1 ULB मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे. BSB BSB: Children, obey your parents in the Lord, for this is right.
2 ULB “आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. BSB BSB: “Honor your father and mother” (which is the first commandment with a promise),
4 ULB आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा. BSB BSB: Fathers, do not provoke your children to wrath; instead, bring them up in the discipline and instruction of the Lord.
5 ULB दासांनो, तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने जशी ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पूर्ण आदराने व थरथर कांपत जे देहानुसार पृथ्वीवरील मालकांशी आज्ञाधारक असा. BSB BSB: Slaves, obey your earthly masters with respect and fear and sincerity of heart, just as you would obey Christ.
6 ULB मनुष्यास संतोषवणाऱ्या सारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर मनापासून, देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे आज्ञांकित असा, BSB BSB: And do this not only to please them while they are watching, but as servants of Christ, doing the will of God from your heart.
7 ULB ही सेवा मनुष्याची नाही तर प्रभूची सेवा आहे अशी मानून ती आनंदाने करा, BSB BSB: Serve with good will, as to the Lord and not to men,
8 ULB प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो, तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्यास प्रतिफळ प्राप्त होईल. BSB BSB: because you know that the Lord will reward each one for whatever good he does, whether he is slave or free.
10 ULB शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा. BSB BSB: Finally, be strong in the Lord and in His mighty power.
11 ULB सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. BSB BSB: Put on the full armor of God, so that you can make your stand against the devil’s schemes.
12 ULB कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे. BSB BSB: For our struggle is not against flesh and blood, but against the rulers, against the authorities, against the powers of this world’s darkness, and against the spiritual forces of evil in the heavenly realms.
13 ULB या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हास सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल BSB BSB: Therefore take up the full armor of God, so that when the day of evil comes, you will be able to stand your ground, and having done everything, to stand.
14 ULB तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा. BSB BSB: Stand firm then, with the belt of truth buckled around your waist, with the breastplate of righteousness arrayed,
15 ULB शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला. BSB BSB: and with your feet fitted with the readiness of the gospel of peace.
16 ULB नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या, जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा. BSB BSB: In addition to all this, take up the shield of faith, with which you can extinguish all the flaming arrows of the evil one.
17 ULB आणि तारणाचे शिरस्राण व आत्म्याची तलवार, जी देवाच वचन आहे, ती घ्या, BSB BSB: And take the helmet of salvation and the sword of the Spirit, which is the word of God.
18 ULB प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पहा व सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा. BSB BSB: Pray in the Spirit at all times, with every kind of prayer and petition. To this end, stay alert with all perseverance in your prayers for all the saints.
19 ULB आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे, BSB BSB: Pray also for me, that whenever I open my mouth, words may be given me so that I will boldly make known the mystery of the gospel,
20 ULB मी, त्यासाठीच बेड्यांत पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे. BSB BSB: for which I am an ambassador in chains. Pray that I may proclaim it fearlessly, as I should.
21 ULB पण माझ्याविषयी, म्हणजे मी काम करीत आहे ते तुम्हास समजावे म्हणून, प्रिय बंधू आणि प्रभूमधील विश्वासू सेवक तुखिक या सर्व गोष्टी तुम्हास कळवील. BSB BSB: Tychicus, the beloved brother and faithful servant in the Lord, will tell you everything, so that you also may know about me and what I am doing.
22 ULB मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे; म्हणजे तुम्हास माझ्याविषयी कळावे आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे. BSB BSB: I have sent him to you for this very purpose, that you may know about us, and that he may encourage your hearts.
23 ULB देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो. BSB BSB: Peace to the brothers and love with faith from God the Father and the Lord Jesus Christ.
24 ULB जे सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो. BSB BSB: Grace to all who love our Lord Jesus Christ with an undying love.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.