1 ULB परमेश्वर मोशेला म्हणाला, BSB BSB: Then the LORD said to Moses,
2 ULB अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन, BSB BSB: “Take Aaron and his sons, their garments, the anointing oil, the bull of the sin offering, the two rams, and the basket of unleavened bread,
3 ULB दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण. BSB BSB: and assemble the whole congregation at the entrance to the Tent of Meeting.”
4 ULB परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. मंडळी दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमली. BSB BSB: So Moses did as the LORD had commanded him, and the assembly gathered at the entrance to the Tent of Meeting.
5 ULB मग मोशे मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले, ते हे.” BSB BSB: And Moses said to them, “This is what the LORD has commanded to be done.”
6 ULB मग मोशेने अहरोन व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली. BSB BSB: Then Moses presented Aaron and his sons and washed them with water.
7 ULB मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्यास झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि त्यावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळून बांधली. BSB BSB: He put the tunic on Aaron, tied the sash around him, clothed him with the robe, and put the ephod on him. He tied the woven band of the ephod around him and fastened it to him.
8 ULB मग मोशेने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले; BSB BSB: Then he put the breastpiece on him and placed the Urim and Thummim in the breastpiece.
9 ULB नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला; आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट ठेवला; परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते, तसेच मोशेने केले. BSB BSB: Moses also put the turban on Aaron’s head and set the gold plate, the holy diadem, on the front of the turban, as the LORD had commanded him.
10 ULB मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवासमंडपावर व त्यातील सर्व वस्तूंना आभिषेक करुन त्यांना पवित्र केले. BSB BSB: Next, Moses took the anointing oil and anointed the tabernacle and everything in it; and so he consecrated them.
11 ULB अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडून पवित्र केले. BSB BSB: He sprinkled some of the oil on the altar seven times, anointing the altar and all its utensils, and the basin with its stand, to consecrate them.
12 ULB मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करून त्यास पवित्र केले. BSB BSB: He also poured some of the anointing oil on Aaron’s head and anointed him to consecrate him.
13 ULB मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. BSB BSB: Then Moses presented Aaron’s sons, put tunics on them, wrapped sashes around them, and tied headbands on them, just as the LORD had commanded him.
14 ULB मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. BSB BSB: Moses then brought the bull near for the sin offering, and Aaron and his sons laid their hands on its head.
15 ULB मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंगांना ते लावले, अशाप्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि उरलेले रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले, देवासाठी त्याने ती वेगळी केली. या प्रकारे ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले. BSB BSB: Moses slaughtered the bull, took some of the blood, and applied it with his finger to all four horns of the altar, purifying the altar. He poured out the rest of the blood at the base of the altar and consecrated it so that atonement could be made on it.
16 ULB गोऱ्हाच्या आंतड्यावरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबीसहीत दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला. BSB BSB: Moses also took all the fat that was on the entrails, the lobe of the liver, and both kidneys and their fat, and burned it all on the altar.
17 ULB परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले. BSB BSB: But the bull with its hide, flesh, and dung he burned outside the camp, as the LORD had commanded him.
18 ULB मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. BSB BSB: Then Moses presented the ram for the burnt offering, and Aaron and his sons laid their hands on its head.
19 ULB मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले. BSB BSB: Moses slaughtered the ram and splattered the blood on all sides of the altar.
20 ULB मग मोशेने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला. BSB BSB: He cut the ram into pieces and burned the head, the pieces, and the fat.
21 ULB त्याची आतडी पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वरासाठी सुवासिक हव्य झाले, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. BSB BSB: He washed the entrails and legs with water and burned the entire ram on the altar as a burnt offering, a pleasing aroma, a food offering to the LORD, just as the LORD had commanded Moses.
22 ULB मग मोशेने दुसरा मेंढा आणला; तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरिता होता. अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले. BSB BSB: After that, Moses presented the other ram, the ram of ordination, and Aaron and his sons laid their hands on its head.
23 ULB मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला: उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले. BSB BSB: Moses slaughtered the ram and took some of its blood and put it on Aaron’s right earlobe, on the thumb of his right hand, and on the big toe of his right foot.
24 ULB मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले. BSB BSB: Moses also presented Aaron’s sons and put some of the blood on their right earlobes, on the thumbs of their right hands, and on the big toes of their right feet. Then he splattered the blood on all sides of the altar.
25 ULB मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील सर्व चरबी काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली; BSB BSB: And Moses took the fat—the fat tail, all the fat that was on the entrails, the lobe of the liver, and both kidneys with their fat—as well as the right thigh.
26 ULB परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतील एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या, चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या. BSB BSB: And from the basket of unleavened bread that was before the LORD, he took one cake of unleavened bread, one cake of bread made with oil, and one wafer, and he placed them on the fat portions and on the right thigh.
27 ULB हे सर्व त्याने अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले. BSB BSB: He put all these in the hands of Aaron and his sons and waved them before the LORD as a wave offering.
28 ULB मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहीत त्यांचा होम केला; अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते हे सुवासीक हव्य होय. हे अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण होते. BSB BSB: Then Moses took these from their hands and burned them on the altar with the burnt offering. This was an ordination offering, a pleasing aroma, a food offering to the LORD.
29 ULB मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला; याजकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले. BSB BSB: He also took the breast—Moses’ portion of the ram of ordination—and waved it before the LORD as a wave offering, as the LORD had commanded him.
30 ULB मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहीत त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे पवित्र केली. BSB BSB: Next, Moses took some of the anointing oil and some of the blood that was on the altar and sprinkled them on Aaron and his garments, and on his sons and their garments. So he consecrated Aaron and his garments, as well as Aaron’s sons and their garments.
31 ULB मोशे अहरोन व त्याचे पुत्र ह्याना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा. BSB BSB: And Moses said to Aaron and his sons, “Boil the meat at the entrance to the Tent of Meeting and eat it there with the bread that is in the basket of ordination offerings, as I commanded, saying, ‘Aaron and his sons are to eat it.’
32 ULB मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका; BSB BSB: Then you must burn up the remainder of the meat and bread.
33 ULB तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये. BSB BSB: You must not go outside the entrance to the Tent of Meeting for seven days, until the days of your ordination are complete; for it will take seven days to ordain you.
34 ULB परमेश्वराने आज्ञा केली आहे की आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे. BSB BSB: What has been done today has been commanded by the LORD in order to make atonement on your behalf.
35 ULB तेव्हा दर्शनमंडपाच्या दारापाशी तुम्ही सात दिवस व रात्री राहा, ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाहीतर तुम्ही मराल; कारण मला तशी आज्ञा दिली आहे.” BSB BSB: You must remain at the entrance to the Tent of Meeting day and night for seven days and keep the LORD’s charge so that you will not die, for this is what I have been commanded.”
36 ULB तेव्हा मोशेच्याद्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केल्या. BSB BSB: So Aaron and his sons did everything the LORD had commanded through Moses.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.