2 ULB शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवीत होता. पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “या मनुष्यास ही शिकवण कोठून मिळाली? त्यास देवाने कोणते ज्ञान दिले आहे आणि याच्या हातून हे केवढे चमत्कार होतात? BSB BSB: When the Sabbath came, He began to teach in the synagogue, and many who heard Him were astonished. “Where did this man get these ideas?” they asked. “What is this wisdom He has been given? And how can He perform such miracles?
4 ULB मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या नगरात, त्याच्या नातेवाईकात आणि त्याच्या कुटुंबात त्याचा सन्मान होत नसतो.” BSB BSB: Then Jesus said to them, “Only in his hometown, among his relatives, and in his own household is a prophet without honor.”
5 ULB थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले, याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्यास तेथे करता आले नाही. BSB BSB: So He could not perform any miracles there, except to lay His hands on a few of the sick and heal them.
6 ULB त्यांच्या अविश्वासामुळे त्यास आश्चर्य वाटले. नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला. BSB BSB: And He was amazed at their unbelief. And He went around from village to village, teaching the people.
7 ULB नंतर येशूने बारा शिष्यांना आपणाकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला, त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला. BSB BSB: Then Jesus called the Twelve to Him and began to send them out two by two, giving them authority over unclean spirits.
8 ULB आणि त्यास आज्ञा केली की, “काठीशिवाय प्रवासासाठी दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळी किंवा कमरकशात पैसे काही घेऊ नका. BSB BSB: He instructed them to take nothing but a staff for the journey—no bread, no bag, no money in their belts—
9 ULB तरी चपला घालून चाला; दोन अंगरखे घालू नका.” BSB BSB: and to wear sandals, but not a second tunic.
10 ULB आणखी तो त्यास म्हणाला, “ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडीपर्यंत राहा. BSB BSB: And He told them, “When you enter a house, stay there until you leave that area.
11 ULB आणि ज्याठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळ पायाची धूळ तेथेच झाडून टाका.” BSB BSB: If anyone will not welcome you or listen to you, shake the dust off your feet when you leave that place, as a testimony against them.”
12 ULB मग शिष्य तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी घोषणा केली. BSB BSB: So they set out and preached that the people should repent.
13 ULB त्यांनी पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून त्यांना बरे केले. BSB BSB: They also drove out many demons and healed many of the sick, anointing them with oil.
14 ULB हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरण पावलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे.” BSB BSB: Now King Herod heard about this, for Jesus’ name had become well known, and people were saying, “John the Baptist has risen from the dead! That is why miraculous powers are at work in him.”
15 ULB इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.” तर काहीजण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.” BSB BSB: Others were saying, “He is Elijah,” and still others, “He is a prophet, like one of the prophets of old.”
16 ULB परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे.” BSB BSB: But when Herod heard this, he said, “John, whom I beheaded, has risen from the dead!”
17 ULB हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती कारण त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले होते. BSB BSB: For Herod himself had ordered that John be arrested and bound and imprisoned, on account of his brother Philip’s wife Herodias, whom Herod had married.
18 ULB व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.” BSB BSB: For John had been telling Herod, “It is not lawful for you to have your brother’s wife!”
19 ULB याकरिता हेरोदीयेने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्यास ठार मारण्याची संधी पाहात होती. परंतु ती त्यास मारू शकली नाही, BSB BSB: So Herodias held a grudge against John and wanted to kill him. But she had been unable,
20 ULB कारण योहान नीतिमान आणि पवित्र मनुष्य आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरीत असे व त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा, फार गोंधळून जाई, तरी तो त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेत असे. BSB BSB: because Herod feared John and protected him, knowing that he was a righteous and holy man. When he heard John’s words, he was greatly perplexed; yet he listened to him gladly.
21 ULB मग एके दिवशी अशी संधी आली की हेरोदिया काहीतरी करू शकेली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालील प्रांतातील प्रमुख लोकांस मेजवानी दिली. BSB BSB: On Herod’s birthday, her opportunity arose. Herod held a banquet for his nobles and military commanders and the leading men of Galilee.
22 ULB हेरोदीयाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदित केले. तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.” BSB BSB: When the daughter of Herodias came and danced, she pleased Herod and his guests, and the king said to the girl, “Ask me for whatever you wish, and I will give it to you.”
23 ULB तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मागशील ते मी तुला देईन.” BSB BSB: And he swore to her, “Whatever you ask of me, I will give you, up to half my kingdom!”
24 ULB ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.” BSB BSB: Then she went out and asked her mother, “What should I request?” And her mother answered, “The head of John the Baptist.”
25 ULB आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.” BSB BSB: At once the girl hurried back to the king with her request: “I want you to give me the head of John the Baptist on a platter immediately.”
26 ULB राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्यास तिला नकार द्यावा असे वाटले नाही. BSB BSB: The king was consumed with sorrow, but because of his oaths and his guests, he did not want to refuse her.
27 ULB तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठवले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले. BSB BSB: So without delay, the king commanded that John’s head be brought in. He sent an executioner, who went and beheaded him in the prison.
28 ULB ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले. BSB BSB: The man brought John’s head on a platter and presented it to the girl, who gave it to her mother.
