1 ULB मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या गोणीमधे जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना नेता येईल तेवढे भर. आणि त्यासोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव. BSB BSB: Then Joseph instructed his steward: “Fill the men’s sacks with as much food as they can carry, and put each one’s silver in the mouth of his sack.
2 ULB सर्वांत धाकट्याच्या गोणीत धान्याच्या पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” योसेफाच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले. BSB BSB: Put my cup, the silver one, in the mouth of the youngest one’s sack, along with the silver for his grain.” So the steward did as Joseph had instructed.
3 ULB दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी त्या भावांना त्यांच्या गाढवांसह त्यांच्या देशाला रवाना करण्यात आले. BSB BSB: At daybreak, the men were sent on their way with their donkeys.
4 ULB ते नगराबाहेर दूर गेले नाहीत, तोच थोड्या वेळाने योसेफ आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला? तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरला? BSB BSB: They had not gone far from the city when Joseph told his steward, “Pursue the men at once, and when you overtake them, ask, ‘Why have you repaid good with evil?
5 ULB हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता उपयोग करतात. हा प्याला चोरून तुम्ही फार वाईट केले आहे.’” BSB BSB: Is this not the cup my master drinks from and uses for divination? What you have done is wicked!’”
6 ULB तेव्हा त्या कारभाऱ्याने त्यांना गाठून योसेफाने आज्ञा केल्याप्रमाणे तो त्यांच्याशी बोलला. BSB BSB: When the steward overtook them, he relayed these words to them.
7 ULB परंतु ते कारभाऱ्याला म्हणाले, “माझे धनी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही. BSB BSB: “Why does my lord say these things?” they asked. “Your servants could not possibly do such a thing.
8 ULB पाहा, मागे आमच्या गोणीत मिळालेला पैसाही आम्ही कनान देशातून तुमच्याकडे परत आणला. तेव्हा आपल्या धन्याच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी कशी चोरणार? BSB BSB: We even brought back to you from the land of Canaan the silver we found in the mouths of our sacks. Why would we steal silver or gold from your master’s house?
9 ULB या पेक्षा आम्हापैकी कोणाच्या पोत्यात तुम्हास जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल. तुम्ही त्यास मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण तुमच्या धन्याचे गुलाम होऊ.” BSB BSB: If any of your servants is found to have it, he must die, and the rest will become slaves of my lord.”
10 ULB कारभारी म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करू. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो मनुष्य माझ्या धन्याचा गुलाम होईल. इतरजण जाण्यास मोकळे राहतील.” BSB BSB: “As you say,” replied the steward. “But only the one who is found with the cup will be my slave, and the rest of you shall be free of blame.”
11 ULB नंतर प्रत्येक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरून उघडली. BSB BSB: So each one quickly lowered his sack to the ground and opened it.
12 ULB कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरुवात करून धाकट्या भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले. तेव्हा त्यास बन्यामिनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला. BSB BSB: The steward searched, beginning with the oldest and ending with the youngest—and the cup was found in Benjamin’s sack.
13 ULB दुःखामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले. BSB BSB: Then they all tore their clothes, loaded their donkeys, and returned to the city.
14 ULB यहूदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले. BSB BSB: When Judah and his brothers arrived at Joseph’s house, he was still there, and they fell to the ground before him.
15 ULB योसेफ त्यांना म्हणाला, “तुम्ही असे का केले? मला शकून पाहण्याचे ज्ञान आहे हे तुम्हास माहीत नाही का?” BSB BSB: “What is this deed you have done?” Joseph declared. “Do you not know that a man like me can surely divine the truth?”
16 ULB यहूदा म्हणाला, “माझ्या धन्याला आम्ही काय बोलावे? किंवा आम्ही अपराधी नाही हे कसे सिद्ध करावे? देवाला तुमच्या सेवकांचा दोष सापडला आहे. म्हणून आता त्याच्यासह आम्ही सर्वजण धन्याचे गुलाम झालो आहोत.” BSB BSB: “What can we say to my lord?” Judah replied. “How can we plead? How can we justify ourselves? God has exposed the iniquity of your servants. We are now my lord’s slaves—both we and the one who was found with the cup.”
17 ULB परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही. फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.” BSB BSB: But Joseph replied, “Far be it from me to do this. The man who was found with the cup will be my slave. The rest of you may return to your father in peace.”
18 ULB मग यहूदा योसेफाजवळ जाऊन म्हणाला, “माझे धनी, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला कानात बोलू द्या आणि माझ्यावर राग भडकू देऊ नका. आपण फारो राजासमान आहात. BSB BSB: Then Judah approached Joseph and said, “Sir, please let your servant speak personally to my lord. Do not be angry with your servant, for you are equal to Pharaoh himself.
19 ULB माझ्या धन्याने आपल्या सेवकाला विचारले होते, ‘तुम्हास बाप किंवा भाऊ आहे का?’ BSB BSB: My lord asked his servants, ‘Do you have a father or a brother?’
