1 ULB एखाद्याला लग्नानंतर आपल्या पत्नीच्या संबंधाने एखादी अयोग्य गोष्ट कळली व ती त्यास आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा; मग तिला घराबाहेर काढावे. BSB BSB: If a man marries a woman, but she becomes displeasing to him because he finds some indecency in her, he may write her a certificate of divorce, hand it to her, and send her away from his house.
2 ULB त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरा पती करावा. BSB BSB: If, after leaving his house, she goes and becomes another man’s wife,
3 ULB त्यातून समजा असे झाले की या पतीचीही तिच्यावर इतराजी झाली आणि त्याने तिला घटस्फोट लिहून दिला तर मात्र त्याने तिला सोडल्यावर पुन्हा पहिल्या पतीने तिच्याशी लग्न करु नये. किंवा हा दुसरा पती मरण पावला तर पहिल्या नवऱ्याने पुन्हा तिच्याशी लग्न करु नये. BSB BSB: and the second man hates her, writes her a certificate of divorce, hands it to her, and sends her away from his house, or if he dies,
4 ULB कारण ती आता भ्रष्ट झालेली आहे. तिच्याशी पहिल्या नवऱ्याने पुन्हा लग्न करणे या गोष्टीचा तुमचा देव परमेश्वर ह्याला विट आहे. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या प्रदेशात असे पाप करु नका. BSB BSB: then the husband who divorced her first may not remarry her after she has been defiled, for that is an abomination to the LORD. You must not bring sin upon the land that the LORD your God is giving you as an inheritance.
5 ULB एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्यास सैन्यात मोहिमेवर पाठवू नये. तसेच त्याच्यावर विशेष कामगिरी सोपवू नये. नववधूला सुखी ठेवण्यासाठी वर्षभर घरीच राहण्याची मोकळीक त्यास द्यावी. BSB BSB: If a man is newly married, he must not be sent to war or be pressed into any duty. For one year he is free to stay at home and bring joy to the wife he has married.
6 ULB कोणाला काही उसने दिल्यास त्याबद्दल जाते किंवा जात्याची तळी गाहाण म्हणून ठेवून घेऊ नये, नाहीतर त्याचा जीवच गहाण ठेवून घेतल्यासारखे होईल. BSB BSB: Do not take a pair of millstones or even an upper millstone as security for a debt, because that would be taking one’s livelihood as security.
7 ULB कोणी आपल्या इस्राएली बांधवाचे अपहरण केले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या मनुष्यास ठार करावे व आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे. BSB BSB: If a man is caught kidnapping one of his Israelite brothers, whether he treats him as a slave or sells him, the kidnapper must die. So you must purge the evil from among you.
8 ULB कोणाला महारोग झाल्याचे आढळले तर लेवी याजकाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करा. माझ्या आज्ञेप्रमाणे याजक सांगतील ते ऐका. BSB BSB: In cases of infectious skin diseases, be careful to diligently follow everything the Levitical priests instruct you. Be careful to do as I have commanded them.
9 ULB मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या. BSB BSB: Remember what the LORD your God did to Miriam on the journey after you came out of Egypt.
10 ULB तुम्ही आपल्या शेजाऱ्याला कोणत्याही प्रकारचे कर्ज द्याल तेव्हा तारण मिळवायला त्याच्या घरात शिरू नका. BSB BSB: When you lend anything to your neighbor, do not enter his house to collect security.
11 ULB बाहेरच थांबा. मग ज्याला तुम्ही कर्ज दिले आहे तो आत जाऊन गहाण ठेवण्याची वस्तू घेऊन येईल. BSB BSB: You are to stand outside while the man to whom you are lending brings the security out to you.
13 ULB त्यास रोजच्या रोज संध्याकाळ झाली की देत जा म्हणजे त्यास पुरेसे अंथरुन पांघरुण मिळेल. त्याबद्दल तो तुम्हास आशीर्वाद देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुमचे वागणे न्यायीपणाचे व उचित होय. BSB BSB: be sure to return it to him by sunset, so that he may sleep in his own cloak and bless you, and this will be credited to you as righteousness before the LORD your God.
14 ULB तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो. BSB BSB: Do not oppress a hired hand who is poor and needy, whether he is a brother or a foreigner residing in one of your towns.
15 ULB त्यास रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल. BSB BSB: You are to pay his wages each day before sunset, because he is poor and depends on them. Otherwise he may cry out to the LORD against you, and you will be guilty of sin.
16 ULB मुलांच्या वागणुकीची शिक्षा म्हणून आई-वडीलांना देहान्तशासन होऊ नये. तसेच आई-वडीलांच्या दुष्कृत्याची सजा म्हणून मुलांना ठार करु नये. ज्याच्या त्याच्या दुष्कृत्याची सजा ज्याला त्यास मिळावी. BSB BSB: Fathers shall not be put to death for their children, nor children for their fathers; each is to die for his own sin.
17 ULB गावातील परकीय आणि अनाथ यांना उचित वागणूक मिळावी. विधवेचा कपडालत्ता गहाण ठेवून घेऊ नये. BSB BSB: Do not deny justice to the foreigner or the fatherless, and do not take a widow’s cloak as security.
18 ULB मिसरमध्ये तुम्ही गरीब गुलाम होतात आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास तेथून सोडवून मुक्त केले हे लक्षात ठेवा. दीन दुबळ्यांशी असे वागा हे मी एवढ्यासाठी तुम्हास सांगत आहे. BSB BSB: Remember that you were slaves in Egypt, and the LORD your God redeemed you from that place. Therefore I am commanding you to do this.
19 ULB शेतातील पीक कापताना एखादी पेंढी तिथेच राहिली तर ती आणायला परत जाऊ नका. अनाथ, उपरे विधवा ह्याच्यासाठी ती राहू द्या. त्यांना थोडे धान्य मिळाले तर तुम्हास तुमच्या प्रत्येक कार्यात तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल. BSB BSB: If you are harvesting in your field and forget a sheaf there, do not go back to get it. It is to be left for the foreigner, the fatherless, and the widow, so that the LORD your God may bless you in all the work of your hands.
20 ULB जैतून वृक्षांच्या फळांसाठी झाडणी कराल तेव्हा डहाळ्यांमध्ये कुठे फळे राहिली आहेत का हे पुन्हा शोधू नको. ती अनाथ, परके, विधवा यांच्यासाठी राहू दे. BSB BSB: When you beat the olives from your trees, you must not go over the branches again. What remains will be for the foreigner, the fatherless, and the widow.
21 ULB द्राक्षमळ्यातून द्राक्षे खुडताना उरली तर ती द्राक्षे पुन्हा तोडू नको ती अनाथ, परके, व विधवा त्यांच्यासाठीच राहू दे. BSB BSB: When you gather the grapes of your vineyard, you must not go over the vines again. What remains will be for the foreigner, the fatherless, and the widow.
22 ULB तुम्हीही मिसरमध्ये गरीब गुलाम होता म्हणून मी तुम्हास हे करायला सांगत आहे. त्याची आठवण ठेवा आणि गरिबांसाठी एवढे करा. BSB BSB: Remember that you were slaves in the land of Egypt. Therefore I am commanding you to do this.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.