1 ULB त्यावेळी चौथाई देशांचा राजा हेरोदाने येशूची किर्ती ऐकली. BSB BSB: At that time Herod the tetrarch heard the reports about Jesus
2 ULB तेव्हा त्याने आपल्या चाकरांना म्हटले, “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. त्यास मरण पावलेल्यातून उठविण्यात आले आहे म्हणून याच्याठायी सामर्थ्य कार्य करीत आहे.” BSB BSB: and said to his servants, “This is John the Baptist; he has risen from the dead! That is why miraculous powers are at work in him.”
3 ULB हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते. BSB BSB: Now Herod had arrested John and bound him and put him in prison on account of Herodias, his brother Philip’s wife,
4 ULB कारण योहान त्यास सांगत होता, “तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राच्या योग्य नाही.” BSB BSB: because John had been telling him, “It is not lawful for you to have her.”
5 ULB हेरोद त्यास मारावयास पाहत होता, पण तो लोकांस भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे. BSB BSB: Although Herod wanted to kill John, he was afraid of the people, because they regarded John as a prophet.
6 ULB हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. BSB BSB: On Herod’s birthday, however, the daughter of Herodias danced before them and pleased Herod
7 ULB त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. BSB BSB: so much that he promised with an oath to give to her whatever she asked.
8 ULB तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला इथे आणून द्या.” BSB BSB: Prompted by her mother, she said, “Give me here on a platter the head of John the Baptist.”
9 ULB हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावयाची आज्ञा केली. BSB BSB: The king was grieved, but because of his oaths and his guests, he ordered that her wish be granted
10 ULB आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर उडवले. BSB BSB: and sent to have John beheaded in the prison.
11 ULB मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलीला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले. BSB BSB: John’s head was brought in on a platter and presented to the girl, who carried it to her mother.
12 ULB मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्यास पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले. BSB BSB: Then John’s disciples came and took his body and buried it. And they went and informed Jesus.
13 ULB मग ते ऐकून येशू तेथून होडीत बसून निवांत जागी निघून गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरांतून त्याच्यामागे पायीपायी गेले. BSB BSB: When Jesus heard about John, He withdrew by boat privately to a solitary place. But the crowds found out about it and followed Him on foot from the towns.
14 ULB मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यास त्यांच्याविषयी कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले. BSB BSB: When He stepped ashore and saw a large crowd, He had compassion on them and healed their sick.
15 ULB मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही अरण्यातील जागा आहे आणि भोजनाची वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.” BSB BSB: When evening came, the disciples came to Him and said, “This is a desolate place, and the hour is already late. Dismiss the crowds so they can go to the villages and buy themselves some food.”
16 ULB परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काही खायला द्या.” BSB BSB: “They do not need to go away,” Jesus replied. “You give them something to eat.”
17 ULB ते त्यास म्हणाले, आमच्याजवळ केवळ “पाच भाकरी व दोन मासे आहेत.” BSB BSB: “We have here only five loaves of bread and two fish,” they answered.
18 ULB तो म्हणाला, “ते माझ्याकडे आणा.” BSB BSB: “Bring them here to Me,” Jesus said.
19 ULB मग लोकांस गवतावर बसण्याची आज्ञा केली. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. BSB BSB: And He directed the crowds to sit down on the grass. Taking the five loaves and the two fish and looking up to heaven, He spoke a blessing. Then He broke the loaves and gave them to the disciples, and the disciples gave them to the people.
20 ULB ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या. BSB BSB: They all ate and were satisfied, and the disciples picked up twelve basketfuls of broken pieces that were left over.
21 ULB जेवणारे सुमारे पाच हजार पुरूष होते. शिवाय स्त्रिया व मुले होतीच. BSB BSB: About five thousand men were fed, besides women and children.
22 ULB मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लगेच शिष्यांना पाठवून दिले. BSB BSB: Immediately Jesus made the disciples get into the boat and go on ahead of Him to the other side, while He dismissed the crowds.
23 ULB लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता. BSB BSB: After He had dismissed them, He went up on the mountain by Himself to pray. When evening came, He was there alone,
24 ULB पण तारू सरोवरामध्ये होते इकडे वारा विरूद्ध दिशेने, वाहत असल्यामुळे तारू लाटांनी हेलकावत होते व त्यामुळे ते तिच्यावर ताबा ठेवू शकत नव्हते. BSB BSB: but the boat was already far from land, buffeted by the waves because the wind was against it.
25 ULB तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी (म्हणजे पहाटे तीन वाजता) येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता. BSB BSB: During the fourth watch of the night, Jesus went out to them, walking on the sea.
26 ULB शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले BSB BSB: When the disciples saw Him walking on the sea, they were terrified. “It’s a ghost!” they said, and cried out in fear.
27 ULB पण येशू लगेच त्यांना म्हणाला, धीर धरा, मी आहे; भिऊ नका. BSB BSB: But Jesus spoke up at once: “Take courage! It is I. Do not be afraid.”
30 ULB पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.” BSB BSB: But when he saw the strength of the wind, he was afraid and, beginning to sink, cried out, “Lord, save me!”
31 ULB आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” BSB BSB: Immediately Jesus reached out His hand and took hold of Peter. “You of little faith,” He said, “why did you doubt?”
32 ULB मग येशू व पेत्र होडीत गेल्यावर वारा थांबला. BSB BSB: And when they had climbed back into the boat, the wind died down.
34 ULB नंतर ते पलीकडे गनेसरेताच्या भागात गेले. BSB BSB: When they had crossed over, they landed at Gennesaret.
35 ULB तेथील लोकांनी येशूला ओळखून व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठवला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले. BSB BSB: And when the men of that place recognized Jesus, they sent word to all the surrounding region. People brought all the sick to Him
36 ULB आणि आम्हास आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले. BSB BSB: and begged Him just to let them touch the fringe of His cloak. And all who touched Him were healed.