1 ULB त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.” BSB BSB: Then Jacob called for his sons and said, “Gather around so that I can tell you what will happen to you in the days to come:
2 ULB “याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका, तुमचा बाप इस्राएल याचे ऐका. BSB BSB: Come together and listen, O sons of Jacob; listen to your father Israel.
3 ULB रऊबेना, तू माझा पहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस. पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस, तू सर्वांपेक्षा अधिक शक्तीवान व सर्वांपेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस. BSB BSB: Reuben, you are my firstborn, my might, and the beginning of my strength, excelling in honor, excelling in power.
4 ULB परंतु तुझ्या भावना पुराच्या पाण्याच्या अनावर व चंचल लाटांप्रमाणे आहेत. कारण तू आपल्या वडिलाच्या पलंगावर गेलास व त्याच्या बिछान्यावर जाऊन तो अशुद्ध केलास.” BSB BSB: Uncontrolled as the waters, you will no longer excel, because you went up to your father’s bed, onto my couch, and defiled it.
5 ULB “शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत. या दोन भावांना तलवारीने लढण्याची आवड आहे. BSB BSB: Simeon and Levi are brothers; their swords are weapons of violence.
6 ULB माझ्या जिवा, त्यांच्या गुप्त मसलतींमध्ये गुंतू नको; त्यांच्या गुप्त बैठकांमध्ये सामील होऊ नको, त्यांचे हे बेत माझ्या जिवाला मान्य नाहीत. त्यांनी त्यांच्या रागाच्या भरात पुरुषांची कत्तल केली. आपल्या रागाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या. BSB BSB: May I never enter their council; may I never join their assembly. For they kill men in their anger, and hamstring oxen on a whim.
7 ULB त्यांचा राग शाप आहे, ते अति रागाने वेडे होतात. तेव्हा अतिशय क्रूर बनतात. मी त्यांना याकोबात विभागीन, ते सर्व इस्राएल देशभर पसरतील. BSB BSB: Cursed be their anger, for it is strong, and their wrath, for it is cruel! I will disperse them in Jacob and scatter them in Israel.
8 ULB यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील. तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील. तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील. BSB BSB: Judah, your brothers shall praise you. Your hand shall be on the necks of your enemies; your father’s sons shall bow down to you.
9 ULB यहूदा सिंहाचा छावा आहे. माझ्या मुला, तू शिकारीपासून वरपर्यंत गेलास. तो खाली वाकला आहे, तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याचे धाडस कोण करील? BSB BSB: Judah is a young lion—my son, you return from the prey. Like a lion he crouches and lies down; like a lioness, who dares to rouse him?
10 ULB शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही. राष्ट्रे त्याच्या आज्ञा पाळतील. BSB BSB: The scepter will not depart from Judah, nor the staff from between his feet, until Shiloh comes and the allegiance of the nations is his.
11 ULB तो त्याचा तरुण घोडा द्राक्षवेलीस, आणि त्याचे शिंगरु खास द्राक्षवेलीस बांधेल. त्याने त्याचे वस्त्र द्राक्षारसात आणि आपला झगा द्राक्षांच्या रक्तात धुतला आहे. BSB BSB: He ties his donkey to the vine, his colt to the choicest branch. He washes his garments in wine, his robes in the blood of grapes.
12 ULB त्याचे डोळे द्राक्षारसापेक्षा अधिक लालबुंद होतील. त्याचे दात दूधापेक्षा अधिक सफेद होतील. BSB BSB: His eyes are darker than wine, and his teeth are whiter than milk.
13 ULB जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल. तो जहाजासाठी सुरक्षित बंदर होईल. त्याच्या जमिनीची हद्द सीदोन नगरापर्यंत असेल.” BSB BSB: Zebulun shall dwell by the seashore and become a harbor for ships; his border shall extend to Sidon.
14 ULB “इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांच्यामध्ये दबून बसला आहे. BSB BSB: Issachar is a strong donkey, lying down between the sheepfolds.
15 ULB आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे, आपला देश आनंददायक आहे असे त्याने पाहिले, आणि मग जड बोजा वाहून नेण्यास व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार झाला. BSB BSB: He saw that his resting place was good and that his land was pleasant, so he bent his shoulder to the burden and submitted to labor as a servant.
16 ULB इस्राएलाचा एक वंश या नात्याने दान आपल्या लोकांचा न्याय करील. BSB BSB: Dan shall provide justice for his people as one of the tribes of Israel.
17 ULB तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल. तो घोड्याच्या टाचेला दंश करील. त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरून मागे कोसळेल. BSB BSB: He will be a snake by the road, a viper in the path that bites the horse’s heels so that its rider tumbles backward.
