1 ULB नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालू ठेवला आणि तो पूर्वेकडील लोकांच्या देशात आला. BSB BSB: Jacob resumed his journey and came to the land of the people of the east.
2 ULB त्याने पाहिले तेव्हा त्यास एका शेतात एक विहीर दिसली आणि पाहा तिच्याजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. या विहिरीतून कळपांना पाणी पाजीत असत आणि या विहिरीच्या तोंडावरचा दगड मोठा होता. BSB BSB: He looked and saw a well in the field, and near it lay three flocks of sheep, because the sheep were watered from this well. And a large stone covered the mouth of the well.
3 ULB जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला काढीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर ते तो दगड परत त्याच जागेवर ठेवत. BSB BSB: When all the flocks had been gathered there, the shepherds would roll away the stone from the mouth of the well and water the sheep. Then they would return the stone to its place over the mouth of the well.
4 ULB याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?” ते म्हणाले, “आम्ही हारान प्रदेशाहून आलो आहोत.” BSB BSB: “My brothers,” Jacob asked the shepherds, “where are you from?” “We are from Haran,” they answered.
5 ULB मग तो त्यांना म्हणाला, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता का?” ते म्हणाले, “होय, आम्ही त्यास ओळखतो.” BSB BSB: “Do you know Laban the grandson of Nahor?” Jacob asked. “We know him,” they replied.
6 ULB याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?” त्यांनी उत्तर दिले, “तो बरा आहे आणि ती पाहा त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडे येत आहे.” BSB BSB: “Is he well?” Jacob inquired. “Yes,” they answered, “and here comes his daughter Rachel with his sheep.”
7 ULB याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि तसेच कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झाली नाही. तेव्हा मेंढरांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत जाऊ द्या.” BSB BSB: “Look,” said Jacob, “it is still broad daylight; it is not yet time to gather the livestock. Water the sheep and take them back to pasture.”
8 ULB परंतु ते म्हणाले, “आम्हांला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो.” BSB BSB: But they replied, “We cannot, until all the flocks have been gathered and the stone has been rolled away from the mouth of the well. Then we will water the sheep.”
9 ULB याकोब त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली. कारण तीच त्यांना राखीत होती. BSB BSB: While he was still speaking with them, Rachel arrived with her father’s sheep, for she was a shepherdess.
10 ULB जेव्हा याकोबाने आपल्या आईचा भाऊ लाबान याची मुलगी राहेल हिला व आपल्या आईच्या भावाच्या मेंढरांना पाहिले तेव्हा याकोबाने जवळ येऊन विहिरीच्या तोंडावरून दगड लोटला व आपल्या आईचा भाऊ लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजले. BSB BSB: As soon as Jacob saw Rachel, the daughter of his mother’s brother Laban, with Laban’s sheep, he went up and rolled the stone away from the mouth of the well and watered his uncle’s sheep.
11 ULB याकोबाने राहेलीचे चुंबन घेतले आणि मोठ्याने रडला. BSB BSB: Then Jacob kissed Rachel and wept aloud.
12 ULB याकोबाने राहेलला सांगितले की, तो तिच्या वडिलाच्या नात्यातील आहे, म्हणजे रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावत गेली आणि तिने आपल्या बापाला सांगितले. BSB BSB: He told Rachel that he was Rebekah’s son, a relative of her father, and she ran and told her father.
13 ULB जेव्हा आपल्या बहिणीचा मुलगा याकोब आल्याची बातमी लाबानाने ऐकली, तेव्हा लाबान धावत जाऊन त्यास भेटला. त्यास मिठी मारली, त्याची चुंबने घेतली आणि त्यास आपल्या घरी घेऊन आला. मग याकोबाने सर्व गोष्टी लाबानाला सांगितल्या. BSB BSB: When Laban heard the news about his sister’s son Jacob, he ran out to meet him. He embraced him and kissed him and brought him to his home, where Jacob told him all that had happened.
14 ULB मग लाबान त्यास म्हणाला, “खरोखर तू माझे हाड व माझे मांस आहेस.” त्यानंतर याकोब एक महिनाभर त्याच्यापाशी राहिला. BSB BSB: Then Laban declared, “You are indeed my own flesh and blood.” After Jacob had stayed with him a month,
15 ULB लाबान याकोबाला म्हणाला, “तू काही मोबदला न घेता काम करीत राहावेस काय? कारण तू माझा नातलग आहेस तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग?” BSB BSB: Laban said to him, “Just because you are my relative, should you work for nothing? Tell me what your wages should be.”
