1 ULB हे परमेश्वरा, आमची अवस्था काय झाली याकडे लक्ष लाव. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक. BSB BSB: Remember, O LORD, what has happened to us. Look and see our disgrace!
2 ULB आमचे वतन परक्यांच्या हातात गेले आहे. आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत. BSB BSB: Our inheritance has been turned over to strangers, our houses to foreigners.
3 ULB आम्ही अनाथ झालो. आम्हास वडील नाहीत. आमच्या मातांची स्थिती विधवांसारखी झाली आहे. BSB BSB: We have become fatherless orphans; our mothers are widows.
4 ULB आम्हास पिण्याच्या पाण्यासाठी रूपे द्यावे लागतात; आमचेच लाकूड आम्हास विकले जाते. BSB BSB: We must buy the water we drink; our wood comes at a price.
5 ULB आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत. आम्ही दमलो आहोत. आम्हास विश्रांती नाही. BSB BSB: We are closely pursued; we are weary and find no rest.
6 ULB पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्यासमोर आम्ही आपले हात पुढे केले. BSB BSB: We submitted to Egypt and Assyria to get enough bread.
7 ULB आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत. BSB BSB: Our fathers sinned and are no more, but we bear their punishment.
8 ULB गुलाम आमच्यावर राज्य करतात. त्यांच्या हातातून आम्हास कोणीही वाचवायला नाही. BSB BSB: Slaves rule over us; there is no one to deliver us from their hands.
9 ULB राणात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत घेऊन आपले अन्न मिळवतो. BSB BSB: We get our bread at the risk of our lives because of the sword in the wilderness.
10 ULB आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत. भुकेमुळे आम्हास ताप चढला आहे. BSB BSB: Our skin is as hot as an oven with fever from our hunger.
11 ULB सियोनेतील स्त्रियांवर आणि यहूदा नगरातील कुमारीवर त्यांनी अत्याचार केला; BSB BSB: Women have been ravished in Zion, virgins in the cities of Judah.
12 ULB त्यांनी आमच्या राजपुत्रांना फासावर दिले; आमच्या वडीलधाऱ्यांचा त्यांनी सन्मान केला नाही. BSB BSB: Princes have been hung up by their hands; elders receive no respect.
13 ULB आमच्या तरुणांना त्यांनी पिठाच्या जात्यावर दळावयास लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले. BSB BSB: Young men toil at millstones; boys stagger under loads of wood.
14 ULB वृध्द आता नगरीच्या द्वारात बसत नाहीत. तरुण गायनवादन करीत नाहीत. BSB BSB: The elders have left the city gate; the young men have stopped their music.
15 ULB आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही. BSB BSB: Joy has left our hearts; our dancing has turned to mourning.
16 ULB आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. म्हणून आम्हास हाय. BSB BSB: The crown has fallen from our head. Woe to us, for we have sinned!
17 ULB या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हास डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही. BSB BSB: Because of this, our hearts are faint; because of these, our eyes grow dim—
18 ULB सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत. सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात. BSB BSB: because of Mount Zion, which lies desolate, patrolled by foxes.
19 ULB पण परमेश्वरा, तुझी सत्ता निरंतन आहे. तुझे राजसिंहासन चिरकाल राहील. BSB BSB: You, O LORD, reign forever; Your throne endures from generation to generation.
20 ULB परमेश्वर तू आम्हास कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हास दीर्घकाल सोडून गेला आहेस. BSB BSB: Why have You forgotten us forever? Why have You forsaken us for so long?
21 ULB परमेश्वरा, आम्हास तुझ्याकडे परत वळव. आम्ही आमच्या पातकाकरिता पश्चाताप करितो. पूर्वीप्रमाणेच आमच्या जुन्या दिवसाची पुनर्स्थापना कर. BSB BSB: Restore us to Yourself, O LORD, so we may return; renew our days as of old,
22 ULB तोपर्यंत आमचा धिक्कार होऊन आमच्याप्रती तुझा क्रोध अतिभयंकर असेल. BSB BSB: unless You have utterly rejected us and remain angry with us beyond measure.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.