून अधिकाधिक दूर नेतो. BSB BSB: But avoid irreverent, empty chatter, which will only lead to more ungodliness,
17 ULB आणि अशाप्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हूमनाय आणि फिलेत आहेत, BSB BSB: and the talk of such men will spread like gangrene. Among them are Hymenaeus and Philetus,
18 ULB ते सत्यापासून दूर गेले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात. BSB BSB: who have deviated from the truth. They say that the resurrection has already occurred, and they undermine the faith of some.
19 ULB तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्यास हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे.” BSB BSB: Nevertheless, God’s firm foundation stands, bearing this seal: “The Lord knows those who are His,” and, “Everyone who calls on the name of the Lord must turn away from iniquity.”
20 ULB मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनवलेलीही असतात. काही सन्मानास व काही अवमानास नेमलेली असतात. BSB BSB: A large house contains not only vessels of gold and silver, but also of wood and clay. Some indeed are for honorable use, but others are for common use.
21 ULB म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, मालकाला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. BSB BSB: So if anyone cleanses himself of what is unfit, he will be a vessel for honor: sanctified, useful to the Master, and prepared for every good work.
22 ULB पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्यामागे लाग. BSB BSB: Flee from youthful passions and pursue righteousness, faith, love, and peace, together with those who call on the Lord out of a pure heart.
23 ULB परंतु मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात. BSB BSB: But reject foolish and ignorant speculation, for you know that it breeds quarreling.
24 ULB देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. BSB BSB: And a servant of the Lord must not be quarrelsome, but must be kind to everyone, able to teach, and forbearing.
25 ULB जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल. BSB BSB: He must gently reprove those who oppose him, in the hope that God may grant them repentance leading to a knowledge of the truth.
26 ULB आणि सैतानाने आपल्या इच्छेप्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फासातून सुटून शुद्धीवर येतील. BSB BSB: Then they will come to their senses and escape the snare of the devil, who has taken them captive to his will.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.