2 ULB लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या पुरुषांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते) BSB BSB: “Take a census of the Kohathites among the Levites by their clans and families,
3 ULB तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची गणती कर. हे पुरुष दर्शनमंडपातली सेवा करण्यासाठी सैन्यात जातात त्यांची गणती कर. BSB BSB: men from thirty to fifty years old—everyone who is qualified to serve in the work at the Tent of Meeting.
4 ULB कहाथ वंशजांनी दर्शनमंडपामधील परमपवित्र वस्तू ज्या माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत त्यांची त्यांनी काळजी घ्यावी. BSB BSB: This service of the Kohathites at the Tent of Meeting regards the most holy things.
5 ULB जेव्हा छावणी आपला तळ पुढे हलविण्याची तयारी करील, तेव्हा अहरोन व त्याच्या मुलांनी तंबूत जाऊन परमपवित्र स्थानातील पडदा जो पवित्रस्थानापासून वेगळा करतो तो खाली काढावा व त्याने कराराचा कोश झाकावा. BSB BSB: Whenever the camp sets out, Aaron and his sons are to go in, take down the veil of the curtain, and cover the ark of the Testimony with it.
6 ULB मग त्यांनी कोशावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व त्यावर संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यांनी तो वाहून नेण्यासाठी दांडे लावावे. BSB BSB: They are to place over this a covering of fine leather, spread a solid blue cloth over it, and insert its poles.
7 ULB त्यांनी समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे नेहमीची भाकरही त्यावर ठेवावी. BSB BSB: Over the table of the Presence they are to spread a blue cloth and place the plates and cups on it, along with the bowls and pitchers for the drink offering. The regular bread offering is to remain on it.
8 ULB त्या सर्वांवर किरमिजी रंगाचे कापड पसरावे व नंतर ते सर्व तहशाच्या कातड्याने झाकून टाकावे; तो वाहून नेण्यासाठी मेजाला दांडे बसवावे. BSB BSB: And they shall spread a scarlet cloth over them, cover them with fine leather, and insert the poles.
9 ULB त्यांनी दीपस्तंभ आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी. BSB BSB: They are to take a blue cloth and cover the lampstand used for light, together with its lamps, wick trimmers, and trays, as well as the jars of oil with which to supply it.
10 ULB या सर्व वस्तू त्यांनी तहशाच्या कातड्याने लपेटून घ्याव्यात आणि हे सर्व वाहून न्यावयाच्या चौकटीवर त्यांनी ठेवावे. BSB BSB: Then they shall wrap it and all its utensils inside a covering of fine leather and put it on the carrying frame.
11 ULB त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे. ते तहशाच्या कातड्याने झाकावे व मग वेदीला वाहून नेण्याचे दांडे बसवावे. BSB BSB: Over the gold altar they are to spread a blue cloth, cover it with fine leather, and insert the poles.
12 ULB मग पवित्रस्थानातील उपासनेसाठी लागणारी सर्व उपकरणे त्यांनी गोळा करावीत व ती निळ्या कापडात गुंडाळावीत; त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन टाकावे आणि मग हे सर्व त्यांनी वाहून नेणाऱ्या चौकटीवर ठेवावे. BSB BSB: They are to take all the utensils for serving in the sanctuary, place them in a blue cloth, cover them with fine leather, and put them on the carrying frame.
13 ULB मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून ती स्वच्छ करावी व वेदीवर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे. BSB BSB: Then they shall remove the ashes from the bronze altar, spread a purple cloth over it,
14 ULB नंतर त्यांनी वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्नीपात्रे, काटे, फावडी व कटोरे या वेदीच्या सर्व वस्तू गोळा करून त्या वेदीवर ठेवाव्यात; मग तिच्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व मग तिला वाहून नेण्याचे दांडे बसवावेत. BSB BSB: and place on it all the vessels used to serve there: the firepans, meat forks, shovels, and sprinkling bowls—all the equipment of the altar. They are to spread over it a covering of fine leather and insert the poles.
16 ULB पवित्र निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू व उपकरणे म्हणजे पवित्रस्थान व त्यातील दिव्यांना लागणारे तेल, सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे व अभिषेकाचे तेल या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी. BSB BSB: Eleazar son of Aaron the priest shall oversee the oil for the light, the fragrant incense, the daily grain offering, and the anointing oil. He has oversight of the entire tabernacle and everything in it, including the holy objects and their utensils.”
