1 ULB स्तेफनाचा जो खून झाला त्यास शौलाची संमति होती. त्या दिवसापासून यरुशलेम शहर; येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला, प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वास ठेवणारे शिष्य यहूदीया व शोमरोन प्रांताच्या, कानाकोपऱ्यात पांगून गेले. BSB BSB: And Saul was there, giving approval to Stephen’s death. On that day a great persecution broke out against the church in Jerusalem, and all except the apostles were scattered throughout Judea and Samaria.
2 ULB काही धार्मिक मनुष्यांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. BSB BSB: God-fearing men buried Stephen and mourned deeply over him.
3 ULB शौलाने ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली; तो घरोघर जाई विश्वास ठेवणारे पुरूष व स्त्रिया यांना धरून खेचून नेई, व तुरुंगात टाकीत असे. BSB BSB: But Saul began to destroy the church. Going from house to house, he dragged off men and women and put them in prison.
4 ULB विश्वास ठेवणारे सगळीकडे पांगले होते जेथे कोठे विश्वास ठेवणारे जात तेथे ते लोकांस सुवार्ता सांगत. BSB BSB: Those who had been scattered preached the word wherever they went.
5 ULB फिलिप्प शोमरोन प्रांतातील एका शहरात गेला, त्याने ख्रिस्ताची घोषणा केली तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले, व त्याने केलेले चमत्कार पाहिले. BSB BSB: Philip went down to a city in Samaria and proclaimed the Christ to them.
6 ULB फिलिप्प जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे, ते ती लक्षपूर्वक ऐकत असत. BSB BSB: The crowds all paid close attention to Philip’s message and to the signs they saw him perform.
7 ULB कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले. BSB BSB: With loud shrieks, unclean spirits came out of many who were possessed, and many of the paralyzed and lame were healed.
8 ULB यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले. BSB BSB: So there was great joy in that city.
9 ULB शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता, तो जादूचे प्रयोग करीत असे; त्याच्या प्रयोगामुळे शोमरोन प्रांतातील लोक आश्चर्यचकित होत असत, तो स्वतःला फार मोठा समजत असे. BSB BSB: Prior to that time, a man named Simon had practiced sorcery in the city and astounded the people of Samaria. He claimed to be someone great,
10 ULB अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत, ते म्हणत असत, “देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे.” BSB BSB: and all the people, from the least to the greatest, heeded his words and said, “This man is the divine power called the Great Power.”
11 ULB त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांस चकीत केले, असल्याने लोक त्याचे ऐकत असत. BSB BSB: They paid close attention to him because he had astounded them for a long time with his sorcery.
12 ULB परंतु जेव्हा देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी फिलिप्पाने त्या लोकांस सुवार्ता सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचवेळी त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांच्यात जसे पुरूष होते तशा स्त्रियाही होत्या. BSB BSB: But when they believed Philip as he preached the gospel of the kingdom of God and the name of Jesus Christ, they were baptized, both men and women.
13 ULB स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला: आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर, तो फिलिप्पबरोबर राहू लागला; आणि झालेले चमत्कार आणि अद्भूत चिन्हे पाहून, शिमोन आश्चर्याने थक्क झाला. BSB BSB: Even Simon himself believed and was baptized. He followed Philip closely and was astounded by the great signs and miracles he observed.
14 ULB यरुशलेम शहरामधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठवले. BSB BSB: When the apostles in Jerusalem heard that Samaria had received the word of God, they sent Peter and John to them.
15 ULB पेत्र व योहान जेव्हा आले, तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून, प्रार्थना केली. BSB BSB: On their arrival, they prayed for them to receive the Holy Spirit.
16 ULB या लोकांचा प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. BSB BSB: For the Holy Spirit had not yet fallen upon any of them; they had simply been baptized into the name of the Lord Jesus.
17 ULB मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. BSB BSB: Then Peter and John laid their hands on them, and they received the Holy Spirit.
18 ULB शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांस पवित्र आत्मा मिळाला तेव्हा शिमोनाने प्रेषितांना पैसे देऊ करून म्हटले. BSB BSB: When Simon saw that the Spirit was given through the laying on of the apostles’ hands, he offered them money.
