1 ULB नंतर माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली BSB BSB: From inside the fish, Jonah prayed to the LORD his God,
2 ULB तो म्हणाला, “मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने मला उत्तर दिले; मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली! तू माझा आवाज ऐकलास. BSB BSB: saying: “In my distress I called to the LORD, and He answered me. From the belly of Sheol I called for help, and You heard my voice.
3 ULB तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, आणि प्रवाहाने मला वेढले, तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ माझ्यावरून गेला. BSB BSB: For You cast me into the deep, into the heart of the seas, and the current swirled about me; all Your breakers and waves swept over me.
4 ULB आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?’ BSB BSB: At this, I said, ‘I have been banished from Your sight; yet I will look once more toward Your holy temple.’
5 ULB जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले; आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले. BSB BSB: The waters engulfed me to take my life; the watery depths closed around me; the seaweed wrapped around my head.
6 ULB मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले; तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे. BSB BSB: To the roots of the mountains I descended; the earth beneath me barred me in forever! But You raised my life from the pit, O LORD my God!
7 ULB जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली. BSB BSB: As my life was fading away, I remembered the LORD. My prayer went up to You, to Your holy temple.
8 ULB जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात, ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात. BSB BSB: Those who cling to worthless idols forsake His loving devotion.
9 ULB परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, तारण परमेश्वराकडूनच आहे.” BSB BSB: But I, with the voice of thanksgiving, will sacrifice to You. I will fulfill what I have vowed. Salvation is from the LORD!”
10 ULB मग परमेश्वराने त्या मोठ्या माश्याला आज्ञा केली; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले. BSB BSB: And the LORD commanded the fish, and it vomited Jonah onto dry land.