1 ULB त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: एक गोऱ्हा व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत; BSB BSB: “Now this is what you are to do to consecrate Aaron and his sons to serve Me as priests: Take a young bull and two rams without blemish,
2 ULB बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या व तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; या सर्व सपिठाच्या असाव्यात. BSB BSB: along with unleavened bread, unleavened cakes mixed with oil, and unleavened wafers anointed with oil. Make them out of fine wheat flour,
3 ULB त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याचप्रमाणे तो गोऱ्हा व ते दोन मेंढे ह्यांच्यासहीत ती टोपली घेऊन ये. BSB BSB: put them in a basket, and present them in the basket, along with the bull and the two rams.
4 ULB अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी; BSB BSB: Then present Aaron and his sons at the entrance to the Tent of Meeting and wash them with water.
5 ULB ती वस्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल; त्यास एफोद व ऊरपट बांधावा आणि एफोदाचा बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध; BSB BSB: Take the garments and clothe Aaron with the tunic, the robe of the ephod, the ephod itself, and the breastplate. Fasten the ephod on him with its woven waistband.
6 ULB त्याच्या डोक्याला मंदिल घाल. आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव. BSB BSB: Put the turban on his head and attach the holy diadem to the turban.
7 ULB नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्यास अभिषेक कर; BSB BSB: Then take the anointing oil and anoint him by pouring it on his head.
8 ULB मग त्याच्या पुत्रांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घालावेत; BSB BSB: Present his sons as well and clothe them with tunics.
9 ULB आणि अहरोनाला व त्याच्या पुत्रांना कमरबंद बांध व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांचे याजकपद कायमचे राहील, ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले ह्यांच्यावर संस्कार करावेत BSB BSB: Wrap the sashes around Aaron and his sons and tie headbands on them. The priesthood shall be theirs by a permanent statute. In this way you are to ordain Aaron and his sons.
10 ULB नंतर तो गोऱ्हा दर्शनमंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत. BSB BSB: You are to present the bull at the front of the Tent of Meeting, and Aaron and his sons are to lay their hands on its head.
11 ULB मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा; BSB BSB: And you shall slaughter the bull before the LORD at the entrance to the Tent of Meeting.
12 ULB मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे. BSB BSB: Take some of the blood of the bull and put it on the horns of the altar with your finger; then pour out the rest of the blood at the base of the altar.
13 ULB मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्याचा वेदीवर होम करावा. BSB BSB: Take all the fat that covers the entrails and the lobe of the liver, and both kidneys with the fat on them, and burn them on the altar.
14 ULB पण गोऱ्ह्याचे मांस, कातडे व शेण ही छावणीबाहेर नेऊन आगीत जाळून टाकावी; हा पापार्पणाचा बली होय. BSB BSB: But burn the flesh of the bull and its hide and dung outside the camp; it is a sin offering.
15 ULB मग अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात एका मेंढ्याच्या डोक्यावर ठेवावेत; BSB BSB: Take one of the rams, and Aaron and his sons shall lay their hands on its head.
16 ULB आणि तो मेंढा वधावा; व त्याचे रक्त वेदीच्या चारही बाजूस टाकावे. BSB BSB: You are to slaughter the ram, take its blood, and splatter it on all sides of the altar.
17 ULB मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके यांच्यासह वेदीवर ठेवावेत; BSB BSB: Cut the ram into pieces, wash the entrails and legs, and place them with its head and other pieces.
18 ULB त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा. हे परमेश्वराकरता होमार्पण होय. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; BSB BSB: Then burn the entire ram on the altar; it is a burnt offering to the LORD, a pleasing aroma, a food offering to the LORD.
19 ULB नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत; BSB BSB: Take the second ram, and Aaron and his sons are to lay their hands on its head.
20 ULB मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळ्यांना व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या अंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूंना शिंपडावे. BSB BSB: Slaughter the ram, take some of its blood, and put it on the right earlobes of Aaron and his sons, on the thumbs of their right hands, and on the big toes of their right feet. Splatter the remaining blood on all sides of the altar.
21 ULB नंतर वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल यांतले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्रावर तसेच त्याच्या पुत्रावर व त्यांच्या वस्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्र आणि त्याच्याबरोबर त्याची मुले व त्यांची वस्रे पवित्र होतील. BSB BSB: And take some of the blood on the altar and some of the anointing oil and sprinkle it on Aaron and his garments, as well as on his sons and their garments. Then he and his garments will be consecrated, as well as his sons and their garments.
22 ULB तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, आणि त्याची चरबीदार शेपूट व त्याच्या आतड्यावरील चरबी व काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्याच्यावरील चरबी आणि उजवी मांडी ही घे; BSB BSB: Take the fat from the ram, the fat tail, the fat covering the entrails, the lobe of the liver, both kidneys with the fat on them, and the right thigh (since this is a ram for ordination),
23 ULB त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी व एक चपाती घ्यावी BSB BSB: along with one loaf of bread, one cake of bread made with oil, and one wafer from the basket of unleavened bread that is before the LORD.
24 ULB आणि ते सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातावर ठेव व हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ. BSB BSB: Put all these in the hands of Aaron and his sons and wave them before the LORD as a wave offering.
