1 ULB एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला. BSB BSB: When Ephraim spoke, there was trembling; he was exalted in Israel. But he incurred guilt through Baal, and he died.
2 ULB आता ते अधिकाधिक पाप करु लागले ते चांदीच्या ओतीव मूर्ती आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो तसे बनवू लागले. लोक म्हणू लागले, “जे बलिदान करतात त्यांनी वासरांचे चुंबन घ्या” BSB BSB: Now they sin more and more and make for themselves cast images, idols skillfully made from their silver, all of them the work of craftsmen. People say of them, “They offer human sacrifice and kiss the calves!”
3 ULB म्हणून पहाटेच्या ढगासारखे लवकर उडून जाणाऱ्या दवासारखे खळ्यातून वाऱ्याने उडणाऱ्या भुसासारखे आणि धुराडयातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील. BSB BSB: Therefore they will be like the morning mist, like the early dew that vanishes, like chaff blown from a threshing floor, like smoke through an open window.
4 ULB पण मी तुमचा देव परमेश्वर आहे, ज्याने तुम्हास मिसरातून बाहेर काढले, माझ्याशिवाय तुम्हास अन्य देव नाही, माझ्याशिवाय कोणी तारक नाही. BSB BSB: Yet I am the LORD your God ever since the land of Egypt; you know no God but Me, for there is no Savior besides Me.
5 ULB मी तुम्हास रानात, रुक्ष प्रदेशात जाणून होतो. BSB BSB: I knew you in the wilderness, in the land of drought.
6 ULB जेव्हा तुम्हास चारा मिळाला तेव्हा तुम्ही तृप्त झालात, आणि जेव्हा तुमचे पोट भरले तेव्हा तुमचे हृदय उन्मत्त झाले; त्या कारणास्तव तुम्ही मला विसरला. BSB BSB: When they had pasture, they became satisfied; when they were satisfied, their hearts became proud, and as a result they forgot Me.
7 ULB म्हणून मी सिंहासारखा तुमच्याशी वागेन, चित्याप्रमाणे तुमच्या वाटेवर दबा धरुन बसेन. BSB BSB: So like a lion I will pounce on them; like a leopard I will lurk by the path.
8 ULB जिची पिल्ले चोरी झाली, अशा अस्वली सारखा मी तुमच्यावर हल्ला करीन, मी तुमचे उर फाडीन, आणि सिंहिनीप्रमाणे तुम्हास खाऊन टाकेन, जसा वनपशू तुम्हास फाडून टाकतो. BSB BSB: Like a bear robbed of her cubs I will attack them, and I will tear open their chests. There I will devour them like a lion, like a wild beast tearing them apart.
9 ULB इस्राएला हा तुझा नाश आहे जो येत आहे, कारण तू माझ्या म्हणजे तुझ्या सहाय्यकर्त्यांच्या विरोधात गेला आहेस. BSB BSB: You are destroyed, O Israel, because you are against Me—against your helper.
10 ULB तुझा राजा कोठे आहे? जो तुझ्या सर्व नगरांचे रक्षण करतो तुझे अधीपती कोठे आहेत? ज्याविषयी तू मला म्हटले, “मला राजा आणि अधिपती दे?” BSB BSB: Where is your king now to save you in all your cities, and the rulers to whom you said, “Give me a king and princes”?
11 ULB मी क्रोधाने तुला राजा दिला आणि रागाने त्यास काढूनही घेतले. BSB BSB: So in My anger I gave you a king, and in My wrath I took him away.
12 ULB एफ्राईमाचा अन्याय गोळा केला आहे, त्याच्या अपराधाची रास करण्यात आली आहे. BSB BSB: The iniquity of Ephraim is bound up; his sin is stored up.
13 ULB प्रसूतिवेदना त्याच्यावर येतील, पण तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण जन्म घेण्याच्या वेळी तो गर्भातून बाहेर येत नाही. BSB BSB: Labor pains come upon him, but he is an unwise son. When the time arrives, he fails to present himself at the opening of the womb.
14 ULB मी त्यांना खरोखर अधोलोकाच्या बळापासून सोडविन काय? मी त्यांना खरोखर मरणातून सोडवणार काय? मरणा, तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत? आणि इथे कळवळा माझ्या समोरुन लपलेला आहे. BSB BSB: I will ransom them from the power of Sheol; I will redeem them from Death. Where, O Death, are your plagues? Where, O Sheol, is your sting? Compassion is hidden from My eyes.
15 ULB एफ्राईम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला, तरी पूर्वेचा वारा येईल, परमेश्वराचा वारा रानातून येईल एफ्राईमाचा झरा सुकून जाईल, त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही. त्यांचा शत्रु त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल. BSB BSB: Although he flourishes among his brothers, an east wind will come—a wind from the LORD rising up from the desert. His fountain will fail, and his spring will run dry. The wind will plunder his treasury of every precious article.
16 ULB शोमरोनात दोष येईल, कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे ते तलवारीने पडतील. त्यांची लहान मुले आपटली जातील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील. BSB BSB: Samaria will bear her guilt because she has rebelled against her God. They will fall by the sword; their little ones will be dashed to pieces, and their pregnant women ripped open.