1 ULB जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक लोक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला. BSB BSB: When morning came, all the chief priests and elders of the people conspired against Jesus to put Him to death.
4 ULB तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!” BSB BSB: “I have sinned by betraying innocent blood,” he said. “What is that to us?” they replied. “You bear the responsibility.”
6 ULB मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे परमेश्वराच्या भवनाच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमांविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.” BSB BSB: The chief priests picked up the pieces of silver and said, “It is unlawful to put this into the treasury, since it is blood money.”
7 ULB तेव्हा त्यांनी मसलत घेतली आणि त्यातून परक्यांना पुरायला कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेतली. BSB BSB: After conferring together, they used the money to buy the potter’s field as a burial place for foreigners.
8 ULB त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात. BSB BSB: That is why it has been called the Field of Blood to this day.
9 ULB तेव्हा यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण झाले त्याने म्हणले आहे की, “आणि इस्राएलाच्या काही वंशजांनी ज्याचे मोल ठरवले होते, त्याचे मोल ते तीस शेकेल, त्यांनी घेतले. BSB BSB: Then what was spoken through Jeremiah the prophet was fulfilled: “They took the thirty pieces of silver, the price set on Him by the people of Israel,
10 ULB मला प्रभू परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी ते कुंभाराच्या शेतासाठी दिले.” BSB BSB: and they gave them for the potter’s field, as the Lord had commanded me.”
11 ULB मग राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्यास प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.” BSB BSB: Meanwhile Jesus stood before the governor, who questioned Him: “Are You the King of the Jews?” “You have said so,” Jesus replied.
12 ULB पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला. BSB BSB: And when He was accused by the chief priests and elders, He gave no answer.
13 ULB म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?” BSB BSB: Then Pilate asked Him, “Do You not hear how many charges they are bringing against You?”
14 ULB परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही आणि पिलात आश्चर्यचकित झाला. BSB BSB: But Jesus gave no answer, not even to a single charge, much to the governor’s amazement.
15 ULB वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकांसाठी राज्यपालाने त्यांच्या निवडीप्रमाणे तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती. BSB BSB: Now it was the governor’s custom at the feast to release to the crowd a prisoner of their choosing.
16 ULB तेव्हा तेथे एक बरब्बा नावाचा कुप्रसिद्ध कैदी होता. BSB BSB: At that time they were holding a notorious prisoner named Barabbas.
17 ULB म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?” BSB BSB: So when the crowd had assembled, Pilate asked them, “Which one do you want me to release to you: Barabbas, or Jesus who is called Christ?”
18 ULB कारण त्यास कळले होते की, त्यांनी त्यास मत्सराने धरून दिले होते. BSB BSB: For he knew it was out of envy that they had handed Jesus over to him.
19 ULB तो न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्यास एक निरोप पाठवून कळवले, “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नात मला आज दिवसभर फार दुःखसहन करावे लागले आहे.” BSB BSB: While Pilate was sitting on the judgment seat, his wife sent him this message: “Have nothing to do with that innocent man, for I have suffered terribly in a dream today because of Him.”
20 ULB पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळवले. BSB BSB: But the chief priests and elders persuaded the crowds to ask for Barabbas and to have Jesus put to death.
21 ULB राज्यपालाने त्यांना विचारले, “मी या दोघांतून तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” लोकांनी उत्तर दिले, “बरब्बाला.” BSB BSB: “Which of the two do you want me to release to you?” asked the governor. “Barabbas,” they replied.
22 ULB पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!” BSB BSB: “What then should I do with Jesus who is called Christ?” Pilate asked. They all answered, “Crucify Him!”
23 ULB आणि तो म्हणाला, “का? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!” BSB BSB: “Why?” asked Pilate. “What evil has He done?” But they shouted all the louder, “Crucify Him!”
24 ULB लोकांच्या पुढे आपले काही चालत नाही हे पिलाताने पाहिले. पण उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले व म्हटले, “या नीतिमान मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पहा.” BSB BSB: When Pilate saw that he was accomplishing nothing, but that instead a riot was breaking out, he took water and washed his hands before the crowd. “I am innocent of this man’s blood,” he said. “You bear the responsibility.”
26 ULB मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. पण येशूला चाबकाचे फटके मारले व त्यास वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून त्याच्याहाती सोपवून दिले. BSB BSB: So Pilate released Barabbas to them. But he had Jesus flogged, and handed Him over to be crucified.
