1 ULB पाच दिवसानंतर महायाजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील हे खाली आले; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली. BSB BSB: Five days later the high priest Ananias came down with some elders and a lawyer named Tertullus, who presented to the governor their case against Paul.
2 ULB जेव्हा पौल शासकासमोर उभा राहिला तेव्हा तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवून म्हणाला, “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हास फार शांतता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे या राष्ट्रात सुधारणा होत आहेत. BSB BSB: When Paul had been called in, Tertullus opened the prosecution: “Because of you, we have enjoyed a lasting peace, and your foresight has brought improvements to this nation.
3 ULB म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो. BSB BSB: In every way and everywhere, most excellent Felix, we acknowledge this with all gratitude.
4 ULB तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे. BSB BSB: But in order not to delay you any further, I beg your indulgence to hear us briefly.
5 ULB हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकात हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे. BSB BSB: We have found this man to be a pestilence, stirring up dissension among the Jews all over the world. He is a ringleader of the sect of the Nazarenes,
6 ULB ह्याने परमेश्वराचे भवनही विटाळण्याचा प्रयत्न केला; त्यास आम्ही धरले; व आमच्या नियमाशास्त्राप्रमाणे याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो. BSB BSB: and he even tried to desecrate the temple; so we seized him.
7 ULB पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून काढून नेले. BSB BSB: Not in the BSB
8 ULB आणि याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.” BSB BSB: By examining him yourself, you will be able to learn the truth about all our charges against him.”
9 ULB तेव्हा या सर्व गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून दुसऱ्या यहूद्यांनी हि दुजोरा दिला. BSB BSB: The Jews concurred, asserting that these charges were true.
10 ULB मग सुभेदाराने बोलण्यास खुणविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षापासून या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो. BSB BSB: When the governor motioned for Paul to speak, he began his response: “Knowing that you have been a judge over this nation for many years, I gladly make my defense.
11 ULB आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरुशलेम शहरात उपासना करायला जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत. BSB BSB: You can verify for yourself that no more than twelve days ago I went up to Jerusalem to worship.
12 ULB आणि परमेश्वराच्या भवनात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करतांना किंवा बंडाळी माजवतांना मी त्यांना आढळलो नाही. BSB BSB: Yet my accusers did not find me debating with anyone in the temple or riling up a crowd in the synagogues or in the city.
13 ULB ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबीत करता येत नाहीत. BSB BSB: Nor can they prove to you any of their charges against me.
14 ULB तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो. BSB BSB: I do confess to you, however, that I worship the God of our fathers according to the Way, which they call a sect. I believe everything that is laid down by the Law and written in the Prophets,
15 ULB आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. BSB BSB: and I have the same hope in God that they themselves cherish, that there will be a resurrection of both the righteous and the wicked.
16 ULB ह्यामुळे देवासंबंधाने व मनुष्यांसंबंधाने माझा विवेकभाव सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो. BSB BSB: In this hope, I strive always to maintain a clear conscience before God and man.
17 ULB मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांस दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो. BSB BSB: After several years, then, I returned to Jerusalem to bring alms to my people and to present offerings.
18 ULB शुद्धीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा परमेश्वराच्या भवनात आढळलो, माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते. BSB BSB: At the time they found me in the temple, I was ceremonially clean and was not inciting a crowd or an uproar. But there are some Jews from the province of Asia
19 ULB त्यांचे माझ्याविरूद्ध काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता. BSB BSB: who ought to appear before you and bring charges, if they have anything against me.
20 ULB किंवा मी न्यायसभेपूढे उभा राहीलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे; BSB BSB: Otherwise, let these men state for themselves any crime they found in me when I stood before the Sanhedrin,
21 ULB ह्यांच्यामध्ये उभे राहून, मरण पावलेल्यांचा पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा उद्गार अपराध असला तर असेल.” BSB BSB: unless it was this one thing I called out as I stood in their presence: ‘It is concerning the resurrection of the dead that I am on trial before you today.’”
22 ULB फेलिक्सास त्या मार्गाची चांगली माहीती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसीयाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.” BSB BSB: Then Felix, who was well informed about the Way, adjourned the hearing and said, “When Lysias the commander comes, I will decide your case.”
23 ULB आणि त्याने शताधिपतीला हुकुम केला की, ह्याला पहाऱ्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना याची सेवा करण्यास मनाई नसावी. BSB BSB: He ordered the centurion to keep Paul under guard, but to allow him some freedom and permit his friends to minister to his needs.
24 ULB मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. BSB BSB: After several days, Felix returned with his wife Drusilla, who was a Jewess. He sent for Paul and listened to him speak about faith in Christ Jesus.
25 ULB तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.” BSB BSB: As Paul expounded on righteousness, self-control, and the coming judgment, Felix became frightened and said, “You may go for now. When I find the time, I will call for you.”
26 ULB आणखी आपणास पौलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे. BSB BSB: At the same time, he was hoping that Paul would offer him a bribe. So he sent for Paul frequently and talked with him.
27 ULB पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला. BSB BSB: After two years had passed, Felix was succeeded by Porcius Festus. And wishing to do the Jews a favor, Felix left Paul in prison.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.