1 ULB ऐकणाऱ्या लोकांस त्याने आपली सर्व वचने सांगणे संपवल्यानंतर त्याने कफर्णहूमात प्रवेश केला. BSB BSB: When Jesus had concluded His discourse in the hearing of the people, He went to Capernaum.
2 ULB तेव्हा कोणाएका शताधीपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता. BSB BSB: There a highly valued servant of a centurion was sick and about to die.
3 ULB मग त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून, तू येऊन माझ्या दासास वाचवावे, अशी त्यास विनंती केली. BSB BSB: When the centurion heard about Jesus, he sent some Jewish elders to ask Him to come and heal his servant.
4 ULB जेव्हा ते येशूजवळ आले तेव्हा त्यांनी त्यास आग्रहाने विनंती केली, ज्याच्यासाठी तू हे करावे, तो योग्य आहे. BSB BSB: They came to Jesus and pleaded with Him earnestly, “This man is worthy to have You grant this,
6 ULB त्यामूळे येशू त्यांच्याबरोबर मार्गात चालत गेला आणि तो घरापासून फार दूर नव्हता, तोच त्या शताधीपतीने मित्रांना त्यांच्याकडे पाठवून म्हटले, प्रभू, आपण त्रास करून घेऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावे असा मी योग्य नाही. BSB BSB: So Jesus went with them. But when He was not far from the house, the centurion sent friends with the message: “Lord, do not trouble Yourself, for I am not worthy to have You come under my roof.
7 ULB त्यामुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा सेवक बरा होईल. BSB BSB: That is why I did not consider myself worthy to come to You. But just say the word, and my servant will be healed.
8 ULB कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला मनुष्य असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत; आणि याला मी म्हणतो, जा, म्हणजे हा जातो व दुसऱ्याला ये म्हणतो, म्हणजे तो येतो आणि माझ्या दासास म्हणतो, हे कर, म्हणजे तो ते करतो. BSB BSB: For I myself am a man under authority, with soldiers under me. I tell one to go, and he goes, and another to come, and he comes. I tell my servant to do something, and he does it.”
9 ULB जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्यास त्याच्याविषयी आश्चर्य वाटले, तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, “मी तुम्हास सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.” BSB BSB: When Jesus heard this, He marveled at the centurion. Turning to the crowd following Him, He said, “I tell you, not even in Israel have I found such great faith.”
10 ULB आणि जे पाठवलेले होते, ते घरी परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे. BSB BSB: And when the messengers returned to the house, they found the servant in good health.
11 ULB आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की, तो नाईन नावाच्या नगराकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते. BSB BSB: Soon afterward, Jesus went to a town called Nain. His disciples went with Him, accompanied by a large crowd.
12 ULB जसा तो गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा पाहा कोणाएका मरण पावलेल्या मनुष्यास बाहेर घेऊन जात होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती; आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. BSB BSB: As He approached the town gate, He saw a dead man being carried out, the only son of his mother, and she was a widow. And a large crowd from the town was with her.
13 ULB तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला “रडू नकोस” BSB BSB: When the Lord saw her, He had compassion on her and said, “Do not weep.”
14 ULB मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले आणि तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ! BSB BSB: Then He went up and touched the coffin, and those carrying it stood still. “Young man,” He said, “I tell you, get up!”
15 ULB आणि तो मरण पावलेला उठून बसला व बोलू लागला; मग येशूने त्यास त्याच्या आईजवळ दिले. BSB BSB: And the dead man sat up and began to speak! Then Jesus gave him back to his mother.
16 ULB तेव्हा सर्वांना भय वाटले आणि ते देवाला गौरव करीत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे” BSB BSB: A sense of awe swept over all of them, and they glorified God. “A great prophet has appeared among us!” they said. “God has visited His people!”
17 ULB येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीया प्रांतात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली. BSB BSB: And the news about Jesus spread throughout Judea and all the surrounding region.
18 ULB योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्वकाही सांगितले, BSB BSB: Then John’s disciples informed him about all these things.
