1 ULB नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला BSB BSB: Then the LORD said to Moses,
2 ULB “पाहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे. BSB BSB: “See, I have called by name Bezalel son of Uri, the son of Hur, of the tribe of Judah.
3 ULB देवाच्या आत्म्याने त्यास परिपूर्ण भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्यास अक्कल, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत. BSB BSB: And I have filled him with the Spirit of God, with skill, ability, and knowledge in all kinds of craftsmanship,
4 ULB तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीचे काम करील. BSB BSB: to design artistic works in gold, silver, and bronze,
5 ULB तो रत्नांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकुसरीची कामे करील. BSB BSB: to cut gemstones for settings, and to carve wood, so that he may be a master of every craft.
6 ULB त्याच्याबरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाखाचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; एवढेच नव्हे तर जेवढे म्हणून बुध्दिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुध्दी ठेवली आहे. ती यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी तयार कराव्या. BSB BSB: Moreover, I have selected Oholiab son of Ahisamach, of the tribe of Dan, as his assistant. I have also given skill to all the craftsmen, that they may fashion all that I have commanded you:
7 ULB म्हणजे दर्शनमंडप, आज्ञापटाचा कोश, त्यावरील दयासन आणि तंबूच्या सर्व वस्तू; BSB BSB: the Tent of Meeting, the ark of the Testimony and the mercy seat upon it, and all the other furnishings of the tent—
8 ULB मेज व त्यावरील सर्व वस्तू, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष व त्याची उपकरणे; BSB BSB: the table with its utensils, the pure gold lampstand with all its utensils, the altar of incense,
9 ULB होमवेदी व तिची उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक; BSB BSB: the altar of burnt offering with all its utensils, and the basin with its stand—
10 ULB अहरोन व त्याच्या मुलांनी याजक या नात्याने माझी सेवा करताना घालावयाची, कुशलतेने विणलेली तलम व पवित्र वस्रे; BSB BSB: as well as the woven garments, both the holy garments for Aaron the priest and the garments for his sons to serve as priests,
11 ULB अभिषेकाचे सुवासिक तेल आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुंगधी द्रव्याचा धूप. या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागीर तयार करतील.” BSB BSB: in addition to the anointing oil and fragrant incense for the Holy Place. They are to make them according to all that I have commanded you.”
12 ULB नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, BSB BSB: And the LORD said to Moses,
13 ULB “इस्राएल लोकांस हे सांग की, तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत, कारण की पिढ्यानपिढ्या तुमच्यामाझ्यामध्ये ही खूण आहे. ह्यावरून हे कळावे की, तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. BSB BSB: “Tell the Israelites, ‘Surely you must keep My Sabbaths, for this will be a sign between Me and you for the generations to come, so that you may know that I am the LORD who sanctifies you.
14 ULB म्हणून शब्बाथ दिवस तुम्ही पवित्रपणे पाळावा; शब्बाथ दिवसास जर कोणी भ्रष्ट करील तर त्यास अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्यादिवशी काम करील, त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे. BSB BSB: Keep the Sabbath, for it is holy to you. Anyone who profanes it must surely be put to death. Whoever does any work on that day must be cut off from among his people.
15 ULB सहा दिवस काम करावे. परंतु सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस परमविश्रामाचा शब्बाथ होय. जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्यास अवश्य ठार मारावे. BSB BSB: For six days work may be done, but the seventh day is a Sabbath of complete rest, holy to the LORD. Whoever does any work on the Sabbath day must surely be put to death.
16 ULB इस्राएल लोकांनी शब्बाथ पाळावा; शब्बाथ हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा. BSB BSB: The Israelites must keep the Sabbath, celebrating it as a permanent covenant for the generations to come.
17 ULB शब्बाथ दिवस इस्राएल लोकांमध्ये व माझ्यामध्ये कायमची खूण आहे. परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश व पृथ्वी निर्माण केल्यावर सातव्या दिवशी स्वस्थ राहून विसावा घेतला.” BSB BSB: It is a sign between Me and the Israelites forever; for in six days the LORD made the heavens and the earth, but on the seventh day He rested and was refreshed.’”
18 ULB या प्रमाणे देवाने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन दगडी पाट्यांचे आज्ञापट त्यास दिले. BSB BSB: When the LORD had finished speaking with Moses on Mount Sinai, He gave him the two tablets of the Testimony, tablets of stone inscribed by the finger of God.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.