1 ULB बलाम बालाकाला म्हणाला, इथे सात वेद्या बांधा आणि माझ्यासाठी सात बैल आणि सात मेंढे तयार ठेवा. BSB BSB: Then Balaam said to Balak, “Build for me seven altars here, and prepare for me seven bulls and seven rams.”
2 ULB बलामाने सांगितले तसे बालाकाने एक मेंढा व एक बैल प्रत्येक वेदीवर मारला. BSB BSB: So Balak did as Balaam had instructed, and Balak and Balaam offered a bull and a ram on each altar.
3 ULB नंतर बलाम बालाकाला म्हणाला, तू या होमबली जवळ थांब. मी दुसरीकडे जातो. नंतर परमेश्वर माझ्याकडे येईल आणि मी काय बोलायचे ते मला सांगेल. नंतर बलाम उंच जागी गेला. BSB BSB: “Stay here by your burnt offering while I am gone,” Balaam said to Balak. “Perhaps the LORD will meet with me. And whatever He reveals to me, I will tell you.” So Balaam went off to a barren height,
4 ULB देव त्या जागी बलामाकडे आला आणि बलाम म्हणाला, मी सात वेद्या तयार केल्या आहेत. आणि प्रत्येक वेदीवर मी एकेक मेंढा व बैल बली दिला आहे. BSB BSB: and God met with him. “I have set up seven altars,” Balaam said, “and on each altar I have offered a bull and a ram.”
5 ULB नंतर परमेश्वराने काय बोलायचे ते बलामास सांगितले. परमेश्वर म्हणाला, बालाकाकडे परत जा आणि मी सांगतो तेच त्यास जाऊन सांग. BSB BSB: Then the LORD put a message in Balaam’s mouth, saying, “Return to Balak and give him this message.”
6 ULB तेव्हा बलाम बालाकाकडे परत आला आणि तो आपल्या होमार्पणाजवळ उभा होता आणि मवाबाचे सर्व पुढारी त्याच्याबरोबर होते. BSB BSB: So he returned to Balak, who was standing there beside his burnt offering, with all the princes of Moab.
7 ULB नंतर बलामाने आपला संदेश सांगण्यास सुरवात केली आणि म्हणाला, पूर्वेकडील अराम पर्वतावरुन मवाबाचा राजा बालाक याने मला येथे आणले. तो म्हणाला, ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे, ये, इस्राएलींना विरोध कर. BSB BSB: And Balaam lifted up an oracle, saying: “Balak brought me from Aram, the king of Moab from the mountains of the east. ‘Come,’ he said, ‘put a curse on Jacob for me; come and denounce Israel!’
8 ULB ज्याला देवाने शाप दिला नाही त्यास मी कसा शाप देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्यास मी कशी धमकी देऊ? BSB BSB: How can I curse those whom God has not cursed? How can I denounce those whom the LORD has not denounced?
9 ULB मी त्या लोकांस पर्वतावरुन बघू शकतो; मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो. पहा, तेथे लोक एकटेच राहत आहे आणि ते स्वतःला सर्वसाधारण राष्ट्रामध्ये गणित नाहीत. BSB BSB: For I see them from atop the rocky cliffs, and I watch them from the hills. Behold, a people dwelling apart, not reckoning themselves among the nations.
10 ULB इस्राएलाचा केवळ चौथा हिस्सा कोण मोजेल किंवा याकोबाच्या धुळीचे कण कोण मोजू शकेल? मला नीतिमान मनुष्याप्रमाणे मरण येऊ दे, आणि त्यांच्याप्रमाणेच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे! BSB BSB: Who can count the dust of Jacob or number even a fourth of Israel? Let me die the death of the righteous; let my end be like theirs!”
11 ULB बालाक बलामास म्हणाला, तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले. पण पहा, तू तर त्यांना आशीर्वाद दिलास. BSB BSB: Then Balak said to Balaam, “What have you done to me? I brought you here to curse my enemies, and behold, you have only blessed them!”
12 ULB बलामाने उत्तर दिले व म्हणाला, परमेश्वराने माझ्या मुखात जे घातले, केवळ तेच मी बोलण्याची काळजी घेऊ नये काय? BSB BSB: But Balaam replied, “Should I not speak exactly what the LORD puts in my mouth?”
13 ULB नंतर बालाक त्यास म्हणाला, म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगळ्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांना माझ्यासाठी शाप दे. BSB BSB: Then Balak said to him, “Please come with me to another place where you can see them. You will only see the outskirts of their camp—not all of them. And from there, curse them for me.”