27 ULB नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळी शिपायांची तुकडी जमवली. BSB BSB: Then the governor’s soldiers took Jesus into the Praetorium and gathered the whole company around Him.
28 ULB त्यांनी त्याचे कपडे काढून व त्यास एक किरमिजी झगा घातला. BSB BSB: They stripped Him and put a scarlet robe on Him.
29 ULB मग एक काट्यांचा मुकुट तयार करून तो त्याच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक वेत दिला. मग शिपाई त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करून म्हणू लागले, “यहूद्यांचा राजा चिरायू होवो!” BSB BSB: And they twisted together a crown of thorns and set it on His head. They put a staff in His right hand, knelt down before Him, and mocked Him, saying, “Hail, King of the Jews!”
30 ULB आणि शिपाई त्याच्यावर थुंकले. त्याच्या हातातील त्यांनी तो वेत घेऊन त्याच्या डोक्यावर मारले. BSB BSB: Then they spit on Him and took the staff and struck Him on the head repeatedly.
31 ULB येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्यास घातले. मग ते त्यास वधस्तंभावर खिळायला घेऊन गेले. BSB BSB: After they had mocked Him, they removed the robe and put His own clothes back on Him. Then they led Him away to crucify Him.
32 ULB ते बाहेर जात असता त्यांना एक शिमोन कुरनेकर नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्यास धरून त्याचा वधस्तंभ वाहायला लावले. BSB BSB: Along the way they found a man from Cyrene, named Simon, and they forced him to carry the cross of Jesus.
33 ULB जेव्हा ते गुलगुथा (“म्हणजे कवटीची जागा”) नावाच्या ठिकाणी आले. BSB BSB: And when they came to a place called Golgotha, which means The Place of the Skull,
34 ULB तेव्हा त्यांनी त्यास पित्तमिश्रित द्राक्षारस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला. BSB BSB: they offered Him wine to drink, mixed with gall; but after tasting it, He refused to drink it.
35 ULB त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले. BSB BSB: When they had crucified Him, they divided up His garments by casting lots.
36 ULB शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले. BSB BSB: And sitting down, they kept watch over Him there.
37 ULB आणि “हा यहूद्यांचा राजा येशू आहे” असे लिहिलेले आरोपपत्रक डोक्याच्या वरच्या बाजूला लावले. BSB BSB: Above His head they posted the written charge against Him: THIS IS JESUS, THE KING OF THE JEWS.
38 ULB दोघां चोरांना, एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आले. BSB BSB: Two robbers were crucified with Him, one on His right and the other on His left.
39 ULB जे जवळून जात होते ते आपली डोकी हलवून त्याची निंदा करून BSB BSB: And those who passed by heaped abuse on Him, shaking their heads
40 ULB म्हणू लागले, हे परमेश्वराचे भवन मोडून तीन दिवसात परत उभारणाऱ्या, स्वतःला वाचव जर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये. BSB BSB: and saying, “You who are going to destroy the temple and rebuild it in three days, save Yourself! If You are the Son of God, come down from the cross!”
41 ULB तसेच मुख्य याजकांसह, नियमशास्त्र शिक्षक व वडीलासह इतरांसारखी त्याची चेष्टा करीत म्हणाले, BSB BSB: In the same way, the chief priests, scribes, and elders mocked Him, saying,
42 ULB याने दुसऱ्यांना वाचवले, परंतु तो स्वतःला वाचवू शकत नाही. हा इस्राएलाचा राजा आहे. असेल, त्याने वधस्तंभावरून खाली यावे आणि मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. BSB BSB: “He saved others, but He cannot save Himself. He is the King of Israel! Let Him come down now from the cross, and we will believe in Him.
43 ULB तो देवावर विश्वास ठेवतो, देवाला तो पाहिजे असेल तर त्याने त्यास वाचवावे कारण तो म्हणत होता, मी देवाचा पुत्र आहे. BSB BSB: He trusts in God. Let God deliver Him now if He wants Him. For He said, ‘I am the Son of God.’”
44 ULB तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर त्यांनीही त्याची तशीच निंदा केली. BSB BSB: In the same way, even the robbers who were crucified with Him berated Him.
