1 ULB मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. BSB BSB: Once again Jesus entered the synagogue, and a man with a withered hand was there.
2 ULB येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. BSB BSB: In order to accuse Jesus, they were watching to see if He would heal on the Sabbath.
3 ULB येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा.” BSB BSB: Then Jesus said to the man with the withered hand, “Stand up among us.”
4 ULB नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” पण ते गप्प राहीले. BSB BSB: And He asked them, “Which is lawful on the Sabbath: to do good or to do evil, to save life or to destroy it?” But they were silent.
5 ULB मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात लांब कर,” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. BSB BSB: Jesus looked around at them with anger and sorrow at their hardness of heart. Then He said to the man, “Stretch out your hand.” So he stretched it out, and it was restored.
6 ULB नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्यास जीवे मारणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करीत बसले. BSB BSB: At this, the Pharisees went out and began plotting with the Herodians how they might kill Jesus.
7 ULB मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला. BSB BSB: So Jesus withdrew with His disciples to the sea, accompanied by a large crowd from Galilee, Judea,
8 ULB यरुशलेम शहर, इदोम प्रांत, यार्देने नदीच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सिदोन शहराच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला. BSB BSB: Jerusalem, Idumea, the region beyond the Jordan, and the vicinity of Tyre and Sidon. The large crowd came to Him when they heard what great things He was doing.
9 ULB मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. BSB BSB: Jesus asked His disciples to have a boat ready for Him so that the crowd would not crush Him.
10 ULB कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते. BSB BSB: For He had healed so many that all who had diseases were pressing forward to touch Him.
11 ULB जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!” BSB BSB: And when the unclean spirits saw Him, they fell down before Him and cried out, “You are the Son of God!”
12 ULB पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका. BSB BSB: But He warned them sternly not to make Him known.
13 ULB मग येशू डोंगरावर चढून गेला व त्यास जे शिष्य हवे होते? त्यांना त्याने स्वतःकडे बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. BSB BSB: Then Jesus went up on the mountain and called for those He wanted, and they came to Him.
14 ULB तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली त्यांना त्याने प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्यासोबत असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्यास पाठवता यावे. BSB BSB: He appointed twelve of them, whom He designated as apostles, to accompany Him, to be sent out to preach,
15 ULB व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा. BSB BSB: and to have authority to drive out demons.
16 ULB मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्यास पेत्र हे नाव दिले. BSB BSB: These are the twelve He appointed: Simon (whom He named Peter),
18 ULB अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी BSB BSB: Andrew, Philip, Bartholomew, Matthew, Thomas, James son of Alphaeus, Thaddaeus, Simon the Zealot,
19 ULB आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला. BSB BSB: and Judas Iscariot, who betrayed Jesus.
20 ULB मग येशू घरी आला आणि पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवता सुद्धा येईना. BSB BSB: Then Jesus went home, and once again a crowd gathered, so that He and His disciples could not even eat.
21 ULB त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास धरावयास निघाले कारण त्यास वेड लागले असे त्यांचे म्हणणे होते. BSB BSB: When His family heard about this, they went out to take custody of Him, saying, “He is out of His mind.”
23 ULB मग येशूने त्यांना आपणाजवळ बोलावून दाखल्याच्या साहाय्याने त्यांना सांगू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील? BSB BSB: So Jesus called them together and began to speak to them in parables: “How can Satan drive out Satan?
24 ULB आपापसात फूट पडलेले राज्य टिकू शकत नाही. BSB BSB: If a kingdom is divided against itself, it cannot stand.
25 ULB आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही. BSB BSB: If a house is divided against itself, it cannot stand.
26 ULB जर सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही, तर त्याचा शेवट होईल. BSB BSB: And if Satan is divided and rises against himself, he cannot stand; his end has come.
27 ULB खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान मनुष्यास बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल. BSB BSB: Indeed, no one can enter a strong man’s house to steal his possessions unless he first ties up the strong man. Then he can plunder his house.
28 ULB मी तुम्हास खरे सांगतो की, लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल. BSB BSB: Truly I tell you, the sons of men will be forgiven all sins and blasphemies, as many as they utter.
29 ULB पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे. BSB BSB: But whoever blasphemes against the Holy Spirit will never be forgiven; he is guilty of eternal sin.”
30 ULB येशू असे म्हणाला कारण त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे असे ते त्याच्याविषयी म्हणत होते.” BSB BSB: Jesus made this statement because they were saying, “He has an unclean spirit.”
31 ULB तेव्हा येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्यास बोलावले. BSB BSB: Then Jesus’ mother and brothers came and stood outside. They sent someone in to summon Him,
32 ULB लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.” BSB BSB: and a crowd was sitting around Him. “Look,” He was told, “Your mother and brothers are outside, asking for You.”
33 ULB त्याने त्यांना उत्तर दिले, “माझे आई व माझे भाऊ कोण आहेत?” BSB BSB: But Jesus replied, “Who are My mother and My brothers?”
34 ULB मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, “पाहा माझी आई आणि माझे भाऊ. BSB BSB: Looking at those seated in a circle around Him, He said, “Here are My mother and My brothers!
35 ULB जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई.” BSB BSB: For whoever does the will of God is My brother and sister and mother.”