1 ULB त्यादिवसात पुन्हा लोकांचा मोठा समुदाय जमला व त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांना म्हणाला, BSB BSB: In those days the crowd once again became very large, and they had nothing to eat. Jesus called the disciples to Him and said,
2 ULB “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही. BSB BSB: “I have compassion for this crowd, because they have already been with Me three days and have nothing to eat.
3 ULB मी जर त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते रस्त्यातच कासावीस होऊन पडतील आणि त्यांच्यातील काही तर दुरून आले आहेत.” BSB BSB: If I send them home hungry, they will faint along the way. For some of them have come a great distance.”
4 ULB त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?” BSB BSB: His disciples replied, “Where in this desolate place could anyone find enough bread to feed all these people?”
5 ULB त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.” BSB BSB: “How many loaves do you have?” Jesus asked. “Seven,” they replied.
6 ULB त्याने लोकांस जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या आणि त्यांनी त्या लोकांस वाढल्या. BSB BSB: And He instructed the crowd to sit down on the ground. Then He took the seven loaves, gave thanks and broke them, and gave them to His disciples to set before the people. And they distributed them to the crowd.
7 ULB त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते, त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढावयास सांगितले. BSB BSB: They also had a few small fish, and Jesus blessed them and ordered that these be set before them as well.
8 ULB ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या. BSB BSB: The people ate and were satisfied, and the disciples picked up seven basketfuls of broken pieces that were left over.
9 ULB तेथे सुमारे चार हजार पुरूष होते. मग येशूने त्यांना घरी पाठवले. BSB BSB: And about four thousand men were present. And when Jesus had dismissed the crowd,
10 ULB आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह तारवात बसला व दल्मनुथा प्रदेशात गेला. BSB BSB: He immediately got into the boat with His disciples and went to the district of Dalmanutha.
11 ULB मग काही परूशी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्यास स्वर्गातून चिन्ह मागितले. BSB BSB: Then the Pharisees came and began to argue with Jesus, testing Him by demanding from Him a sign from heaven.
12 ULB आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खरे सांगतो की, या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही.” BSB BSB: Jesus sighed deeply in His spirit and said, “Why does this generation demand a sign? Truly I tell you, no sign will be given to this generation.”
13 ULB नंतर तो त्यांना सोडून पुन्हा तारवात जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला. BSB BSB: And He left them, got back into the boat, and crossed to the other side.
14 ULB तेव्हा शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते आणि तारवात त्यांच्याजवळ एकच भाकर होती. BSB BSB: Now the disciples had forgotten to take bread, except for one loaf they had with them in the boat.
15 ULB येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर यापासून सावध राहा.” BSB BSB: “Watch out!” He cautioned them. “Beware of the leaven of the Pharisees and of Herod.”
16 ULB मग ते आपसात चर्चा करू लागले की, “आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो बोलला की काय?” BSB BSB: So they began to discuss with one another the fact that they had no bread.
17 ULB ते काय बोलत होते हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हास समजूनही समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? BSB BSB: Aware of their conversation, Jesus asked them, “Why are you debating about having no bread? Do you still not see or understand? Do you have such hard hearts?
18 ULB डोळे असून तुम्हास दिसत नाही काय? कान असून तुम्हास ऐकू येत नाही काय? तुम्हास आठवत नाही काय? BSB BSB: ‘Having eyes, do you not see? And having ears, do you not hear?’ And do you not remember?
19 ULB मी पाच हजार लोकांस पाच भाकरी वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांमधून किती टोपल्या गोळा केल्या.” शिष्यांनी उत्तर दिले, “बारा.” BSB BSB: When I broke the five loaves for the five thousand, how many basketfuls of broken pieces did you collect?” “Twelve,” they answered.
20 ULB “आणि चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.” BSB BSB: “And when I broke the seven loaves for the four thousand, how many basketfuls of broken pieces did you collect?” “Seven,” they said.
21 ULB मग येशू त्यांना म्हणाला, “अजूनही तुम्हास समजत नाही काय?” BSB BSB: Then He asked them, “Do you still not understand?”
22 ULB ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्यास स्पर्श करावा अशी विनंती केली. BSB BSB: When they arrived at Bethsaida, some people brought a blind man and begged Jesus to touch him.
23 ULB मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्यास गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यांवर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्यास विचारले, “तुला काही दिसते काय?” BSB BSB: So He took the blind man by the hand and led him out of the village. Then He spit on the man’s eyes and placed His hands on him. “Can you see anything?” He asked.
24 ULB त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीही ती चालत आहेत.” BSB BSB: The man looked up and said, “I can see the people, but they look like trees walking around.”
25 ULB नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या मनुष्याच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्यास दृष्टी आली आणि त्यास सर्वकाही स्पष्ट दिसू लागले. BSB BSB: Once again Jesus placed His hands on the man’s eyes, and when he opened them his sight was restored, and he could see everything clearly.
26 ULB येशूने त्याला, “त्या गावात पाऊलदेखील टाकू नको” असे सांगून घरी पाठवून दिले. BSB BSB: Jesus sent him home and said, “Do not go back into the village.”
28 ULB त्यांनी त्यास उत्तर दिले, “काहीजण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान, तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहात असे म्हणतात.” BSB BSB: They replied, “Some say John the Baptist; others say Elijah; and still others, one of the prophets.”
29 ULB मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हास मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त आहेस.” BSB BSB: “But what about you?” Jesus asked. “Who do you say I am?” Peter answered, “You are the Christ.”
30 ULB येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.” BSB BSB: And Jesus warned them not to tell anyone about Him.
32 ULB त्याने हे स्पष्टपणे सांगितले, तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्यास दटावू लागला. BSB BSB: He spoke this message quite frankly, and Peter took Him aside and began to rebuke Him.
33 ULB परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावीत नाहीस, तर मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस.” BSB BSB: But Jesus, turning and looking at His disciples, rebuked Peter and said, “Get behind Me, Satan! For you do not have in mind the things of God, but the things of men.”
34 ULB नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्यामागे यायचे आहे तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. BSB BSB: Then Jesus called the crowd to Him along with His disciples, and He told them, “If anyone wants to come after Me, he must deny himself and take up his cross and follow Me.
35 ULB जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. BSB BSB: For whoever wants to save his life will lose it, but whoever loses his life for My sake and for the gospel will save it.
36 ULB मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ? BSB BSB: What does it profit a man to gain the whole world, yet forfeit his soul?
37 ULB जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? BSB BSB: Or what can a man give in exchange for his soul?
38 ULB देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.” BSB BSB: If anyone is ashamed of Me and My words in this adulterous and sinful generation, the Son of Man will also be ashamed of him when He comes in His Father’s glory with the holy angels.”