1 ULB इस्राएलाने, आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैर-शेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली. BSB BSB: So Israel set out with all that he had, and when he came to Beersheba, he offered sacrifices to the God of his father Isaac.
2 ULB रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?” BSB BSB: And that night God spoke to Israel in a vision: “Jacob, Jacob!” He said. “Here I am,” replied Jacob.
3 ULB तो म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन. BSB BSB: “I am God,” He said, “the God of your father. Do not be afraid to go down to Egypt, for I will make you into a great nation there.
4 ULB मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.” BSB BSB: I will go down with you to Egypt, and I will surely bring you back. And Joseph’s own hands will close your eyes.”
6 ULB त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले; याप्रमाणे याकोब व त्याची संतती मिसर देशास आली. BSB BSB: They also took the livestock and possessions they had acquired in the land of Canaan, and Jacob and all his offspring went to Egypt.
7 ULB त्याने आपल्यासोबत आपली मुले व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिसरात नेले. BSB BSB: Jacob took with him to Egypt his sons and grandsons, and his daughters and granddaughters—all his offspring.
8 ULB इस्राएलाचे जे पुत्र त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी: याकोबाचा प्रथम जन्मलेला रऊबेन; BSB BSB: Now these are the names of the sons of Israel (Jacob and his descendants) who went to Egypt: Reuben, Jacob’s firstborn.
9 ULB रऊबेनाचे पुत्र हनोख आणि पल्लू आणि हेस्रोन आणि कर्मी; BSB BSB: The sons of Reuben: Hanoch, Pallu, Hezron, and Carmi.
10 ULB शिमोनाचे पुत्र यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल; BSB BSB: The sons of Simeon: Jemuel, Jamin, Ohad, Jachin, Zohar, and Shaul the son of a Canaanite woman.
11 ULB लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी; BSB BSB: The sons of Levi: Gershon, Kohath, and Merari.
12 ULB यहूदाचे पुत्र एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह, (परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे पुत्र हेस्रोन व हामूल), BSB BSB: The sons of Judah: Er, Onan, Shelah, Perez, and Zerah; but Er and Onan died in the land of Canaan. The sons of Perez: Hezron and Hamul.
13 ULB इस्साखाराचे पुत्र तोला, पुवा, लोब व शिम्रोन; BSB BSB: The sons of Issachar: Tola, Puvah, Job, and Shimron.
14 ULB जबुलूनाचे पुत्र सेरेद, एलोन व याहलेल BSB BSB: The sons of Zebulun: Sered, Elon, and Jahleel.
15 ULB (याकोबाला लेआपासून पदन-अरामात झालेली सहा मुले व दीना ही मुलगी; त्याच्या कुटुंबात मुले आणि मुली मिळून तेहतीस जण होते), BSB BSB: These are the sons of Leah born to Jacob in Paddan-aram, in addition to his daughter Dinah. The total number of sons and daughters was thirty-three.
16 ULB गादाचे पुत्र सिफयोन आणि हग्गी, शूनी आणि एसबोन, एरी, अरोदी, आणि अरेली; BSB BSB: The sons of Gad: Ziphion, Haggi, Shuni, Ezbon, Eri, Arodi, and Areli.
17 ULB आशेराचे पुत्र इम्ना आणि इश्वा, इश्वी, आणि बरीया, आणि त्याची बहीण सेराह; आणि बरीयाचे पुत्र हेबर व मलकीएल BSB BSB: The children of Asher: Imnah, Ishvah, Ishvi, Beriah, and their sister Serah. The sons of Beriah: Heber and Malchiel.
18 ULB (जिल्पा जी लाबानने आपली मुलगी लेआ हिला दिली होती, तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे पुत्र होते. ती एकंदर सोळा माणसे होती), BSB BSB: These are the sons of Jacob born to Zilpah—whom Laban gave to his daughter Leah—sixteen in all.
19 ULB याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र योसेफ व बन्यामीन हे होते; BSB BSB: The sons of Jacob’s wife Rachel: Joseph and Benjamin.
20 ULB (योसेफास मिसर देशातील ओनचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे पुत्र झाले), BSB BSB: Manasseh and Ephraim were born to Joseph in the land of Egypt by Asenath daughter of Potiphera, priest of On.
21 ULB बन्यामिनाचे पुत्र बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द. BSB BSB: The sons of Benjamin: Bela, Becher, Ashbel, Gera, Naaman, Ehi, Rosh, Muppim, Huppim, and Ard.
22 ULB (याकोबापासून राहेलीस झालेली ही मुले. सर्व मिळून ते सर्व चौदा जण होते), BSB BSB: These are the sons of Rachel born to Jacob—fourteen in all.
23 ULB हुशीम हा दान याचा मुलगा होता; BSB BSB: The son of Dan: Hushim.
24 ULB नफतालीचे पुत्र यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते. BSB BSB: The sons of Naphtali: Jahzeel, Guni, Jezer, and Shillem.
25 ULB (लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हाचे याकोबापासून झालेले हे पुत्र. हे सर्व मिळून सात जण होते). BSB BSB: These are the sons of Jacob born to Bilhah, whom Laban gave to his daughter Rachel—seven in all.
26 ULB याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या स्त्रिया सोडून सहासष्ट जण होती. BSB BSB: All those belonging to Jacob who came to Egypt—his direct descendants, besides the wives of Jacob’s sons—numbered sixty-six persons.
27 ULB योसेफास मिसर देशात झालेले दोन पुत्र मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते. BSB BSB: And with the two sons who had been born to Joseph in Egypt, the members of Jacob’s family who went to Egypt were seventy in all.
28 ULB याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली. BSB BSB: Now Jacob had sent Judah ahead of him to Joseph to get directions to Goshen. When Jacob’s family arrived in the land of Goshen,
29 ULB योसेफास आपला रथ तयार करून आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्यास सामोरा गेला. योसेफाने आपल्या पित्यास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यात गळा घालून तो बराच वेळ रडला. BSB BSB: Joseph prepared his chariot and went there to meet his father Israel. Joseph presented himself to him, embraced him, and wept profusely.
30 ULB मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.” BSB BSB: Then Israel said to Joseph, “Finally I can die, now that I have seen your face and know that you are still alive!”
31 ULB मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या वडिलाच्या घरच्या सर्वांना म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की, ‘माझे भाऊ व माझ्या वडिलाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत. BSB BSB: Joseph said to his brothers and to his father’s household, “I will go up and inform Pharaoh: ‘My brothers and my father’s household from the land of Canaan have come to me.
32 ULB माझ्या वडिलाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत, ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरेढोरे पाळत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’ BSB BSB: The men are shepherds; they raise livestock, and they have brought their flocks and herds and all that they own.’
33 ULB जेव्हा फारो राजा तुम्हास बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’ BSB BSB: When Pharaoh summons you and asks, ‘What is your occupation?’
34 ULB तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हास गोशेन प्रांतात राहू देईल. मिसरी लोकांस मेंढपाळ आवडत नाहीत.” BSB BSB: you are to say, ‘Your servants have raised livestock ever since our youth—both we and our fathers.’ Then you will be allowed to settle in the land of Goshen, since all shepherds are detestable to the Egyptians.”