1 ULB हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस? BSB BSB: Why, O LORD, do You stand far off? Why do You hide in times of trouble?
2 ULB कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो. BSB BSB: In pride the wicked pursue the needy; let them be caught in the schemes they devise.
3 ULB कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो; दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो. BSB BSB: For the wicked man boasts in the cravings of his heart; he blesses the greedy and reviles the LORD.
4 ULB दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही. कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही. BSB BSB: In his pride the wicked man does not seek Him; in all his schemes there is no God.
5 ULB त्याचे मार्ग उन्नतीचे असतात, परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत, तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो. BSB BSB: He is secure in his ways at all times; Your lofty judgments are far from him; he sneers at all his foes.
6 ULB तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही; संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही. BSB BSB: He says to himself, “I will not be moved; from age to age I am free of distress.”
7 ULB त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरलेले आहेत. त्यांची जीभ जखमी व नाश करते. BSB BSB: His mouth is full of cursing, deceit, and violence; trouble and malice are under his tongue.
8 ULB तो गावाजवळ टपून बसतो, गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो; त्याचे डोळे लाचारावर टपून असतात. BSB BSB: He lies in wait near the villages; in ambush he slays the innocent; his eyes watch in stealth for the helpless.
9 ULB जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो. BSB BSB: He lies in wait like a lion in a thicket; he lurks to seize the oppressed; he catches the lowly in his net.
10 ULB त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात. ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात. BSB BSB: They are crushed and beaten down; the helpless fall prey to his strength.
11 ULB तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही. BSB BSB: He says to himself, “God has forgotten; He hides His face and never sees.”
12 ULB हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. गरीबांना विसरु नकोस. BSB BSB: Arise, O LORD! Lift up Your hand, O God! Do not forget the helpless.
13 ULB दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो? BSB BSB: Why has the wicked man renounced God? He says to himself, “You will never call me to account.”
14 ULB तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो, लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे. BSB BSB: But You have regarded trouble and grief; You see to repay it by Your hand. The victim entrusts himself to You; You are the helper of the fatherless.
15 ULB दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक, त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही. BSB BSB: Break the arm of the wicked and evildoer; call him to account for his wickedness until none is left to be found.
16 ULB परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे, राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत. BSB BSB: The LORD is King forever and ever; the nations perish from His land.
17 ULB हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे. BSB BSB: You have heard, O LORD, the desire of the humble; You will strengthen their hearts. You will incline Your ear,
18 ULB पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये. BSB BSB: to vindicate the fatherless and oppressed, that the men of the earth may strike terror no more.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.