18 ULB हे परमेश्वरा, तुझ्याकडून उद्धार होण्याची मी वाट पाहत आहे. BSB BSB: I await Your salvation, O LORD.
19 ULB गाद-लुटारूंची टोळी त्याच्यावर हल्ला करेल, परंतु तो त्यांच्या पार्श्वभागावर हल्ला करून त्यांना पळवून लावील. BSB BSB: Gad will be attacked by raiders, but he will attack their heels.
20 ULB आशेराचे अन्न समृद्ध होईल आणि तो राजाला योग्य असे शाही अन्नपदार्थ पुरवील. BSB BSB: Asher’s food will be rich; he shall provide royal delicacies.
21 ULB नफताली मोकळ्या सुटलेल्या हरीणीप्रमाणे आहे. त्याचे बोलणे गोड असेल. BSB BSB: Naphtali is a doe set free that bears beautiful fawns.
22 ULB योसेफ हा फलदायी फाट्यासारखा आहे. तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे. त्याच्या फांद्या भिंतीवर चढून पसरल्या आहेत. BSB BSB: Joseph is a fruitful vine—a fruitful vine by a spring, whose branches scale the wall.
23 ULB तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला. आणि त्यास तीर मारले व त्यास त्रास दिला. BSB BSB: The archers attacked him with bitterness; they aimed at him in hostility.
24 ULB तरी त्याचे धनुष्य मजबूत राहील, आणि त्याचे बाहु कुशल होतील याकोबाचा सामर्थ्यवान देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक याजकडून त्याच्या हातांना शक्ती मिळते. BSB BSB: Yet he steadied his bow, and his strong arms were tempered by the hands of the Mighty One of Jacob, in the name of the Shepherd, the Rock of Israel,
25 ULB कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील, आणि सर्वशक्तिमान देवामुळे, जो तुला वरून आकाशाचे आशीर्वाद, खाली खोल दरीचे आशीर्वाद देवो, तसेच स्तनांचा व गर्भाशयांच्या उपजांचा आशीर्वाद तो तुला देवो. BSB BSB: by the God of your father who helps you, and by the Almighty who blesses you, with blessings of the heavens above, with blessings of the depths below, with blessings of the breasts and womb.
26 ULB तुझ्या बापाचे आशीर्वाद माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादापेक्षा मोठे होतील, अथवा सर्वकाळ टिकून राहणाऱ्या डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इच्छित वस्तुंहून श्रेष्ठ होतील. ते योसेफाच्या मस्तकावर, जो आपल्या भावांमध्ये राजपुत्र त्याच्या मस्तकावर आशीर्वाद असे राहतील. BSB BSB: The blessings of your father have surpassed the blessings of the ancient mountains and the bounty of the everlasting hills. May they rest on the head of Joseph, on the brow of the prince of his brothers.
27 ULB बन्यामीन हा भुकेला लांडगा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारून खाईल, आणि संध्याकाळी तो लूट वाटून घेईल.” BSB BSB: Benjamin is a ravenous wolf; in the morning he devours the prey, in the evening he divides the plunder.”
28 ULB हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत. त्यांच्या वडिलाने आशीर्वाद देऊन त्यांना म्हटले ते हेच. त्याने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला. BSB BSB: These are the tribes of Israel, twelve in all, and this was what their father said to them. He blessed them, and he blessed each one with a suitable blessing.
29 ULB मग त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांना म्हणाला, “मी आता माझ्या लोकांकडे जात आहे. एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे, BSB BSB: Then Jacob instructed them, “I am about to be gathered to my people. Bury me with my fathers in the cave in the field of Ephron the Hittite.
30 ULB ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले. BSB BSB: The cave is in the field of Machpelah near Mamre, in the land of Canaan. This is the field Abraham purchased from Ephron the Hittite as a burial site.
31 ULB अब्राहाम व त्याची पत्नी सारा, यांना त्या गुहेत पुरले आहे; इसहाक आणि त्याची पत्नी रिबका यांनाही तेथेच पुरले आहे; आणि माझी पत्नी लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे. BSB BSB: There Abraham and his wife Sarah are buried, there Isaac and his wife Rebekah are buried, and there I buried Leah.
32 ULB ते शेत व ती गुहा हेथी लोकांकडून विकत घेतलेली आहे.” BSB BSB: The field and the cave that is in it were purchased from the Hittites.”
33 ULB आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर याकोबाने आपले पाय पलंगावर जवळ ओढून घेतले व मरण पावला, आणि तो आपल्या पूर्वजांकडे गेला. BSB BSB: When Jacob had finished instructing his sons, he pulled his feet into the bed and breathed his last, and he was gathered to his people.