45 ULB मग दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता. BSB BSB: From the sixth hour until the ninth hour darkness came over all the land.
46 ULB सुमारे नवव्या ताशी, येशू मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” BSB BSB: About the ninth hour Jesus cried out in a loud voice, “Eli, Eli, lema sabachthani?” which means, “My God, My God, why have You forsaken Me?” 47 ULB जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला बोलावत आहे.” BSB BSB: When some of those standing there heard this, they said, “He is calling Elijah.”
48 ULB त्यांच्यातला एक लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून त्यास प्यायला दिला. BSB BSB: One of them quickly ran and brought a sponge. He filled it with sour wine, put it on a reed, and held it up for Jesus to drink.
49 ULB परंतु त्यांतील दुसरे म्हणाले, “त्याला एकटे राहू द्या, एलीया येऊन त्यास वाचवतो काय, ते आपण पाहू.” BSB BSB: But the others said, “Leave Him alone. Let us see if Elijah comes to save Him.”
52 ULB कबरी उघडल्या आणि जे पवित्रजन मरण पावले होते, ते उठवले गेले. BSB BSB: The tombs broke open, and the bodies of many saints who had fallen asleep were raised.
53 ULB ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशूचे पुनरूत्थान झाल्यावर ते लोक पवित्र नगरीत गेले आणि अनेकांनी त्यांना पाहिले. BSB BSB: After Jesus’ resurrection, when they had come out of the tombs, they entered the holy city and appeared to many people.
54 ULB आता शताधिपतीने, त्यांच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा खरोखर देवाचा पुत्र होता.” BSB BSB: When the centurion and those with him who were guarding Jesus saw the earthquake and all that had happened, they were terrified and said, “Truly this was the Son of God.”
55 ULB तेथे बऱ्याच स्त्रिया काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करीत या स्त्रिया गालील प्रांताहून त्याच्या मागोमाग आल्या होत्या. BSB BSB: And many women were there, watching from a distance. They had followed Jesus from Galilee to minister to Him.
56 ULB त्यांच्यात मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई या तेथे होत्या. BSB BSB: Among them were Mary Magdalene, Mary the mother of James and Joseph, and the mother of Zebedee’s sons.
57 ULB संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा अरिमथाईचा, एक धनवान मनुष्य तेथे आला. तो येशूचा अनुयायी होता. BSB BSB: When it was evening, there came a rich man from Arimathea named Joseph, who himself was a disciple of Jesus.
58 ULB तो पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते देण्याचा हुकूम केला. BSB BSB: He went to Pilate to ask for the body of Jesus, and Pilate ordered that it be given to him.
59 ULB नंतर योसेफाने ते शरीर घेतले आणि स्वच्छ तागाच्या कपड्यात ते गुंडाळले. BSB BSB: So Joseph took the body, wrapped it in a clean linen cloth,
60 ULB आणि ते एका खडकात खोदलेल्या नव्या कबरेत ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली आणि तो निघून गेला. BSB BSB: and placed it in his own new tomb that he had cut into the rock. Then he rolled a great stone across the entrance to the tomb and went away.
61 ULB मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया कबरेसमोर बसल्या होत्या. BSB BSB: Mary Magdalene and the other Mary were sitting there opposite the tomb.
62 ULB त्या दिवसास तयारीचा दिवस म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक लोक व परूशी पिलाताकडे गेले. BSB BSB: The next day, the one after Preparation Day, the chief priests and Pharisees assembled before Pilate.
63 ULB ते म्हणाले, “साहेब, आम्हास आठवण आहे की, तो लबाड जिवंत असताना असे म्हणाला होता की, मी तीन दिवसानी परत जीवनात येईल (उठेन). BSB BSB: “Sir,” they said, “we remember that while He was alive that deceiver said, ‘After three days I will rise again.’
64 ULB म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याची आज्ञा करा. कारण त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांस सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.” BSB BSB: So give the order that the tomb be secured until the third day. Otherwise, His disciples may come and steal Him away and tell the people He has risen from the dead. And this last deception would be worse than the first.”
65 ULB पिलात म्हणाला, “तुमच्याबरोबर पहारा घ्या, जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.” BSB BSB: “You have a guard,” Pilate said. “Go, make the tomb as secure as you know how.”
66 ULB म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले. BSB BSB: So they went and secured the tomb by sealing the stone and posting the guard.