16 ULB लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल. BSB BSB: Now Laban had two daughters; the older was named Leah, and the younger was named Rachel.
17 ULB लेआचे डोळे अधू होते, परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती. BSB BSB: Leah had weak eyes, but Rachel was shapely and beautiful.
18 ULB याकोबाचे राहेलीवर प्रेम होते, म्हणून तो लाबानास म्हणाला, “तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.” BSB BSB: Since Jacob loved Rachel, he answered, “I will serve you seven years for your younger daughter Rachel.”
19 ULB लाबान म्हणाला, “परक्या मनुष्यास देण्यापेक्षा, ती मी तुला द्यावी हे बरे आहे. माझ्यापाशी राहा.” BSB BSB: Laban replied, “Better that I give her to you than to another. Stay here with me.”
20 ULB म्हणून याकोबाने सात वर्षे राहेलसाठी सेवाचाकरी केली; आणि राहेलीवरील प्रेमामुळे ती वर्षे त्यास फार थोड्या दिवसांसारखी वाटली. BSB BSB: So Jacob served seven years for Rachel, yet it seemed but a few days because of his love for her.
21 ULB नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी पत्नी मला द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन.” BSB BSB: Finally Jacob said to Laban, “Grant me my wife, for my time is complete, and I want to sleep with her.”
22 ULB तेव्हा लाबानाने तेथील सर्व लोकांस एकत्र केले आणि मेजवानी दिली. BSB BSB: So Laban invited all the men of that place and prepared a feast.
23 ULB त्या संध्याकाळी लाबानाने आपली मुलगी लेआ हिला घेतले आणि याकोबाकडे आणले; तो तिच्यापाशी गेला BSB BSB: But when evening came, Laban took his daughter Leah and gave her to Jacob, and he slept with her.
24 ULB लाबानाने आपली दासी जिल्पा आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली. BSB BSB: And Laban gave his servant girl Zilpah to his daughter Leah as her maidservant.
25 ULB सकाळी याकोबाने पाहिले तो पाहा, ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले?” BSB BSB: When morning came, there was Leah! “What have you done to me?” Jacob said to Laban. “Wasn’t it for Rachel that I served you? Why have you deceived me?”
26 ULB लाबान म्हणाला, “आमच्या रीतीरीवाजाप्रमाणे थोरल्या मुलीच्या आधी आम्ही धाकट्या मुलीला देत नाही. BSB BSB: Laban replied, “It is not our custom here to give the younger daughter in marriage before the older.
27 ULB या मुलीचा लग्न विधीचा सप्ताह पूर्ण होऊ दे, म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो, परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.” BSB BSB: Finish this week’s celebration, and we will give you the younger one in return for another seven years of work.”
28 ULB त्याप्रमाणे याकोबाने केले, लेआचे सप्तक पूर्ण केले. मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्यास पत्नी करून दिली; BSB BSB: And Jacob did just that. He finished the week’s celebration, and Laban gave him his daughter Rachel as his wife.
29 ULB लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली. BSB BSB: Laban also gave his servant girl Bilhah to his daughter Rachel as her maidservant.
31 ULB परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेल निःसंतान होती. BSB BSB: When the LORD saw that Leah was unloved, He opened her womb; but Rachel was barren.
32 ULB लेआला मुलगा झाला, तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले. कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दुःख पाहिले आहे; कारण माझा पती माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.” BSB BSB: And Leah conceived and gave birth to a son, and she named him Reuben, for she said, “The LORD has seen my affliction. Surely my husband will love me now.”
33 ULB लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे, म्हणून त्याने मला हा सुद्धा मुलगा दिला आहे,” आणि या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले. BSB BSB: Again she conceived and gave birth to a son, and she said, “Because the LORD has heard that I am unloved, He has given me this son as well.” So she named him Simeon.
34 ULB लेआ पुन्हा गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मात्र माझा पती माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन पुत्र दिले आहेत.” त्यामुळे तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले. BSB BSB: Once again Leah conceived and gave birth to a son, and she said, “Now at last my husband will become attached to me, because I have borne him three sons.” So he was named Levi.
35 ULB त्यानंतर लेआ पुन्हा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुती करीन.” त्यामुळे तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; नंतर तिला मुल होण्याचे थांबले. BSB BSB: And once more she conceived and gave birth to a son and said, “This time I will praise the LORD.” So she named him Judah. Then Leah stopped having children.