19 ULB “मी ज्याच्यावर हात ठेवीन त्यास पवित्र आत्मा मिळेल, असा अधिकार मलासुद्धा द्या.” BSB BSB: “Give me this power as well,” he said, “so that everyone on whom I lay my hands may receive the Holy Spirit.”
20 ULB पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो; कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केला.” BSB BSB: But Peter replied, “May your silver perish with you, because you thought you could buy the gift of God with money!
21 ULB या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही. BSB BSB: You have no part or share in our ministry, because your heart is not right before God.
22 ULB तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्यासाठी पश्चात्ताप कर, प्रभूला प्रार्थना कर, कदाचित तुइया अंतःकरणातील कल्पनेची तो तुला क्षमा करील. BSB BSB: Repent, therefore, of your wickedness, and pray to the Lord. Perhaps He will forgive you for the intent of your heart.
23 ULB कारण तुझ्या मनात कटू मत्सर भरलेला आहे व तू पापाच्या बंधनात आहेस, हे मला दिसून आले आहे. BSB BSB: For I see that you are poisoned by bitterness and captive to iniquity.”
24 ULB शिमोनाने उत्तर दिले, तुम्ही सांगितले त्यातले काही माझ्यावर येऊ नये म्हणून तुम्हीच प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना करा. BSB BSB: Then Simon answered, “Pray to the Lord for me, so that nothing you have said may happen to me.”
25 ULB नंतर पेत्र व योहान ह्यांनी आपली साक्ष लोकांस देऊन, “प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेम शहरास परत आले, परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली.” BSB BSB: And after Peter and John had testified and spoken the word of the Lord, they returned to Jerusalem, preaching the gospel in many of the Samaritan villages.
27 ULB मग तो उठला. व गेला, रस्त्यात त्यास एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता, तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता, तो यरुशलेम शहरास उपासना करण्यासाठी गेला होता. BSB BSB: So he started out, and on his way he met an Ethiopian eunuch, a court official in charge of the entire treasury of Candace, queen of the Ethiopians. He had gone to Jerusalem to worship,
28 ULB आता तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्टयाचा ग्रंथ वाचत होता. BSB BSB: and on his return was sitting in his chariot reading Isaiah the prophet.
29 ULB पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा.” BSB BSB: The Spirit said to Philip, “Go over to that chariot and stay by it.”
31 ULB तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे, समजेल कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे?” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलावले. BSB BSB: “How can I,” he said, “unless someone guides me?” And he invited Philip to come up and sit with him.
33 ULB त्यास लज्जित केले गेले त्याच्या लीन अवस्थेत त्यास न्याय मिळाला नाही: त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.” BSB BSB: In His humiliation He was deprived of justice. Who can recount His descendants? For His life was removed from the earth.”
34 ULB तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “कृपाकरून मला सांगा, हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे, की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे?” BSB BSB: “Tell me,” said the eunuch, “who is the prophet talking about, himself or someone else?”
35 ULB मग फिलिप्पाने तोंड उघडले; व शास्त्रलेखातील यशया संदेष्ट्याच्या भागापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्यास सांगितली. BSB BSB: Then Philip began with this very Scripture and told him the good news about Jesus.
36 ULB ते दोघे प्रवास करीत असताना, एका तळ्याजवळ आले; तेव्हा अधिकारी म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे; माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” BSB BSB: As they traveled along the road and came to some water, the eunuch said, “Look, here is water! What is there to prevent me from being baptized?”
37 ULB फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे, त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो. BSB BSB: Not in the BSB
38 ULB आणि षंढाने रथ थांबविण्याची आज्ञा केली, नंतर फिलिप्प व षंढ हे दोघे उतरून पाण्यात गेले, आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला. BSB BSB: And he gave orders to stop the chariot. Then both Philip and the eunuch went down into the water, and Philip baptized him.
39 ULB ते जेव्हा पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले; आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही, पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. BSB BSB: When they came up out of the water, the Spirit of the Lord carried Philip away, and the eunuch saw him no more, but went on his way rejoicing.
40 ULB आपण अजोत नगरात आहोत. असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली, नंतर तो कैसरीया शहरास गेला. BSB BSB: But Philip appeared at Azotus and traveled through that region, preaching the gospel in all the towns until he came to Caesarea.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.