19 ULB नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलावले आणि त्याने त्यांना प्रभूकडे हे विचारण्यासाठी पाठवले की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? BSB BSB: So John called two of his disciples and sent them to ask the Lord, “Are You the One who was to come, or should we look for someone else?”
20 ULB जेव्हा ते लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हास तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” BSB BSB: When the men came to Jesus, they said, “John the Baptist sent us to ask, ‘Are You the One who was to come, or should we look for someone else?’”
21 ULB त्याच घटकेस येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील दुष्ट आत्मे काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली. BSB BSB: At that very hour Jesus healed many people of their diseases, afflictions, and evil spirits, and He gave sight to many who were blind.
22 ULB येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा, आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात. BSB BSB: So He replied, “Go back and report to John what you have seen and heard: The blind receive sight, the lame walk, the lepers are cleansed, the deaf hear, the dead are raised, and the good news is preached to the poor.
23 ULB आणि जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य आहे.” BSB BSB: Blessed is the one who does not fall away on account of Me.”
24 ULB मग योहानाचे निरोपे गेल्यावर तो योहानाविषयी समुदायांशी बोलू लागला, “तुम्ही काय पाहायला बाहेर रानात गेला? वाऱ्याने हलवलेला बोरू काय? BSB BSB: After John’s messengers had left, Jesus began to speak to the crowds about John: “What did you go out into the wilderness to see? A reed swaying in the wind?
25 ULB तर तुम्ही काय पाहायला बाहेर गेला? मऊ वस्त्रे घातलेल्या मनुष्यास काय? पाहा, भडक पोषाख घातलेले व चैनीत असणारे लोक राजवाड्यांत असतात. BSB BSB: Otherwise, what did you go out to see? A man dressed in fine clothes? Look, those who wear elegant clothing and live in luxury are found in palaces.
26 ULB तर तुम्ही काय पाहायाला बाहेर गेला? संदेष्ट्याला काय? होय, मी तुम्हास सांगतो, संदेष्ट्याहूनही जो अधिक मोठा आहे त्याला. BSB BSB: What then did you go out to see? A prophet? Yes, I tell you, and more than a prophet.
27 ULB पाहा, ‘मी आपल्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो; तो तुझ्यापुढे तुझी वाट तयार करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. BSB BSB: This is the one about whom it is written: ‘Behold, I will send My messenger ahead of You, who will prepare Your way before You.’
28 ULB मी तुम्हास सांगतो की स्त्रियांपासून जे जन्मले त्यांच्यांमध्ये योहानापेक्षा मोठा असा कोणी नाही, तरी देवाच्या राज्यांत जो अगदी लहान आहे, तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.” BSB BSB: I tell you, among those born of women there is no one greater than John, yet even the least in the kingdom of God is greater than he.”
29 ULB आणि जकातदारांसह सर्व लोकांनी ऐकून ‘देव न्यायी आहे’ असे ठरवले कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता. BSB BSB: All the people who heard this, even the tax collectors, acknowledged God’s justice. For they had received the baptism of John.
30 ULB परंतु परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा न घेऊन आपल्या संबंधीची देवाची योजना धिक्कारली. BSB BSB: But the Pharisees and experts in the law rejected God’s purpose for themselves, because they had not been baptized by John.
31 ULB प्रभूने म्हटले, “तर मग मी या पिढीच्या मनुष्यांना कोणती उपमा देऊ? आणि ती कशासारखी आहेत? BSB BSB: “To what, then, can I compare the men of this generation? What are they like?
32 ULB जी मुले बाजारामध्ये बसून एकमेकांना हाक मारतात त्यांच्यासारखी ती आहेत, ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही विलाप केला तरी तुम्ही रडला नाही. BSB BSB: They are like children sitting in the marketplace and calling out to one another: ‘We played the flute for you, and you did not dance; we sang a dirge, and you did not weep.’
33 ULB कारण बाप्तिस्मा करणारा योहान भाकर न खाता आणि द्राक्षारस न पिता आला आहे आणि तुम्ही म्हणता, त्यास भूत लागले आहे. BSB BSB: For John the Baptist came neither eating bread nor drinking wine, and you say, ‘He has a demon!’
