1 ULB परमेश्वर मोशेला म्हणाला, BSB BSB: Then the LORD said to Moses,
2 ULB “इस्राएल लोकांस असे सांग. परमेश्वराने नेमलेल सण, पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे; ते माझे नेमलेले पवित्रसण असे: BSB BSB: “Speak to the Israelites and say to them, ‘These are My appointed feasts, the feasts of the LORD that you are to proclaim as sacred assemblies.
3 ULB सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा. BSB BSB: For six days work may be done, but the seventh day is a Sabbath of complete rest, a day of sacred assembly. You must not do any work; wherever you live, it is a Sabbath to the LORD.
4 ULB परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे, BSB BSB: These are the LORD’s appointed feasts, the sacred assemblies you are to proclaim at their appointed times.
5 ULB पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळपासून परमेश्वराचा वल्हांडण सण आहे. BSB BSB: The Passover to the LORD begins at twilight on the fourteenth day of the first month.
6 ULB त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचा बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर (खमीर न घातलेली भाकर खावी). BSB BSB: On the fifteenth day of the same month begins the Feast of Unleavened Bread to the LORD. For seven days you must eat unleavened bread.
7 ULB सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये. BSB BSB: On the first day you are to hold a sacred assembly; you are not to do any regular work.
8 ULB सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्नीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी काही काम करु नये.” BSB BSB: For seven days you are to present a food offering to the LORD. On the seventh day there shall be a sacred assembly; you must not do any regular work.’”
9 ULB परमेश्वर मोशेला म्हणाला, BSB BSB: And the LORD said to Moses,
10 ULB “इस्राएल लोकांस सांग: मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी; BSB BSB: “Speak to the Israelites and say, ‘When you enter the land that I am giving you and you reap its harvest, you are to bring to the priest a sheaf of the firstfruits of your harvest.
11 ULB याजकाने ती पेंढी शब्बाथाच्या दुसऱ्या दिवशी परमेश्वरासमोर ओवाळावी म्हणजे ती तुमच्यासाठी मान्य होईल. शब्बाथाच्या पुढच्या दिवशी ती याजकाने आेवाळावी. BSB BSB: And he shall wave the sheaf before the LORD so that it may be accepted on your behalf; the priest is to wave it on the day after the Sabbath.
12 ULB पेंढी ओवाळाल त्यादिवशी निर्दोष अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण परमेश्वरासाठी करावे; BSB BSB: On the day you wave the sheaf, you shall offer a year-old lamb without blemish as a burnt offering to the LORD,
13 ULB तुम्ही त्याचबरोबर तेलात मळलेल्या दोन दशमांश सपिठा अन्नार्पण अर्पावे. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; आणि त्या बरोबरचे पेयार्पण म्हणून एकचतुर्थांश हीन द्राक्षारस अर्पावा. BSB BSB: along with its grain offering of two-tenths of an ephah of fine flour mixed with oil—a food offering to the LORD, a pleasing aroma—and its drink offering of a quarter hin of wine.
14 ULB तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल, त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर, किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे रहाल तेथे तुमच्याकरिता हा नियम पिढ्यानपिढ्या कायमचा चालू राहील. BSB BSB: You must not eat any bread or roasted or new grain until the very day you have brought this offering to your God. This is to be a permanent statute for the generations to come, wherever you live.
15 ULB तुम्ही शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून सात शब्बाथ दिवस मोजावे; BSB BSB: From the day after the Sabbath, the day you brought the sheaf of the wave offering, you are to count off seven full weeks.
16 ULB सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे. BSB BSB: You shall count off fifty days until the day after the seventh Sabbath, and then present an offering of new grain to the LORD.
17 ULB त्यादिवशी तुम्ही आपल्या घरातून दोन दशांश एफाभर मैद्याच्या, खमीर घालून भाजलेल्या दोन भाकरी ओवाळण्यासाठी आणाव्या; परमेश्वराकरिता हे पहिल्या उपजाचे अर्पण होय. BSB BSB: Bring two loaves of bread from your dwellings as a wave offering, each made from two-tenths of an ephah of fine flour, baked with leaven, as the firstfruits to the LORD.
18 ULB एक गोऱ्हा, दोन मेंढे व प्रत्येकी एक वर्षाची सात नर कोकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पण आणि पेयार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वरास संतोष होईल. BSB BSB: Along with the bread you are to present seven unblemished male lambs a year old, one young bull, and two rams. They will be a burnt offering to the LORD, together with their grain offerings and drink offerings—a food offering, a pleasing aroma to the LORD.
19 ULB आणि पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणासाठी प्रत्येकी एक वर्षाची दोन नर कोंकरे अर्पावित. BSB BSB: You shall also prepare one male goat as a sin offering and two male lambs a year old as a peace offering.
20 ULB याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी. BSB BSB: The priest is to wave the lambs as a wave offering before the LORD, together with the bread of the firstfruits. The bread and the two lambs shall be holy to the LORD for the priest.
21 ULB त्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; तुम्ही कोणतेही काम करु नये; तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हास पिढ्यानपिढ्या निरंतरचा नियम होय. BSB BSB: On that same day you are to proclaim a sacred assembly, and you must not do any regular work. This is to be a permanent statute wherever you live for the generations to come.
