1 ULB हे परमेश्वरा, दावीदाकरता त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर. BSB BSB: A song of ascents. O LORD, remember on behalf of David all the hardships he endured,
2 ULB त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर. BSB BSB: how he swore an oath to the LORD, and vowed to the Mighty One of Jacob:
3 ULB तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही. BSB BSB: “I will not enter my house or get into my bed,
4 ULB मी आपल्या डोळ्यांवर झोप किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही. BSB BSB: I will not give sleep to my eyes or slumber to my eyelids,
5 ULB परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.” BSB BSB: until I find a place for the LORD, a dwelling for the Mighty One of Jacob.”
6 ULB पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले; आम्हास तो जारच्या रानात सापडला. BSB BSB: We heard that the ark was in Ephrathah; we found it in the fields of Jaar.
7 ULB आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ; आम्ही त्याच्या पदासनापाशी आराधना करू आणि म्हणू. BSB BSB: Let us go to His dwelling place; let us worship at His footstool.
8 ULB हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये, BSB BSB: Arise, O LORD, to Your resting place, You and the ark of Your strength.
9 ULB तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत; तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत. BSB BSB: May Your priests be clothed with righteousness, and Your saints shout for joy.
10 ULB तुझा सेवक दावीदाकरिता, तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस. BSB BSB: For the sake of Your servant David, do not reject Your anointed one.
11 ULB परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे; तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही, मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन. BSB BSB: The LORD swore an oath to David, a promise He will not revoke: “One of your descendants I will place on your throne.
12 ULB जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला, आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील. BSB BSB: If your sons keep My covenant and the testimony I will teach them, then their sons will also sit on your throne forever and ever.”
13 ULB खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे; त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे. BSB BSB: For the LORD has chosen Zion; He has desired it for His home:
14 ULB “ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे; मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे. BSB BSB: “This is My resting place forever and ever; here I will dwell, for I have desired this home.
15 ULB मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन; मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन. BSB BSB: I will bless her with abundant provisions; I will satisfy her poor with bread.
16 ULB मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन; तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील. BSB BSB: I will clothe her priests with salvation, and her saints will sing out in joy.
17 ULB तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन; तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे. BSB BSB: There I will make a horn grow for David; I have prepared a lamp for My anointed one.
18 ULB मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.” BSB BSB: I will clothe his enemies with shame, but the crown upon him will gleam.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.