17 ULB परमेश्वर मोशे व अहरोनाशी बोलला. तो म्हणाला, BSB BSB: Then the LORD said to Moses and Aaron,
18 ULB तुम्ही कहाथी वंशातल्या कुळाचा वंश लेव्यातून काढून टाकण्याची परवानगी देऊ नका; BSB BSB: “Do not allow the Kohathite tribal clans to be cut off from among the Levites.
19 ULB जेव्हा ते परमपवित्रस्थानातील वस्तूजवळ जातील तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी आत जाऊन त्यांच्यातील एकएकाला त्यांचे काम व ओझे नेमून द्यावे. BSB BSB: In order that they may live and not die when they come near the most holy things, do this for them: Aaron and his sons are to go in and assign each man his task and what he is to carry.
20 ULB पवित्र स्थानातील वस्तू पाहण्यास त्यांनी क्षणभरहि आत जाऊ नये किंवा गेले तर ते मरतील. अहरोनाने व त्याच्या मुलांनी आत जाऊन कहाथीतल्या एकएकाला त्याचे काम व त्याचे विशेष काम नेमून द्यावे. BSB BSB: But the Kohathites are not to go in and look at the holy objects, even for a moment, or they will die.”
21 ULB परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला, BSB BSB: And the LORD said to Moses,
22 ULB गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याच्याप्रमाणे त्यांची यादी कर; BSB BSB: “Take a census of the Gershonites as well, by their families and clans,
23 ULB म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र असतील अशा लोकांची गणती कर. BSB BSB: from thirty to fifty years old, counting everyone who comes to serve in the work at the Tent of Meeting.
24 ULB गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा व वाहावयाची ओझी ही अशीः BSB BSB: This is the service of the Gershonite clans regarding work and transport:
25 ULB त्यांनी निवासमंडपाचे पडदे, दर्शनमंडप व त्याचे आच्छादन आणि त्यावर असलेले तहशाच्या कातड्याचे आच्छादन तसेच दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, BSB BSB: They are to carry the curtains of the tabernacle, the Tent of Meeting with the covering of fine leather over it, the curtains for the entrance to the Tent of Meeting,
26 ULB निवासमंडप व वेदी ह्यांच्या भोंवतीच्या अंगणाच्या कनातीचे पडदे, तसेच अंगणाच्या प्रवेश दाराचा पडदा, सर्व तणावे व त्यांच्याबरोबर लागणारी उपकरणे, या सर्व वस्तू गेर्षोनी कुळांनी वहाव्यात; आणि या सामानासंबंधी जे काही काम पडेल ते त्यांनी करावे; BSB BSB: the curtains of the courtyard, and the curtains for the entrance at the gate of the courtyard that surrounds the tabernacle and altar, along with their ropes and all the equipment for their service. The Gershonites will do all that needs to be done with these items.
27 ULB गेर्षोनी लोकांनी त्यांना नेमून दिलेली कामे वाहने आणि जी सर्व सेवा, अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या आज्ञेवरून करावी. त्यांचा भार त्यांच्याकडे सोपवावा. BSB BSB: All the service of the Gershonites—all their transport duties and other work—is to be done at the direction of Aaron and his sons; you are to assign to them all that they are responsible to carry.
28 ULB गेर्षोनी कुळातील लोकांची दर्शनमंडपातली ही सेवा आहे. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्यांच्या हाताखाली त्यांनी कामाची जबाबदारी पार पाडावी. BSB BSB: This is the service of the Gershonite clans at the Tent of Meeting, and their duties shall be under the direction of Ithamar son of Aaron the priest.
29 ULB मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी या प्रमाणे गणती कर. BSB BSB: As for the sons of Merari, you are to number them by their clans and families,
30 ULB म्हणजे तीस ते पन्नास वर्षेच्या वयाच्या दर्शनमंडपामधील सेवा करण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती कर. BSB BSB: from thirty to fifty years old, counting everyone who comes to serve in the work of the Tent of Meeting.