34 ULB मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाडा मनुष्य व दारूबाज, जकातदारांचा व पाप्यांचा मित्र! BSB BSB: The Son of Man came eating and drinking, and you say, ‘Look at this glutton and drunkard, a friend of tax collectors and sinners!’
35 ULB परंतु ज्ञान आपल्या सर्व लेकरांकडून न्यायी ठरलेले आहे.” BSB BSB: But wisdom is vindicated by all her children.”
36 ULB तेव्हा परूश्यांपैकी कोणा एकाने, “तू माझ्याबरोबर जेवावे.” अशी येशूला विनंती केली. मग तो परूश्याच्या घरात जाऊन जेवायला बसला. BSB BSB: Then one of the Pharisees invited Jesus to eat with him, and He entered the Pharisee’s house and reclined at the table.
37 ULB आणि पाहा, कोणीएक पापी स्त्री त्या नगरांत होती; येशू परूश्यांच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकू ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. BSB BSB: When a sinful woman from that town learned that Jesus was dining there, she brought an alabaster jar of perfume.
38 ULB आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले. BSB BSB: As she stood behind Him at His feet weeping, she began to wet His feet with her tears and wipe them with her hair. Then she kissed His feet and anointed them with the perfume.
39 ULB तेव्हा ज्या परूश्याने येशूला बोलावले होते, त्याने हे पाहून आपल्या मनांत म्हटले, “हा संदेष्टा असता तर जी स्त्री त्यास स्पर्श करीत आहे ती कोण व कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्यास कळले असते.” BSB BSB: When the Pharisee who had invited Jesus saw this, he said to himself, “If this man were a prophet, He would know who this is and what kind of woman is touching Him—for she is a sinner!”
40 ULB तेव्हा येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “शिमोना, तुझ्याशी मला काही बोलायचे आहे.” तेव्हा तो म्हणाला, “गुरूजी बोला.” BSB BSB: But Jesus answered him, “Simon, I have something to tell you.” “Tell me, Teacher,” he said.
41 ULB येशूने म्हटले, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला चांदीचे पाचशे नाणे व दुसऱ्याला पन्नास असे देणे होते. BSB BSB: “Two men were debtors to a certain moneylender. One owed him five hundred denarii, and the other fifty.
42 ULB परंतु कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने दोघांना क्षमा केली. तर त्यांच्यापैकी कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?” BSB BSB: When they were unable to repay him, he forgave both of them. Which one, then, will love him more?”
43 ULB तेव्हा शिमोनाने उत्तर देऊन म्हटले, “ज्याला अधिक माफ केले तो, असे मला वाटते.” मग येशू त्यास म्हणाला, “ठीक ठरवलेस.” BSB BSB: “I suppose the one who was forgiven more,” Simon replied. “You have judged correctly,” Jesus said.
44 ULB तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “ही स्त्री तुला दिसते ना? मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले आणि आपल्या केसांनी ते पुसले. BSB BSB: And turning toward the woman, He said to Simon, “Do you see this woman? When I entered your house, you did not give Me water for My feet, but she wet My feet with her tears and wiped them with her hair.
45 ULB तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही, BSB BSB: You did not greet Me with a kiss, but she has not stopped kissing My feet since I arrived.
46 ULB तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले आहे. BSB BSB: You did not anoint My head with oil, but she has anointed My feet with perfume.
47 ULB या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे; कारण हिने पुष्कळ प्रीती केली; परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो.” BSB BSB: Therefore I tell you, her many sins have been forgiven, for she has loved much. But he who has been forgiven little loves little.”
48 ULB तेव्हा येशूने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” BSB BSB: Then Jesus said to her, “Your sins are forgiven.”
49 ULB मग त्याच्याबरोबर जेवायला बसले होते ते आपसांत म्हणू लागले, “पापांची देखील क्षमा करणारा हा कोण आहे?” BSB BSB: But those at the table began to say to themselves, “Who is this who even forgives sins?”
50 ULB मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.” BSB BSB: And Jesus told the woman, “Your faith has saved you; go in peace.”