1 ULB त्यादिवशी दबोरा आणि अबीनवामाचा पुत्र बाराक ह्यानी गाइलेले गीत: BSB BSB: On that day Deborah and Barak son of Abinoam sang this song:
2 ULB “इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा. BSB BSB: “When the princes take the lead in Israel, when the people volunteer, bless the LORD.
3 ULB राजानो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वरास गाईन; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन. BSB BSB: Listen, O kings! Give ear, O princes! I will sing to the LORD; I will sing praise to the LORD, the God of Israel.
4 ULB हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलीस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदू गाळले; मेघांनीही जलबिंदू गाळले; BSB BSB: O LORD, when You went out from Seir, when You marched from the land of Edom, the earth trembled, the heavens poured out rain, and the clouds poured down water.
5 ULB परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर हा सीनाय देखील थरारला. BSB BSB: The mountains quaked before the LORD, the One of Sinai, before the LORD, the God of Israel.
6 ULB अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या काळी, याएलेच्या काळी राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करीत. BSB BSB: In the days of Shamgar son of Anath, in the days of Jael, the highways were deserted and the travelers took the byways.
7 ULB मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्राएलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत, इस्राएलात कोणी पुढारी उरले नव्हते; BSB BSB: Life in the villages ceased; it ended in Israel, until I, Deborah, arose, a mother in Israel.
8 ULB लोकांनी नवे देव निवडले तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय? BSB BSB: When they chose new gods, then war came to their gates. Not a shield or spear was found among forty thousand in Israel.
9 ULB माझे मन इस्राएलाच्या अधिपतींकडे लागले आहे ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. BSB BSB: My heart is with the princes of Israel, with the volunteers among the people. Bless the LORD!
10 ULB पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, त्याचे गुणगान करा. BSB BSB: You who ride white donkeys, who sit on saddle blankets, and you who travel the road, ponder
11 ULB पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या न्यायकृत्यांचे, इस्राएलावरील सत्तेसंबंधाने त्याच्या न्यायकृत्यांचे लोक वर्णन करतात त्या वेळी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले. BSB BSB: the voices of the singers at the watering places. There they shall recount the righteous acts of the LORD, the righteous deeds of His villagers in Israel. Then the people of the LORD went down to the gates:
12 ULB जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या पुत्रा, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा. BSB BSB: ‘Awake, awake, O Deborah! Awake, awake, sing a song! Arise, O Barak, and take hold of your captives, O son of Abinoam!’
13 ULB तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्याकरिता वीरांविरुद्ध सामना करावयास उतरले. BSB BSB: Then the survivors came down to the nobles; the people of the LORD came down to me against the mighty.
14 ULB अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले. BSB BSB: Some came from Ephraim, with their roots in Amalek; Benjamin came with your people after you. The commanders came down from Machir, the bearers of the marshal’s staff from Zebulun.
15 ULB इस्साखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले, रऊबेनाच्या पक्षामध्ये मोठी चर्चा झाली. BSB BSB: The princes of Issachar were with Deborah, and Issachar was with Barak, rushing into the valley at his heels. In the clans of Reuben there was great indecision.
16 ULB खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला. BSB BSB: Why did you sit among the sheepfolds to hear the whistling for the flocks? In the clans of Reuben there was great indecision.
17 ULB गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनाऱ्यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यावर बसून राहिला. BSB BSB: Gilead remained beyond the Jordan. Dan, why did you linger by the ships? Asher stayed at the coast and remained in his harbors.
18 ULB जबुलून व नफताली या लोकांनी आपल्या प्रांतांतील उंचवट्यांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला. BSB BSB: Zebulun was a people who risked their lives; Naphtali, too, on the heights of the battlefield.
19 ULB राजे येऊन लढले, तेव्हा कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहापाशी तानख येथे लढले; त्यांना रुप्याची काहीच लूट मिळाली नाही. BSB BSB: Kings came and fought; then the kings of Canaan fought at Taanach by the waters of Megiddo, but they took no plunder of silver.
20 ULB आकाशातून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली. BSB BSB: From the heavens the stars fought; from their courses they fought against Sisera.
21 ULB किशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जीवा, हिंमत धरून पुढे चाल. BSB BSB: The River Kishon swept them away, the ancient river, the River Kishon. March on, O my soul, in strength!
22 ULB तेव्हा घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला. BSB BSB: Then the hooves of horses thundered—the mad galloping of his stallions.
23 ULB परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या त्यातल्या रहिवाश्यांना मोठा शाप द्या; कारण परमेश्वरास साहाय्य करावयास वीरांविरुद्ध परमेश्वरास साहाय्य करावयास ते आले नाहीत. BSB BSB: ‘Curse Meroz,’ says the angel of the LORD. ‘Bitterly curse her inhabitants; for they did not come to help the LORD, to help the LORD against the mighty.’
24 ULB केनी हेबेर यांची स्त्री याएल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य! डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य! BSB BSB: Most blessed among women is Jael, the wife of Heber the Kenite, most blessed of tent-dwelling women.
25 ULB त्याने पाणी मागितले तो तिने त्यास दूध दिले; श्रीमंताना साजेल अशा वाटीत तिने त्यास दही आणून दिले. BSB BSB: He asked for water, and she gave him milk. In a magnificent bowl she brought him curds.
26 ULB तिने आपला एक हात मेखेला आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला; तिने हातोड्याने सीसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले. BSB BSB: She reached for the tent peg, her right hand for the workman’s hammer. She struck Sisera and crushed his skull; she shattered and pierced his temple.
27 ULB तिच्या पायाखाली तो वाकला व पडला, निश्चल झाला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला. BSB BSB: At her feet he collapsed, he fell, there he lay still; at her feet he collapsed, he fell; where he collapsed, there he fell dead.
28 ULB सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथाच्या चाकांना कोणी खीळ घातली? BSB BSB: Sisera’s mother looked through the window; she peered through the lattice and lamented: ‘Why is his chariot so long in coming? What has delayed the clatter of his chariots?’
29 ULB तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले; BSB BSB: Her wisest ladies answer; indeed she keeps telling herself,
30 ULB ‘त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एक एक किंवा दोन-दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्रे लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यांत भुषण म्हणून पांघरण्यासाठी रंगीबेरंगी वस्रे मिळाली नसतील ना?’ BSB BSB: ‘Are they not finding and dividing the spoil—a girl or two for each warrior, a plunder of dyed garments for Sisera, the spoil of embroidered garments for the neck of the looter?’
31 ULB हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला. BSB BSB: So may all Your enemies perish, O LORD! But may those who love You shine like the sun at its brightest.” And the land had rest for forty years.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.