2 ULB तो म्हणाला: सीयोनांतून परमेश्वर गर्जना करेल, तो यरुशलेमेतून आपला शब्द उच्चारील. मेंढपाळांची कुरणे शोक करतील, आणि कर्मेलाचा माथा वाळून जाईल. BSB BSB: He said: “The LORD roars from Zion and raises His voice from Jerusalem; the pastures of the shepherds mourn, and the summit of Carmel withers.”
3 ULB परमेश्वर असे म्हणतो, “कारण दिमिष्काच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शासन करण्यापासून माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी गिलादला मळण्याच्या लोखंडी अवजाराने मळले आहे. BSB BSB: This is what the LORD says: “For three transgressions of Damascus, even four, I will not revoke My judgment, because they threshed Gilead with sledges of iron.
4 ULB मी हजाएलच्या घरात अग्नी पाठवीन; आणि तो अग्नी बेन-हदादच्या राजवाड्यांना गिळून टाकीन. BSB BSB: So I will send fire upon the house of Hazael to consume the citadels of Ben-hadad.
5 ULB मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकीन, आणि बेथ-एदेनाच्या घरातून राजदंड धरणारा व आवेनाच्या खोऱ्यात राहणारा राजा यांचा पराभव करीन. आणि अरामी लोक कीर येथे पाडवपणांत जातील.” असे परमेश्वर म्हणतो. BSB BSB: I will break down the gates of Damascus; I will cut off the ruler from the Valley of Aven and the one who wields the scepter in Beth-eden. The people of Aram will be exiled to Kir,” says the LORD.
6 ULB आणि परमेश्वर असे म्हणतो, “गज्जाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, त्यांना शिक्षा करण्यापासून मी माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी संपूर्ण लोकांस गुलाम म्हणून नेले, ह्यासाठी की त्यांना अदोम्यांच्या हाती द्यावे. BSB BSB: This is what the LORD says: “For three transgressions of Gaza, even four, I will not revoke My judgment, because they exiled a whole population, delivering them up to Edom.
7 ULB म्हणून मी गज्जाच्या भिंतींवर अग्नी पाठवीन. आणि हा अग्नी त्याचे किल्ले नष्ट करील. BSB BSB: So I will send fire upon the walls of Gaza, to consume its citadels.
8 ULB मी अश्दोदमध्ये राहणाऱ्या मनुष्यास आणि अष्कलोनात राजदंड धरणाऱ्या मनुष्यास नष्ट करीन. एक्रोनाच्या विरुद्ध मी माझा हात चालवीन. आणि पलिष्ट्यांचे उरलेले लोक मरतील.” असे परमेश्वर देव म्हणतो. BSB BSB: I will cut off the ruler of Ashdod and the one who wields the scepter in Ashkelon. I will turn My hand against Ekron, and the remnant of the Philistines will perish,” says the Lord GOD.
9 ULB परमेश्वर असे म्हणतो, “सोराच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी संपूर्ण लोकांस अदोम्यांच्या हाती दिले आणि त्यांच्या भावांबरोबर केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही. BSB BSB: This is what the LORD says: “For three transgressions of Tyre, even four, I will not revoke My judgment, because they delivered up a whole congregation of exiles to Edom and broke a covenant of brotherhood.
10 ULB म्हणून सोराच्या तटबंदीवर मी अग्नी पाठवीन आणि तो त्यांचे किल्ले नष्ट करील.” BSB BSB: So I will send fire upon the walls of Tyre to consume its citadels.”
11 ULB परमेश्वर असे म्हणतो, “अदोमाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून फिरणार नाही. कारण अदोमाने तलवार घेऊन त्याच्या भावाचा पाठलाग केला. आणि त्याने सर्व दयाशीलपणा काढून टाकला. त्याचा क्रोध कायम राहिला, आणि त्याने आपला राग सतत बाळगला. BSB BSB: This is what the LORD says: “For three transgressions of Edom, even four, I will not revoke My judgment, because he pursued his brother with the sword and stifled all compassion; his anger raged continually, and his fury flamed incessantly.
12 ULB म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन, ती बस्राचे राजवाडे खाऊन टाकील.” BSB BSB: So I will send fire upon Teman to consume the citadels of Bozrah.”
13 ULB परमेश्वर असे म्हणतो, “अम्मोनांच्या संतानाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी शिक्षा करण्यापासून फिरणार नाही. कारण त्यांनी गिलादामध्ये गर्भवतींना फाडून टाकले, ह्यासाठी की आपल्या देशाचा सीमांचा विस्तार करावा. BSB BSB: This is what the LORD says: “For three transgressions of the Ammonites, even four, I will not revoke My judgment, because they ripped open the pregnant women of Gilead in order to enlarge their territory.
14 ULB म्हणून मी राब्बाच्या तटबंदीला आग लावीन, त्यांच्यावर युध्दाच्या दिवशी आरडाओरड होत असतांना, आणि वावटळीच्या दिवशी वादळाने, ती त्याचे महाल खाऊन टाकील. BSB BSB: So I will kindle a fire in the walls of Rabbah to consume its citadels amid war cries on the day of battle and a violent wind on the day of tempest.
15 ULB आणि त्यांचा राजा व त्याच्याबरोबर त्याचे सरदार एकत्र बंदीवान होतील.” असे परमेश्वर म्हणतो. BSB BSB: Their king will go into exile—he and his princes together,” says the LORD.