2 ULB तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसर्या शिष्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आणि त्यास कोठे ठेवले हे आम्हास माहीत नाही.” BSB BSB: So she came running to Simon Peter and the other disciple, the one whom Jesus loved. “They have taken the Lord out of the tomb,” she said, “and we do not know where they have put Him!”
3 ULB म्हणून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. BSB BSB: Then Peter and the other disciple set out for the tomb.
4 ULB तेव्हा ते दोघे जण बरोबर धावत गेले; पण तो दुसरा शिष्य पेत्राच्या पुढे धावत गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला. BSB BSB: The two were running together, but the other disciple outran Peter and reached the tomb first.
5 ULB त्याने ओणवून आत डोकावले आणि त्यास तागाची वस्त्रे पडलेली दिसली. पण तो आत गेला नाही. BSB BSB: He bent down and looked in at the linen cloths lying there, but he did not go in.
6 ULB शिमोन पेत्रहि त्याच्यामागून येऊन पोहचला व तो कबरेत शिरला; BSB BSB: Simon Peter arrived just after him. He entered the tomb and saw the linen cloths lying there.
7 ULB आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो त्या तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून ठेवलेला होता. BSB BSB: The cloth that had been around Jesus’ head was rolled up, lying separate from the linen cloths.
8 ULB तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोहि आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. BSB BSB: Then the other disciple, who had reached the tomb first, also went in. And he saw and believed.
9 ULB कारण त्याने मरण पावलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना अजून कळला नव्हता. BSB BSB: For they still did not understand from the Scripture that Jesus had to rise from the dead.
10 ULB मग ते शिष्य पुन्हा आपल्या घरी गेले. BSB BSB: Then the disciples returned to their homes.
11 ULB पण इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि ती रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले; BSB BSB: But Mary stood outside the tomb weeping. And as she wept, she bent down to look into the tomb,
12 ULB आणि जेथे येशूचे शरीर आधी ठेवलेले होते तेथे ते शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायांकडील बाजूस बसलेले दिसले. BSB BSB: and she saw two angels in white sitting where the body of Jesus had lain, one at the head and the other at the feet.
13 ULB आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यास कोठे ठेवले हे मला माहीत नाही.” BSB BSB: “Woman, why are you weeping?” they asked. “Because they have taken my Lord away,” she said, “and I do not know where they have put Him.”
14 ULB असे बोलून ती मागे वळली आणि तो तिला येशू उभा असलेला दिसला; पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. BSB BSB: When she had said this, she turned around and saw Jesus standing there. But she did not recognize that it was Jesus.
15 ULB येशूने तिला म्हटले, “मुली, तू का रडतेस? तू कोणाला शोधतेस?” तो माळी आहे असे समजून त्यास म्हणाली, “साहेब, तू त्यास येथून नेले असेल तर कोठे ठेवलेस ते मला सांग म्हणजे मी त्यास घेऊन जाईन.” BSB BSB: “Woman, why are you weeping?” Jesus asked. “Whom are you seeking?” Thinking He was the gardener, she said, “Sir, if you have carried Him off, tell me where you have put Him, and I will get Him.”
16 ULB येशूने तिला म्हटले, “मरीये,” ती वळून त्यास इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी,” (म्हणजे गुरूजी) BSB BSB: Jesus said to her, “Mary.” She turned and said to Him in Hebrew, “Rabboni!” (which means “Teacher”).
18 ULB मग्दालीया नगराची मरीया गेली आणि आपण प्रभूला पहिल्याचे आणि त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले. BSB BSB: Mary Magdalene went and announced to the disciples, “I have seen the Lord!” And she told them what He had said to her.
19 ULB त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.” BSB BSB: It was the first day of the week, and that very evening, while the disciples were together with the doors locked for fear of the Jews, Jesus came and stood among them. “Peace be with you!” He said to them.
20 ULB आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले BSB BSB: After He had said this, He showed them His hands and His side. The disciples rejoiced when they saw the Lord.
21 ULB तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हास पाठवतो.” BSB BSB: Again Jesus said to them, “Peace be with you. As the Father has sent Me, so also I am sending you.”
22 ULB एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. BSB BSB: When He had said this, He breathed on them and said, “Receive the Holy Spirit.
23 ULB ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.” BSB BSB: If you forgive anyone his sins, they are forgiven; if you withhold forgiveness from anyone, it is withheld.”
26 ULB आणि पुन्हा, आठ दिवसानी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्हास शांती असो.” BSB BSB: Eight days later, His disciples were once again inside with the doors locked, and Thomas was with them. Jesus came and stood among them and said, “Peace be with you.”
27 ULB मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट पुढे कर आणि माझे हात बघ; तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि विश्वासहीन होऊ नकोस पण विश्वास ठेवणारा हो.” BSB BSB: Then Jesus said to Thomas, “Put your finger here and look at My hands. Reach out your hand and put it into My side. Stop doubting and believe.”
29 ULB येशूने त्यास म्हटले, “तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे आहे ते धन्य!” BSB BSB: Jesus said to him, “Because you have seen Me, you have believed; blessed are those who have not seen and yet have believed.”
31 ULB पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन मिळावे. BSB BSB: But these are written so that you may believe that Jesus is the Christ, the Son of God, and that by believing you may have life in His name.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.