20 ULB आणि आम्ही आपल्या धन्याला म्हणालो, होय, आमचा बाप आहे, तो म्हातारा आहे तसेच वडिलाच्या म्हातारपणी झालेला लहान भाऊ आहे. आणि त्याचा भाऊ मरण पावला आहे. त्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे. आणि त्याचा बाप त्याच्यावर प्रीती करतो. BSB BSB: And we answered, ‘We have an elderly father and a younger brother, the child of his old age. The boy’s brother is dead. He is the only one of his mother’s sons left, and his father loves him.’
21 ULB आणि तुम्ही आपल्या सेवकांना म्हणाला, ‘मग त्यास माझ्याकडे घेऊन या. मला त्यास पाहावयाचे आहे.’ BSB BSB: Then you told your servants, ‘Bring him down to me so that I can see him for myself.’
22 ULB आणि आम्ही स्वामीस म्हणालो, तो मुलगा बापाला सोडून येऊ शकणार नाही, कारण त्याने बापाला सोडले तर आमचा बाप मरून जाईल. BSB BSB: So we said to my lord, ‘The boy cannot leave his father. If he were to leave, his father would die.’
23 ULB परंतु आपण आम्हांला बजावून सांगितले, ‘तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला घेऊन आलेच पाहिजे नाही, तर तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहू शकणार नाही.’ BSB BSB: But you said to your servants, ‘Unless your younger brother comes down with you, you will not see my face again.’
24 ULB मग असे झाले की, आम्ही तुमचा सेवक आमचा बाप याच्याकडे परत गेलो व आमचा धनी जे बोलला ते त्यास सांगितले. BSB BSB: Now when we returned to your servant my father, we relayed your words to him.
25 ULB आणि आमचा बाप म्हणाला, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा. BSB BSB: Then our father said, ‘Go back and buy us some food.’
26 ULB आणि आम्ही म्हणालो, आमच्या धाकट्या भावाला बरोबर घेतल्याशिवाय जाणार नाही, कारण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे आणल्याखेरीज तुम्हास माझे तोंड पुन्हा पाहता येणार नाही, असे त्या अधिकाऱ्याने आम्हास बजावले आहे. BSB BSB: But we answered, ‘We cannot go down there unless our younger brother goes with us. So if our younger brother is not with us, we cannot see the man.’
27 ULB मग तुमचा सेवक आमचा बाप म्हणाला, तुम्हास माहीत आहे की, माझ्या पत्नीच्या पोटी मला दोन पुत्र झाले. BSB BSB: And your servant my father said to us, ‘You know that my wife bore me two sons.
28 ULB आणि त्यातला एक माझ्यापासून दूर निघून गेला आहे आणि मी म्हणालो, खरोखर त्यास वन्य पशूने फाडून तुकडे तुकडे केले आणि तेव्हापासून मी त्यास पाहिले नाही. BSB BSB: When one of them was gone, I said: “Surely he has been torn to pieces.” And I have not seen him since.
29 ULB आणि आता माझ्या या मुलाला तुम्ही माझ्यापासून घेऊन गेला आणि त्यास जर काही अपाय झाला तर तुम्ही माझे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला कारण व्हाल. BSB BSB: Now if you also take this one from me and harm comes to him, you will bring my gray hair down to Sheol in sorrow.’
30 ULB म्हणून आता तुझा सेवक, माझा बाप याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला तर याच्या जिवाशी त्याचा जीव जडलेला असल्यामुळे, BSB BSB: So if the boy is not with us when I return to your servant, and if my father, whose life is wrapped up in the boy’s life,
31 ULB असे होईल की, मुलगा नाही हे पाहून तो मरून जाईल. आणि तुमचा चाकर, आमचा बाप याचे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला तुझे सेवक कारण होतील. BSB BSB: sees that the boy is not with us, he will die. Then your servants will have brought the gray hair of your servant our father down to Sheol in sorrow.
32 ULB या मुलाबद्दल मी माझ्या पित्यास हमी दिली आहे. मी म्हटले, ‘जर मी त्यास तुमच्याकडे परत घेऊन आलो नाही तर मग जन्मभर मी तुमचा दोषी राहीन.’ BSB BSB: Indeed, your servant guaranteed the boy’s safety to my father, saying, ‘If I do not return him to you, I will bear the guilt before you, my father, all my life.’
33 ULB म्हणून आता, मी तुम्हास विनंती करतो, मला, तुमच्या या सेवकाला या मुलाच्याऐवजी माझ्या धन्याचा गुलाम म्हणून ठेवून घ्या. मुलाला त्याच्या भावांबरोबर जाऊ द्या. BSB BSB: Now please let your servant stay here as my lord’s slave in place of the boy. Let him return with his brothers.
34 ULB माझ्या बापाकडे मी माघारी कसा जाऊ? माझ्या बापाचे वाईट होईल ते मला पाहावे लागेल याची मला भयंकर भीती वाटते.” BSB BSB: For how can I go back to my father without the boy? I could not bear to see the misery that would overwhelm him.”