14 ULB तेव्हा बालाक बलामास पिसगाच्या माथ्यावरील सोफीमाच्या माळ्यावर घेऊन गेला. तेथे बालाकाने सात वेद्या बांधल्या. नंतर बालाकाने प्रत्येक वेदीवर एक बैल आणि एक मेंढा बली दिला. BSB BSB: So Balak took him to the field of Zophim, to the top of Pisgah, where he built seven altars and offered a bull and a ram on each altar.
15 ULB तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, तू येथे आपल्या होमबलीजवळ या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो. BSB BSB: Balaam said to Balak, “Stay here beside your burnt offering while I meet the LORD over there.”
16 ULB परमेश्वर बलामाकडे आला आणि काय बोलायचे ते त्याने त्यास सांगितले. नंतर परमेश्वराने बलामास बालाकाकडे जायला सांगितले. आणि त्याने सांगितलेलेच बोलायला सांगितले. BSB BSB: And the LORD met with Balaam and put a message in his mouth, saying, “Return to Balak and speak what I tell you.”
17 ULB म्हणून बलाम बलाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबाचे पुढारी होमबलीपाशी उभे होते. बालाकाने बलामास येताना पाहिले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने काय सांगितले? BSB BSB: So he returned to Balak, who was standing there by his burnt offering with the princes of Moab. “What did the LORD say?” Balak asked.
18 ULB बलामाने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, बालाका, उठ आणि ऐक. तू सिप्पोरेच्या मुला, माझे ऐक, BSB BSB: Then Balaam lifted up an oracle, saying: “Arise, O Balak, and listen; give ear to me, O son of Zippor.
19 ULB देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे, किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे. जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय? तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय? BSB BSB: God is not a man, that He should lie, or a son of man, that He should change His mind. Does He speak and not act? Does He promise and not fulfill?
20 ULB पहा, मी आशीर्वाद द्यायला आज्ञा केली, देवाने आशीर्वाद दिला आणि मी तो उलटा फिरवू शकत नाही. BSB BSB: I have indeed received a command to bless; He has blessed, and I cannot change it.
21 ULB त्यास याकोबात काही कष्ट किंवा इस्राएलात त्रास दिसला नाही. त्यांचा परमेश्वर देव त्यांच्याबरोबर आहे, राजाचा जयघोष त्यांच्यात आहे. BSB BSB: He considers no disaster for Jacob; He sees no trouble for Israel. The LORD their God is with them, and the shout of the King is among them.
22 ULB देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. ते रानबैला इतके शक्तिमान आहेत. BSB BSB: God brought them out of Egypt with strength like a wild ox.
23 ULB याकोबाच्याविरूद्ध मंत्रतंत्र चालणार नाही आणि इस्राएलींना दैवप्रश्र सांगणारे हानी पोचवू शकत नाही, याकोबाविषयी व इस्राएलाविषयी म्हणतील की पहा, देवाने केवढे महान कार्य केले! BSB BSB: For there is no spell against Jacob and no divination against Israel. It will now be said of Jacob and Israel, ‘What great things God has done!’
24 ULB पहा, लोक सिंहिणीसारखे उठत आहेत, सिंहासारखा बाहेर येतो आणि हल्ला करतो. तो त्याची शिकार खाऊन आणि वधलेल्यांचे रक्त प्यायल्याखेरीज तो खाली बसणार नाही. BSB BSB: Behold, the people rise like a lioness; they rouse themselves like a lion, not resting until they devour their prey and drink the blood of the slain.”
25 ULB नंतर बालाक बलामास म्हणाला, तू त्यांना शापहि देऊ नको आणि आशीर्वादहि देऊ नको. BSB BSB: Now Balak said to Balaam, “Then neither curse them at all nor bless them at all!”
26 ULB बलामाने बालाकाला उत्तर दिले, मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगेल तेच मला बोलता येईल. BSB BSB: But Balaam replied, “Did I not tell you that whatever the LORD says, I must do?”
27 ULB नंतर बालाक बलामास म्हणाला, तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुला त्या लोकांस शाप द्यायची परवानगी देईल. BSB BSB: “Please come,” said Balak, “I will take you to another place. Perhaps it will please God that you curse them for me from there.”
28 ULB म्हणून बालाक बलामास घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरुन वाळवंट दिसते. BSB BSB: And Balak took Balaam to the top of Peor, which overlooks the wasteland.
29 ULB बलाम बालाकाला म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बली देण्यासाठी तयार कर.” BSB BSB: Then Balaam said, “Build for me seven altars here, and prepare for me seven bulls and seven rams.”
30 ULB बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने साऱ्या गोष्टी केल्या. बालाकाने वेदीवर बैल आणि मेंढे बली दिले. BSB BSB: So Balak did as Balaam had instructed, and he offered a bull and a ram on each altar.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.