29 ULB हे ऐकल्यावर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले. BSB BSB: When John’s disciples heard about this, they came and took his body and placed it in a tomb.
30 ULB यानंतर प्रेषित येशूभोवती जमले आणि त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्यास सांगितले. BSB BSB: Meanwhile, the apostles gathered around Jesus and brought Him news of all they had done and taught.
31 ULB नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या.” कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती. BSB BSB: And He said to them, “Come with Me privately to a solitary place, and let us rest for a while.” For many people were coming and going, and they did not even have time to eat.
32 ULB तेव्हा ते सर्वजण तारवात बसून रानात गेले. BSB BSB: So they went away in a boat by themselves to a solitary place.
33 ULB परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व त्याच्या येण्याअगोदरच ते तेथे पोहोचले. BSB BSB: But many people saw them leaving and recognized them. They ran together on foot from all the towns and arrived before them.
34 ULB येशू किनाऱ्याला आल्यावर, त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला; ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्यास त्यांचा कळवळा आला; म्हणून तो त्यांना बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला. BSB BSB: When Jesus stepped ashore and saw a large crowd, He had compassion on them, because they were like sheep without a shepherd. And He began to teach them many things.
35 ULB दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. BSB BSB: By now the hour was already late. So the disciples came to Jesus and said, “This is a desolate place, and the hour is already late.
36 ULB लोकांस जाऊ द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.” BSB BSB: Dismiss the crowd so they can go to the surrounding countryside and villages and buy themselves something to eat.”
37 ULB परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्यास म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय?” BSB BSB: But Jesus told them, “You give them something to eat.” They asked Him, “Should we go out and spend two hundred denarii to give all of them bread to eat?”
38 ULB तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” पाहिल्यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” BSB BSB: “Go and see how many loaves you have,” He told them. And after checking, they said, “Five—and two fish.”
39 ULB येशूने सर्व लोकांस आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे. BSB BSB: Then Jesus directed them to have the people sit in groups on the green grass.
40 ULB तेव्हा ते शंभर शंभर व पन्नास पन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले. BSB BSB: So they sat down in groups of hundreds and fifties.
41 ULB येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून, आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांस वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि दोन मासेसुद्धा वाटून दिले. BSB BSB: Taking the five loaves and the two fish and looking up to heaven, Jesus spoke a blessing and broke the loaves. Then He gave them to His disciples to set before the people. And He divided the two fish among them all.
42 ULB मग ते सर्व जेवन करून तृप्त झाले. BSB BSB: They all ate and were satisfied,
43 ULB आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. BSB BSB: and the disciples picked up twelve basketfuls of broken pieces of bread and fish.
44 ULB भाकरी खाणारे पाच हजार पुरूष होते. BSB BSB: And there were five thousand men who had eaten the loaves.
46 ULB लोकांस निरोप देऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. BSB BSB: After bidding them farewell, He went up on the mountain to pray.
47 ULB संध्याकाळ झाली तेव्हा तारू सरोवराच्या मध्यभागी होता आणि येशू एकटाच जमिनीवर होता. BSB BSB: When evening came, the boat was in the middle of the sea, and Jesus was alone on land.
48 ULB मग त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. BSB BSB: He could see that the disciples were straining to row, because the wind was against them. About the fourth watch of the night, Jesus went out to them, walking on the sea. He intended to pass by them,
49 ULB पण त्यास सरोवरातील पाण्यावरून चालतांना पाहिले, तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले. BSB BSB: but when they saw Him walking on the sea, they cried out, thinking He was a ghost—
50 ULB (कारण त्या सर्वांनी त्यास पाहिले व ते घाबरून गेले.) तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भिऊ नका, मी आहे.” BSB BSB: for they all saw Him and were terrified. But Jesus spoke up at once: “Take courage! It is I. Do not be afraid.”
51 ULB नंतर तो त्यांच्याकडे तारवात गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले. BSB BSB: Then He climbed into the boat with them, and the wind died down. And the disciples were utterly astounded,
52 ULB कारण त्यांना भाकरीची गोष्ट समजली नव्हती आणि त्यांची मने कठीण झाली होती. BSB BSB: for they had not understood about the loaves, but their hearts had been hardened.
53 ULB त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतला आले व तारु बांधून टाकले. BSB BSB: When they had crossed over, they landed at Gennesaret and moored the boat.
54 ULB ते तारवातून उतरताच लोकांनी येशूला ओळखले. BSB BSB: As soon as they got out of the boat, the people recognized Jesus
55 ULB आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे लोक दुखणेकऱ्यांना बाजेवर घालून नेऊ लागले. BSB BSB: and ran through that whole region, carrying the sick on mats to wherever they heard He was.
56 ULB तो गावात किंवा शेतमळ्यात कोठेही जावो, तेथे लोक दुखणेकऱ्यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्यास विनंती करीत आणि जितक्यांनी त्यास स्पर्श केला तितके बरे झाले. BSB BSB: And wherever He went—villages and towns and countrysides—they laid the sick in the marketplaces and begged Him just to let them touch the fringe of His cloak. And all who touched Him were healed.