1 ULB पारसाचा राजा कोरेश हयाच्या तिसऱ्या वर्षी दानीएल (ज्याला बेल्टशस्सर हे नाव होते) यास संदेश प्राप्त झाला जो सत्य होता, म्हणजे तो एक मोठ्या युध्दाविषयी होता. दानीएलास तो दृष्टांत व त्या दृष्टांताचा समज प्राप्त झाला. BSB BSB: In the third year of Cyrus king of Persia, a message was revealed to Daniel, who was called Belteshazzar. The message was true, and it concerned a great conflict. And the understanding of the message was given to him in a vision.
2 ULB त्या दिवसात मी दानीएल, तीन आठवडे शोक करत होतो. BSB BSB: In those days I, Daniel, was mourning for three full weeks.
3 ULB ते तिन आठवडे संपेपर्यंत मी पक्वान्न खाल्ले नाही मी द्राक्षारस प्यालो, नाही माझ्या डोक्याला तेल लावले नाही. BSB BSB: I ate no rich food, no meat or wine entered my mouth, and I did not anoint myself with oil until the three weeks were completed.
4 ULB पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी मी महानदीच्या काठावर होतो. BSB BSB: On the twenty-fourth day of the first month, as I was standing on the bank of the great river, the Tigris,
5 ULB मी डोळे वर करून पाहिले तर मला तागाची वस्त्रे घातलेला आणि कंबरेत उफाज देशाच्या शुध्द सोन्याचा पट्टा घातलेला एक पुरुष दिसला. BSB BSB: I lifted up my eyes, and behold, there was a certain man dressed in linen, with a belt of fine gold from Uphaz around his waist.
6 ULB त्याचे शरीर रत्नासारखे असून त्याचा चेहरा विजेसारखा होता, त्याचे डोळे जळणाऱ्या मशालीसारखे असून त्याचे बाहू आणि पाय उजळ पितळेसारखे होते आणि त्याचा शब्दाचा आवाज मोठ्या समुदायाच्या आवाजासारखा होता. BSB BSB: His body was like beryl, his face like the brilliance of lightning, his eyes like flaming torches, his arms and legs like the gleam of polished bronze, and his voice like the sound of a multitude.
7 ULB मी दानीएल एकट्याने हा दृष्टांत पाहिला माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांनी काही पाहिले नाही तरीही त्यांना मोठी भिती वाटली आणि लपण्यासाठी तेथून ते पळून गेले. BSB BSB: Only I, Daniel, saw the vision; the men with me did not see it, but a great terror fell upon them, and they ran and hid themselves.
8 ULB मग मी एकटाच राहिलो आणि तो मोठा दृष्टांत मी पाहिला. माझ्यात बळ उरले नाही. माझा चेहरा भितीने बदलून गेला आणि माझ्यात बळ राहीले नाही. BSB BSB: So I was left alone, gazing at this great vision. No strength remained in me; my face grew deathly pale, and I was powerless.
9 ULB मग मी त्याची वाणी एकेली आणि ती ऐकत असता पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली. BSB BSB: I heard the sound of his words, and as I listened, I fell into a deep sleep, with my face to the ground.
10 ULB एका हाताने मला स्पर्श केला आणि माझे गुडगे आणि तळहात थरथरु लागले. BSB BSB: Suddenly, a hand touched me and set me trembling on my hands and knees.
11 ULB तो दूत मला म्हणाला, “दानीएला परमप्रिय पुरुषा मी जे सांगतो ते मन लावून समजून घे; आणि स्थिर रहा, तुला हे सांगण्यासाठी मला पाठवले आहे,” जेव्हा तो हे शब्द बोलला मी थरथरत उभा राहिलो. BSB BSB: He said to me, “Daniel, you are a man who is highly precious. Consider carefully the words that I am about to say to you. Stand up, for I have now been sent to you.” And when he had said this to me, I stood up trembling.
12 ULB तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानीएला, भिऊ नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले, आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे. BSB BSB: “Do not be afraid, Daniel,” he said, “for from the first day that you purposed to understand and to humble yourself before your God, your words were heard, and I have come in response to them.
13 ULB परंतु पारसाच्या राज्याच्या एका अधिपतीने एकवीस दिवस मला आवरिले; आणि पाहा, मीखाएल, मुख्य अधिपतींपैकी एक, माझे साहाय्य करायला आला; मग मी तेथे पारसाच्या राजांजवळ राहिलो. BSB BSB: However, the prince of the kingdom of Persia opposed me for twenty-one days. Then Michael, one of the chief princes, came to help me, for I had been left there with the kings of Persia.
14 ULB आता मी तुला हे समजविण्यास आलो आहे की, शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचे काय होणार कारण हा दृष्टांत पूर्ण होण्यास बराच वेळ आहे. BSB BSB: Now I have come to explain to you what will happen to your people in the latter days, for the vision concerns those days.”
15 ULB जेव्हा तो हे शब्द बोलून थांबला; मी माझे मुख जमिनीकडे लावले आणि मी त्यावेळी बोलू शकलो नाही. BSB BSB: While he was speaking these words to me, I set my face toward the ground and became speechless.
16 ULB तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने माझ्या ओठास स्पर्श केला व मी माझे तोंड उघडले आणि जो माझ्यापुढे उभा होता त्याच्याशी मी बोललो, “हे प्रभू या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले आहे आणि माझ्यात बळ राहीले नाही. BSB BSB: And suddenly one with the likeness of a man touched my lips, and I opened my mouth and said to the one standing before me, “My lord, because of the vision, I am overcome with anguish, and I have no strength.
17 ULB मी तुझा दास आहे मी आपल्या स्वामीबरोबर कसा बोलू? कारण माझ्यात बळ आणि दम उरला नाही.” BSB BSB: How can I, your servant, speak with you, my lord? Now I have no strength, nor is any breath left in me.”
18 ULB तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने मला स्पर्श करून मला बळ दिले. BSB BSB: Again the one with the likeness of a man touched me and strengthened me.
19 ULB तो म्हणाला, “हे परमप्रिय मानवा घाबरू नकोस, तुला शांती असो हिंमत धर. आता, नेट धर!” तो जेव्हा हे बोलला तेव्हा मला बळ मिळाले आहे व मी म्हणालो, “माझ्या स्वामीने आता बोलावे, कारण तू मला सबळ केले आहे.” BSB BSB: “Do not be afraid, you who are highly precious,” he said. “Peace be with you! Be strong now; be very strong!” As he spoke with me, I was strengthened and said, “Speak, my lord, for you have strengthened me.”
20 ULB तो म्हणाला, मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? आता मी परत जाऊन पारसाच्या अधिपतीबरोबर लढणार, मी गेलो म्हणजे ग्रिसचा अधिपती येईल. BSB BSB: “Do you know why I have come to you?” he said. “I must return at once to fight against the prince of Persia, and when I have gone forth, behold, the prince of Greece will come.
21 ULB परंतु जे सत्याच्या लेखांत लिहिले आहे ते मी तुला प्रगट करतो; आणि त्यांच्याविरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मीखाएल याच्यावाचून माझ्याबरोबर कोणी नाही. BSB BSB: But first I will tell you what is inscribed in the Book of Truth. Yet no one has the courage to support me against these, except Michael your prince.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.