1 ULB सर्व एफ्राइमी लोक एकत्र झाले आणि यार्देन नदी पार करून उत्तरेस साफोन नगरात जाऊन इफ्ताहाला म्हणाले, “तू अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला गेलास, तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस? आम्ही तुझ्यासह घराला आग लावून जाळून टाकू.” BSB BSB: Then the men of Ephraim assembled and crossed the Jordan to Zaphon. They said to Jephthah, “Why have you crossed over to fight the Ammonites without calling us to go with you? We will burn your house down with you inside!”
2 ULB तेव्हा इफ्ताह त्यांना म्हणाला, “अम्मोन्यांशी माझे व माझ्या लोकांचे फार भांडण होत होते; तेव्हा मी तुम्हाला बोलावले, परंतु तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडवले नाही. BSB BSB: But Jephthah replied, “My people and I had a serious conflict with the Ammonites, and when I called, you did not save me out of their hands.
3 ULB तेव्हा तुम्ही सोडवत नाही, हे पाहून मी माझा जीव धोक्यात घालून माझ्या स्वत:च्या सामर्थ्याने अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला पलीकडे गेलो, या प्रकारे परमेश्वराने मला विजय दिला; तर आजच्या दिवशी तुम्ही माझ्याशी लढायला मजवर आला आहात?” BSB BSB: When I saw that you would not save me, I risked my life and crossed over to the Ammonites, and the LORD delivered them into my hand. Why then have you come today to fight against me?”
4 ULB तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमवून आणि एफ्राइमाशी लढाई केली, आणि गिलादी मनुष्यांनी एफ्राइमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, “एफ्राइम व मनश्शे यांच्यामध्ये राहत आहा ते तुम्ही गिलादी एफ्राइमातले पळपुटे आहात.” BSB BSB: Jephthah then gathered all the men of Gilead and fought against Ephraim. And the men of Gilead struck them down because the Ephraimites had said, “You Gileadites are fugitives in Ephraim, living in the territories of Ephraim and Manasseh.”
5 ULB तेव्हा गिलाद्यांनी एफ्राइम्यांसमोर यार्देनेचे उतार रोखून धरले, आणि असे झाले की, जेव्हा कोणी एफ्राइमी पळताना बोलला, “तुम्ही मला पार जाऊ द्या,” असे म्हणे. तेव्हा गिलादी माणसे त्यास म्हणत असत, “तू एफ्राथी आहेस की काय?” आणि तो जर “नाही” असे बोलला, BSB BSB: The Gileadites captured the fords of the Jordan leading to Ephraim, and whenever a fugitive from Ephraim would say, “Let me cross over,” the Gileadites would ask him, “Are you an Ephraimite?” If he answered, “No,”
6 ULB तर ते त्यास म्हणत, “आता तू शिब्बोलेथ असे म्हण,” तेव्हा तो “सिब्बोलेथ” असे म्हणत असे (कारण त्यांना त्या शब्दाचा बरोबर उच्चार करता येत नव्हता). मग ते त्यास धरून यार्देनेच्या उताराजवळ जिवे मारत असत; तर त्या वेळी एफ्राइमातली बेचाळीस हजार माणसे मारली गेली. BSB BSB: they told him, “Please say Shibboleth.” If he said, “Sibboleth,” because he could not pronounce it correctly, they seized him and killed him at the fords of the Jordan. So at that time 42,000 Ephraimites were killed.
7 ULB इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला; मग इफ्ताह गिलादी मेला, आणि गिलादातल्या एका नगरात त्यास पुरण्यात आले. BSB BSB: Jephthah judged Israel six years, and when he died, he was buried in one of the cities of Gilead.
8 ULB मग त्याच्यामागे बेथलेहेमातल्या इब्सानाने इस्राएलाचा न्याय केला. BSB BSB: After Jephthah, Ibzan of Bethlehem judged Israel.
9 ULB तेव्हा त्यास तीस पुत्र व तीस कन्या होत्या; त्या त्याने बाहेर दिल्या आणि आपल्या पुत्रांसाठी बाहेरून तीस कन्या आणल्या; त्याने सात वर्षे इस्राएलाचा न्याय केला. BSB BSB: He had thirty sons, as well as thirty daughters whom he gave in marriage to men outside his clan; and for his sons he brought back thirty wives from elsewhere. Ibzan judged Israel seven years.
10 ULB नंतर इब्सान मेला, आणि त्यास बेथलेहेमात पुरण्यात आले. BSB BSB: Then Ibzan died, and he was buried in Bethlehem.
11 ULB आणि त्याच्यामागे जबुलूनी एलोन इस्राएलाचा न्यायाधीश झाला; त्याने तर दहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला. BSB BSB: After Ibzan, Elon the Zebulunite judged Israel ten years.
12 ULB नंतर तो जबुलूनी एलोन मेला, आणि त्यास जबुलून देशातल्या अयालोन येथे पुरण्यात आले. BSB BSB: Then Elon the Zebulunite died, and he was buried in Aijalon in the land of Zebulun.
13 ULB आणि त्यानंतर हिल्लेलाचा पुत्र अब्दोन जो पिराथोनी, तो इस्राएलाचा न्यायाधीश झाला. BSB BSB: After Elon, Abdon son of Hillel, from Pirathon, judged Israel.
14 ULB आणि त्यास चाळीस पुत्र व तीस नातू होते; त्यांच्याकडे आपापले गाढव होते ज्यावर जे सवार होत होते; त्याने आठ वर्षे इस्राएलाचा न्याय केला. BSB BSB: He had forty sons and thirty grandsons, who rode on seventy donkeys. And he judged Israel eight years.
15 ULB मग पिराथोनी हिल्लेलाचा पुत्र अब्दोन मेला, आणि त्यास एफ्राइम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोनात पुरण्यात आले. BSB BSB: Then Abdon son of Hillel, from Pirathon, died, and he was buried at Pirathon in Ephraim, in the hill country of the Amalekites.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.