31 ULB दर्शनमंडपाच्या ज्या वस्तू वाहून नेण्याची जबाबदारी त्यांना करावी लागेल ती हीः निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, उथळ्या, वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे. BSB BSB: This is the duty for all their service at the Tent of Meeting: to carry the frames of the tabernacle with its crossbars, posts, and bases,
32 ULB तसेच सभोंवतीच्या अंगणाचे खांब, उथळ्या, तंबूच्या मेखा, तणावे आणि अंगणाच्या खांबासाठी लागणारी इतर उपकरणे, इत्यादी सर्वसामान वाहून नेण्याचे व निगा राखण्याचे काम मरारी लोकांचे आहे. त्या मनुष्यांच्या नावांची यादी करा व प्रत्येकाने नक्की काय वाहून न्यायचे ते त्यास सांगा. BSB BSB: and the posts of the surrounding courtyard with their bases, tent pegs, and ropes, including all their equipment and everything related to their use. You shall assign by name the items that they are responsible to carry.
33 ULB दर्शनमंडपाची कामे करिताना मरारी कुळातील पुरुषांनी ही सेवा करावी त्यांच्या कामासाठी अहरोन याजकाचा मुलगा इथामार हा जबाबदार राहील. BSB BSB: This is the service of the Merarite clans according to all their work at the Tent of Meeting, under the direction of Ithamar son of Aaron the priest.”
34 ULB मोशे, अहरोन व इस्राएलाच्या मंडळीचे पुढारी ह्यानी कहाथी लोकांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती केली. BSB BSB: So Moses, Aaron, and the leaders of the congregation numbered the Kohathites by their clans and families,
35 ULB त्यांनी, दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती केली. BSB BSB: everyone from thirty to fifty years old who came to serve in the work at the Tent of Meeting.
36 ULB ज्या पुरुषांची त्यांच्या वंशाप्रमाणे गणती झाली ते दोन हजार सातशे पन्नास लोक होते. BSB BSB: And those numbered by their clans totaled 2,750.
37 ULB कहाथी वंशापैकी जे दर्शनमंडपामध्ये पवित्र सेवा करीत त्यांची गणती करण्यात आली. मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. BSB BSB: These were counted from the Kohathite clans, everyone who could serve at the Tent of Meeting. Moses and Aaron numbered them according to the command of the LORD through Moses.
38 ULB तसेच गेर्षोनी वंशजांचीही, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली; BSB BSB: Then the Gershonites were numbered by their clans and families,
39 ULB म्हणजे दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असलेले तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली. BSB BSB: everyone from thirty to fifty years old who came to serve in the work at the Tent of Meeting.
40 ULB ज्या पुरुषांची, त्यांचे वंश व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती झाली ती दोन हजार सहाशे तीस होती. BSB BSB: And those numbered by their clans and families totaled 2,630.
41 ULB गेर्षोनी कुळांपैकी नोंद घेतलेले जे सर्व दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असत, ज्यांची नोंद मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केली. BSB BSB: These were counted from the Gershonite clans who served at the Tent of Meeting, whom Moses and Aaron counted at the LORD’s command.
42 ULB त्याचप्रमाणे मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली, BSB BSB: And the Merarites were numbered by their clans and families,
43 ULB म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र होते ते सर्व, BSB BSB: everyone from thirty to fifty years old who came to serve in the work at the Tent of Meeting.
44 ULB ज्या पुरुषांची त्यांच्या कुळास अनुसरून गणती झाली ते तीन हजार दोनशे भरले. BSB BSB: The men registered by their clans numbered 3,200.
45 ULB मरारी वंशापैकी ज्या पुरुषांची गणती मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे केली, ते इतके भरले. BSB BSB: These were counted from the Merarite clans, whom Moses and Aaron numbered at the LORD’s command through Moses.
46 ULB तेव्हा मोशे, अहरोन व इस्राएलाचे पुढारी ह्यानी सर्व लेवी लोकांची गणती, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे केली. BSB BSB: So Moses, Aaron, and the leaders of Israel numbered by their clans and families all the Levites
47 ULB तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या व दर्शनमंडपामधील सेवा करण्यास व ओझे वाहण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली; BSB BSB: from thirty to fifty years old who came to do the work of serving and carrying the Tent of Meeting.
48 ULB त्यांची एकूण संख्या आठ हजार पांचशे ऐंशी होती. BSB BSB: And the number of men was 8,580.
49 ULB तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याची गणती करण्यात आली; प्रत्येक मनुष्यास त्याने स्वत: करावयाचे काम नेमून देण्यात आले व त्याने काय वाहून न्यावयाचे ते सांगण्यात आले. हे सर्व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे करण्यात आले. BSB BSB: At the LORD’s command through Moses they were numbered, and each one was assigned his work and burden, as the LORD had commanded Moses.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.