22 ULB तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करु नका आणि सरवा वेचू नका; गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी तो राहू द्या, मी तुमचा देव परमेश्वर आहे!” BSB BSB: When you reap the harvest of your land, do not reap all the way to the edges of your field or gather the gleanings of your harvest. Leave them for the poor and the foreign resident. I am the LORD your God.’”
23 ULB आणखी परमेश्वर मोशेला म्हणाला, BSB BSB: The LORD also said to Moses,
24 ULB “इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी; BSB BSB: “Speak to the Israelites and say, ‘On the first day of the seventh month you are to have a day of rest, a sacred assembly announced by trumpet blasts.
25 ULB तुम्ही कोणतेही काम करु नये; तर तुम्ही परमेश्वरास अर्पण अर्पावे.” BSB BSB: You must not do any regular work, but you are to present a food offering to the LORD.’”
26 ULB परमेश्वर मोशेला म्हणाला, BSB BSB: Again the LORD said to Moses,
27 ULB “सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करून नम्र व्हावे व परमेश्वरास अर्पण अर्पावे. BSB BSB: “The tenth day of this seventh month is the Day of Atonement. You shall hold a sacred assembly and humble yourselves, and present a food offering to the LORD.
28 ULB त्यादिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवस आहे; त्यादिवशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल. BSB BSB: On this day you are not to do any work, for it is the Day of Atonement, when atonement is made for you before the LORD your God.
29 ULB त्यादिवशी जो मनुष्य काही न खाता आपल्या जिवास ताडन करून आपणाला नम्र करणार नाही त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. BSB BSB: If anyone does not humble himself on this day, he must be cut off from his people.
30 ULB त्यादिवशी कोणाही मनुष्याने जर कसलेही काम केले तर मी देव त्यास त्याच्या लोकातून नाहीसा करीन. BSB BSB: I will destroy from among his people anyone who does any work on this day.
31 ULB तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहत असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हास हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय. BSB BSB: You are not to do any work at all. This is a permanent statute for the generations to come, wherever you live.
32 ULB तो दिवस तुम्हास पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्यादिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास ताडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.” BSB BSB: It will be a Sabbath of complete rest for you, and you shall humble yourselves. From the evening of the ninth day of the month until the following evening you are to keep your Sabbath.”
33 ULB परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला, BSB BSB: And the LORD said to Moses,
34 ULB “इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा; BSB BSB: “Speak to the Israelites and say, ‘On the fifteenth day of the seventh month the Feast of Tabernacles to the LORD begins, and it continues for seven days.
35 ULB पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी कसलेही काम करु नये. BSB BSB: On the first day there shall be a sacred assembly. You must not do any regular work.
36 ULB सात दिवस परमेश्वरास अर्पण अर्पावे; आठव्या दिवशी दुसरा पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशीही परमेश्वरास अर्पण अर्पावे; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये. BSB BSB: For seven days you are to present a food offering to the LORD. On the eighth day you are to hold a sacred assembly and present a food offering to the LORD. It is a solemn assembly; you must not do any regular work.
37 ULB परमेश्वराने हे सण नेमलेले आहेत: त्यादिवशी पवित्र मेळे भरवावेत; त्यामध्ये योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण परमेश्वरास अर्पावे. BSB BSB: These are the LORD’s appointed feasts, which you are to proclaim as sacred assemblies for presenting food offerings to the LORD—burnt offerings and grain offerings, sacrifices and drink offerings, each on its designated day.
38 ULB परमेश्वराच्या नेहमीच्या शब्बाथ पालना शिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत; तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडीची अर्पणे, तुम्ही परमेश्वरास अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे, ह्यांच्यात भर घालणारी अर्पणे असावीत. BSB BSB: These offerings are in addition to the offerings for the LORD’s Sabbaths, and in addition to your gifts, to all your vow offerings, and to all the freewill offerings you give to the LORD.
39 ULB जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसापर्यंत परमेश्वराकरिता सण पाळावा; त्यातील पहिला दिवस व आठवा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. BSB BSB: On the fifteenth day of the seventh month, after you have gathered the produce of the land, you are to celebrate a feast to the LORD for seven days. There shall be complete rest on the first day and also on the eighth day.
40 ULB पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन तुमचा देव परमेश्वर यासमोर सात दिवस उत्सव करावा. BSB BSB: On the first day you are to gather the fruit of majestic trees, the branches of palm trees, and the boughs of leafy trees and of willows of the brook. And you are to rejoice before the LORD your God for seven days.
41 ULB प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा. BSB BSB: You are to celebrate this as a feast to the LORD for seven days each year. This is a permanent statute for the generations to come; you are to celebrate it in the seventh month.
42 ULB तुम्ही सात दिवस तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात रहावे; जन्मापासून जे इस्राएल आहेत त्या सर्वानी मांडवात रहावे, BSB BSB: You are to dwell in booths for seven days. All the native-born of Israel must dwell in booths,
43 ULB म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात रहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे!” BSB BSB: so that your descendants may know that I made the Israelites dwell in booths when I brought them out of the land of Egypt. I am the LORD your God.’”
44 ULB तेव्हा ह्याप्रमाणे परमेश्वराने नेमिलेले सण मोशेने इस्राएल लोकांस कळवले. BSB BSB: So Moses announced to the Israelites the appointed feasts of the LORD.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.