25 ULB मग त्या सर्व वस्तू त्यांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर सुवासिक मधुर सुगंध म्हणून वेदीवरील होमार्पणावर त्यांचा होम करावा; ते परमेश्वरास अर्पिलेले सुवासिक हव्य होय. BSB BSB: Then take them from their hands and burn them on the altar atop the burnt offering as a pleasing aroma before the LORD; it is a food offering to the LORD.
26 ULB मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण ते परमेश्वरासमोर ओवाळ, तो तुझा हिस्सा आहे. BSB BSB: Take the breast of the ram of Aaron’s ordination and wave it before the LORD as a wave offering, and it will be your portion.
27 ULB नंतर अहरोन व त्याचे पुत्र यांच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ओवाळलेले ऊर व समर्पिलेली मांडी तू पवित्र करावी. BSB BSB: Consecrate for Aaron and his sons the breast of the wave offering that is waved and the thigh of the heave offering that is lifted up from the ram of ordination.
28 ULB इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या पुत्रांचा हा निरंतरचा हक्क आहे. कारण हे समर्पित केलेले दान आहे. हे इस्राएलाकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराकरता समर्पित केलेले दान होय. BSB BSB: This will belong to Aaron and his sons as a regular portion from the Israelites, for it is the heave offering the Israelites will make to the LORD from their peace offerings.
29 ULB अहरोनाची पवित्र वस्रे त्याच्यानंतर त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावी, म्हणजे या वस्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा. BSB BSB: The holy garments that belong to Aaron will belong to his sons after him, so they can be anointed and ordained in them.
30 ULB अहरोनाच्या जागी त्याचा जो पुत्र याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपामध्ये जाताना ती वस्रे सात दिवस घालावीत. BSB BSB: The son who succeeds him as priest and enters the Tent of Meeting to minister in the Holy Place must wear them for seven days.
31 ULB समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे; BSB BSB: You are to take the ram of ordination and boil its flesh in a holy place.
32 ULB अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी; BSB BSB: At the entrance to the Tent of Meeting, Aaron and his sons are to eat the meat of the ram and the bread that is in the basket.
33 ULB त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यासाठी ज्या पदार्थांनी प्रायश्चित्त झाले ते पदार्थ त्यांनी खावे. पण कोणी परक्याने ते खाऊ नयेत. कारण ते पदार्थ पवित्र आहेत. BSB BSB: They must eat those things by which atonement was made for their ordination and consecration. But no outsider may eat them, because these things are sacred.
34 ULB समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे; BSB BSB: And if any of the meat of ordination or any bread is left until the morning, you are to burn up the remainder. It must not be eaten, because it is sacred.
35 ULB मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व गोष्टीप्रमाणे अहरोन व त्याचे पुत्र यांचे कर. सात दिवसपर्यंत त्यांच्यावर संस्कार कर. BSB BSB: This is what you are to do for Aaron and his sons based on all that I have commanded you, taking seven days to ordain them.
36 ULB प्रायश्चित्तासाठी पापबली म्हणून एक गोऱ्हा या प्रत्येक दिवशी बली दे. आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर. BSB BSB: Sacrifice a bull as a sin offering each day for atonement. Purify the altar by making atonement for it, and anoint it to consecrate it.
37 ULB सातही दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल, ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल. BSB BSB: For seven days you shall make atonement for the altar and consecrate it. Then the altar will become most holy; whatever touches the altar will be holy.
38 ULB वेदीवर होम करायचा तो असा: प्रतिदिनी एकएक वर्षाच्या दोन कोकरांचा नेहमी होम करावा. BSB BSB: This is what you are to offer regularly on the altar, each day: two lambs that are a year old.
39 ULB एका कोकराचा सकाळी व दुसऱ्या कोकराचा संध्याकाळी होम करावा. BSB BSB: Offer one lamb in the morning and the other at twilight.
40 ULB कुटून काढलेल्या पाव हिन तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे. BSB BSB: With the first lamb offer a tenth of an ephah of fine flour, mixed with a quarter hin of oil from pressed olives, and a drink offering of a quarter hin of wine.
41 ULB आणि संध्याकाळी दुसरे कोकरू अर्पावे व त्याच्याबरोबरही सकाळच्याप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पण करावे; हे परमेश्वरास प्रिय असे सुवासिक हव्य होय. BSB BSB: And offer the second lamb at twilight with the same grain offering and drink offering as in the morning, as a pleasing aroma, a food offering to the LORD.
42 ULB दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण करीत रहावे; या ठिकाणी मी तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्हास भेटेन. BSB BSB: For the generations to come, this burnt offering shall be made regularly at the entrance to the Tent of Meeting before the LORD, where I will meet you to speak with you.
43 ULB त्या ठिकाणी मी इस्राएल लोकांस भेटेन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल. BSB BSB: I will also meet with the Israelites there, and that place will be consecrated by My glory.
44 ULB “ह्याप्रमाणे मी दर्शनमंडप व वेदी पवित्र करीन आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून मी त्यांनाही पवित्र करीन. BSB BSB: So I will consecrate the Tent of Meeting and the altar, and I will consecrate Aaron and his sons to serve Me as priests.
45 ULB मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन. BSB BSB: Then I will dwell among the Israelites and be their God.
46 ULB आणि लोकांस समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.” BSB BSB: And they will know that I am the LORD their God, who brought them out of the land of Egypt so that I might dwell among them. I am the LORD their God.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.