2 ULB धार्मिक मनुष्य पृथ्वीवरून नष्ट झाला आहे, आणि मनुष्यांमध्ये कोणीही सरळ नाही; ते सर्व रक्त पाडायला टपतात; ते प्रत्येकजण जाळे घेऊन आपल्या भावाची शिकार करतात. BSB BSB: The godly man has perished from the earth; there is no one upright among men. They all lie in wait for blood; they hunt one another with a net.
3 ULB त्यांचे हात दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत. अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत. सामर्थ्यवान मनुष्या दुसऱ्याला आपल्या जिवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो. असे ते एकत्र येऊन योजना करतात. BSB BSB: Both hands are skilled at evil; the prince and the judge demand a bribe. When the powerful utters his evil desire, they all conspire together.
4 ULB त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे. त्यातला अति सरळ तो काटेरी कुंपणापेक्षा वाईट आहे. हा दिवस, तुझ्या पाहारेकऱ्यांचा दिवस येतो, आता त्यांचा गोंधळ उडेल. BSB BSB: The best of them is like a brier; the most upright is sharper than a hedge of thorns. The day for your watchmen has come, the day of your visitation. Now is the time of their confusion.
5 ULB कोणत्याही शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नको. मित्रावरही विश्वास ठेवून राहू नको. तुझ्या उराशी जी स्त्री निजते तिला देखील काही सांगू नको, तू काय बोलतो त्या बद्दल सावध राहा. BSB BSB: Do not rely on a friend; do not trust in a companion. Seal the doors of your mouth from her who lies in your arms.
7 ULB परंतू मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन, मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहीन, माझा परमेश्वर माझे ऐकेल. BSB BSB: But as for me, I will look to the LORD; I will wait for the God of my salvation. My God will hear me.
8 ULB माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन. जेव्हा मी अंधारात बसेन तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल. BSB BSB: Do not gloat over me, my enemy! Though I have fallen, I will arise; though I sit in darkness, the LORD will be my light.
9 ULB परमेश्वर माझा वाद करेल आणि माझा न्याय साधेल तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन, कारण मी त्याच्याविरुध्द पाप केले आहे. तो मला प्रकाशाकडे आणील, आणि त्याच्या न्यायीपणात त्याने मला सोडवलेले मी पाहीन. BSB BSB: Because I have sinned against Him, I must endure the rage of the LORD, until He argues my case and executes justice for me. He will bring me into the light; I will see His righteousness.
10 ULB मग माझा शत्रू हे पाहिल; “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” असे ज्याने मला म्हटले त्यास लाज झाकून टाकेल. माझे डोळे तिच्याकडे पाहतील, रस्त्यावरील चिखलाप्रमाने ती तुडवली जाईल. BSB BSB: Then my enemy will see and will be covered with shame—she who said to me, “Where is the LORD your God?” My eyes will see her; at that time she will be trampled like mud in the streets.
11 ULB तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल. त्या दिवसात तुझी सीमा फार विस्तारीत होईल. BSB BSB: The day for rebuilding your walls will come—the day for extending your boundary.
12 ULB त्या दिवसात ते अश्शूर देशातून आणि मिसर देशापासून, फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून, दूरदूरच्या समुद्रतीरावरून व दूरदूरच्या पर्वताकडून लोक तुझ्याकडे येतील. BSB BSB: On that day they will come to you from Assyria and the cities of Egypt, even from Egypt to the Euphrates, from sea to sea and mountain to mountain.
13 ULB देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे ओसाड होईल. BSB BSB: Then the earth will become desolate because of its inhabitants, as the fruit of their deeds.
14 ULB म्हणून तू आपल्या लोकांस, तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला, आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचिन दिवसात तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत. BSB BSB: Shepherd with Your staff Your people, the flock of Your inheritance. They live alone in a woodland, surrounded by pastures. Let them graze in Bashan and Gilead, as in the days of old.
15 ULB जेव्हा तू मिसरदेशातून बाहेर निघालास, त्या दिवसाप्रमाणे त्यास मी अद्भुत कृत्ये दाखवीन. BSB BSB: As in the days when you came out of Egypt, I will show My wonders.
16 ULB राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील. ती आपला हात आपल्या मुखाला लावतील, त्यांचे कान बहिरे होतील. BSB BSB: Nations will see and be ashamed, deprived of all their might. They will put their hands over their mouths, and their ears will become deaf.
17 ULB ते सापाप्रमाणे धुळ चाटतील, भूमीतल्या सरपटणाऱ्यांप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील. परमेश्वर आमचा देव याच्याकडे ती भयभीत होऊन येतील, आणि ते तुझ्यामुळे घाबरतील. BSB BSB: They will lick the dust like a snake, like reptiles slithering on the ground. They will come trembling from their strongholds in the presence of the LORD our God; they will tremble in fear of You.
18 ULB तुझ्यासारखा देव कोण आहे? जो तू पापांची क्षमा करतोस आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो. तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही, कारण त्यास दयाळू व्हायला आवडते. BSB BSB: Who is a God like You, who pardons iniquity and passes over the transgression of the remnant of His inheritance—who does not retain His anger forever, because He delights in loving devotion?
19 ULB तो आम्हावर पुन्हा दया करील; तो आमच्या पापांचा आपल्या पायाखाली चुराडा करील आणि आमची सर्व पापे समुद्रात खोलवर फेकून देईल. BSB BSB: He will again have compassion on us; He will vanquish our iniquities. You will cast out all our sins into the depths of the sea.
20 ULB पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तू ज्याविषयी शपथ वाहीली ती अशी की, तू याकोबाला सत्यता आणि अब्राहामाला कराराचा विश्वासुपणा देशील. BSB BSB: You will show faithfulness to Jacob and loving devotion to Abraham, as You swore to our fathers from the days of old.